हा आणीबाणीच्या काळात रिलीज झाला होता ना? निवृत्त पोलिसाने कायदा हातात घेऊन स्वतः खलनायकाला ठार मारणं सरकारला पटलं नाही आणि त्यामुळे शेवट बदलायला लावला असं ऐकून आहे. मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही.
Submitted by हरचंद पालव on 14 December, 2025 - 18:40
मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही.>> हो मलाही मोराल म्हणुन पटणार नाही. पण चित्रपटात एतना सन्नाटा वाल्या सीन मध्ये एक डायलॉग आहे गाववाल्या च्या तोंडी
"इस खून खराबेसे क्या होगा ,भला अहिंसा भी कोई चीज होती हैं."
तेंव्हा ठाकूर बोलतो
"अहिंसा को मैं भी मानता हु लेकींन एक दुष्ट पापी के सामने सर झुकाना कायरता है बुजद्दीली है"
आणि ठाकूर बुजद्दील नसतो त्यामुळे हाच शेवट लोकांना आवडला असावा. शेवटी गब्बर हा एक क्रूरकर्मा डाकू असतो त्याने केलेल्या कर्माची शिक्षा त्याला मिळायला हवी असं वाटलं तर त्यात चूक नाहीये. एक शोले चहाती म्हणून मला हा शेवट आवडला .
डायलॉग्स च्या कौतुकात लेखक सलीम जावेद यांना श्रेय द्यायचं राहून गेलं.काय अप्रतिम डायलॉग्स लिहिलेत या जोडीने चित्रपटाच्या कौतुकामध्ये लेखकाचं कौतुक नेहमी झाकलं जातं या चित्रपटात असं होत नाही. सलीम जावेद हे नाव यातल्या उत्कृष्ठ डायलॉग्स साठी ओळखले जातात आणि कायम ओळखले जातील.
मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही. >> ही अगदी "मै तुम्हारे सामने पेंट पहनकर. नही, लुंगी पहनके खडा हूं" केस झाली .
अब तक छप्पन जुनं झाल्याच्या काळात शोलेकडून आजही या अपेक्षा ठेवल्या जातात हे ही एक प्रकारचं यशच म्हटलं पाहीजे.
इस खून खराबेसे क्या होगा ,भला अहिंसा भी कोई चीज होती हैं >> हे दुसरं टोक झालं. मला गब्बर विरुद्ध अहिंसा तर अजिबात मान्य नाही. भला कायदेशीर मार्ग, फाशी वगैरे भी कोई चीज होती है. उद्या एखादा भ्रष्ट निवृत्त पोलिस अधिकारी आपल्या जुन्या शत्रूला असंच कायदा हातात घेऊन ठार मारू लागला तर हे कोण कोर्टात सिद्ध करत बसणार की गब्बरची गोष्ट वेगळी होती, इथे मेलेला माणूस victim आहे वगैरे. अंधाधुंद कारभार होण्याची पहिली पायरी आहे ही.
Submitted by हरचंद पालव on 14 December, 2025 - 21:35
सिमरन करेक्ट. संजीवकुमार धर्मेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो तो प्रसंग फारच आवडला मलाही.
संजीवकुमारचे जे वर्तमानकाळातले शॉट्स आहेत, त्यांत त्याच्या चेहऱ्यावर काहीही भावभावना दिसत नाही. एक दगडी चेहरा घेऊन तो वावरतो. घरच्यांच्या खुनांच्या आधीच्या प्रसंगांमध्ये मात्र तो नॉर्मल आहे. त्या धक्क्याने तो बधीर झालेला आहे. तो कदाचित एकदाही रडलेला नाही. तो थेट गब्बरला मारून, क्लोजर मिळाल्यानंतर ढसाढसा रडतो. तेही धर्मेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून, ज्याने नुकताच सख्ख्या मित्राचा मृत्यू अनुभवला आहे. त्या दोघांच्यातल्या या प्रसंगानंतर शेवटच्या स्टेशनवरच्या प्रसंगात जेव्हा संजीवकुमार धर्मेंद्रला म्हणतो की मैं तुम्हारा दुख बाँट तो नहीं सकता, लेकिन समझ जरूर सकता हूँ, तेव्हा ते परफेक्ट वाटतं.
संजीवकुमार ग्रेट. मनातली टोकाची सुडाची भावना दाबून ठेवणारा दगडी चेहरा, आवाजही थंड, तरीही प्रसंगी चिरत जाणारा. आणि शेवटचा निचरा..
शोले यापूर्वी असंख्य वेळा बघितलेला असूनही थिएटरमध्ये बघताना जास्त 'फोकस'ने बघितला गेला आणि काही बारकावे लक्षात आले.
शोले यापूर्वी असंख्य वेळा बघितलेला असूनही थिएटरमध्ये बघताना जास्त 'फोकस'ने बघितला गेला आणि काही बारकावे लक्षात आले.+1 यासाठीच मला थेटरात बघायचा होता तिथे कोणी डिस्टर्ब करत नाही नाहीतर घरी पाणी आण ,दार उघड यांच्यात पिच्चरचे मेन सीन जातात.
पण शोले बघताना घरातले डिस्टर्ब करत नाहीत इतका सगळ्यांच्या आवडीचा मुवि आहे खूप चांगल्या मेमरीज आहेत माझ्या आठवणीत. लहानपणी पहिल्यांदा टीव्ही वर पाहताना वडिलांनी पिच्चरच्या 70 mm च्या साऊंड च्या सांगितलेल्या गोष्टी,नंतर मी आणि भावाने केलेली पारायणं ,कुठूनही पिच्चर लागला तरी दोघे पाहायचो , असंख्य वेळा पाहिलेली गाणी आणि पाठ झालेले सगळे डायलॉग्स.
वेगळा धागा काढा. Proud>> माबो वर असेल ना शोले चा धागा
धुरंधर पाहिला...
मला फारसा आवडला नाही.. ये जनता मुझे माफ करेगी क्या ?
एकट्या रणवीर च्या जीवावर पुर्ण वेळ बसुन पाहिला.. रणवीर बेस्टेस्ट बेस्ट .. बॉडी लँग्वेज, डोळे, एक्सप्रेशन्स, २६/११ च्या प्रसंगात हतबल होउन समोर चालु असलेला तमाशा बघणारा रणवीर.. ..भारीच.
बाकी सगळा चित्रपट तुटक तुटक.. .... उगीच लांबवला आहे.....
खप्पड अक्षय खन्ना..कुठलासा टर्मिनल आजार झाल्यासारखा दिसतोय.. शेवटच्या मारामारीत अजिबात शोभत नाही.
संजय दत्त कोणत्याही क्षणी " क्या मामु, विनम्रता से बात करनेका" असं म्हणेल असं वाटतं...
माधवन चे काही संवाद ऐकुच आले नाहीत..
२६/११ चे संवाद मधेच रेड स्क्रीन करुन का दाखवले ? ही डॉक्युमेंट्री नाहीये.. डोवल किंवा अन्य मंडळींच्या तोंडी आले असते तरी चाललंच असतं..२६/११ वर अनेक पुस्तके, डॉक्युमेट्रीज, वेब सिरीज आलेल्या आहेत त्यात हे सगळं उत्तम पद्धतीने दाखवलंय..
भारतात निरोप पोचवण्यासाठी रणवीर काय आणी कसं नेटवर्क वापरत असतो ? निरोप कसे जात असतात हे पण कळलं नाही....
राझी शी तुलना झाली माझी नकळत.. पण असो...एकंदर दिग्दर्शन आवडले नाही..
रणवीर आणि गाणी आवडली.. जुन्या गाण्यांचा वापर मस्त...
Submitted by स्मिता श्रीपाद on 15 December, 2025 - 00:37
'शोले' हा भारतीय चित्रपटांच्या नभांगणातला 'ध्रुव तारा' म्हणता येण्यासारखा चित्रपट आहे! आत्तापर्यंत कितीवेळा तो पहिला असेल ह्याची मोजदात नाही, सगळे प्रसंग आणि संवाद पाठ झाले होते. मला वाटतं दोनेक दशकांपूर्वीची गोष्ट असेल... 'फिल्मी' चॅनलवर "ये शोले हम नहीं भूलेंगे" नावाचा त्या चित्रपटापेक्षी जास्त लांबीचा एक खूप छान कार्यक्रम बघितला होता.
'शोले'च्या चित्रीकरणापासून ते त्याचे कथालेखन, संवाद लेखन, त्यातल्या जवळपास सर्व पात्रांची नावे कशी ठेवली गेली (उदा. प्रत्यक्ष जीवनात रमेश सिप्पींची हजामत करणाऱ्या कारागीराचे 'हरिराम नाई' हे केष्टो मुखर्जीला दिलेले नाव) अशा बारीक-सारीक तपशिलांचाही समावेश असलेला हा कार्यक्रमपण मला शोले चित्रपटाएवढाच आवडला होता. कोणाला पाहिल्याचे आठवते आहे का हा कार्यक्रम?
दुर्दैवाने हे चॅनल पुढे बहुतेक बंद पडले त्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा पाहण्याची खूप इच्छा असली तरी त्याचा रिपीट टेलिकास्ट काही पाहता आला नाही. जालावर आणि युट्युब, व्हिमिओवरही खूप शोधाशोध करून पहिली पण तो कुठेच सापडला नाही. DTH - सेटटॉप बॉक्सचे आगमन होण्यापूर्वीचा हा कार्यक्रम असल्याने आतासारखे एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवण्याचीही तेव्हा काही सोय नव्हती हे डबल दुर्दैव!
सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही शोलेला शिव्या घालणारे, तो आवडला नसल्याचे सांगणारे भेटले आहेत. सुरुवातीला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे, पण नंतर एखादा चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार, अभिनेता, अभिनेत्री आवडणे किंवा न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष असते हे पूर्णपणे पटल्यावर मग त्याचेही काही वाटेनासे झाले... पसंद अपनी अपनी... और क्या?
बाकी शोलेला सिप्पींचा 'बेअरर चेक' म्हंटले जायचे ते काही खोटे नव्हते, कधीही पैशांची गरज लागली कि करा पुनःप्रदर्शित हा 'चेक' वटणार ह्याची निश्चिती असायची! ह्यावेळी मात्र या चित्रपटाने पहिल्या ३ दिवसांत फक्त ९५ लाखांचा व्यवसाय केल्याची 'Sacnilk' ह्या विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या संस्थळाने जाहीर केलेली आकडेवारी पाहून त्याच्या पुनःप्रदर्शनाची वेळ थोडी चुकल्यासारखे वाटत आहे.
Submitted by संजय भावे on 15 December, 2025 - 01:00
एखाद दुसरा शो आहे. ते ही गैरसोयीच्या वेळी. आम्हाला ६.१५ चा शो त्यातल्या त्यात सोयीचा होता आणि जास्त लांब नव्हता. डिसेंबर एण्ड ला रिलीज झाला असता तर बरं झालं असतं.
डायलॉग्स च्या कौतुकात लेखक सलीम जावेद यांना श्रेय द्यायचं राहून गेलं.काय अप्रतिम डायलॉग्स लिहिलेत या जोडीने चित्रपटाच्या कौतुकामध्ये लेखकाचं कौतुक नेहमी झाकलं जातं या चित्रपटात असं होत नाही. सलीम जावेद हे नाव यातल्या उत्कृष्ठ डायलॉग्स साठी ओळखले जातात आणि कायम ओळखले जातील.>>> अगदी, शोलेच्या डायलॉग्स विथ बीजीएमच्या कॅसेट्स होत्या का कुणाकडे?
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 15 December, 2025 - 02:04
अगदी, शोलेच्या डायलॉग्स विथ बीजीएमच्या कॅसेट्स होत्या का कुणाकडे?>>> आमच्याकडे होती शोलेच्या डॉयलॉगची कॅसेट...इतक्या वेळा लागायची..शेजार पेजार,मित्रमन्डळ घेवुन जायच.दादाने ती पुण्याहुन आणली होती...पुलचे बरेच कथाकथन म्हैस, असामी असामी, रावसाहेब हरितात्या सगळ सतत एकुन तोन्डपाठ होते.
Submitted by प्राजक्ता on 15 December, 2025 - 03:26
जय - अजय देवगण
वीरू - शाहरूख खान
गब्बर सिंग - सयाजी शिंदे / नवाजुद्दीन सिद्दीकी
ठाकूर - मनोज वाजपेयी / पंकज त्रिपाठी
बसंती - animal ची हिरॉइन अवघड नाव असलेली.
जेलर - कपिल शर्मा
सुरमा भोपाली - कृष्णा
अहमद - सचिन
शोले सर्च केलं तर हे https://www.maayboli.com/search#gsc.tab=0&gsc.q=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4... धागे सापडले यात जुन्या माबोवर एक धागा केदार जोशी यांचा आहे. पण त्यात लिहिता येत नाही पण त्यांनी फार छान पोस्टी लिहिल्या आहेत.एक 2011 चा धागा आहे पण तो ठाकुरच्या हातावर आहे .बाकी वेगळ्याच धाग्यानमध्ये शोलेचा उल्लेख आहे .
प्रॉपर हा एकच https://www.maayboli.com/node/85513रघु आचार्य यांचा धागा आहे ज्यात शोलेवर चर्चा आहे त्यांनी नावात फक्त रिलीज डेट दिलेय .शोले हे नांव दिलं असतं तर धाग्यावर लक्ष गेलं असतं ,इथल्या मानाने फारच कमी प्रतिसाद आहेत. त्यावरच लिहिणं योग्य वाटतंय.
नाही https://www.maayboli.com/node/23827 या नितीन बोरगे यांच्या धाग्यावर विनोद नाहीयेत पण फोकस ठाकुरच्या कुर्त्यातून दिसणाऱ्या हातावर आहे. यातल्या शेवटच्या पोस्टमध्ये ठाकुरने गब्बरला मारल्याच्या शेवटाचा उल्लेख आहे.
पुलचे बरेच कथाकथन म्हैस, असामी असामी, रावसाहेब हरितात्या सगळ सतत एकुन तोन्डपाठ होते. सेम सेम .. अजुन आमच्याकडे राम नगरी , द .मा . मिरासदार , शंकर पाटील यांचे कथा कथन , वर्हाड निघाले लंडनला , दादू इंदुरीकरांचे गाढवाचं लग्न , जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांचे मिमिक्री ची , बाबासाहेव पुरंदर्यांचे शिव कल्याण राजा मधील हिरकणी ची कथा, प्रतापराव गुजरांची वेडात मराठे वीर दौडले सात ची कथा हे सगळं ऐकलय.
हा आणीबाणीच्या काळात रिलीज
हा आणीबाणीच्या काळात रिलीज झाला होता ना? निवृत्त पोलिसाने कायदा हातात घेऊन स्वतः खलनायकाला ठार मारणं सरकारला पटलं नाही आणि त्यामुळे शेवट बदलायला लावला असं ऐकून आहे. मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही.
मला प्रेक्षक म्हणून त्याने
मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही.>> हो मलाही मोराल म्हणुन पटणार नाही. पण चित्रपटात एतना सन्नाटा वाल्या सीन मध्ये एक डायलॉग आहे गाववाल्या च्या तोंडी
"इस खून खराबेसे क्या होगा ,भला अहिंसा भी कोई चीज होती हैं."
तेंव्हा ठाकूर बोलतो
"अहिंसा को मैं भी मानता हु लेकींन एक दुष्ट पापी के सामने सर झुकाना कायरता है बुजद्दीली है"
आणि ठाकूर बुजद्दील नसतो त्यामुळे हाच शेवट लोकांना आवडला असावा. शेवटी गब्बर हा एक क्रूरकर्मा डाकू असतो त्याने केलेल्या कर्माची शिक्षा त्याला मिळायला हवी असं वाटलं तर त्यात चूक नाहीये. एक शोले चहाती म्हणून मला हा शेवट आवडला .
डायलॉग्स च्या कौतुकात लेखक सलीम जावेद यांना श्रेय द्यायचं राहून गेलं.काय अप्रतिम डायलॉग्स लिहिलेत या जोडीने चित्रपटाच्या कौतुकामध्ये लेखकाचं कौतुक नेहमी झाकलं जातं या चित्रपटात असं होत नाही. सलीम जावेद हे नाव यातल्या उत्कृष्ठ डायलॉग्स साठी ओळखले जातात आणि कायम ओळखले जातील.
मला प्रेक्षक म्हणून त्याने
मला प्रेक्षक म्हणून त्याने ठार मारण्याचा शेवट जास्त आवडेल, पण एक मोराल म्हणून पटणार नाही. >> ही अगदी "मै तुम्हारे सामने पेंट पहनकर. नही, लुंगी पहनके खडा हूं" केस झाली .
अब तक छप्पन जुनं झाल्याच्या काळात शोलेकडून आजही या अपेक्षा ठेवल्या जातात हे ही एक प्रकारचं यशच म्हटलं पाहीजे.
गब्बरला शेवटी पोलिस अटक करतात
गब्बरला शेवटी पोलिस अटक करतात ना? त्याच्या कृत्यांची शिक्षा त्याला कायद्यानुसार आणि कायद्याने मिळणार होतीच. सोडून कुठे दिले त्याला?
इस खून खराबेसे क्या होगा ,भला
इस खून खराबेसे क्या होगा ,भला अहिंसा भी कोई चीज होती हैं >> हे दुसरं टोक झालं. मला गब्बर विरुद्ध अहिंसा तर अजिबात मान्य नाही. भला कायदेशीर मार्ग, फाशी वगैरे भी कोई चीज होती है. उद्या एखादा भ्रष्ट निवृत्त पोलिस अधिकारी आपल्या जुन्या शत्रूला असंच कायदा हातात घेऊन ठार मारू लागला तर हे कोण कोर्टात सिद्ध करत बसणार की गब्बरची गोष्ट वेगळी होती, इथे मेलेला माणूस victim आहे वगैरे. अंधाधुंद कारभार होण्याची पहिली पायरी आहे ही.
"मै तुम्हारे सामने पेंट पहनकर
"मै तुम्हारे सामने पेंट पहनकर. नही, लुंगी पहनके खडा हूं" केस झाली >>
अगदीच! सही पकडे हैं
शेवटच्या मारामारीत एकही डाकू
शेवटच्या मारामारीत एकही डाकू मरताना दाखवला नाही का?
की फक्त गब्बर पुरते अहिंसा होती?
सर्व डाकूंना मारल्याबद्दल
सर्व डाकूंना मारल्याबद्दल तिघांवर निदान खटला भरण्यात यावा मायलॉर्ड
वेगळा धागा काढा.
वेगळा धागा काढा.
बच्चा बच्चा भी जानता है !
सिमरन करेक्ट. संजीवकुमार
सिमरन करेक्ट. संजीवकुमार धर्मेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो तो प्रसंग फारच आवडला मलाही.
संजीवकुमारचे जे वर्तमानकाळातले शॉट्स आहेत, त्यांत त्याच्या चेहऱ्यावर काहीही भावभावना दिसत नाही. एक दगडी चेहरा घेऊन तो वावरतो. घरच्यांच्या खुनांच्या आधीच्या प्रसंगांमध्ये मात्र तो नॉर्मल आहे. त्या धक्क्याने तो बधीर झालेला आहे. तो कदाचित एकदाही रडलेला नाही. तो थेट गब्बरला मारून, क्लोजर मिळाल्यानंतर ढसाढसा रडतो. तेही धर्मेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून, ज्याने नुकताच सख्ख्या मित्राचा मृत्यू अनुभवला आहे. त्या दोघांच्यातल्या या प्रसंगानंतर शेवटच्या स्टेशनवरच्या प्रसंगात जेव्हा संजीवकुमार धर्मेंद्रला म्हणतो की मैं तुम्हारा दुख बाँट तो नहीं सकता, लेकिन समझ जरूर सकता हूँ, तेव्हा ते परफेक्ट वाटतं.
संजीवकुमार ग्रेट. मनातली टोकाची सुडाची भावना दाबून ठेवणारा दगडी चेहरा, आवाजही थंड, तरीही प्रसंगी चिरत जाणारा. आणि शेवटचा निचरा..
शोले यापूर्वी असंख्य वेळा बघितलेला असूनही थिएटरमध्ये बघताना जास्त 'फोकस'ने बघितला गेला आणि काही बारकावे लक्षात आले.
शोलेत अमिताभ बच्चन शेवटी मरतो
शोलेत अमिताभ बच्चन शेवटी मरतो तेव्हा मला अजुनही डोळ्यातुन पाणी येतं कारण मरण्याचा सीन त्याच्या इतक्या ताकदीने कोणी करु शकत नाही.
शोले यापूर्वी असंख्य वेळा
शोले यापूर्वी असंख्य वेळा बघितलेला असूनही थिएटरमध्ये बघताना जास्त 'फोकस'ने बघितला गेला आणि काही बारकावे लक्षात आले.+1 यासाठीच मला थेटरात बघायचा होता तिथे कोणी डिस्टर्ब करत नाही नाहीतर घरी पाणी आण ,दार उघड यांच्यात पिच्चरचे मेन सीन जातात.
पण शोले बघताना घरातले डिस्टर्ब करत नाहीत इतका सगळ्यांच्या आवडीचा मुवि आहे खूप चांगल्या मेमरीज आहेत माझ्या आठवणीत. लहानपणी पहिल्यांदा टीव्ही वर पाहताना वडिलांनी पिच्चरच्या 70 mm च्या साऊंड च्या सांगितलेल्या गोष्टी,नंतर मी आणि भावाने केलेली पारायणं ,कुठूनही पिच्चर लागला तरी दोघे पाहायचो , असंख्य वेळा पाहिलेली गाणी आणि पाठ झालेले सगळे डायलॉग्स.
वेगळा धागा काढा. Proud>> माबो वर असेल ना शोले चा धागा
शोले यापूर्वी असंख्य वेळा
नाहीये का
धुरंधर पाहिला...
धुरंधर पाहिला...
मला फारसा आवडला नाही.. ये जनता मुझे माफ करेगी क्या ?
एकट्या रणवीर च्या जीवावर पुर्ण वेळ बसुन पाहिला.. रणवीर बेस्टेस्ट बेस्ट .. बॉडी लँग्वेज, डोळे, एक्सप्रेशन्स, २६/११ च्या प्रसंगात हतबल होउन समोर चालु असलेला तमाशा बघणारा रणवीर.. ..भारीच.
बाकी सगळा चित्रपट तुटक तुटक.. .... उगीच लांबवला आहे.....
खप्पड अक्षय खन्ना..कुठलासा टर्मिनल आजार झाल्यासारखा दिसतोय.. शेवटच्या मारामारीत अजिबात शोभत नाही.
संजय दत्त कोणत्याही क्षणी " क्या मामु, विनम्रता से बात करनेका" असं म्हणेल असं वाटतं...
माधवन चे काही संवाद ऐकुच आले नाहीत..
२६/११ चे संवाद मधेच रेड स्क्रीन करुन का दाखवले ? ही डॉक्युमेंट्री नाहीये.. डोवल किंवा अन्य मंडळींच्या तोंडी आले असते तरी चाललंच असतं..२६/११ वर अनेक पुस्तके, डॉक्युमेट्रीज, वेब सिरीज आलेल्या आहेत त्यात हे सगळं उत्तम पद्धतीने दाखवलंय..
भारतात निरोप पोचवण्यासाठी रणवीर काय आणी कसं नेटवर्क वापरत असतो ? निरोप कसे जात असतात हे पण कळलं नाही....
राझी शी तुलना झाली माझी नकळत.. पण असो...एकंदर दिग्दर्शन आवडले नाही..
रणवीर आणि गाणी आवडली.. जुन्या गाण्यांचा वापर मस्त...
नाहीये का Uhoh >>>आहेत.
नाहीये का Uhoh >>>आहेत.
पण जुना धागा शोधून वर काढला / जुना धागा असताना नवीन धागा सुरू केला तरी दोन्ही कडून अडचण.
आमची थोडी सुरुवात गेली. आधी युट्यूबवर नंतर ओटीटी वर य वेळा पाहिला होता. पण धाकट्यांनी नव्हता पाहिला. तरी त्यांना प्रचंड आवडला. बसंती फेवरिट झाली आहे.
'शोले' हा भारतीय
'शोले' हा भारतीय चित्रपटांच्या नभांगणातला 'ध्रुव तारा' म्हणता येण्यासारखा चित्रपट आहे! आत्तापर्यंत कितीवेळा तो पहिला असेल ह्याची मोजदात नाही, सगळे प्रसंग आणि संवाद पाठ झाले होते. मला वाटतं दोनेक दशकांपूर्वीची गोष्ट असेल... 'फिल्मी' चॅनलवर "ये शोले हम नहीं भूलेंगे" नावाचा त्या चित्रपटापेक्षी जास्त लांबीचा एक खूप छान कार्यक्रम बघितला होता.
'शोले'च्या चित्रीकरणापासून ते त्याचे कथालेखन, संवाद लेखन, त्यातल्या जवळपास सर्व पात्रांची नावे कशी ठेवली गेली (उदा. प्रत्यक्ष जीवनात रमेश सिप्पींची हजामत करणाऱ्या कारागीराचे 'हरिराम नाई' हे केष्टो मुखर्जीला दिलेले नाव) अशा बारीक-सारीक तपशिलांचाही समावेश असलेला हा कार्यक्रमपण मला शोले चित्रपटाएवढाच आवडला होता. कोणाला पाहिल्याचे आठवते आहे का हा कार्यक्रम?
दुर्दैवाने हे चॅनल पुढे बहुतेक बंद पडले त्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा पाहण्याची खूप इच्छा असली तरी त्याचा रिपीट टेलिकास्ट काही पाहता आला नाही. जालावर आणि युट्युब, व्हिमिओवरही खूप शोधाशोध करून पहिली पण तो कुठेच सापडला नाही. DTH - सेटटॉप बॉक्सचे आगमन होण्यापूर्वीचा हा कार्यक्रम असल्याने आतासारखे एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवण्याचीही तेव्हा काही सोय नव्हती हे डबल दुर्दैव!
सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही शोलेला शिव्या घालणारे, तो आवडला नसल्याचे सांगणारे भेटले आहेत. सुरुवातीला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे, पण नंतर एखादा चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार, अभिनेता, अभिनेत्री आवडणे किंवा न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष असते हे पूर्णपणे पटल्यावर मग त्याचेही काही वाटेनासे झाले... पसंद अपनी अपनी... और क्या?
बाकी शोलेला सिप्पींचा 'बेअरर चेक' म्हंटले जायचे ते काही खोटे नव्हते, कधीही पैशांची गरज लागली कि करा पुनःप्रदर्शित हा 'चेक' वटणार ह्याची निश्चिती असायची! ह्यावेळी मात्र या चित्रपटाने पहिल्या ३ दिवसांत फक्त ९५ लाखांचा व्यवसाय केल्याची 'Sacnilk' ह्या विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या संस्थळाने जाहीर केलेली आकडेवारी पाहून त्याच्या पुनःप्रदर्शनाची वेळ थोडी चुकल्यासारखे वाटत आहे.
एखाद दुसरा शो आहे. ते ही
एखाद दुसरा शो आहे. ते ही गैरसोयीच्या वेळी. आम्हाला ६.१५ चा शो त्यातल्या त्यात सोयीचा होता आणि जास्त लांब नव्हता. डिसेंबर एण्ड ला रिलीज झाला असता तर बरं झालं असतं.
>>"एखाद दुसरा शो आहे. ते ही
>>"एखाद दुसरा शो आहे. ते ही गैरसोयीच्या वेळी.">>
ओह...
>>"डिसेंबर एण्ड ला रिलीज झाला असता तर बरं झालं असतं.""
करेक्टो... 👍
डायलॉग्स च्या कौतुकात लेखक
डायलॉग्स च्या कौतुकात लेखक सलीम जावेद यांना श्रेय द्यायचं राहून गेलं.काय अप्रतिम डायलॉग्स लिहिलेत या जोडीने चित्रपटाच्या कौतुकामध्ये लेखकाचं कौतुक नेहमी झाकलं जातं या चित्रपटात असं होत नाही. सलीम जावेद हे नाव यातल्या उत्कृष्ठ डायलॉग्स साठी ओळखले जातात आणि कायम ओळखले जातील.>>> अगदी, शोलेच्या डायलॉग्स विथ बीजीएमच्या कॅसेट्स होत्या का कुणाकडे?
अगदी, शोलेच्या डायलॉग्स विथ
अगदी, शोलेच्या डायलॉग्स विथ बीजीएमच्या कॅसेट्स होत्या का कुणाकडे?>>> आमच्याकडे होती शोलेच्या डॉयलॉगची कॅसेट...इतक्या वेळा लागायची..शेजार पेजार,मित्रमन्डळ घेवुन जायच.दादाने ती पुण्याहुन आणली होती...पुलचे बरेच कथाकथन म्हैस, असामी असामी, रावसाहेब हरितात्या सगळ सतत एकुन तोन्डपाठ होते.
नवीन कलाकार घेऊन रीमेक बनवावा
नवीन कलाकार घेऊन रीमेक बनवावा.
जय - अजय देवगण
वीरू - शाहरूख खान
गब्बर सिंग - सयाजी शिंदे / नवाजुद्दीन सिद्दीकी
ठाकूर - मनोज वाजपेयी / पंकज त्रिपाठी
बसंती - animal ची हिरॉइन अवघड नाव असलेली.
जेलर - कपिल शर्मा
सुरमा भोपाली - कृष्णा
अहमद - सचिन
आता असलेला शेवटच पूर्वी पासून
आता असलेला शेवटच पूर्वी पासून असता तर शोले मधे Angry Old Man संजीव कुमार आहे ही चर्चा झाली असती.
शोले सर्च केलं तर हे https:/
शोले सर्च केलं तर हे https://www.maayboli.com/search#gsc.tab=0&gsc.q=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4... धागे सापडले यात जुन्या माबोवर एक धागा केदार जोशी यांचा आहे. पण त्यात लिहिता येत नाही पण त्यांनी फार छान पोस्टी लिहिल्या आहेत.एक 2011 चा धागा आहे पण तो ठाकुरच्या हातावर आहे .बाकी वेगळ्याच धाग्यानमध्ये शोलेचा उल्लेख आहे .
प्रॉपर हा एकच https://www.maayboli.com/node/85513रघु आचार्य यांचा धागा आहे ज्यात शोलेवर चर्चा आहे त्यांनी नावात फक्त रिलीज डेट दिलेय .शोले हे नांव दिलं असतं तर धाग्यावर लक्ष गेलं असतं ,इथल्या मानाने फारच कमी प्रतिसाद आहेत. त्यावरच लिहिणं योग्य वाटतंय.
हो. तिकडे लिहू. इथे बऱ्याच
हो. तिकडे लिहू. इथे बऱ्याच पोस्टी झाल्या. ठाकूरच्या हातावर विनोद आहेत का?
नाही https://www.maayboli.com
नाही https://www.maayboli.com/node/23827 या नितीन बोरगे यांच्या धाग्यावर विनोद नाहीयेत पण फोकस ठाकुरच्या कुर्त्यातून दिसणाऱ्या हातावर आहे. यातल्या शेवटच्या पोस्टमध्ये ठाकुरने गब्बरला मारल्याच्या शेवटाचा उल्लेख आहे.
हो वाचले मी शोधून.
हो वाचले मी शोधून.
माबोचा सर्च ऑप्शन भारी आहे.
माबोचा सर्च ऑप्शन भारी आहे.
आमच्याकडे शोले ची ऑडिओ कैसेट
आमच्याकडे शोले ची ऑडिओ कैसेट होती पूर्ण सिनेमाची. ऐकून ऐकून सगळा सिनेमा पाठ झाला होता.
पुलचे बरेच कथाकथन म्हैस,
पुलचे बरेच कथाकथन म्हैस, असामी असामी, रावसाहेब हरितात्या सगळ सतत एकुन तोन्डपाठ होते. सेम सेम .. अजुन आमच्याकडे राम नगरी , द .मा . मिरासदार , शंकर पाटील यांचे कथा कथन , वर्हाड निघाले लंडनला , दादू इंदुरीकरांचे गाढवाचं लग्न , जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांचे मिमिक्री ची , बाबासाहेव पुरंदर्यांचे शिव कल्याण राजा मधील हिरकणी ची कथा, प्रतापराव गुजरांची वेडात मराठे वीर दौडले सात ची कथा हे सगळं ऐकलय.
माबोचा सर्च ऑप्शन भारी आहे. >
माबोचा सर्च ऑप्शन भारी आहे. >> हो? मी आयपॅड वापरते. त्यावर विचित्रच दिसतं. काहीच शोधता येत नाही नीट.
Pages