दृष्टी

Submitted by पुरंदरे शशांक on 6 May, 2013 - 01:46

दृष्टी

त्यांची होते कशी वारी
माझी नित्य फिराफिरी

त्यांना होतो तो सोहळा
इथे गोंधळ सावळा

निसर्गचि त्यांना सखा
झालो मी का त्या पारखा

सूरताल त्यांना साथी
मला गोंगाट का होती

काय करावे कर्मासी
जशी दृष्टी तशी सृष्टी ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या (ही) कवितेत काही प्रश्न दिसले व थोडक्यात बरेच काही म्हणून गेल्यासारखे वाटले. 'याही' म्हणण्याचे कारण नुकतीच 'असे का होते' ही कविता वाचून त्यावर प्रतिसाद देऊन येथे आलो.

शशांक, मस्त कविता. तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहित आहे आणि ते शेवटच्या कडव्यात आहे Happy

प्रस्तावनेत ४-५ कडवी व अतीशय प्रभावी २ ओळीत समारोप असे असले तरी बॅलन्स साधला गेलाय म्हणून वाटते आहे की नेमकी नेटकी आली आहे कविता

मला खूप आवडली

एखाद्या शेरातून जसा एखादा विरोधाभास पकडावा तसे काहीसे प्रत्येक दोन ओळीत सापडले ..मुसल्सल गझलेसारखी मजा आली

(अभंगच हा .....तुकोबाराय दिसताय्तच कवितेत!! :))

धन्यवाद शशांकजी