चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अवटार- फायर & अ‍ॅश पाहीला.
मस्त आहे. खूप ड्रामा (फायर) आहे. ती व्हॅम्प छान दाखवलिये. फार लांब अहे सिनेमा त्यात आम्ही रात्री उशीराच्या शो ला गेलेलो. खरे तर माझा वाढदिवस २ दिवसात येतोय म्हणुन गेलेलो. रात्री अडीच वाजता घरी परतलो.
.
अ‍ॅक्शन ( फायर) से भरपूर. खूप आवडला. थ्री डी पाहीला. नक्की बघा. आवडेलच. माझा आवडता अवटार - वॉटर आहे. हा फायर फार स्कॉर्चिंग आहे. पण ड्रामा मस्त आहे. पॅशन रन्स हाय. पॅशन इन अ ब्रॉड अ‍ॅज वेल अ‍ॅज संकुचित ( फिझिकल) सेन्स. तो व्हिलन (कर्नल का मेजर) आवडायचा मला खरं तर. ..... तुम्हीच पहा फोडत नाही. बाकी सगळे कुटुंबवत्सल तोच एक अल्फा मेल होता.
.
आमच्या मागच्या रांगेत, २ कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली खूप. कोणीतरी बडबड करुन डिस्टर्ब करत होतं. त्यावरुन पेटलं.

अरे वाह.. मला जायचे आहे. पहिला फार आवडीचा. क्लास होता. दुसरा तितका नाही पण तिसऱ्याची उत्सुकता राहावी इतपत आवडला होता..
सध्या इथे धुरंदराने अवताराचे मार्केट खाल्ले आहे. चांगला असेल तरच चालेल.

नेफिवरचे दोन पिक्चर्सः

द ग्रेट फ्लड - कोरियन, इंग्रजीत ऑडिओ आहे. सुरूवातीला "डिझास्टर फिल्म" आहे असे वाटते. सेऊल मधे प्रचंड पाऊस व मोठा पूर येतो - म्हणजे इमारतींचे अनेक मजले बुडतील इतका. त्यातून लोकांची वाचण्याची धडपड दाखवली आहे. मग कळते की अ‍ॅण्टार्क्टिका मधे अ‍ॅस्टेरॉइड आदळल्याने जगभर बर्फ वितळून पूर आलाय (म्हणजे समुद्राच्या पाण्याची लेव्हल वाढली. पण बरोब्बर त्याच वेळेला प्रचंड पाऊस पडणे हा योगायोग असावा. नाहीतर ही बातमी लोकांना कळायच्या आत इतका मोठा पाऊस कोठून आला ते समजले नाही). म्हणजे स्काय फाय डिझास्टर कॅटेगरीत पिक्चर जातो. त्यानंतर एआय आले, मग तो ही जॉनरा बदलणारा एक सीन आला. पुढे काय झाले माहीत नाही.

बॉर्डर हंटर्स - थ्रिलर आहे. एंगेजिंग आहे. जे काही २-३ रिव्यूज आले आहेत ते काही खास नाहीत ("गीझर टीझर" नावाचा पण एक जॉनरा आहे हे नवीन कळाले) पण बघताना मला एंगेजिंग वाटला. ब्रेबॅ मधला हँक डीन नॉरिस यात आहे. त्याचे त्यातले मॅनरिजम थोडे दिसतात इथे पण आता त्याचे वय दिसू लागले. त्यामुळे ब्रेबॅ मधे कधीकधी एखाद्या सूक्ष्म हावभावांतून सुद्धा त्याला जे वाटते ते चपखल पोहोचवणारा डीन नॉरिस आता बडे मियाँ छोटे मियाँ मधल्या थिजलेल्या चेहर्‍याच्या अमिताभसारखा वाटतो. अनेकदा त्याच्यात जॉन गुडमनचाही भास होतो. एकूण पिक्चर फार थोर वगैरे नाही पण वेगवान आहे.

फायर अँड ऍश पाहिला. भयंकर बोअर झालो.

पहिल्या दोन सिनेमांच्या साच्यात बनवला आहे. ऍश पीपल कथेत आणल्यावर कितीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी अपेक्षित होत्या, नाही मिळाल्या.

दुसऱ्या सिनेमात किमान तीच कथा पण निदान पॅन्डोराची नवीन बाजू (पाण्यातले प्राणी) पहायला मिळाली होती. ते सुद्धा फारसे नाही ह्या सिनेमात.

क्वारीच आणि स्पायडर ह्यांच्या व्यक्तिरेखा सर्वात रोचक वाटल्या. बाकी सगळे अत्यंत प्रेडिक्टेबल.

व्हिज्युअल स्पेक्टॅकल तर आहेच. पण मला नाही पकडून ठेऊ शकला सिनेमा साडेतीन तासांसाठी, आयमॅक्स ३D मध्ये असूनही. "सॉस" नाहीये कथेत.

अज्ञानाचे जाहीर प्रदर्शनः इतकी वर्षे मी ट्रान्सफॉर्मर्स सिरीज मधले पिक्चर्स हे मार्व्हल युनिव्हर्सचाच भाग समजत होतो. नेफिवरून पहिला चालला आहे म्हणून सुमारे तासभर पाहिला - बघणेबल वाटला पण अगदी एंगेजिंग नव्हता. अजून तासभर बघायचा बाकी आहे पण आता कधी एकदा परत लावतोय इतके काही वाटत नाही.

ट्रेन ड्रीम्स - खूप ऐकले याबद्दल म्हणून लावला. पण फार स्लो आहे. मधेच बंद केला. नेफिवर आहे.

सनीचा "घातक" - पूर्वी पाहिला होता पण सहज लावला आणि बघत बसलो. यातला सनी घायल मधल्या सनीपेक्षा वेगळा आहे. यातला रोल जास्त फिल्मी आहे. अमरिश पुरीचा रोल मात्र भारी आहे.

>>"मस्त आहे. खूप ड्रामा (फायर) आहे. ती व्हॅम्प छान दाखवलिये. फार लांब अहे सिनेमा त्यात आम्ही रात्री उशीराच्या शो ला गेलेलो.">>
---
>>"फायर अँड ऍश पाहिला. भयंकर बोअर झालो. / व्हिज्युअल स्पेक्टॅकल तर आहेच. पण मला नाही पकडून ठेऊ शकला सिनेमा साडेतीन तासांसाठी, आयमॅक्स ३D मध्ये असूनही. "सॉस" नाहीये कथेत.">>
---
3D मधे आज दोनच शो होते. त्यापैकी दुपारचा जमण्यासारखा नव्ह्ता म्हणुन रात्री १०:१५ च्या शोला जाणार आहोत. धनश्री आणि कॉमी तुमची वेगवेगळी मते वाचुन मात्र थोडा विचारात पडलो आहे 🤔

तुमची वेगवेगळी मते वाचुन मात्र थोडा विचारात पडलो आहे >>> मी सुद्धा Proud म्हणून तिसऱ्या मताची वाट बघत होतो. तुम्हीच बना आता थर्ड अंपायर Happy

>>"तुम्हीच बना आता थर्ड अंपायर">>

तिकिटं तर बुक झालेली आहेत त्यामुळे आता माघार घेणे अशक्य... उद्या सांगतो जे काय बनेल ते मत 😀

संजय तुमचं तिकीट वाया जाणार नाही पहिल्या दोन पेक्षा जास्त अपेक्षा ठेवून जाऊ नका.प्रेडिक्टेबल आहे पण drama wise ठीकठाक. आहे हा भाग पूर्ण स्पायडर चा आहे .पण जॅक सली या भागात बाप म्हणून काय काय करतो आणि फायर वॉटर ची सुपब व्हिज्युअल ट्रीट अनुभवायची असेल तर नक्क्की बघा . तसंही अवतार चे सगळे भाग थेटर मध्ये बघणं मेंडेटरी आहे. Happy मला पर्सनली चष्मेवाले पिच्चर आवडतात त्यामुळे 3Dबघायला मस्त मजा आली.

>>"तुमचं तिकीट वाया जाणार नाही पहिल्या दोन पेक्षा जास्त अपेक्षा ठेवून जाऊ नका.">>
ओके...
मध्यंतरी रामोजी फिल्म सिटीमध्ये 'मोशन कॅप्चर सिस्टिम' वापरून अवतार सारख्या चित्रपटांचे शूटिंग कसे होते ह्याचे फार सुंदर प्रात्यक्षिक बघितले होते. आताच्या तिसऱ्या भागात त्याचा किती वापर केलाय हे बघायची उत्सुकता जास्त आहे.

>>"तसंही अवतार चे सगळे भाग थेटर मध्ये बघणं मेंडेटरी आहे Happy मला पर्सनली चष्मेवाले पिच्चर आवडतात ">>
अर्थातच... मलाही 👍

मानवी नातेसंबंधावर पाहिलेले काही सिनेमे. एका वेळी नाहीत पाहिले.

Tokyo Story (जपान, 1953)
Bicycle Thieves (इटली, 1948)
The Mirror / Persona (स्वीडन, बर्गमन)
Pather Panchali (भारत, सत्यजित रे)
Amour (फ्रान्स, 2012)
Scenes from a Marriage (स्वीडन)
Still Walking (जपान)
Manchester by the Sea (USA)
A Separation (इराण)
Blue Valentine (USA)

Bicycle Thieves - सुरेख चित्रपट. मोठे संवाद नाहीत. संगीत फार मोजकं. भावना “दाखवल्या” जात नाहीत, घडतात.

युद्धोत्तर रोममध्ये अँटोनियो रिची या बेरोजगार माणसाला पोस्टर लावण्याची नोकरी मिळते. अट एकच, सायकल हवी. त्याची बायको घरातील शेवटची मौल्यवान वस्तू गहाण ठेवून सायकल आणते.
पहिल्याच दिवशी कामावर असताना सायकल चोरीला जाते. सायकलशिवाय नोकरी टिकणार नाही, म्हणून अँटोनियो आपला लहान मुलगा ब्रुनो याला सोबत घेऊन संपूर्ण शहरात सायकल शोधत फिरतो. पोलीस मदत करत नाहीत; समाज उदासीन आहे.
दिवसभराच्या निष्फळ शोधानंतर, हताश झालेला अँटोनियो स्वतःच दुसऱ्याची सायकल चोरण्याचा प्रयत्न करतो. पण तो पकडला जातो. मुलाच्या डोळ्यांसमोर त्याची अब्रू जाते. शेवटी तो सुटतो, पण सायकल मिळत नाही.
शेवटी वडील आणि मुलगा हातात हात घालून गर्दीत दिसेनासे होतात. गरिबी, अपमान आणि माणुसकी यांच्यात गुंतलेलं त्यांचं नातं उरते.
( गुन्हेगार गरीबीमुळे निर्माण होतो असा काळाच्या ओघातला संदेश )

मराठी सायकल भिन्न आहे. पण तुलना करायचा मोह आवरला नाही. तो ही पाहिला आहे. दोन्हीच्या आत्म्यात साम्य आहे.
बायसिकल थिव्हज हा गरीबीवरचा सिनेमा आहे तर सायकल आशेवरचा. सायकल चोरीला जाणे एव्हढेच साम्य.

Tokyo Story - हा व्हीसीआरवर (भाड्याने आणून) पाहिलेला. ज्या वेळी पाहिला त्या वेळी आवडला / नावडला असे काहीही सांगता आले नाही. पंधरा वीस वर्षे उलटल्यावर आवडला. वडील गेल्यानंतर समजला.

एक वृद्ध दाम्पत्य गावातून टोकियोला मुलांकडे येतं.
मुलं वाईट नाहीत, क्रूर नाहीत. फक्त बिझी आहेत. ( त्यांना व्हिलन बनवलेलं नाही बागबान सारखं).
आई-वडील परत जातात.
आईचा मृत्यू होतो.
नात्यांमध्ये कुठेच भांडण नाही, पण तरीही एक मोठी रिकामी जागा उरते.
आपण ज्यांना सर्वात जास्त गृहित धरतो, त्यांच्या वरच सर्वात जास्त अन्याय होतो

माधुरी दिक्षितच्या फॅन्ससाठे इथेच लिहिते. (कुठला वेगळा धागा मिळाला नाही).

मिसेस देशपांडे - अतिशय भयाण आहे. मादि (माधुरी दिक्षित) त्या फिल्लर्स मुळे खुपच विचित्र वाटते , त्यामुळे अभिनय तसाही गंडलाय.

पटकथा चांगली करता आली असती, पण कोण दिग्दर्शन पण बंडल आहे. झोपेचे खोबरं केलं मी.

Bicycle Thieves (इटली, 1948) >> हा दोनच आठवड्यापूर्वी पाहिला. सुंदर! शेवट चटका लावून जातो.

knives out चा तिसरा भाग म्हणजे काय भयंकर आचरटपणा आहे. डॅनियल क्रेगची तर वाटच लावलीय. लांब केस अजिबात शोभत नाहीत. आणि हिरो तो येडचॅप फादर, constipated face…

मादि (माधुरी दिक्षित) त्या फिल्लर्स मुळे खुपच विचित्र वाटते , >>>> इथे अवांतर होईल, पण बॉलीवूड मधे हा जो आचरट पणा चालू आहे त्यामुळे टीन एज मधल्या मुलींवर भयानक वाईट परिणाम होतोय. ध्रुव राठीचा व्हिडीओ इतक्यातच आला आहे. तो आवडत असो वा नसो, हा विषय महत्वाचा आहे.
The FAKE Beauty of Bollywood Celebrities!
https://www.youtube.com/watch?v=Z6o7FqmBZvo

परवा रात्री अवतार : फायर & अ‍ॅश पाहीला. एकदा पहायला ठिक वाटला. का कोणास ठाउक पण मोआना २ ची खुप आठवण येत होती तो पहाताना. बाकी डिटेल्स उद्या लिहितो, बेक्कार सर्दी-खोकला झाला आहे काल सकाळ पासुन त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रीया द्यायचा मुडच बनला नाही कालपासुन 😓

'अवतार -फायर अँड ऍश' काल रात्री पाहिला. आवडला चित्रपट. साडे- तीन तासाचा चित्रपट असूनही चित्रपटगृहात सगळ्या प्रेक्षकांनी शांतचित्ताने, एकाग्रपणे चित्रपट enjoy केला. रात्री १० चा शो असूनही पालकांसोबत आलेल्या लहान मुलांची संख्या लक्षणीय होती.

पहिला भाग घरी टिव्ही वर पाहिलेला. दुसरा आणि तिसरा भाग चित्रपटगृहात. पुढचा भागही येईल असं वाटते. तो सुद्धा बघेनच. हॉलिवूडकरांची कल्पनाशक्ती अचाट आहे. चित्रपट पाहताना बॉलिवूडमध्ये असा चित्रपट बनायला किती काळ जावा लागेल..? असा प्रश्न पडला.

अवतार बघायचा आहे,
पण आयमॅक्स / आयमॅक्स थ्री डी / ४ डी एक्स / ४ डीएक्स थ्रीडी / नुसताच थ्रीडी / टू डी / आय सी ई / स्क्रीन एक्स यापैकी कुठे बघावा याबाबतीत प्रचंड गोंधळ आहे. ४ डी मधे काही वर्षांपूर्वी पंधरा मिनिटांचा मूव्ही पाहिला होता. फारसे आवडले नाही. तेच तंत्रज्ञान ३ तासाच्या मूव्हीसाठी असेल तर बिग नो.
कलकत्याच्या सायन्स पार्क मधे जे प्रोजेक्शन आहे त्यातली स्क्रीन ही पुढे समोर, वर आणि मागेही असते. ते फारच अद्भूत होतं. स्पेस मधे बसल्यासारखं वाटत होतं.

>>"यापैकी कुठे बघावा याबाबतीत प्रचंड गोंधळ आहे.">>
बघायचा आहे म्हणताय तर मग आयमॅक्स 3D किंवा नुसताच 3D मधे बघा. लांबीला जास्त असल्याने बोअर व्हायची शक्यता कमी होइल, मी 2D मधे पाहिला असता तर कदाचीत आवडला नसता... धुरंधरही लांबीला जास्त आहे पण कथानक चांगले आहे, इथे कथानकात हवा तसा दम नाहिये पण वरती अनेकांनी म्हंटल्याप्रमाणे 'व्हिज्युअल ट्रीट' मात्र नक्की आहे!

धन्यवाद.
नुसत्या थ्रीडी मधे मला वेगवेगळे अनुभव आले. एकदा थ्रीडीचा अनुभव मस्त वाटला. दुसर्‍या वेळी चित्रं अधांतरी आणि नुसतीच थ्रीडी स्केचप्रमाणे उभारून आलेली वाटली. नंतर समजलं कि थ्रीडी कॅमेरा आणि टू डी चं थ्री डी कन्वर्जन अशा दोन वेगवेगळ्या टेक्निक असतात.

आयमॅक्स अनुभव घ्यायचा आहे. पण तुम्ही म्हणता तसा अवतार कंटाळवाणा असेल तर नको. घरी होम थिएटर आहे. त्यावर बघता येईल.

अवतार मिक्स रिव्ह्यू येत आहेत
उद्याच वेळ आहे
आज रात्रीच निर्णय घ्यायचा आहे
म्हणून चित्रपटात शाहरुख असावा.. निर्णय सोपा होतो Happy

"अवतार फायर ॲंड ॲश" मला भयंकर बोअर झाला. मुलांनाही बोअर झाला. असह्य वाटला, मला तर उठून यायचं होतं. तीन तास सूड! काहीही चालू होतं. ते नवरा बायको आणि त्यांची सारखी अडचणीत सापडणारी मूर्ख मुलं. लेकुरे उदंड झाली, निळी बापुडी......... ! वेण्या लावून चार्ज करणं, कशातही शेपूट घालणं (शब्दशः). काहीही नवीन नाही. सुरवातीला तर अतिशय स्लो आहे, नंतर सुद्धा आधीच्या सिनेमापेक्षा वेगळे काही घडत नाही. मी अवतार सिनेमा तर सोडा, ट्रेलर सुद्धा बघायला जाणार नाही. मी अजूनही नावं ठेवू शकते. मुलीला झूटोपिया पहायचा होता, मुलाला तर यायचंच नव्हते आणि ही बंडल आयडिया माझीच होती. मीच मार्केटिंग करून नेलं होतं. बघा आता ! जबरदस्त फजिती झाली माझी. Proud

Pages