पर्जन्य

इंद्रधनू

Submitted by पाषाणभेद on 27 July, 2019 - 18:31

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पडू द्या सरिवर सरी

Submitted by SuhasPhanse on 15 July, 2012 - 04:55

पडू द्या सरिवर सरी

(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)

वीज कन्यका तळपत पाहुनी,
मेघ गर्जना करी ।
पडू द्या सरिवर सरी हो सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥

आकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,
पर्जन्याच्या सरी ।
पर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥

घेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,
भरुनी पाण्याच्या घागरी
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पर्जन्य