चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिस इन्स्पेक्टरला पोत्यात घालून शरद सक्सेना पाण्यात टाकतो ना? मग तो व्हीलचेअरवर कसा काय दिसतो नंतर. वाचतो?

>>>>> +१

कसा वाचतो?

रात अकेली है मधे मी ड्रायव्हर ओमप्रकाशला सिक्युरिटी गार्ड समजलो होतो. त्यामुळं याचा हात असणारच असं वाटलं होतं. पण तो जखमी झाला. शेवटी मात्र त्यानेच पण या कारणासाठी खून केले हे अजिबात पटले नाही. संपूर्ण पिक्चरवर चित्रांगदा सिंग वर आणि गुरू मा वर शक ठेवला. पण शेवटी काही पण दाखवलं. शेवटी शेवटी तर डीजीपी सुद्धा खूनी असेल असं वाटत होतं.

असाच दुसरा इत्तेफाक. पहिल्या इत्तेफाक मधे बेबीनंदा खूनी होती. लहान असताना हा टीव्हीवर आला तेव्हां बेबीनंदा कोण हे पण माहीती नव्हतं. ती दिसल्यावर हीच खूनी आहे असं मोठ्याने ओरदलो तेव्हां आईने कानाखाली सण्णकन ठेवून दिली होती. एका सस्पेन्स साठी सख्खी आई आपल्या बाळाच्या कानाखाली ठेवून देते याचंच फार वाईट वाटलं होतं. तोपर्यंत आई म्हणजे आपल्यासाठी काहीही करू शकते हेच माहिती होतं. पण सस्पेन्स साठी ती कानाखाली वाजवू शकते हे समजल्यापासून सस्पेन्स माझ्या मनातून उतरलं. आता समजतं कि आई शेवटी स्त्रीच.

बन्सल मर्डर्स पाहिला. कथा व सस्पेन्स चांगला आहे पण दोन पोलिस तपास करताहेत स्वतंत्र हे काही पटले नाही.
पण जाउदे.

सतत सगळीकडे भटकुन तपास करणारा पोलिस गाढव निघतो आणि कुठेच न भटकणारा ढोल्या पोलिस बरोबर सस्पेन्स सोडवतो.

पडक्कलम (Padakkalam) - जियो हॉटस्टार
मल्याळम - हिंदी डब

याच्या प्रोमोमध्ये एकजण दुसऱ्याची बॉडी कंट्रोल करताना बघून काहीतरी सुपर नॅचरल आहे याची कल्पना होती. पण नेमका जॉनर कसा आहे हे समजत नव्हते.
आज फेसबुकवर याच्या कौतुकाची एक पोस्ट वाचून लगेच बघितला आणि आवडला.

जुमानजी सारखा एक प्राचीन खेळ दाखवला आहे. जो वापरून एक प्रोफेसर इतरांच्या बॉडीला कंट्रोल करत असतो. आणि तीन कॉलेज स्टूडेंटला त्याचे रहस्य समजल्याने ते त्याच्या मागे लागले असतात.
इंटरवल होता होता अजून एक धमाल सुरू होते. बॉडी स्वॅपिंग!
अ चा आत्मा ब मध्ये, ब चा आत्मा क मध्ये, आणि क चा आत्मा अ मध्ये असा ट्रँगल तयार होतो. चित्रपट अजून वेगवान आणि धमाल होतो.

विषय सुपर नॅचरल असला तरी टिपिकल साउथ इंडियन मसाला आणि अतर्क्य गोष्टी जराही नाहीत. त्यामुळे ते न आवडणारे देखील निश्चिंत बघू शकतात. आवडला तर माझे आभार मानायची बिलकुल गरज नाही. बस दुवाओ मे याद रखना!

काल हूमा कुरैशी, श्रेयस तळपदे आणि सन्नी सिंग ( मलाही हा आठवत नव्हता, तो "बम डिगी बम बम" गाण्यातला- सोनू की टिट्टू का काय) 'सिंगल सलमा' अर्धवट पाहिला.

अतिशय बोअर आहे, अर्ध्यावर सोडून दिला. क्रिंज आणि डेटेड संवाद आहेत. काही गोष्टी वूमन एम्पॉवरमेंटसाठी दाखवलेल्या वाटतात पण त्याही जुनाट आणि तेच तेच वाटल्यात. श्रेयस तळपदे लाल केसांचा पोक्त लखनवी मुस्लिम नवरदेव अजिबात वाटत नव्हता. आणि निरागस दाखवायचे होते बहुतेक पण बावळट वाटत होता. जुन्या मराठी चित्रपटात प्रशांत दामले वगैरे सुंदर- हुशार हिरोईन पाहून जसं ततपप करायचे, तसं ततपप आता कालबाह्य वाटते. नेमकं तेच ततपप ह्यात दिसलं. कालानुरूप 'ततपप' चाललं असतं. हूमा आणि श्रेयसचं लग्न ठरल्यावर ती लंडनला जाते.

सन्नी सिंग तर अतिशय लो एनर्जी जंटलमन, नो केमेस्ट्री. लंडन मधला थर्ड जनरेशन ब्रिटिश. हूमा कुरैशी - वडील बिनकामाचे नवाब म्हणून बापाचा संसार ओढत लग्नाचं वय उलटून गेलेली मुलगी. जी लखनौला स्मार्ट सिटी बनवण्याच्या प्रोजेक्ट निमित्त लंडनला जाते. तेथे सन्नीने सांगितल्यामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदा करते व त्याच्याकडे आकर्षित होते. तेथे बेदिंग सूट घालून चुकून दुसऱ्याच्या फेसबुकवर येते, ती सगळी पोस्टर लखनौ मधे एक माणूस चिकटवतो. लग्न मोडले की काय वगैरे
तुम्ही बघा. मला बोअर झाले. हूमा आवडते म्हणून पहायला घेतला होता. पण श्रेयस आणि सन्नीनी पाहू दिला नाही.

थम्मा नावाचा पिक्चर बघत होतो. रश्मिका मंदाना वर डाऊट होताच. यात ती तिच्या मूळ रूपात दाखवली आहे. आयुष्यमान खुराना गुलाबजाम वाटतो त्यामुळे ती त्याला खात नाही. ती फक्त रक्त पीत असते. नंतर मग कंटाळा आला. पिक्चर जर बंडल काढायचाच असेल तर राजरोस बंडल म्हणून काढावा. अपेक्षाभंग होत नाही. सर्टिफाईड गुंड आणि चोरून गुंड यातला कोण प्रामाणिक.

म्हणुन मग मास जठारा सुरू केला. सर्ट्फाईड कॅटेगरीतला आहे. तिकडचा मिठुन रवी तेजा आहे. डोकं (असेल तर) माळ्यावर काढून ठेवायचं अन बघायचा. टाईमपास होईल. या गाण्याला थांबलोय. शब्दरचना अप्रतिम आहे.

ओ मेरा लौव्वर लौव्वर लौव्वर
मै तुजको दिला फ्लौव्वर्र आ
ओ मेरा लौव्वर लौव्वर लौव्वर
सजाये कानों पे कालीफ्लौव्वर्र ए हे आ आ आ
तुज जैसा भयानही (भाया नही) कोई एव्हर्र
प्यार से तेर्रेग्गालों को बना लु अपना फारेवर
तुज जैसे _कंचे पौधे मे काला प्लेवर
तेरा बापू भी है गली का लोफर

काल मल्याळी ‘एको’ हा चित्रपट पाहिला. (नेफ्लि)

दिनजित अय्यतन या दिग्दर्शकाने जंगलातील प्राणी हे एक पात्र योजुन बनवलेल्या तिन चित्रपटांतील हा शेवटचा. यातल्या एक किश्किंधा कांदलनचा उल्लेख वर आलाय, त्यात जंगली माकडे आहेत. हा नेफ्लिवर नाही Sad

एको या चित्रपटात जंगली कुत्रे हे महत्वाचे पात्र आहे. चित्रपट आवडला. सस्पेन्स खुप मोठा असा नाही वाटला पण दृष्ये व प्रसंगांतुन जे उलगडत जाते ते आपल्याला ठिपके जोडत समजुन घ्यावे लागते आणि तो सस्पेन्स समजला की अंगावर येतो एकदम. एकाही दृष्यात, सुचकतेनेही सुद्धा, जे चाललेय ते नक्की कोणाकोणात सुरु आहे ते दाखवलेले नाही त्यामुळे शेवट धक्कादायक वाटतो.

संरक्षणात ठेवणे आणि बंदी ठेवणे यातली सीमारेषा खुप पुसट आहे अशा अर्थाचे एक वाक्य चित्रपटात दोनदा येते. पहिल्यांदा येते तेव्हा फारसे लक्षात राहात नाही. परत येते तेव्हा हे आधीही आलेय हे लक्षात येते आणि सगळा उलगडा होतो Happy

जंगली कुत्रे यात खुप महत्वाची भुमिका करताना दाखवलेत. ए आय वापरलेय. त्यांचा हिंस्त्रपणा डोळ्यांतुन , दातांतुन व आवाजातुन पकडण्यात खुप यश मिळालेय. बघताना कुत्र्यांची भिती वाटते. मी एरवी कुत्र्यांना अजिबात घाबरत नाही Happy

कलाकार अर्थातच ओळखीचे नाहीत. पियुसचे काम उत्तम झालेय. बाकी सगळ्यांनीही छान कामे केलीत.

हल्ली असे खुप चित्रपट येताहेत ज्यात पडद्याबर सगळे संत्रे सोललेले नसते. आपल्यालाच ते सोलावे लागते. या चित्रपटातले संत्रे मला सोलता आले हे माझे नशिब. नाहीतर केहना क्या चाहते हो भाई म्हणावे लागले असते. शेवटचा एक संवाद मदत करतो पण मला तो व आधीचा सगळा सिक्वेन्स परत पाहावा लागला तेव्हा कुठे संत्र्याने सोलुन घ्यायचे मनावर घेतले. Happy

केरळ कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या निर्मनुष्य जंगलात कथा घडते. अशी निर्मनुष्य जंगले आता कुठे उरताहेत…

जंगलातली दृष्ये छान टिपलीत. त्यात ए आय किती असावे हे टिपणार्‍यालाच माहिती.

साली मोहोब्बत मधलं कुंडीतील झाड बहुधा जीव नसेल घेत , कायमचं जायबंदी करत असावं . त्यामुळं इन्स्पेक्टर वाचला .
दुसरं झाड दुसऱ्या नवऱ्यासाठी .

एक गम्मत ..... हि बाई असे किती नवरे मारणार ? त्यापेक्षा थोडं आत्मपरीक्षण का नाही करत ? असा एक विचार उगीचच केला मी बसल्या बसल्या .

शरद सक्सेना रोपाची कुंडी घेऊन आलेला असतो ? हाच का.>>>>>>> नाही वरचाच प्रश्न पडलेला. रोपाची कुंडी आता दुसर्‍या नवर्‍यासाठी असणार ना? Happy
>>>> स्पॉयलर-मला वाटलं त्या इन्स्पेक्टर साठीच कारण तोच शेवटी लिहून तिचं भांडं फोडू शकतो आणि तीच्यविरोधात सबुत आहे खुनाचा साक्षीदारही. तो त्याच्या मित्र जो दुसरा इन्स्पेक्टर आहे त्याला सांगू शकतो कारण शेवटी तिला पकडली जायचं नाहीये. नवर्याला फक्त भीती दाखवायची असते तिला स्टोरी सांगून.

थम्मा आणि त्यातले लॉजीक अ तिशय बंडल आहे. काय्च्या काय चालू असते. प्राईम वर फ्री दिसला म्हणुन पाहिला.. परेश रावल ला वाया घालवलेय..
रश्मिका ला फार सुंदर वगैरे म्हणुन दाखवलेय पण मला(च) ती फार सुमार अशी वाटते.
मुळ रुपात >> Rofl

रश्मिका ला फार सुंदर वगैरे म्हणुन दाखवलेय पण मला(च) ती फार सुमार अशी वाटते.>>>>रश्मिका अत्यत ओव्हररेटेड आहे...फार सुन्दर वैगरे मलाही ती कधिच वाटली नाही..अभिनय पण यथा तथाच पण नशिब जबरदस्त!!

रश्मिकाचा The girlfriend चित्रपट बघा. छान अभिनय केला आहे.
त्यावर लिहिलेल्या पोस्टमधील एक वाक्य कॉपी पेस्ट करतो.

<<<< रश्मिकाला गेल्या काही काळात बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले हे बरेच जणांना आश्चर्यकारक वाटते. पण ती मस्त अभिनय करते!>>>>

पुरुषप्रधान चित्रपटात सुद्धा ती भाव खाऊन जाते हा तिचा मला प्लस पॉइंट वाटतो. काहीतरी नक्कीच खास आहे तिच्यात.

पण ती मस्त अभिनय करते!>>> मला तसं वाटत नाही. तुला तर सई ताम्हणकर चा अभिनय पण आवडतो.. Uhoh

नशिब जबरदस्त!!>>> अनुमोदन!

गर्लफ्रेंड बघायच्या लिस्टीत आहे, कारण टॉपिक बोलका आहे फार. रेड फ्लॅग्स वाला मुलगा कसा ओळखावा Happy
कबिर सिंग २ बनला असता असा. गफ्रे, ने १००% सोडला असता टॉक्सिक ट्रेट वाल्या मुलाला Happy

एको चे रेको
आलेत खूप
बघणार लावून
शेंडीला तूप

Eko - नेटफ्लिक्स
कमाल सुंदर चित्रपट आहे.

कुठल्याही नात्यात प्रोटेक्शन आणि रीस्ट्रिक्शन यामध्ये बारीक अंतर असते या थीमवर चित्रपट आहे.
स्टोरी टेलिंग अशी आहे की चित्रपटातील काही गोष्टी आपल्याला कळतात आणि काहींचा अंदाज लागतो तर काहीचा नाही. पण उत्सुकता कायम राहते. शेवटी एक वर्तुळ पूर्ण होताना बघायला मिळते. ज्यात एखादे रहस्य उलगडल्याचा धक्का कमी आणि समाधान जास्त मिळते.

जंगलाचे इतके सुंदर चित्रण आहे की संपूर्ण चित्रपटच बघायला छान वाटतो.
चित्रपटातील मेन कॅरेक्टर आहेत कुत्रे जो प्राणी मला बिलकुल आवडत नाही. पण सारेच कुत्रे हिंस्त्र आणि प्रेमात पडावे असे आहेत.

कुठलीही घटना थेट न दाखवता सुचक पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे इतर काम करता करता ऐकू नका. चित्रपट आवर्जून बघा.

नेटफ्लिक्स वर रेकलेस बघितला...म्हणजे रॅन्डमली छोट्या ग्लिम्स मधे काहीतरी इन्ट्रेस्टिन्ग वाट्ल म्हणून लावला...डब आहे.मुळ कलाकार स्पॅनिश असावे..एकही माहिती नव्हता.
अ‍ॅक्शन थ्रिलर आहे...ज्याना माफक अ‍ॅक्शन, नो ब्लडशेड, थोडा सस्पेन्स आवडतो त्याना आवडेल..थोडा फाइन ट्युन करुन अजुन चान्गला करता आला असता.
हिन्दी वाल्याना सहज कॉपी करायला चान्गला आहे.

'दे दे प्यार दे २’ - संवाद, अभिनय, पटकथा याची उत्तम भट्टी जमली आहे. अजय देवगण खूप थकलेला वाटतो पण इतर सर्व कलाकारांनी चोख काम केले आहे. माधवन, रकुल विशेष उल्लेखनीय.

धुरंधर - सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी असलेला जबरदस्त ऍक्शनपट. सर्व गाणी रिपीट लिस्ट वर.

निशांची - ऐश्वर्य, वेदिका हे नवे चेहरे चित्रपटाचा एक्स-फॅक्टर आहेत. सगळ्यांची कामे उत्तम पण ह्या दोघांचे काम विशेष आवडले. बरीचशी गाणी रिपीट लिस्ट वर. ‘निंद भी मेरी’, 'क्या है क्या’, 'जेहेर थुकती’, 'रौंदेवू राजा’ हि गाणी तर सुपर रिपीट मोड वर Happy

दे दे प्यार दे द्वितीय
काही संवाद आणि त्याचे टाइमिंग जमले आहेत. मजेशीर वाटतात.
पण मध्येच कंटाळा देखील यायला सुरुवात होते. थोडा एडिट आणि कम्प्रेस करून अजून चांगला बनवता आला असता.
इमोशन बाकी सगळे नकली वाटतात. म्हातारा पुरुष आणि जवान मुलगी यांची प्रेमकथा विश्वासार्ह पद्धतीने सादर केली नाहीये. त्यामुळे रोमँटिक अँगल भिडत नाही. तो भिडला की मला मजा येते.

इको ठीक ठाक. रेकोज प्रमाणे आउटस्टँडींग नाही.
ट्रीटमेंट मधे वेगळेपणा आहे पण कूर्मगतीने पुढे सरकतो. सस्पेन्स काही असेल तर त्याचा अंदाज आधीच येतो.

काही संवाद आणि त्याचे टाइमिंग जमले आहेत. मजेशीर वाटतात. >> +१. जावेद जाफरीचे संवाद उत्स्फुर्त आहेत असे वाचले. तसे असेल तर जबरदस्त टायमिंग आहे त्यांचे.

दे दे प्यार दे मधे..रकुल, माधवन, गौतमी वैगरे फुल एनर्जी लोकामधे अजय देवगणच मिसफिट वाटतो..खुप थकलेला, निस्तेज...थोडा बघितल्यावर बोअर वाटायला लागला.. बन्दच केला.

सिंगल सलमा मस्त आहे. सेकंड हाफ नंतर हा नेहमीच्या वळणाने जातो कि काय असं वाटलं पण शेवटची वीस मिनिटे खास. धक्का पण छान दिलाय. रेटींग कसं कमी मिळालं असेल ?

मी रेटिंग वगैरे बघत नाही. श्रेयस तळपदेचे ऑफ़ बीट सिनेमे पाहिले होते आणि ते आवडले होते म्हणून सिंगल सलमा सर्वांनी एकत्र बसून पाहिला. शेवट खूपच आवडला.

एक दोन गोष्टी खटकल्या. इतक्या चांगल्या पिक्चर मधे नसत्या तर बरंच होतं. पण इट्स ओके. शाळेतल्या हुशार मुलाची छोटी चूक पण मग मोठी वाटते.
आजीला बेहद्द आवडला. अजून काय पाहिजे?
मीतचं काम केलेला ऐक्टर ओळखीचा वाटला. रोल साठी एकदम चपखल कास्टिंग. हुमा कुरेशी थोराड वाटते पण तिचा रोल तसाच आहे. श्रेयस तळपदेला अधेड उम्र का दाखवलाय ते पटत नाही. बेबी फेस मुळे तो लहान वाटततो. महागुरूंसारखा. त्याला न शोभणाऱ्या मिशा लावल्यात.
अभिनय सर्वांचा छान.

सिंगल सलमा बद्दल फार छान ऐकले नव्हते. कलाकार आवडीचे दिसत असूनही त्यामुळे रिस्क घेत नव्हतो. पण वरच्या दोन प्रतिसादांनी हुरूप वाढवला. आता लवकरच बघतो.

सिंगल सलमा - नेटफ्लिक्स
संमिश्र प्रतिसाद कानावर आले म्हणून कलाकार चांगले दिसत असूनही एवढे दिवस पाहिला नव्हता. पण आज पाहिला हे चांगले झाले. फार छान आहे आणि फार आवडला.

क्वीन चित्रपटाचे vibes येतील. पण वेगळा आहे. शेवट स्पेशल आहेच पण पूर्ण चित्रपट छान घेतला आहे. हुमा कुरेशीचा अभिनय नेहमीच आवडतो. पण यात ओवर न करता तिने जो आपल्यातील चेंज दाखवला आहे तो फार सहज वाटतो. मेलोड्रामा वाटत नाही.

आता सहज रिअलाईज झाले की हे सगळे एका खानदानी नवाबाच्या मुस्लिम कुटुंबात घडताना दाखवले आहे.

काळ बदलत आहे. लोकांचे विचार बदलत आहेत. गुड फॉर our नेक्स्ट generation!

खानदानी नवाबाच्या मुस्लिम कुटुंबात >> कंवलजित सिंग नबाब दाखवलाय. तो अजून तरूण वाटतो. सुरूवातीला 15 रूपये पेन्शन घेताना दाखवला आहे तेव्हा तो म्हणतो कि "पैशासाठी नाही तर हे 15 रूपये नबाबीचा पुरावा आहे".
शंका आली की नबाब लोकांना अजून पेन्शन चालू आहे का?
कारण मुघलांचे वारस झोपडपट्टीत राहतात आणि त्यांना कुठलंच इन्कम नसल्याने लाल किल्ला परत करावा अशी याचिका दाखल केली होती.

सिंगल सलमा पाहिला. आवडला म्हणायला हरकत नाही. केला त्यापेक्षा वेगळा शेवट काय असणार होता, त्यामुळे जो केला तो ठिकच.. शेवट वगळता बाकी सारे आवडले.

सरकारी लोक प्रशिक्षणासाठी परदेशी गेल्यावर त्यांना असे राजेशाही थाटात राहायला व फिरायला मिळते हे बघुन तर डोळ्यातुन आनंदाश्रु वाहायला लागले. असोच.

मुस्लिम कुटुंब दाखवले हे छान केले. ह्या चित्रपटात पात्रांचा धर्म कोणता हे महत्वाचे नव्हते. अशा वेळी साधारणपणे हिंदु कुटुंब दाखवले जाते. कथेची तशी गरज असेल तरच, धार्मिक
प्रश्न मांडायचे असतील तरच मुस्लिम व्यक्तीरेखा येते. ह्या चित्रपटात म्हणुनच मुस्लिम दाखवले हे आवडले.

मल्याळी सुक्ष्मदर्शिनीमध्ये सगळे गावच ख्रिस्ती दाखवले होते पण कथेचा धर्माशी संबंध नव्हता. तसेच हे.

Pages