साहित्य

उदासबोध

Submitted by झुलेलाल on 15 February, 2015 - 00:01

ज्याच्या खांद्यावर, शरदाचा हात
तो गेला गाळात, हेचि सत्य...

कसे नाकळे हे, मानवी इंद्रास
कसला हा ध्यास, मित्रत्वाचा...

वर अभिमाने, सांगतो जगास
संपेना दिवस, सल्ल्याविना...

बहुत जनांसी, लागले आकळू
कुल्ल्यावरी गळू , पिकलेले...

वाढता वाढते, कशी ठुसठुस
परि ती कुणास, सांगू कैसी...

ठाम तो निर्णय, आणि ठोस कृती
गेली सांगुनिया, बारामती

बसा घेऊनिया, हातावर हात
कमळाचा जन्म, गाळात गाळात...

माझ्याकडची ई-पुस्तके (पीडीएफ फाईल्स)

Submitted by हर्ट on 13 February, 2015 - 10:05

इथे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यिक ई-पुस्तकांची यादी लिहा. मराठी, हिन्दी, इंग्रजी कुठलीही. जर आपल्यापैकी कुणाला एखादे पुस्तक हवे असेल तर मग ते पुस्तक ई-मेल करुन पाठवता येईल. नेटवर ई-पुस्तके बर्‍यापैकी मिळतात पण कधीकधी हवी ती पुस्तके मिळत नाही. धन्यवाद.

विषय: 

मोफत मराठी पुस्तकं

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

ही लिंक कुठे टाकायची हे नक्की न कळल्यानी इथे देतो आहे:
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...

४४४ पुस्तकं महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2015 - 22:01

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥९८१||

हरवलेली लेखिका - मेघना पेठे

Submitted by हर्ट on 7 February, 2015 - 11:28

मी मेघना पेठेंचा निस्सिम चाहता आहे. ह्या लेखिकेनी अनेक वर्षांपासून काही लिहिलेले दिसत नाही. म्हणजे दोन कथासंग्रह आणि एक कादंबरी, अधूनमधून दिवाळी अंकासाठी लिहिलेले थोडे साहित्य ह्या खेरीज अजून काही त्यांनी लिहिलेलं वाचलेलं नाही.

आज सहज गुगलवर मेघना पेठेंना शोधलं आणि ह्या ३ सुंदर मुलाखती ऐकायला मिळ्यात मेघना पेठेंनी दिलेल्या:

https://www.youtube.com/watch?v=yn2pp2vHYrE

मी फक्त एकाच अंकाची लिंक दिली पण तिथल्या तिथे उर्वरीत दोन भाग मिळतील.

विषय: 

उर्दू ग़ज़ल- काही शतकांचा प्रवास- ३

Submitted by समीर चव्हाण on 7 February, 2015 - 06:48

ही मालिका लिहायला घेतल्यानंतर मला हा प्रश्न भेडसावत होता की आपल्या यादीमध्ये अमीर खु़सरो सारखा मोठा कवी आणि अभ्यासक नाही. त्याची अनेक कारणे आहेत.
काही कारणे बहुधा त्याचे पुढील खुसरोचा शेर पाहिल्यावर स्पष्ट व्हावीत:

जब यार देखा नैनभर, दिलकी गयी चिन्ता उतर
ऐसा नही कोई अजब राखे उसे समझाय कर

वरील द्विपदी वाचल्यावर स्पष्ट होते की उर्दू गझल तेव्हा आरम्भिक अवस्थेत होती.

विषय: 
शब्दखुणा: 

तुला बक्षिस मिळालं म्हणून, खंडेराव!

Submitted by खंडेराव on 7 February, 2015 - 05:36

खंडेराव, तुला मिळालेल्या बक्षिसामुळे आता उदाहरणार्थ दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्या.

विषय: 

कुठे आहे कळेना मी

Submitted by वैवकु on 6 February, 2015 - 05:23

इथे आहे तिथे आहे कुठे आहे कळेना मी
कधीचा शोधतो आहे मला काही मिळेना मी

कुठे नेणार आहे ही सरळ चालायची वृत्ती
मला कळले जरी आहे तरीसुद्धा वळेना मी

तुझे हळुवार श्वासांनी किती कुरवाळुनी झाले
तरी का भळभळत आहे मुळीही साकळेना मी

असा काही तुझ्यावरती अता मी भाळलो आहे
कितीदा पाहुनी झाले मलासुद्धा चळेना मी

कितीदा आग लावावी कितीदा देह जाळावा
कितीदा भान जाळावे तरीसुद्धा जळेना मी

तुझ्या ह्या बांधकामाची जगाला ह्यामुळे ईर्षा
जगाच्या पाडकामांनी जराही ढासळेना मी

~वैवकु

इंग्रजी स्पेलिंग्ज आणि उच्चार इतके तर्कशून्य का?

Submitted by स्वीट टॉकर on 3 February, 2015 - 02:56

माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना.

किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या चिखलात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती.

समजून घ्या

Submitted by वैवकु on 28 January, 2015 - 01:34

मी किती समजावतो आहे चला समजून घ्या
शब्द वेडे वाटले तर मामला समजून घ्या

या इथे कोणी न माझे गाव हे माझे कुठे
मी जरी परकाच आहे आपला समजून घ्या

देवभोळ्या भाविकांची ही कुणी दिंडी नव्हे
चालला आहे गझलचा काफला समजून घ्या

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या

वाटते आहे मलाही की... नको थांबायला
ओघ माझ्या वेदनांचा थांबला समजून घ्या

Pages

Subscribe to RSS - साहित्य