Submitted by विनायक उजळंबे on 25 April, 2013 - 04:59
तुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी
व्यथांचेच सारे महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?
जरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,
कशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥
तुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,
खळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू चंद्र खग्रास होतो ॥
फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .
सुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी पालवी ये ..
मला सावराया तुझे हात येता ,उगा फार बेचैन मग श्वास होतो..!
किती शेर लिहितो , किती दाद घेतो , उला छान होतो ,कडेलोट सानी,
मनातून माझ्याच आवाज येतो ,तुझ्या नावचा मीसरा खास होतो ॥
विनायक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! बरेच दिवसांनी इथे
मस्त! बरेच दिवसांनी इथे कविता पोस्ट केलीत
मस्तच
मस्तच
फेसबुकवर वाचलीच होती तुमचे
फेसबुकवर वाचलीच होती
तुमचे जबरदस्त कवित्व शब्दाशब्दातून ओसंड्ते आहे इथे
क्या बात है ..... अतिशय सुंदर
क्या बात है ..... अतिशय सुंदर रचना ...
सुरेख.. आधी वाचलिये..
सुरेख.. आधी वाचलिये..
खळी़कंस हा शब्द पहिल्यांदाच
खळी़कंस हा शब्द पहिल्यांदाच वाचला. नक्की काय अर्थ आहे?
फुलोनी पहाटेस प्राजक्त येता
फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .>>>>>>>.
वाह भाऊ, मस्तच रे !