अवतार न आवडणारी ही मंडळी खूप आहेत मुळात ही सगळी फॅन्टसी फिल्म आहे हे लक्षात घेऊन बघितली तर मजा येते, आमच्याच घरात "काय ती निळी माणसं बघायची "म्हणून माझ्यासोबत कोणी आलं नाही. मला पहिले दोन खूप आवडले होते कंन्टिन्यूटी साठी बघणं मस्ट आहे म्हणून मी बघितला
पण अस्मिता तू जॅक आणि पोरांबद्दल जे लिहिलंय ते अगदी खरं आहे .ती पोर अडकणार आणि हा वाचवणार हे कंटाळवाणे तेच तेच वाटू शकतं.पण तुला ते बारकं पिल्लू ही नाही आवडलं. कसलं क्यूट दाखवलंय.माझ्या शेजारी बसलेले चिल्लेपिल्ले त्या सीनमधल्या बाळाला बघून तर जाम एक्साईट झाले होते एकजण जोरात ओरडला पण "आई ते बघ बाळ". एकंदर टीनेजर आणि लहान मुलांना आवडलाय चित्रपट इथल्या तरी.
मला पहिला आवडला होता, दुसराही बरा वाटला होता. पण ह्यात काहीच नवीन नाही. Old wine in a new bottle! ॲनाकोन्डाला गेले असते तर पीडा गेली असती. जॅक ब्लॅक आणि पॉल रड यांची कॉमेडी. काही तरी करमणूक!
ते बाळ गोंडस होतं पण आई किरकिरी होती. आमच्या मागे बसलेले लोक हळवेबिळवे सुस्कारे टाकत होते. आम्हाला काहीच जाणवत नव्हते, कुठेही शेपूट घाला. मग दुष्ट बाई येऊन वेणीत वेणी घालून शक्ती काढून घेऊ लागली हाकानाका. एकदा तर त्या मुलीने अंगात आल्यासारखं केलं, घुमलीबिमली. मी म्हटलंही हे आमचंच चोरलंय.
आमच्या घरी कुत्र्यासहित सगळ्यांच्या स्ट्रॉन्ग पर्सनॅलिटी आहेत, कुणीही तोंडदेखलं सुद्धा आवडला म्हणत नाही. मनात नसताना तर किडनॅप केल्यासारखे येतात सोबत. यावेळी मात्र माझीच आयडिया होती, मीच "चला, सुट्टी एन्जॉय करू" म्हणून पकडून गाडीत घालून नेलं होतं. मी स्वतःच जे चुळबुळ केली, पॉपकॉर्न तर लगेच संपले. थोडा वेळ झोपले सुद्धा. काय माहीत एवढा बोअर तर 'विकेड' सुद्धा झाला नाही, तो तर म्युझिकल होता.
सिमरन, मुलांनी एन्जॉय केला तर मग अजून काय हवं ! माझ्या भाच्यालाही पहायचा आहे, मी 'जाऊन या' म्हटलं. लहान मुलांना आवडेलही.
दुसऱ्याचा शेवट जसा आहे तसा हा जवळपास अर्धा आहे अमित.
Submitted by अस्मिता. on 27 December, 2025 - 20:31
एकदा तर त्या मुलीने अंगात आल्यासारखं केलं, घुमलीबिमली. मी म्हटलंही हे आमचंच चोरलंय>>>>
नावच इथुन उचललय… पुढचे काय मग
असो.. मला अवतार १ खुप आवडलेला. थेटरात होता तेव्हा खुप
हाईपमुळे बघायला गेले नव्हते. मला अगदी उच्च हाईप झालेले चित्रपट बघायचा कंटाळा येतो, उगीच मोठे मनोरथ घेऊन जायचे आणि ते जर कोसळले तर रडत बसायचे याचा कंटाळा येतो. नंतर कधीतरी टिवीवर बघितला आणि मोठ्या पडद्यावर न बघितल्याचा पश्चाताप झाला… कथेसाठी नाही, कथा नेहमीचीच घिसिपिटी.. बेकेटपासुन सुरु होऊन आपल्या नमकहरामपर्यंत पोचलेली. पण चित्रिकरण नेत्रसुखद होते इतकेच म्हणणे अन्यायकारक ठरले असते इतकी सुंदर दृश्ये पडद्यावर पाहायला मिळाली. विशेषतः ट्रि ऑफ लाईफचे दृश्य ..
दुसर्या भागाचा ट्रेलर थेटरात पाहिलेला. म्हटले हा तर गरुडावर बसलेला विष्णु . चित्रपट बघायचा ठरवले होते पण नंतर उत्साह राहिला नाही. अवतार ३ चीही फारशी उत्सुकता वाटत नाहीय. २ व ३ ओटीटीवर बघेन.
>>>>>
अवतार न आवडणारी ही मंडळी खूप आहेत मुळात ही सगळी फॅन्टसी फिल्म आहे हे लक्षात घेऊन बघितली तर मजा येते
>>>>>
अवतार १ मध्ये फॅन्टसी वाटत नाही. सायन्स जास्त वाटते. आणि त्यातील इमोशन आणि संदेश एकूणच त्याला क्लासिक बनवते. त्याच्याशी तुलना करता नंतरचे भाग मात्र सायन्स कमी आणि फॅन्टसी जास्त होत खेचलेले वाटतात.
बाकी फॅन्टसीचा मुद्दा बरोबर आहे. ते डोक्यातून काढता आले नाही तर आवडणे अवघड. मला हाच अनुभव हॅरी पॉटर बाबत येऊ लागला. काय ते लहान मुलांचे जादूचे खेळ म्हणत नंतर कंटाळा येऊ लागला. घरचे मात्र पुन्हा पुन्हा तेच रिपीट मोड बघायचे त्यामुळे ते बीटीएस सारखे डोक्यात जाऊ लागले. पण या दोन्ही गोष्टी बिलकुल आवडत नाहीत हे त्याच्या चाहत्यांसमोर बोलायची सोय नाही.
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2025 - 00:37
मला हाच अनुभव हॅरी पॉटर बाबत येऊ लागला. काय ते लहान मुलांचे जादूचे खेळ म्हणत नंतर कंटाळा येऊ लागला. घरचे मात्र पुन्हा पुन्हा तेच रिपीट मोड बघायचे त्यामुळे ते बीटीएस सारखे डोक्यात जाऊ लागले.>> हॅरी पॉटर तुम्ही बघाल तसे आहे. त्यातील बोगार्ट सारखे. पुस्तक वाचलेल्यांना हा रेफरेन्स कळेल.
मला तर त्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट खूप फिलॉसॉफिकल वाटल्या. पुस्तकं वाचून सिनेमे बघितले तर नक्कीच सगळ्यांना आवडतील.
Submitted by शर्मिला. on 28 December, 2025 - 00:58
हो मला कल्पना आहे. अश्या कलाकृती ज्यांना आवडतात त्यांना त्यातील फिलॉसॉफी दिसते, कळते, आणि ज्यांना आवडत नाही त्यांना समजत नाही. हाच मुद्दा होता. त्यात काय आवडण्यासारखे म्हणून कोणालाच नावे ठेवायची नव्हती.
आपले बरेच हिंदी चित्रपट सुद्धा असेच फिल्मी दुनियेत जाऊन बघायचे असतात. हे असे कुठे होते का म्हणून लॉजिक शोधत बसलो तर तीच खुसपट काढायची सवय लागते.
आणि हो, पुस्तके सुद्धा आमच्याकडे आहेत. ती बघून तर मला आता पिक्चर बघितल्यावर हा खर्चा कश्याला केला असे झाले होते
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2025 - 01:15
बॅटल ऑफ गलवान चं ट्रेलर पाहीलं .सलमान खानला बघूनच विषयाची वाट लागली असेल हा अंदाज आला. सलमान खान फिल्म्सने काही चांगले सिनेमे बनवले आहेत. पण थकेला सलमान युद्धपटात नकोच. त्यातून एकट्याने आर्मीला थोपवण्याचा सीन हास्यास्पद वाटला.
धुरंधर प्रमाणे प्रपोगंडा फिल्म बनवून गलवान प्रकरणात सरकारचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न शक्य नाही. कारण सलमानला याच सरकारने वाचवलं आहे. तो हे करणार नाही. आणि धुरंधर सारखा परफेक्ट प्रपोगंडा बनवण्याइतकी प्रतिभा त्याच्याकडे नाही. तो बंदरछापच पिक्चर बनवणार.
अवतार सिनेमा फॉरमॅट
रेग्युलर माणसे भयंकर अन्याय जाळपोळ करतात.
- निळी माणसे पळतात.
रेग्युलर माणसे कोणत्यातरी अतिमहत्वाच्या गोष्टीसाठी आणखी जाळपोळ कापाकापी करतात. (पहिल्या भागात अनऑब्टेनियम (फारच कल्पक नाव!) दुसऱ्या व तिसऱ्या भागात व्हेलमाश्याचे अमृत (कल्पक २.०) )
- निळ्या माणसांना लास्ट स्टँड घेणे भाग पडते. जेक सुली भाषण देऊन, मोठ्या पक्ष्यावर उडून सगळ्यांना प्रेरित वैगरे करतो.
जेक सुलीची पोरे वन बाय वन पकडली जात असतात आणि त्याला मारामारीस जावे लागते.
निळी माणसे रेग्युलर माणसांशी उत्तम फाईट देतात, पण जिंकत आले असताना रेग्युलर माणसे आणखी ताकदीने येतात. आता निळी माणसे साफ मार खाऊ लागतात.
पण...
एव्हा आई जागृत होते आणि रानातले आणि पाण्यातले विविध पशु पक्षी येऊन रेग्युलर माणसांना पळवून लावतात. पक्षी येऊन भलीमोठी विमाने पाडतात आणि मासे बोटी पाडतात.
तीन दिवस झाले मोबाईलला हात लावता आलेला नाही.
आज पहाटे चोरून थोडा वेळ नेफ्लि वरचा रात अकेली है पाहिला. थोडा पापाचा कोटा संपवून टाकला
आधी कळेचना, या नावाचा आधी पाहिलाय असे वाटले.
हा पुढचा भाग आहे. बाह्य जगतात ध्यान अडकायला नको म्हणताना सस्पेन्स सुरू झाला तर तिथेच ध्यान अडकून बसले आहे.
रात अकेली पहिल्याच आणि दुसऱ्याचा आपसात काही संबंध आहे का?
पहिल्याबद्दल फार काही चांगले न ऐकल्याने बघितला नव्हता.
दुसऱ्याबद्दल बरे ऐकू येतेय तर बघायची इच्छा आहे.
पहिला न बघता दुसरा बघितला तर चालतेय का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 December, 2025 - 10:58
रात अकेली है : बन्सल मर्डर्स असं नाव आहे आताच्या पार्टचं. पार्ट २ असं काही म्हटलेलं नाही.
पहिल्या भागाप्रमाणेच हाय प्रोफाईल मर्डर केस. नवाजुद्दीन साधा इन्स्पेक्टर. ज्यांना प्रश्न विचारायचे ते सगळे उद्योगपती. गेल्या वेळी रॉयल फॅमिलीचे लोक होते. सगळ्याच फॅमिली मेंबर्सचा मर्डर झालाय आणि जे वाचलेत त्यांची चौकशी करायची आहे पण ती करता येत नाहीये. आता बघेन उरलेला.
फणा बघतोय
नागाचा नाही आमिर आणि काजोलचा
लहानपणी तुकड्यात बघत अर्धवट सोडला होता.
का सोडला होता कल्पना नाही, पण आता अर्धा अधिक संपला आणि आवडतोय.
गाणी तर शायराना होतीच आणि तेव्हाही आवडायचीच. स्पेशली चांद सिफारिश.. शान आणि कैलाश खेर !
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 December, 2025 - 14:42
रात अकेली है - बन्सल मर्डर्स - बोअर झाला मला. अजिबात ग्रिप च घेत नाही सिनेमा. असंख्य कॅरेक्टर्स, बहुतेक उगीचच आहेत. तपास नक्की कोणाकडे आहे? कोण कोणाला रिपोर्ट करतंय, कुणाला काय अधिकार असतात, कुणीही उठून आपापला लीड फॉलो करतं का? कळेनाच काही.
सस्पेन्स ज्या प्रकारे उलगडते तो भाग कै च्या कै वाटला. मेन लीड नवाजुद्दिन, शिवाय रजत कपूर, चित्रांगदा सिंग, रेवती, दीप्ती नवल, इला अरुण अजून कोण कोण कलाकार असूनही सिनेमाचा तसा काही इम्पॅक्ट नाही वाटला. हो, आणि राधिका आपटे का होती सिनेमात??
Submitted by maitreyee on 30 December, 2025 - 09:35
मस्त होता जब तक है जान
आजपर्यंत का पूर्ण पाहिला नव्हता असे झाले.
शेवटी पूर्ण पोहोचतो पिक्चर!
यश चोप्रा त्यांच्या शेवटच्या कामात सुद्धा प्रेमाचा एक वेगळा अँगल दाखवून गेले.
कतरिना आयुष्यातून गेल्यावर शाहरुखचे बदललेले आयुष्य जे अनुष्काने पाहिले असते ती जेव्हा त्याला त्याचे आधीचे आयुष्य जगताना पाहते तो चित्रपटाचा हाय पॉइंट होता.
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2025 - 11:56
झी५ वर साली मोहोब्बत बघितला. राधिका आपटे, मिर्झापुर मधला पण एक कॅरेक्टर आहे.
प्रेडिक्टेबल मर्डर मिस्ट्री आहे पण तरी पाहिला. ओके आहे. कोणी पाहिला असेल तर शेवटचा एक ट्विस्ट कळला नाही तो विचारता येईल
Submitted by अंजली_१२ on 30 December, 2025 - 14:09
जब तक है जान संपताच सुलतान लावला.
आधीच्यात अनुष्काला शाहरुख खान नाही भेटला तर यात निदान सलमान खान तरी मिळू दे म्हटले.
पण तिच्यातही काही कमी किडे नाहीत. तिथेही सुखाने नांदायला जमले नाही.
असो,
आधी म्हटले की सेकंड हाफ बघूया डायरेक्ट. पण पूर्वार्ध बघितल्याशिवाय उत्तरार्ध बघायचे इमोशन तयार होत नाहीत म्हणून पूर्ण बघितला.
मला त्याच्या पहिल्या फाईटचा मॉडर्न देसी धोबी पछाड सीन फार आवडतो. तो दोन तीन वेळा रिवाइंड करून पाहिला. थिएटरमध्ये ही रिवाइंड करायची मजा नसते. त्यामुळे घरीच राजाबाबू सारखे बघावे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2025 - 15:45
रात अकेली बाबत अंदाज खरे ठरला तर, बरे झाले बघायला गेलो नाही. सुलतान, फनाह, जब तक है जान.. तीन खानाचे तीन चित्रपट झाले ओळीत
@ माणूस,
तुम्ही नक्की कुठल्या हायफाय माणसांबद्दल बोलत आहात? कारण मी सुद्धा गरजेपेक्षा जास्त कमावतो. आणि माझ्याकडे सुद्धा इतर सगळ्या कामांना माणसे आहेत. जेणेकरून मला निवांत मूवी बघता येतात.
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2025 - 23:11
शेवटचा एक ट्विस्ट कळला नाही तो विचारता येईल Wink>>>>शेवटी कोणाला नक्क्की मारायला शरद सक्सेना रोपाची कुंडी घेऊन आलेला असतो ? हाच का.
राधिका आपटे चे दोन चित्रपट पाहिले .पहिला सिस्टर मिडनाइट, अतिशय वाईट चित्रपट ,का पाहिला असं झालं .सुरुवातीलाच जेव्हा ती पहिल्या रात्री बाहेर जाऊन विड्या फुंकते तेव्हाच खरंतर बंद करायला हवा होता. तरी म्हंटल बघूया पण एका वाक्यात चित्रपटाबद्दल सांगायचं तर ,वियर्ड लोकांनी वियर्ड लोकांसाठी काढलेली वियर्ड फिल्म. आर्ट फिल्म्स आवडतात पण हे म्हणजे माझ्या मेंदूच्या कक्षे बाहेरचं प्रकरण वाटलं. कोणी पूर्ण पाहिला असेल तर त्या शेवटी पळणाऱ्या मेंढ्यांचा काय अर्थ आहे हे सांगा.
राधिकाचाच दुसरा चित्रपट म्हणजे साली मोहोब्बत ,याबद्दल पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं मत म्हणजे एकदम मस्त चित्रपट, पण स्टोरीलाइन ओळखीची वाटली म्हणून डिरेक्टर कोण आहे ते पाहिलं ,टिस्का चोप्रा .मग लक्षात आलं तीची चटणी शॉर्टफिल्म मस्त होती, तशीच ही पण वाटली म्हणजे चटणी ची आठवण येते.तशी कथा पूर्णपणे वेगळी आहे पण ट्रीटमेंट सेम .स्टोरी लिहिलेय पण टीस्का नेच .एकंदरीत पाहण्यासारखी आहे फिल्म. यात राधिका आवडली.
सकाळी सकाळी एक लेखक यांच्या सिनेमाच्या विविध फॉर्मॅट चा प्रश्न पाहिला होता. इथे अवांतर असेल. कुणी जर धागा काढला तर छान माहिती मिळेल. कोलकत्याच्या सायन्स सिटीमधल्या स्पेस थिएटरचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. अनुभव म्हणाल तर आयमॅक्स तो अनुभव कधीही देऊ शकत नाही. पण ते किष्ट आणि प्रचंड महाग प्रकरण आहे. कमर्शियल मूव्ही या फॉर्मॅट मधे बनवणं अवघड आहे. तसा मूव्ही हा डोक्यात पूर्णपणे इमॅजिन करून मगच शूट करावा लागेल. अवघड आहे.
कोणता ट्विस्ट कळला नाही अंजली ?>>>>> पोलिस इन्स्पेक्टरला पोत्यात घालून शरद सक्सेना पाण्यात टाकतो ना? मग तो व्हीलचेअरवर कसा काय दिसतो नंतर. वाचतो?
शरद सक्सेना रोपाची कुंडी घेऊन आलेला असतो ? हाच का.>>>>>>> नाही वरचाच प्रश्न पडलेला. रोपाची कुंडी आता दुसर्या नवर्यासाठी असणार ना?
Submitted by अंजली_१२ on 31 December, 2025 - 12:38
धुरंधर परत पाहीला. जास्त
धुरंधर परत पाहीला. जास्त आवडला
कशातही शेपूट घालणं (शब्दशः) >
कशातही शेपूट घालणं (शब्दशः) >>>
मी पहिला बराच नंतर पाहिला. तोपर्यंत त्यातली नॉव्हेल्टी इतकी राहिली नव्हती. मला बघणेबल पेक्षा फार भारी वाटला नाही.
कशातही शेपूट घालणं (शब्दशः)>>
कशातही शेपूट घालणं (शब्दशः)>>>
अवतार न आवडणारी ही मंडळी खूप आहेत मुळात ही सगळी फॅन्टसी फिल्म आहे हे लक्षात घेऊन बघितली तर मजा येते, आमच्याच घरात "काय ती निळी माणसं बघायची "म्हणून माझ्यासोबत कोणी आलं नाही. मला पहिले दोन खूप आवडले होते कंन्टिन्यूटी साठी बघणं मस्ट आहे म्हणून मी बघितला
पण अस्मिता तू जॅक आणि पोरांबद्दल जे लिहिलंय ते अगदी खरं आहे .ती पोर अडकणार आणि हा वाचवणार हे कंटाळवाणे तेच तेच वाटू शकतं.पण तुला ते बारकं पिल्लू ही नाही आवडलं. कसलं क्यूट दाखवलंय.माझ्या शेजारी बसलेले चिल्लेपिल्ले त्या सीनमधल्या बाळाला बघून तर जाम एक्साईट झाले होते एकजण जोरात ओरडला पण "आई ते बघ बाळ". एकंदर टीनेजर आणि लहान मुलांना आवडलाय चित्रपट इथल्या तरी.
दुसऱ्याचा शेवट माझ्या डोक्यात
दुसऱ्याचा शेवट माझ्या डोक्यात गेलेला. तरी हा हॉलिडेज मध्ये बघावा विचार होता पण आता नाही जाणार.
मला पहिला आवडला होता, दुसराही
मला पहिला आवडला होता, दुसराही बरा वाटला होता. पण ह्यात काहीच नवीन नाही. Old wine in a new bottle! ॲनाकोन्डाला गेले असते तर पीडा गेली असती. जॅक ब्लॅक आणि पॉल रड यांची कॉमेडी. काही तरी करमणूक!
ते बाळ गोंडस होतं पण आई किरकिरी होती. आमच्या मागे बसलेले लोक हळवेबिळवे सुस्कारे टाकत होते. आम्हाला काहीच जाणवत नव्हते, कुठेही शेपूट घाला. मग दुष्ट बाई येऊन वेणीत वेणी घालून शक्ती काढून घेऊ लागली हाकानाका. एकदा तर त्या मुलीने अंगात आल्यासारखं केलं, घुमलीबिमली. मी म्हटलंही हे आमचंच चोरलंय.
आमच्या घरी कुत्र्यासहित सगळ्यांच्या स्ट्रॉन्ग पर्सनॅलिटी आहेत, कुणीही तोंडदेखलं सुद्धा आवडला म्हणत नाही. मनात नसताना तर किडनॅप केल्यासारखे येतात सोबत. यावेळी मात्र माझीच आयडिया होती, मीच "चला, सुट्टी एन्जॉय करू" म्हणून पकडून गाडीत घालून नेलं होतं. मी स्वतःच जे चुळबुळ केली, पॉपकॉर्न तर लगेच संपले. थोडा वेळ झोपले सुद्धा. काय माहीत एवढा बोअर तर 'विकेड' सुद्धा झाला नाही, तो तर म्युझिकल होता.
सिमरन, मुलांनी एन्जॉय केला तर मग अजून काय हवं !
माझ्या भाच्यालाही पहायचा आहे, मी 'जाऊन या' म्हटलं. लहान मुलांना आवडेलही.
दुसऱ्याचा शेवट जसा आहे तसा हा जवळपास अर्धा आहे अमित.
एकदा तर त्या मुलीने अंगात
एकदा तर त्या मुलीने अंगात आल्यासारखं केलं, घुमलीबिमली. मी म्हटलंही हे आमचंच चोरलंय>>>>
नावच इथुन उचललय… पुढचे काय मग

असो.. मला अवतार १ खुप आवडलेला. थेटरात होता तेव्हा खुप
हाईपमुळे बघायला गेले नव्हते. मला अगदी उच्च हाईप झालेले चित्रपट बघायचा कंटाळा येतो, उगीच मोठे मनोरथ घेऊन जायचे आणि ते जर कोसळले तर रडत बसायचे याचा कंटाळा येतो. नंतर कधीतरी टिवीवर बघितला आणि मोठ्या पडद्यावर न बघितल्याचा पश्चाताप झाला… कथेसाठी नाही, कथा नेहमीचीच घिसिपिटी.. बेकेटपासुन सुरु होऊन आपल्या नमकहरामपर्यंत पोचलेली. पण चित्रिकरण नेत्रसुखद होते इतकेच म्हणणे अन्यायकारक ठरले असते इतकी सुंदर दृश्ये पडद्यावर पाहायला मिळाली. विशेषतः ट्रि ऑफ लाईफचे दृश्य ..
दुसर्या भागाचा ट्रेलर थेटरात पाहिलेला. म्हटले हा तर गरुडावर बसलेला विष्णु
. चित्रपट बघायचा ठरवले होते पण नंतर उत्साह राहिला नाही. अवतार ३ चीही फारशी उत्सुकता वाटत नाहीय. २ व ३ ओटीटीवर बघेन.
>>>>>
>>>>>
अवतार न आवडणारी ही मंडळी खूप आहेत मुळात ही सगळी फॅन्टसी फिल्म आहे हे लक्षात घेऊन बघितली तर मजा येते
>>>>>
अवतार १ मध्ये फॅन्टसी वाटत नाही. सायन्स जास्त वाटते. आणि त्यातील इमोशन आणि संदेश एकूणच त्याला क्लासिक बनवते. त्याच्याशी तुलना करता नंतरचे भाग मात्र सायन्स कमी आणि फॅन्टसी जास्त होत खेचलेले वाटतात.
बाकी फॅन्टसीचा मुद्दा बरोबर आहे. ते डोक्यातून काढता आले नाही तर आवडणे अवघड. मला हाच अनुभव हॅरी पॉटर बाबत येऊ लागला. काय ते लहान मुलांचे जादूचे खेळ म्हणत नंतर कंटाळा येऊ लागला. घरचे मात्र पुन्हा पुन्हा तेच रिपीट मोड बघायचे त्यामुळे ते बीटीएस सारखे डोक्यात जाऊ लागले. पण या दोन्ही गोष्टी बिलकुल आवडत नाहीत हे त्याच्या चाहत्यांसमोर बोलायची सोय नाही.
मला हाच अनुभव हॅरी पॉटर बाबत
मला हाच अनुभव हॅरी पॉटर बाबत येऊ लागला. काय ते लहान मुलांचे जादूचे खेळ म्हणत नंतर कंटाळा येऊ लागला. घरचे मात्र पुन्हा पुन्हा तेच रिपीट मोड बघायचे त्यामुळे ते बीटीएस सारखे डोक्यात जाऊ लागले.>> हॅरी पॉटर तुम्ही बघाल तसे आहे. त्यातील बोगार्ट सारखे. पुस्तक वाचलेल्यांना हा रेफरेन्स कळेल.
मला तर त्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट खूप फिलॉसॉफिकल वाटल्या. पुस्तकं वाचून सिनेमे बघितले तर नक्कीच सगळ्यांना आवडतील.
हो मला कल्पना आहे. अश्या
हो मला कल्पना आहे. अश्या कलाकृती ज्यांना आवडतात त्यांना त्यातील फिलॉसॉफी दिसते, कळते, आणि ज्यांना आवडत नाही त्यांना समजत नाही. हाच मुद्दा होता. त्यात काय आवडण्यासारखे म्हणून कोणालाच नावे ठेवायची नव्हती.
आपले बरेच हिंदी चित्रपट सुद्धा असेच फिल्मी दुनियेत जाऊन बघायचे असतात. हे असे कुठे होते का म्हणून लॉजिक शोधत बसलो तर तीच खुसपट काढायची सवय लागते.
आणि हो, पुस्तके सुद्धा आमच्याकडे आहेत. ती बघून तर मला आता पिक्चर बघितल्यावर हा खर्चा कश्याला केला असे झाले होते
बॅटल ऑफ गलवान चं ट्रेलर
बॅटल ऑफ गलवान चं ट्रेलर पाहीलं .सलमान खानला बघूनच विषयाची वाट लागली असेल हा अंदाज आला. सलमान खान फिल्म्सने काही चांगले सिनेमे बनवले आहेत. पण थकेला सलमान युद्धपटात नकोच. त्यातून एकट्याने आर्मीला थोपवण्याचा सीन हास्यास्पद वाटला.
धुरंधर प्रमाणे प्रपोगंडा फिल्म बनवून गलवान प्रकरणात सरकारचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न शक्य नाही. कारण सलमानला याच सरकारने वाचवलं आहे. तो हे करणार नाही. आणि धुरंधर सारखा परफेक्ट प्रपोगंडा बनवण्याइतकी प्रतिभा त्याच्याकडे नाही. तो बंदरछापच पिक्चर बनवणार.
अस्मिता, अवतार बाबत प्रतिसाद
अस्मिता, अवतार बाबत प्रतिसाद

त्यापेक्षा दशावतारी बरे!
अवतार सिनेमा फॉरमॅट
अवतार सिनेमा फॉरमॅट
रेग्युलर माणसे भयंकर अन्याय जाळपोळ करतात.
- निळी माणसे पळतात.
रेग्युलर माणसे कोणत्यातरी अतिमहत्वाच्या गोष्टीसाठी आणखी जाळपोळ कापाकापी करतात. (पहिल्या भागात अनऑब्टेनियम (फारच कल्पक नाव!) दुसऱ्या व तिसऱ्या भागात व्हेलमाश्याचे अमृत (कल्पक २.०) )
- निळ्या माणसांना लास्ट स्टँड घेणे भाग पडते. जेक सुली भाषण देऊन, मोठ्या पक्ष्यावर उडून सगळ्यांना प्रेरित वैगरे करतो.
जेक सुलीची पोरे वन बाय वन पकडली जात असतात आणि त्याला मारामारीस जावे लागते.
निळी माणसे रेग्युलर माणसांशी उत्तम फाईट देतात, पण जिंकत आले असताना रेग्युलर माणसे आणखी ताकदीने येतात. आता निळी माणसे साफ मार खाऊ लागतात.
पण...
एव्हा आई जागृत होते आणि रानातले आणि पाण्यातले विविध पशु पक्षी येऊन रेग्युलर माणसांना पळवून लावतात. पक्षी येऊन भलीमोठी विमाने पाडतात आणि मासे बोटी पाडतात.
समाप्त.
आणि शेवटी कारण नसताना उपरती
आणि शेवटी कारण नसताना उपरती होते.
तीन दिवस झाले मोबाईलला हात
तीन दिवस झाले मोबाईलला हात लावता आलेला नाही.

आज पहाटे चोरून थोडा वेळ नेफ्लि वरचा रात अकेली है पाहिला. थोडा पापाचा कोटा संपवून टाकला
आधी कळेचना, या नावाचा आधी पाहिलाय असे वाटले.
हा पुढचा भाग आहे. बाह्य जगतात ध्यान अडकायला नको म्हणताना सस्पेन्स सुरू झाला तर तिथेच ध्यान अडकून बसले आहे.
रा अ के भाग २ पण आहे??? मी
रा अ के भाग २ पण आहे??? मी पहिला पाहिलाय हे लक्षात न राहवुन परत सुरु केला होता
रात अकेली पहिल्याच आणि
रात अकेली पहिल्याच आणि दुसऱ्याचा आपसात काही संबंध आहे का?
पहिल्याबद्दल फार काही चांगले न ऐकल्याने बघितला नव्हता.
दुसऱ्याबद्दल बरे ऐकू येतेय तर बघायची इच्छा आहे.
पहिला न बघता दुसरा बघितला तर चालतेय का?
रात अकेली है : बन्सल मर्डर्स
रात अकेली है : बन्सल मर्डर्स असं नाव आहे आताच्या पार्टचं. पार्ट २ असं काही म्हटलेलं नाही.
पहिल्या भागाप्रमाणेच हाय प्रोफाईल मर्डर केस. नवाजुद्दीन साधा इन्स्पेक्टर. ज्यांना प्रश्न विचारायचे ते सगळे उद्योगपती. गेल्या वेळी रॉयल फॅमिलीचे लोक होते. सगळ्याच फॅमिली मेंबर्सचा मर्डर झालाय आणि जे वाचलेत त्यांची चौकशी करायची आहे पण ती करता येत नाहीये. आता बघेन उरलेला.
फणा बघतोय
फणा बघतोय
नागाचा नाही आमिर आणि काजोलचा
लहानपणी तुकड्यात बघत अर्धवट सोडला होता.
का सोडला होता कल्पना नाही, पण आता अर्धा अधिक संपला आणि आवडतोय.
गाणी तर शायराना होतीच आणि तेव्हाही आवडायचीच. स्पेशली चांद सिफारिश.. शान आणि कैलाश खेर !
रात अकेली है - बन्सल मर्डर्स
रात अकेली है - बन्सल मर्डर्स - बोअर झाला मला. अजिबात ग्रिप च घेत नाही सिनेमा. असंख्य कॅरेक्टर्स, बहुतेक उगीचच आहेत. तपास नक्की कोणाकडे आहे? कोण कोणाला रिपोर्ट करतंय, कुणाला काय अधिकार असतात, कुणीही उठून आपापला लीड फॉलो करतं का? कळेनाच काही.
सस्पेन्स ज्या प्रकारे उलगडते तो भाग कै च्या कै वाटला. मेन लीड नवाजुद्दिन, शिवाय रजत कपूर, चित्रांगदा सिंग, रेवती, दीप्ती नवल, इला अरुण अजून कोण कोण कलाकार असूनही सिनेमाचा तसा काही इम्पॅक्ट नाही वाटला. हो, आणि राधिका आपटे का होती सिनेमात??
मस्त होता जब तक है जान
मस्त होता जब तक है जान
आजपर्यंत का पूर्ण पाहिला नव्हता असे झाले.
शेवटी पूर्ण पोहोचतो पिक्चर!
यश चोप्रा त्यांच्या शेवटच्या कामात सुद्धा प्रेमाचा एक वेगळा अँगल दाखवून गेले.
कतरिना आयुष्यातून गेल्यावर शाहरुखचे बदललेले आयुष्य जे अनुष्काने पाहिले असते ती जेव्हा त्याला त्याचे आधीचे आयुष्य जगताना पाहते तो चित्रपटाचा हाय पॉइंट होता.
झी५ वर साली मोहोब्बत बघितला.
झी५ वर साली मोहोब्बत बघितला. राधिका आपटे, मिर्झापुर मधला पण एक कॅरेक्टर आहे.
प्रेडिक्टेबल मर्डर मिस्ट्री आहे पण तरी पाहिला. ओके आहे. कोणी पाहिला असेल तर शेवटचा एक ट्विस्ट कळला नाही तो विचारता येईल
जब तक है जान संपताच सुलतान
जब तक है जान संपताच सुलतान लावला.
आधीच्यात अनुष्काला शाहरुख खान नाही भेटला तर यात निदान सलमान खान तरी मिळू दे म्हटले.
पण तिच्यातही काही कमी किडे नाहीत. तिथेही सुखाने नांदायला जमले नाही.
असो,
आधी म्हटले की सेकंड हाफ बघूया डायरेक्ट. पण पूर्वार्ध बघितल्याशिवाय उत्तरार्ध बघायचे इमोशन तयार होत नाहीत म्हणून पूर्ण बघितला.
मला त्याच्या पहिल्या फाईटचा मॉडर्न देसी धोबी पछाड सीन फार आवडतो. तो दोन तीन वेळा रिवाइंड करून पाहिला. थिएटरमध्ये ही रिवाइंड करायची मजा नसते. त्यामुळे घरीच राजाबाबू सारखे बघावे.
रात अकेली है पाहिला. मला
रात अकेली है पाहिला. मला तुकड्या तुकड्यात बघितल्याने असं वाटलं का समजलं नाही. पण इथे वाचून खरंच गंडलाय हे समजलं.
रात अकेली बाबत अंदाज खरे ठरला
रात अकेली बाबत अंदाज खरे ठरला तर, बरे झाले बघायला गेलो नाही. सुलतान, फनाह, जब तक है जान.. तीन खानाचे तीन चित्रपट झाले ओळीत
@ माणूस,
तुम्ही नक्की कुठल्या हायफाय माणसांबद्दल बोलत आहात? कारण मी सुद्धा गरजेपेक्षा जास्त कमावतो. आणि माझ्याकडे सुद्धा इतर सगळ्या कामांना माणसे आहेत. जेणेकरून मला निवांत मूवी बघता येतात.
कोणता ट्विस्ट कळला नाही अंजली
कोणता ट्विस्ट कळला नाही अंजली ?
शेवटचा एक ट्विस्ट कळला नाही
शेवटचा एक ट्विस्ट कळला नाही तो विचारता येईल Wink>>>>शेवटी कोणाला नक्क्की मारायला शरद सक्सेना रोपाची कुंडी घेऊन आलेला असतो ? हाच का.
राधिका आपटे चे दोन चित्रपट पाहिले .पहिला सिस्टर मिडनाइट, अतिशय वाईट चित्रपट ,का पाहिला असं झालं .सुरुवातीलाच जेव्हा ती पहिल्या रात्री बाहेर जाऊन विड्या फुंकते तेव्हाच खरंतर बंद करायला हवा होता. तरी म्हंटल बघूया पण एका वाक्यात चित्रपटाबद्दल सांगायचं तर ,वियर्ड लोकांनी वियर्ड लोकांसाठी काढलेली वियर्ड फिल्म. आर्ट फिल्म्स आवडतात पण हे म्हणजे माझ्या मेंदूच्या कक्षे बाहेरचं प्रकरण वाटलं. कोणी पूर्ण पाहिला असेल तर त्या शेवटी पळणाऱ्या मेंढ्यांचा काय अर्थ आहे हे सांगा.
राधिकाचाच दुसरा चित्रपट म्हणजे साली मोहोब्बत ,याबद्दल पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं मत म्हणजे एकदम मस्त चित्रपट, पण स्टोरीलाइन ओळखीची वाटली म्हणून डिरेक्टर कोण आहे ते पाहिलं ,टिस्का चोप्रा .मग लक्षात आलं तीची चटणी शॉर्टफिल्म मस्त होती, तशीच ही पण वाटली म्हणजे चटणी ची आठवण येते.तशी कथा पूर्णपणे वेगळी आहे पण ट्रीटमेंट सेम .स्टोरी लिहिलेय पण टीस्का नेच .एकंदरीत पाहण्यासारखी आहे फिल्म. यात राधिका आवडली.
सकाळी सकाळी एक लेखक यांच्या
सकाळी सकाळी एक लेखक यांच्या सिनेमाच्या विविध फॉर्मॅट चा प्रश्न पाहिला होता. इथे अवांतर असेल. कुणी जर धागा काढला तर छान माहिती मिळेल. कोलकत्याच्या सायन्स सिटीमधल्या स्पेस थिएटरचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. अनुभव म्हणाल तर आयमॅक्स तो अनुभव कधीही देऊ शकत नाही. पण ते किष्ट आणि प्रचंड महाग प्रकरण आहे. कमर्शियल मूव्ही या फॉर्मॅट मधे बनवणं अवघड आहे. तसा मूव्ही हा डोक्यात पूर्णपणे इमॅजिन करून मगच शूट करावा लागेल. अवघड आहे.
कोणता ट्विस्ट कळला नाही अंजली
कोणता ट्विस्ट कळला नाही अंजली ?>>>>> पोलिस इन्स्पेक्टरला पोत्यात घालून शरद सक्सेना पाण्यात टाकतो ना? मग तो व्हीलचेअरवर कसा काय दिसतो नंतर. वाचतो?
शरद सक्सेना रोपाची कुंडी घेऊन आलेला असतो ? हाच का.>>>>>>> नाही वरचाच प्रश्न पडलेला. रोपाची कुंडी आता दुसर्या नवर्यासाठी असणार ना?
स्पॉयलर्स असतील तर वॉर्निंग
स्पॉयलर्स असतील तर वॉर्निंग द्या प्लीज
Finding Dory बघतोय.. Hotstar
Finding Dory बघतोय.. Hotstar
मासे बोलताना दाखवलेत.. काहीही
Pages