चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुरंधर मस्त आहे सिनेमा थिएटरला बघण्यासारखा च आहे.
भरपूर वेग आहे त्यामुळे बोर कुठेच नाही झाला. हिंसा प्रचंड रक्तपात वगैरे आहे त्यामुळे मुलांना नेऊ नका.
रणवीर सिंग इज आय कँडी. राकेश बेदी सरप्राईज पॅकेज.
अक्षय खन्नाचा सगळीकडे उदो उदो चालू आहे. काम छानच केलंय पण फार अशक्त वाटला.

जर ती व्यक्ती रोज मरून पुन्हा पुन्हा जिवंत होणार असेल तर तिलाच पुन्हा मारले तरी ते पाच मर्डरच धरले जातील ना.. >> ठार मारणार असं नाही ना? थोबाडीत मारू शकतो.

शोले उद्या रिलीज होतोय. पण इथे पुण्यात एकेकच शोज आहेत.
वाकडला तीन शोज आहेत, खराडीला दोन, बाकी सर्वत्र एक शोज.

आता ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर फोर के तंत्रज्ञान, डॉल्बी ५.१ या तंत्रज्ञान वापरून पुनर्जीवित करण्यात आला आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नव्या 'शोले'चा क्लायमॅक्सचा काही भाग बदलण्यात आला आहे. त्यामुळे उत्सुकता निर्माण होते.
संदर्भ: लोकसत्ता

त्या मूळ आवृत्तीत थोडे वेगळे होतेच. जेम्स बॉण्ड->तात्या टोपे (के पोते है ये) वगैरे. हे त्यापेक्षाही आणखी वेगळे आहेत का?

सचिनला मारतात तेव्हा गब्बरला काही संवाद आहेत हे पाहिल्याचे आठवते. पण रिलीज्ड आवृत्तीमधे तो फक्त हातावरचा मुंगळा मारतो ते जबरी इफेक्टिव्ह होते संवादांपेक्षा.

सचिनला मारतात तेव्हा गब्बरला काही संवाद आहेत हे पाहिल्याचे आठवते. पण रिलीज्ड आवृत्तीमधे तो फक्त हातावरचा मुंगळा मारतो ते जबरी इफेक्टिव्ह होते संवादांपेक्षा.
<<<
रामगढ कि चीटी !

पाहिला धुरंदर!

माधवनचे पहिले सीन बघताना जाणवते की आज कुछ अलग देखणे जा रहे है..
पण पुढे म्हटले तर स्टोरी लाईन नेहमीची आहे.
पण सादरीकरण भन्नाट आहे.
आणि बॅकग्राऊंड स्कोअर त्याहून भारी!
बरेचदा नाईनटीज किड नॉस्टॅल्जिया जागवणारे म्युझिक आहे ते सुद्धा फार आवडले.

रणवीर सिंग जबरदस्त!
बोडी लँग्वेज नेहमी भारी असते या माणसाची. ८३ मध्ये कपिल वाटला होता. इथेही अगदी वाटतो त्यांच्यातलाच एक बलोच..

अक्षय खन्ना खरेच डोक्यात अडकून राहतो. तो आणि रणवीर दोघे एकाच सीनमध्ये असतात तेव्हा आपली नजर अक्षय खन्नावर जास्त अडकून राहते.

संजय दत्तसाठी हा रोल म्हणजे भाई अपना ये रोज का काम है होते. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचा प्रश्नच नाही.

राकेश बेदी खरेच सरप्राइज पॅकेज म्हणून येतो.

हिरोईन दिसायला छान होती. एवढ्या रावडी अल्फा मेल मध्ये एखादा फ्रेश चेहरा बघणे बरे वाटते.

शिव्यांना का एखाद शब्द गाळून दाखवत होते आमच्या थिएटरमध्ये हे समजले नाही. अलाऊड नाहीये का?

अरे हो.. खून खराब हिंसाचार रक्तपात वगैरे ओके आहे. अती नाही वाटले. दहशतवादी मानसिकता दाखवायला इतके तरी दाखवणे गरजेचे होते.

तात्या टोपे (के पोते है ये) वगैरे >>> तात्या टोपे हा मूळचा डायलॉग आहे. नॅशनल अर्काईव्ह मधे इंडीया रिलीज वाली मूळ निगेटिव्ह होती, जी सिप्पींच्या पुढच्या पिढीने रमेश सिप्पींची परवानगी न घेता थ्रीडी करता वापरली. तिचे रिस्टोरेशन करताना बॅकग्राउंड स्कोअर बदलला होता आणि थ्रीडी साठी जे बदल केले ते रमेश सिप्पींना आवडलेले नव्हते. नव्याने रिलीज करताना लंडन इथे प्रिझर्व केलेली एक निगेटिव्ह मिळाली, ज्यात सेन्सॉर बोर्डाने कट करायला लावलेले सीन्स सुद्धा होते. यातलं बॅकग्राउंड म्युझिक आणि संवाद ओरिजिनल होते. प्रिंटचा बराचसा भाग डॅमेज झालेला असल्याने तीन चार वर्षे फ्रेम बय फ्रेम रिस्टोअर केली होती. गेल्या वर्षी पन्नासावे वर्ष सुरू झाले तेव्हां एक शो ठेवला होता, पण बहुधा तो सलीम जावेद यांच्यावर नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी बनलेली तिच्या प्रमोशन साठी असेल. नक्की माहिती नाही. तेव्हां बरेच काम शिल्लक राहिलेले होते.

यात सचिनला मरतात तो सीन, गब्बरचा शेवट असलेला सीन हे आले आहेत.

सगळेच्या सगळे एकत्र जमल्यावरच जायचं हे पक्कं ठरलं आहे. तितका काळ थेटरमधे शोले राहील का हे बघायचं आता.

जी ओ टी मधून ब्रेक घेऊन थोडा वेळ सुपरमॅन २०२५ लावलेला. पण बहुतेक मागचा भाग असावा म्हणून मेन ऑफ स्टील पाहिला. अजिबातच आवडला नाही. सुपरमॅनला साय फाय बनवण्याच्या नादात त्यातलं एंटरटेनमेंट संपवून टाकलंय. बर्‍याच गोष्टी लॉजिकल वाटाव्यात म्हणून घुसवल्यात. स्पायडीचं पण असंच केलेलं. स्पायडी सुरूवातीचाच छान वाटला. २००३ चा. नंतरचे उगाच वाटले.

तसंच हा सुपरमॅन. ख्रिस्तोफर रीव्ह स्टोरी म्हणून एच बी ओ डॉक्युमेण्टरी आहे. त्यातला सुपरमॅन वेगळ्या जगातला वाटतो. तो वाटतो सुपरमॅन. याच्या नंतर आणि आताचा आहे त्याच्या आधी आलेला पण देखणा होता पण अशक्त होता. जीओटी सारखी मालिका बघताना मधे काही बघूच नये. नाहीच आवडणार.

शोले बघितला आज थिएटरमध्ये. मजा आली. टाळ्या शिट्ट्या वगैरे भरपूर.
शेवट वेगळा आहे. मला हा शेवट जास्त आवडला.
सचिनला मारण्याचा सीनही आहे. पण त्याबाबतीत फारएण्डशी सहमत. अजूनही एखाददोन सीन्स जास्त आहेत.
असाच मागे अमर अकबर अँथनी बघितला होता. त्यावेळी लक्षात न आलेली एक गोष्ट आत्ता जाणवली म्हणजे गाणी थिएटरमध्ये ऐकायला छान वाटली. विशेषतः 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' मधला किशोरचा आवाज (आणि अर्थात मन्ना डेचाही) काय छान वाटला!

धुरंदर पाहिला. आवडला.

रणवीरच्या भुमिकेला चांगले कंगोरे आहेत. एखाद्या भाईचा डावा किंवा उजवा हात अचानक सेंटर स्टेजला यावा अशी त्याची भुमिका आहे. म्हटलं तर प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी प्रेझेंट पण त्याच्या अस्तित्वाची फारशी कुणी दखल घेऊ नये अशी. तसंही हेराने बॅकग्राऊंडमध्ये मिसळून जाणं अपेक्षित असतं. ती त्याने उत्तम निभावली आहे. त्याची बॉडी लॅंग्वेज परफेक्ट बाउन्सरसारखी आहे.
फक्त काही वेळा नजरेतून तो वेगळं काही व्यक्त करू पाहतो. सुरूवातीला काही प्रसंगात त्याचा आवाज त्या बीफी बॉडीला शोभला नाही.

अक्षय खन्ना is ♥️. इथे तो छा गया है. सिंगल पसली अवतारानिशी ऑरा दाखवणं अवघड. पण तो ती कमाल करतो. त्याच्या अभिनयक्षमतेला वाव देणाऱ्या भुमिका त्याला आता तरी मिळताहेत याबद्दल आनंद.

संजय दत्तने पांढरा पठाणी ड्रेस बहुतेक वॉर्डरोब स्टेपल म्हणून ठेवला असेल इतकी हातखंडा भुमिका त्याला दिली आहे.

उझैर झालेल्या दानिश पंडोरचं व मोहम्मद आलम झालेल्या गौरव गेराचं कामंही चांगलं आहे.

खरी कमाल मात्र जमीर जमाल झालेल्या राकेश बेदीची. स्वतःची काही पॉवर नसताना इतरांचा आसरा घेत हवा तसा वाकत झुकत आपलं बस्तान बसवणारा राजकारणी ही भुमिका त्याने जिवंत केली आहे.

माधवनच्या वाट्याला दोवल यांची छोटीशी भुमिका आलेली आहे. लूक बऱ्यापैकी जमलेला आहे. काही क्रींज संवाद सोडल्यास ती भुमिकाही चांगली वठवली आहे.

दुलत यांनी कॅमिओ केलाय की काय असा वाटणारा कलाकार हीसुद्धा कास्टिंग डायरेक्टरची कमाल.

एकंदरीत चित्रपटाच्या यशात कास्टिंग डायरेक्टरचा मोलाचा वाटा आहे.

सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. विशेषतः बलोचिस्तानचा वैराण, निर्मनुष्य प्रदेश पटतो.

ज्यांना पहायचा आहे त्यांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा. तुमच्याकडे अंबानीसारखं होम थिएटर नसेल तर ओटीटीवर ती मजा येणार नाही.

संगीताचा वापर चांगला केलाय. विशेषतः रणवीरच्या एंट्रीला ‘ना तो कारवां की तलाश हैं’ एकदम चपखल बसलंय.

हिंसा व रक्तपात पाहण्याचा माझा टॉलरन्स फार कमी आहे. त्यामुळे ट्रेलर पाहून दुविधेत होते. पण ट्रेलरमधे दाखवलेली हिंसा प्रत्यक्ष कथेच्या ओघात काही सेकंद ते मिनीटं एवढाच वेळ येते तेव्हा फारशी अंगावर येत नाही.

काही रिव्ह्यूमधे या पिक्चरला हायपर नॅशनलिस्टीक म्हटलं होतं तसं मला काही वाटलं नाही. कारण IC 814 अपहरण, संसदेवरचा हल्ला, २६/११ हे सगळे हल्ले आणि त्यावेळचं वातावरण अनुभवलेलं आहे. त्यात काय वेगळं दाखवलंय? अगदी खोट्या नोटांच्या सुळसुळाटामागचे आपल्याच राजकारण्यांनी केलेले कर्मदरीद्री प्रतापही ठाऊक आहेत.

२६/११च्या हल्ल्याचं प्लानिंग सोडल्यास हा पिक्चर गॅंग्ज ऑफ कराची/गॅंग्ज ऑफ नागपाडा/गॅंग्ज ऑफ डोंगरी म्हणून खपेल इतकी कमर्शिअल स्टोरी आहे. चांगली गुंफली असल्याने व काही सत्यघटनांची फोडणी दिल्याने तो देशभक्तीपर कसा होईल? पुढच्या भागाकडून या बाबतीत जास्त अपेक्षा ठेवता येतील कदाचित.

माझा रेको आहे.

व्हीएक्सएफ वर एक धागा होता का पूर्वी ? सापडत नाहीये. प्लीज लिंक द्या.

आज फायनली शोलेचं ठरलं. धुरंधर पण चालला असता सर्वांना.

शोले चा शेवट थिएटर मधे अंगावर येणारा वाटला. इंटरनेटवर मूळ शेवट पाहिला होता. पण त्यानंतर संजीवकुमारचा अभिनय पाहिलेला नव्हता. एरव्ही सूडकथेत सूड घेताना आधीच्या अन्यायाची दृश्ये दाखवली जातात. पण संजीवकुमार गब्बरला मारल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरच्या वेदना, संताप आणि हलके होत जातानाची भावना आणि नंतर इतके दिवस रोखून ठेवलेल्या भावना, तो धर्मेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो, ते विलक्षण आहे. त्या एका दृश्यात संजीवकुमार म्हणजे काय ते समजतं. या सिनेमाचा ना यक तो आहे हे मूळच्या शेवटाने कळतं.

धर्मेंद्रला पाहून वाईट वाटत राहतं. शेवटच्या सीनमधे वीरू गेलाय जय आहे हे लक्षात राहतं.
बूटाला खिळे ठोकत असल्याचा सीन आवडला.

अहमदला गब्बरने का मारलं ?
कारण तो अहमद असून भगवे कपडे घालून चालला होता.

ठाकूर सुटीवर घरी येत असताना जया भादुरी शालू नेसून मंदीरात गेलेली असते. पण ठाकूर येईपर्यंत तिने पांढरी साडी नेसलेली असते. केव्हढं प्रसंगावधान ! अशा प्रसंगात सुद्धा पोरीने संस्कार सोडले नाहीत. कौतुक वाटलं.

राभू - आधीची माहितीही अ‍ॅक्नॉलेज करतो (तात्या टोपे वाली). वाचली. मी ही व्हर्जन पाहिली आहे. मला रिलीज्ड व्हर्जनच आवडली होती. अर्थात ही मी थिएटर मधे पाहिली नाही.

वावे- मला वाटले तुम्हाला मूळचाच शेवट जास्त आवडला असेल.

टायटल्सचे म्युझिक थिएटरमधे फार मस्त वाटत असेल. मला जितके आठवते त्यावरून मी थिएटरमधे पाहिल्याची आठवण पुण्यात नटराज मधली आहे बहुतेक. स्टीरीओफोनिक साउण्ड सिस्टीममधे ते नाणे पडल्याचे आवाज, झोपाळ्याचा थिएटर चिरत जाणारा आवाज, घोड्यांच्या टापा, जब तक है जाँ गाण्या हेमा थकून मधे थांबते तेव्हा सांबाने बंदुकीचा खटका हलवून गोळी मारायला तयार करणे वगैरे अगदी लक्षात राहिलेले आवाज आठवतात.

धुरंधर पाहायचा आहे. वरच्या पोस्ट्स वाचल्या. रणवीर ऑटाफे आहेच. भूमिकेत शिरण्याचे कसब भारी आहे त्याचे.

जेम्स बाँड च कायम ठेवलं आहे.. आता च्या काळात वादग्रस्त ठरले अतते.
गब्बर च्या एण्ट्री ला शिट्ट्यांनी गदारोळ झाला होता. नंतर त्याच्या बेरकीपणाला पब्लिक सतत हसत होतं. धर्मेंद्रला फुल्ल रिस्पॉन्स होता. सगळे कॉलेजिएन्स होते.

शोले पाहिला . जाम धमाल आली .बरेच जण सीन बरोबर डायलॉग्स म्हणत होते . मलाही हा शेवट आवडला गब्बरला मारल्यानंतर ठाकूर रडतो ,त्या इमोशनल सीन मध्ये ठाकुरच्या बदल्याला आणि जय च्या मृत्यूला एकदम क्लोजर मिळाल्यासारखा वाटतं.गाणी थेटर मध्ये सॉलिड वाजतात "ये दोस्ती" तर आहेच पण "हा जब तक है जान" पण भारी वाटतं. जेलर वाला,टंकी वाला ,मंदिरातील ,सिक्केवाले सीन, सगळे आयकॉनिक सीन बघताना तितकीच मजा आली.

सिमरन अगदी अगदी.
टाकीचा सीन, मौसी वाला सीन, फुल्ल धमाल चालली होती. आमच्या मागे एक फॅमिली खूप पांचट विनोद करत होती.
बाकी नॉस्टॅल्जिक होतं पब्लिक.

होमबाऊंड - जबरदस्त इंपॅक्ट असलेला सिनेमा. धडक-२ पेक्षा खूप कमी अंगावर येणारी दृश्यं असूनही (किंबहूना नाहीच) कुठेही कथेचा गाभा अशक्त होत नाही. खूप छान जमलाय.

शोले मध्ये आता गब्बरला मारला...>>> हा ओरिजनल शेवट होता त्यावेळेस सेन्सर बोर्डने शेवट बदलायला लावला होता.
मग आधी का जिवंत सोडला होता?
पार्ट टू काढायचा प्लान होता का?

Pages