Farend हे नाही पटले. मुस्लिम द्वेष हा उत्तरेतच नाही तर अगदी महाराष्ट्रात सुद्धा फोफावला आहे. लोक ओला वर मुस्लिम driver चे नाव आले तर बुकिंग रद्द करतात. फळे, भाजी मुस्लिम लोकांकडून घेत नाहीत. जातीभेद उत्तरेकडे अजूनही प्रचंड आहे. वर साधना ह्यांनी लिहिले आहे तो प्रसंग खरेच घडला आहे यू पी मध्ये शाळेत. नग्न धिंड काढणे, पाणपोइ विहिरी वेगळ्या असणे, वस्ती वेगळी असणे हे अजून सुद्धा हिंदी बहुल पट्ट्यात जोरात चालते. भारत आणि इंडिया आधी वेगळे असावेत, आता इंडिया परत भारत होत आहे. >>>>
लंपन माझा रोख या गोष्टींवर नाही. याबद्दल सहमत आहेच. इथे अवांतर होईल म्हणून जास्त खोलात शिरत नाही.
ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन नेफी वर पाहिला. एकदम जबरदस्त चित्रपट. अत्यंत सुंदर. तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूड पेक्षा सुद्धा सरस वाटला. प्रचंड मेहनतीने बनविलेला चित्रपट आहे हे पाहताना जाणवत राहत. कथा वेगवान आहे, कुठेही कंटाळा येत नाही. असे चित्रपट आपण ऑस्कर ला पाठवायला हवेत. धन्यवाद ऋन्मेष सुचविल्याबद्दल.
Submitted by माबो वाचक on 4 December, 2025 - 08:44
Premalu – Jio Hotstar
Original language – Malyalam
IMDb 7.8 – KL State Award Winner हे वाचून आणि लव्हस्टोरी आहे हे बघून सुरू केला.
सुरुवातीला ओके ओके वाटला. पण बदलावे ढकलावे असे कुठे वाटले नाही. थोड्याच वेळात चित्रपट हैदराबाद शहरात गेला आणि लव्हस्टोरी ट्रॅक सुरू झाला तसे हळूहळू रंगत गेला. सेकंड हाफ जास्त छान वाटला. एका मुली मागे दोन मुले आणि दुसरा हिरोपेक्षा भावखाऊ असे दाखवल्याने छोटी छोटी सी बात वाईब सुद्धा आले. हिरोचा मित्र त्याच्या लव्ह स्टोरी मध्ये गुंततो तसे मलाही चित्रपटात गुंतायला झाले त्यामुळे शेवटी गोड शेवट बघून छान वाटले. ओवरऑल फार आवडला.
पहिला भाग पाहिला. मला खूप आवडला. टिपिकल अनुराग कश्यप स्टँप आहे. गँग्ज ऑफ वासेपूरची आठवण येतेच. पण गँग्जपेक्षा किंचित कमी रासवट, अधिक कलात्मक आहे. (किमान पहिला भाग पाहून तरी मला तसं वाटलं).
त्यामुळे सध्या तरी गँग्जपेक्षा हा जास्त आवडलाय.
काही गाणी गंमतशीर आहेत.. लिरिक्समध्ये प्रादेशिक छाप पुरेपूर आहे. कानपुरिया कंटाप, डाई फार आवर कंटरी.
क्या है क्या है हे रोमँटिक गाणं खूप आवडलं. रोमँटिक असूनही त्यात काहीतरी गूढ असावं असा आवाज, चाल आहे त्याची.
आणि कास्टिंग काय जबरदस्त असतं या माणसाचं! ऐश्वर्य ठाकरे हा कलाकार मला माहिती नव्हता. डबल रोल आहे हे सुरुवातीला समजलं नाही, इतका गेट-अपमध्ये सटल काय काय फरक होता. त्याने उत्तम काम केलंय.
मोनिका पनवर जामताडात लक्षात राहिली होती. कमाल अॅक्ट्रेस आहे ती. तिचा कॅरेक्टर आर्कही खूप छान आहे. कुटुंबातली अल्फा-फिमेल म्हणून तिचं पात्र जोरदार लिहिलेलं आहे. म्हटलं तर सेकंड-फिडल, पण घूम-फिर के कथानक तिच्याकडे परततं.
टायटल रोल तिच्याकडेच जातोय की काय असं मानायला जागा आहे. दुसर्या भागात समजेल.
Submitted by ललिता-प्रीति on 4 December, 2025 - 23:30
गेल्या रविवारी नितीन आणि श्रीलीलाचा 'एक्स्ट्रा ऑर्डीनरी मॅन' हा (मूळचा तेलगू) हिंदी डब्ड चित्रपट युट्युबवर पाहिला. लॉजिक वगैरे शोधण्याच्या भानगडीत न पडता, डोकं बाजूला ठेऊन केवळ 'मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन' ह्या उद्देशाने चित्रपट पाहायची आवड असल्यास (गाणी पळवत 😀) पहावा असा चित्रपट आहे! कॉमेडी थोडी वेगळ्या टाईपची वाटली.
Submitted by संजय भावे on 5 December, 2025 - 02:10
रणवीर कपूर, करिश्मा कपूर, अर्जुन कपूर, करिना कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, आर्यन खान, आमीर खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, अक्षय खन्ना, सनी देओल, बॉबी देओल, राजदीप देओल, करन देओल, अजिंक्य देव, रितेश देशमुख, करन जोहर, आदित्य चोप्रा, उदय चोप्रा अशा सर्वांच्या कुटुंबाची माहिती आपण चघळतोच कि. त्यामुळंच त्यांनी दिली असेल ही माहिती. त्यातून ठाकरे हे नाव मराठी कुटुंबाच्या जिव्हाळ्याचं. त्यांना कसं झिडकारणार ?
त्याच्या कुटुंबाची माहिती काय करायचीय. मी 'कलाकार' माहिती नव्हता असं लिहिलंय.
>>>
मला त्याच्या घरच्यांमुळेच तो "कलाकार" आहे हे आधीपासून माहीत होते कारण त्यामुळे तो चर्चेत होता. म्हणून मी त्याच्या घरच्यांची नावे सांगितली.
जसे कल हो ना हो आल्यानंतर हृतिक बद्दल समजले पण तुझे मेरी कसम येण्याआधीच रितेश देशमुख बद्दल माहीत होते.
माझ्यामते कलाकार म्हणजे जो कलेची मनापासून उपासना करतो. राजकारणात आयते करिअर करून नाव पैसा कमवायची संधी असून जे आपले कलेचे Passion फॉलो करतात त्यांच्या कलेच्या उपासनेवर शंका तरी मी कशी घ्यावी.
म्हणून जेव्हा ठाकरे परिवारातील एखादा मुलगा चित्रपटात आला तेव्हाच मला समजले की अरे हा तर "कलाकार" आहे
एक लेखक को कभी इग्नोर मत करना ! >>>> हो , ते कधीही तुम्हाला ठार मारू शकतात.
निशानची की निशांची चं पोस्टर अंधेरीला हायवेवर सप्टेंबर मध्ये पाहिलं होतं ,वाटलं होतं असेल यूपी साईड वाल्या हौशी कलाकारांचा चित्रपट . मागे मैत्रेयी यांच्या रेको वरून कळले अनुराग कश्यप डायरेक्टर आहे मग बघायला घेतला.टोटल अनुराग कश्यप स्टाईल बऱ्याचदा गँग ऑफ वासेपूर ची आठवण होते त्याच्या फॅन्स साठी तर मस्ट वॉच. नवीन अँक्टर्स असले तरी मस्त कामं केली आहेत ऐश्वर्य ठाकरे प्रॉमिसिंग वाटतोय.हिरोईन एक नवीन आहे ती ठीक आहे दुसरी खौफ ,जमतारा मध्ये होती तिनेही चांगले काम केलेय. स्टोरी डायलॉग मस्त स्पेशल मेन्शन करण्यासारखी गोष्ट म्हणजे गाणी. मस्त आहेत.
म्हटलं याचं प्रोमो प्रमोशन काहीच पाहिलं नाही , थिएटर ला फ्लॉप झालेला का? तर चेक केलं ,तर बॉक्स ऑफिस वर हिट दाखवतोय एक करोड चा गल्ला जमा केलाय या लो बजेट पिक्चर ने.
“ कल हो ना हो आल्यानंतर हृतिक बद्दल समजले” - ‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे. असते एकेकाची दिव्यदृष्टी!
- ‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे >> कहो ना आणि कल हो ना हे इतकं कन्फ्युजिंग आहे , त्यामुळं म्हटलं असेल ऋन्मेषजींनी तसं. सर्वांचाच असा गोंधळ होतो. राकेश रोशन यांनी थोडं कॅची टायटल ठेवायला पाहीजे होतं. खामोश दिल कि धडकन , किसका चेहरा किसका प्यार
ओह.. मला तर फेरफटका यांची पूर्ण पोस्ट वाचूनही समजले नाही की माझे काय चुकले
गेल्या महिन्याभरात कल हो ना हो आणि कहो ना प्यार है दोन्ही चित्रपट पाहिल्यामुळे पटकन जे नाव उडी मारून डोक्यातून बाहेर आले ते टाईपले असे झाले असावे
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे >>>
निशान्ची पहिला भाग पाहिला पूर्ण. मस्त आहे. ऐश्वर्य ठाकरे कोठेही नवखा वाटत नाही. मोनिका पनवरचे काम चांगले आहे. ती हिरॉइन आहे तिचेही. कुमुद मिश्रा तर असतोच भारी. सुरूवातीच्या दोन तीन गाण्यांबद्दल आधीच लिहीले आहे वरती. दुसरा भाग अजून पाहायचा आहे.
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे >
आर्यन वेगवान होता नि अथपासून इतिपर्यंत एकाच वेळी बघता आला. हाताळणी मात्र अगदीच बाळबोध वाटली. नंबीचे फॅमिली शेपूट अगदीच अनावश्यक. तोच प्रकार मधल्या फायटींगचा. देवगण ह्यावर हिंदी सिनेमा काढेल असे वाटते. हा हिरो नि अजय दोघेही सिरियस थिंकिंग लुक म्हणजे हनुवटी थोडी खाली करून डोळे ऊर्ध दिशेला लावून पुटपुटतात.
आर्यन हा हसण्यावारी नेण्यासारखा नाही. यातली अक्षरे हा क्ल्यू आहे.
डर आणि बाजीगर मधे व्हिलन हिरो असतो, तसा प्रयोग इथं केला आहे. फरक इतकाच कि व्हिलन सुरूवातीलाच पाच मिनिटात मरतो.
पण त्यानंतर (मेल्यानंतर) तो खून करत राहतो. हिरोला बाजीगरच्या सिद्धार्थ सारखं काम आहे. अॅक्च्युअली शाहरूख खानच त्यात हिरो आहे.
डॉन मधे पहिला बच्चन मेल्यानंतर तो व्हिलन असून हिरोच राहतो. त्याच्या जागी आलेल्या दुसर्या बच्चनला हिरो असून एव्हढं काम नाही.
हा त्याच्या पुढे जाणारा पिक्चर आहे. हिंदीत बनला तर एक लेखकचं काम परेश रावल किंवा त्रिपाठी करू शकतात.
पहिल्या भागापेक्षा दुसर्या भागाचा वेग जाणीवपूर्वक कमी ठेवलेला असणं, त्यामुळे प्रेक्षक अस्वस्थ होत जातील आणि जोरदार क्लायमॅक्स त्यांच्यावर आदळेल - हे गणित बर्यापैकी जमलंय, नाही असं नाही, पण पहिल्या भागाइतका दुसरा भाग दमदार, जोरकस इ.इ. वाटला नाही. दुसर्या भागाचा सेकंड हाफ जरा फिल्मी आहे.
पण पहिल्या भागाच्या पुण्याईमुळे हा भाग आवडला.
शिवाय शेवटाचा अंदाज अनेकांनी केला असेलच.
दोन भावांचा मोठा सीन छान आहे. साध्यासुध्या भावाला (डबलू, बबलूपैकी कोण कुठला यात अजूनही माझा गोंधळ होतोय) इथे एकदाच मोठे, लांब डायलॉग मिळालेत. ते त्याने मस्त केलंय.
कुमुद मिश्रा आणि मोनिका पनवरची जुगलबंदी एकदम टशन आहे. त्यांचे सीन्स बघताना फार मजा आली. कारमधल्या दृश्यात टेन्शन शिगोशीग भरलेलं आहे.
एकूण दोन्ही भाग मिळून 'गँग्ज...'पेक्षा हा जास्त आवडला.
Submitted by ललिता-प्रीति on 6 December, 2025 - 23:15
धुरंधर पाहिला.
काही भाग उत्तम आहेत. अक्षय खन्ना जबरदस्त. रणवीर सिंह छानच. पण खूप गरज नसताना रक्त मांस गोर दाखवले आहे. सिनेमा प्रचंड लांबलेला आहे. ४५ मिनिटे सहज कट होऊ शकतात. पार्श्वसंगीत छान आहे पण बऱ्याच ठिकाणी इतके जास्त कर्कश आहे की डायलॉगच ऐकूच येत नाहीत.
प्रो भाजप राजकारण अतिशय ओव्हर्टली दाखवले आहे.
आणि सिनेमा खऱ्या घटनांवर प्रेरित आहे पण भरपूर नाट्यीकरण आहे असे डिस्क्लेमर येते. पण दिग्दर्शक स्वतःच मध्ये मध्ये खऱ्या घटनांची फुटेज घालून खरे आणि फिक्षन ह्यातली लाइन धूसर केलीय.
राभू हा नुसताच सुंदरी वेगळा आहे का? बाकी परम सुंदरी वगैरेही आलेत म्हणून विचारतोय की तुम्ही शॉर्ट मधे लिहीलेले नाही ना?
ल-प्रि - मी ही दुसरा भाग साधारण अर्धा पाहिला. पहिल्याच्या मानाने थोडा स्लो आहे पण तरीही एंगेजिंग वाटतोय. बहुधा उरलेल्या तासाभरात वेग पकडेल असे दिसते.
नेटफ्लिक्समधे यश चोप्राचे बरेच पिक्चर्स एकदम आलेत. शाखाचे जवळजवळ सगळे असावेत. बच्चनचे काला पत्थर आणि कभी कभी दिसत आहेत. काला पत्थरचे बच्चनचे, त्याच्या शत्रूघ्न बरोबरच्या खुन्नसचे सीन्स बाकीचे पळवून परत पाहिले (अपवाद शशी कपूर परवीनला कोळशाबद्दल "माहिती" देतो तो सीन). ते कधीही मस्त वाटतात. बाकी कम्युनिस्ट सोशालिस्ट अंडरटोन आहेच तेव्हाच्या अनेक पिक्चर्स सारखा. गाण्यातील साहिरच्या ओळी आणि संवादांतील सलीम-जावेदची वाक्ये एकाच व्यक्तीने लिहील्यासारखी कन्सिस्टंट वाटतात. खाणमालक मात्र एकदम ढोबळ आहे त्याला मजुरांची काळजी नसेल पण किमान काही काळ आपली खाण बंद पडेल व त्यातून उत्पन्न मिळणार नाही यावर तरी तो विचार करेल? तीही काळजी त्याला दिसत नाही
त्या बोलबच्चन धाग्यावरून कुतुहल जागे होउन त्यावेळेसचे काही पिक्चर वगैरे पाहावेसे वाटले. पीकॉक वर "डंकर्क" थोडा पाहिला. तो नेमका दुसर्या दिवशी त्यांनी काढला असे दिसते. पण जेवढा पाहिला तेवढा एंगेजिंग वाटला. नेफिने मग "चर्चिल अॅट वॉर" नावाची एक चार भागांची डॉक्युमेण्टरी सजेस्ट केली. ती मला खूप आवडली. दुसर्या महायुध्दाच्या वेळचा काळ जास्त दाखवला आहे पण थोडे आधी व नंतरचेही आहे. मुख्य म्हणजे चर्चिलची काळी बाजूही तितकीच दाखवली आहे - बंगालच्या दुष्काळाच्या वेळची त्याची भूमिका वगैरे. तसेच पहिल्या महायुद्धाच्या वेळचे त्याचे अपयशही. या विषयाची आवड असेल तर नक्की बघा. नेटफ्लिक्सवर आहे.
अमेरिकेला सुरूवातीला या युद्धात काही इंटरेस्ट नसणे हा एक भाग आणि अमेरिकेने अटलांटिक कराराच्या वेळेस ब्रिटनला वसाहतींमधून बाहेर पडण्याचा आग्रह करणे हे दुसरे - माबोवर इतरत्र चर्चिले गेलेले हे दोन्ही विषय यात ठळकपणे आले आहेत.
नुसताच सुंदरी वेगळा आहे का? >> हो. हा सुंदरी वेगळा आहे. आता तर हा सिनेमा अर्धा तास पाहिला हे सांगितल्याचीही लाज वाटतेय इतकी लाज वाटतेय. या अशा सिनेमांमुळे साऊथ सिनेमे बदनाम होतात. पुन्हा फेसबुक रेको घेणार नाही.
Farend हे नाही पटले. मुस्लिम
Farend हे नाही पटले. मुस्लिम द्वेष हा उत्तरेतच नाही तर अगदी महाराष्ट्रात सुद्धा फोफावला आहे. लोक ओला वर मुस्लिम driver चे नाव आले तर बुकिंग रद्द करतात. फळे, भाजी मुस्लिम लोकांकडून घेत नाहीत. जातीभेद उत्तरेकडे अजूनही प्रचंड आहे. वर साधना ह्यांनी लिहिले आहे तो प्रसंग खरेच घडला आहे यू पी मध्ये शाळेत. नग्न धिंड काढणे, पाणपोइ विहिरी वेगळ्या असणे, वस्ती वेगळी असणे हे अजून सुद्धा हिंदी बहुल पट्ट्यात जोरात चालते. भारत आणि इंडिया आधी वेगळे असावेत, आता इंडिया परत भारत होत आहे. >>>>
लंपन माझा रोख या गोष्टींवर नाही. याबद्दल सहमत आहेच. इथे अवांतर होईल म्हणून जास्त खोलात शिरत नाही.
ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन
ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन नेफी वर पाहिला. एकदम जबरदस्त चित्रपट. अत्यंत सुंदर. तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूड पेक्षा सुद्धा सरस वाटला. प्रचंड मेहनतीने बनविलेला चित्रपट आहे हे पाहताना जाणवत राहत. कथा वेगवान आहे, कुठेही कंटाळा येत नाही. असे चित्रपट आपण ऑस्कर ला पाठवायला हवेत. धन्यवाद ऋन्मेष सुचविल्याबद्दल.
Premalu – Jio Hotstar
Premalu – Jio Hotstar
Original language – Malyalam
IMDb 7.8 – KL State Award Winner हे वाचून आणि लव्हस्टोरी आहे हे बघून सुरू केला.
सुरुवातीला ओके ओके वाटला. पण बदलावे ढकलावे असे कुठे वाटले नाही. थोड्याच वेळात चित्रपट हैदराबाद शहरात गेला आणि लव्हस्टोरी ट्रॅक सुरू झाला तसे हळूहळू रंगत गेला. सेकंड हाफ जास्त छान वाटला. एका मुली मागे दोन मुले आणि दुसरा हिरोपेक्षा भावखाऊ असे दाखवल्याने छोटी छोटी सी बात वाईब सुद्धा आले. हिरोचा मित्र त्याच्या लव्ह स्टोरी मध्ये गुंततो तसे मलाही चित्रपटात गुंतायला झाले त्यामुळे शेवटी गोड शेवट बघून छान वाटले. ओवरऑल फार आवडला.
निशांची (प्राइम)
निशांची (प्राइम)
पहिला भाग पाहिला. मला खूप आवडला. टिपिकल अनुराग कश्यप स्टँप आहे. गँग्ज ऑफ वासेपूरची आठवण येतेच. पण गँग्जपेक्षा किंचित कमी रासवट, अधिक कलात्मक आहे. (किमान पहिला भाग पाहून तरी मला तसं वाटलं).
त्यामुळे सध्या तरी गँग्जपेक्षा हा जास्त आवडलाय.
काही गाणी गंमतशीर आहेत.. लिरिक्समध्ये प्रादेशिक छाप पुरेपूर आहे. कानपुरिया कंटाप, डाई फार आवर कंटरी.
क्या है क्या है हे रोमँटिक गाणं खूप आवडलं. रोमँटिक असूनही त्यात काहीतरी गूढ असावं असा आवाज, चाल आहे त्याची.
आणि कास्टिंग काय जबरदस्त असतं या माणसाचं! ऐश्वर्य ठाकरे हा कलाकार मला माहिती नव्हता. डबल रोल आहे हे सुरुवातीला समजलं नाही, इतका गेट-अपमध्ये सटल काय काय फरक होता. त्याने उत्तम काम केलंय.
मोनिका पनवर जामताडात लक्षात राहिली होती. कमाल अॅक्ट्रेस आहे ती. तिचा कॅरेक्टर आर्कही खूप छान आहे. कुटुंबातली अल्फा-फिमेल म्हणून तिचं पात्र जोरदार लिहिलेलं आहे. म्हटलं तर सेकंड-फिडल, पण घूम-फिर के कथानक तिच्याकडे परततं.
टायटल रोल तिच्याकडेच जातोय की काय असं मानायला जागा आहे. दुसर्या भागात समजेल.
ऐश्वर्य ठाकरे हा कलाकार मला
ऐश्वर्य ठाकरे हा कलाकार मला माहिती नव्हता.
>>>>
आई स्मिता ठाकरे
आजोबा स्व. बाळासाहेब ठाकरे
गेल्या रविवारी नितीन आणि
गेल्या रविवारी नितीन आणि श्रीलीलाचा 'एक्स्ट्रा ऑर्डीनरी मॅन' हा (मूळचा तेलगू) हिंदी डब्ड चित्रपट युट्युबवर पाहिला. लॉजिक वगैरे शोधण्याच्या भानगडीत न पडता, डोकं बाजूला ठेऊन केवळ 'मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन' ह्या उद्देशाने चित्रपट पाहायची आवड असल्यास (गाणी पळवत 😀) पहावा असा चित्रपट आहे! कॉमेडी थोडी वेगळ्या टाईपची वाटली.
ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन
ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन नेफी वर पाहिला. एकदम जबरदस्त चित्रपट. ----->>> यातून काय संदेश मिळतो ?
एक लेखक को कभी इग्नोर मत करना !
आई स्मिता ठाकरे
आई स्मिता ठाकरे
आजोबा स्व. बाळासाहेब ठाकरे
>>>
त्याच्या कुटुंबाची माहिती काय करायचीय.... मी 'कलाकार' माहिती नव्हता असं लिहिलंय.
रणवीर कपूर, करिश्मा कपूर,
रणवीर कपूर, करिश्मा कपूर, अर्जुन कपूर, करिना कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, आर्यन खान, आमीर खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, अक्षय खन्ना, सनी देओल, बॉबी देओल, राजदीप देओल, करन देओल, अजिंक्य देव, रितेश देशमुख, करन जोहर, आदित्य चोप्रा, उदय चोप्रा अशा सर्वांच्या कुटुंबाची माहिती आपण चघळतोच कि. त्यामुळंच त्यांनी दिली असेल ही माहिती. त्यातून ठाकरे हे नाव मराठी कुटुंबाच्या जिव्हाळ्याचं. त्यांना कसं झिडकारणार ?
कलेचं घराणं समजलं कि कलेची खोली लक्षात येते.
यातून काय संदेश मिळतो ?
यातून काय संदेश मिळतो ?
एक लेखक को कभी इग्नोर मत करना ! >>>> हो , ते कधीही तुम्हाला ठार मारू शकतात.
त्याच्या कुटुंबाची माहिती काय
त्याच्या कुटुंबाची माहिती काय करायचीय. मी 'कलाकार' माहिती नव्हता असं लिहिलंय.
>>>
मला त्याच्या घरच्यांमुळेच तो "कलाकार" आहे हे आधीपासून माहीत होते
कारण त्यामुळे तो चर्चेत होता. म्हणून मी त्याच्या घरच्यांची नावे सांगितली.
जसे कल हो ना हो आल्यानंतर हृतिक बद्दल समजले पण तुझे मेरी कसम येण्याआधीच रितेश देशमुख बद्दल माहीत होते.
माझ्यामते कलाकार म्हणजे जो कलेची मनापासून उपासना करतो. राजकारणात आयते करिअर करून नाव पैसा कमवायची संधी असून जे आपले कलेचे Passion फॉलो करतात त्यांच्या कलेच्या उपासनेवर शंका तरी मी कशी घ्यावी.
म्हणून जेव्हा ठाकरे परिवारातील एखादा मुलगा चित्रपटात आला तेव्हाच मला समजले की अरे हा तर "कलाकार" आहे
एक लेखक को कभी इग्नोर मत करना
एक लेखक को कभी इग्नोर मत करना ! >>>> हो , ते कधीही तुम्हाला ठार मारू शकतात.

निशानची की निशांची चं पोस्टर अंधेरीला हायवेवर सप्टेंबर मध्ये पाहिलं होतं ,वाटलं होतं असेल यूपी साईड वाल्या हौशी कलाकारांचा चित्रपट . मागे मैत्रेयी यांच्या रेको वरून कळले अनुराग कश्यप डायरेक्टर आहे मग बघायला घेतला.टोटल अनुराग कश्यप स्टाईल बऱ्याचदा गँग ऑफ वासेपूर ची आठवण होते त्याच्या फॅन्स साठी तर मस्ट वॉच. नवीन अँक्टर्स असले तरी मस्त कामं केली आहेत ऐश्वर्य ठाकरे प्रॉमिसिंग वाटतोय.हिरोईन एक नवीन आहे ती ठीक आहे दुसरी खौफ ,जमतारा मध्ये होती तिनेही चांगले काम केलेय. स्टोरी डायलॉग मस्त स्पेशल मेन्शन करण्यासारखी गोष्ट म्हणजे गाणी. मस्त आहेत.
म्हटलं याचं प्रोमो प्रमोशन काहीच पाहिलं नाही , थिएटर ला फ्लॉप झालेला का? तर चेक केलं ,तर बॉक्स ऑफिस वर हिट दाखवतोय एक करोड चा गल्ला जमा केलाय या लो बजेट पिक्चर ने.
“ कल हो ना हो आल्यानंतर हृतिक
“ कल हो ना हो आल्यानंतर हृतिक बद्दल समजले” - ‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे. असते एकेकाची दिव्यदृष्टी!
“ ऋन्मेष यांनी सुचविलेला
“ ऋन्मेष यांनी सुचविलेला आर्यन नेफी वर पाहिला” - ऋन्मेष, चांगला रेको होता रे. वेगवान आणि खिळवून ठेवतो मूव्ही. शेवटी जरा खेचलाय, पण ठीक आहे.
- ‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक
- ‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे >> कहो ना आणि कल हो ना हे इतकं कन्फ्युजिंग आहे , त्यामुळं म्हटलं असेल ऋन्मेषजींनी तसं. सर्वांचाच असा गोंधळ होतो. राकेश रोशन यांनी थोडं कॅची टायटल ठेवायला पाहीजे होतं. खामोश दिल कि धडकन , किसका चेहरा किसका प्यार
ओह.. मला तर फेरफटका यांची
ओह.. मला तर फेरफटका यांची पूर्ण पोस्ट वाचूनही समजले नाही की माझे काय चुकले
गेल्या महिन्याभरात कल हो ना हो आणि कहो ना प्यार है दोन्ही चित्रपट पाहिल्यामुळे पटकन जे नाव उडी मारून डोक्यातून बाहेर आले ते टाईपले असे झाले असावे
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे >>>
निशान्ची पहिला भाग पाहिला पूर्ण. मस्त आहे. ऐश्वर्य ठाकरे कोठेही नवखा वाटत नाही. मोनिका पनवरचे काम चांगले आहे. ती हिरॉइन आहे तिचेही. कुमुद मिश्रा तर असतोच भारी. सुरूवातीच्या दोन तीन गाण्यांबद्दल आधीच लिहीले आहे वरती. दुसरा भाग अजून पाहायचा आहे.
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक
‘कल हो ना हो’ मुळे ह्रितिक बद्दल समजणे म्हणजे महाभारत वाचून मंथरेविषयी किंवा शोले बघून दिलिप कुमारविषयी समजण्यासारखेच आहे >
आर्यन वेगवान होता नि अथपासून इतिपर्यंत एकाच वेळी बघता आला. हाताळणी मात्र अगदीच बाळबोध वाटली. नंबीचे फॅमिली शेपूट अगदीच अनावश्यक. तोच प्रकार मधल्या फायटींगचा. देवगण ह्यावर हिंदी सिनेमा काढेल असे वाटते. हा हिरो नि अजय दोघेही सिरियस थिंकिंग लुक म्हणजे हनुवटी थोडी खाली करून डोळे ऊर्ध दिशेला लावून पुटपुटतात.
हा हिरो नि अजय दोघेही सिरियस
हा हिरो नि अजय दोघेही सिरियस थिंकिंग लुक म्हणजे हनुवटी थोडी खाली करून डोळे ऊर्ध दिशेला लावून पुटपुटतात >>>
त्यांना या कोचची गरज आहे
साउथ च्या पिक्चर मधल्या हीरोचे नाव आर्यन? मला वाटले द्रविड असेल
आर्यन हा हसण्यावारी
आर्यन हा हसण्यावारी नेण्यासारखा नाही. यातली अक्षरे हा क्ल्यू आहे.
डर आणि बाजीगर मधे व्हिलन हिरो असतो, तसा प्रयोग इथं केला आहे. फरक इतकाच कि व्हिलन सुरूवातीलाच पाच मिनिटात मरतो.
पण त्यानंतर (मेल्यानंतर) तो खून करत राहतो. हिरोला बाजीगरच्या सिद्धार्थ सारखं काम आहे. अॅक्च्युअली शाहरूख खानच त्यात हिरो आहे.
डॉन मधे पहिला बच्चन मेल्यानंतर तो व्हिलन असून हिरोच राहतो. त्याच्या जागी आलेल्या दुसर्या बच्चनला हिरो असून एव्हढं काम नाही.
हा त्याच्या पुढे जाणारा पिक्चर आहे. हिंदीत बनला तर एक लेखकचं काम परेश रावल किंवा त्रिपाठी करू शकतात.
आर्यन चा रेको घेतला आहे.
आर्यन चा रेको घेतला आहे.
निशान्ची बघायचा प्रयत्न केला होता. पुन्हा करीन.
The girlfriend - Netflix
The girlfriend - Netflix
ओरिजनल लँग्वेज - तेलगू
पझेसिव आवरणाखाली लपलेला मिसोजनस बॉयफ्रेंड आणि नशिबात आलेला अनसपोर्टीव हट्टी बाप यात फसलेली एक इंट्रोवर्ट मुलगी - रश्मिका
म्हटले तर कबीर सिंग वाईब देत ठराविक वळणाने जातो चित्रपट पण सादरीकरण चांगले असल्याने उत्सुकता कायम राहते.
पण सर्वात महत्वाचा आहे तो शेवट आणि तो कडक जमला आहे. तेवढ्यासाठी तरी आवर्जून पाहावा हा पूर्ण चित्रपट.
रश्मिकाला गेल्या काही काळात बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले हे बरेच जणांना आश्चर्यकारक वाटते. पण ती मस्त अभिनय करते!
“हाताळणी मात्र अगदीच बाळबोध
“हाताळणी मात्र अगदीच बाळबोध वाटली. नंबीचे फॅमिली शेपूट अगदीच अनावश्यक. तोच प्रकार मधल्या फायटींगचा.” - +१
“साउथ च्या पिक्चर मधल्या हीरोचे नाव आर्यन?” - नंबी आहे. आर्यन चा संदर्भ वेगळा आहे.
“हा हिरो नि अजय दोघेही सिरियस थिंकिंग लुक म्हणजे हनुवटी थोडी खाली करून डोळे ऊर्ध दिशेला लावून पुटपुटतात”
“त्यांना या कोचची गरज आहे” -
परफेक्ट!
निशांची - भाग २ पाहिला.
निशांची - भाग २ पाहिला.
पहिल्या भागापेक्षा दुसर्या भागाचा वेग जाणीवपूर्वक कमी ठेवलेला असणं, त्यामुळे प्रेक्षक अस्वस्थ होत जातील आणि जोरदार क्लायमॅक्स त्यांच्यावर आदळेल - हे गणित बर्यापैकी जमलंय, नाही असं नाही, पण पहिल्या भागाइतका दुसरा भाग दमदार, जोरकस इ.इ. वाटला नाही. दुसर्या भागाचा सेकंड हाफ जरा फिल्मी आहे.
पण पहिल्या भागाच्या पुण्याईमुळे हा भाग आवडला.
शिवाय शेवटाचा अंदाज अनेकांनी केला असेलच.
दोन भावांचा मोठा सीन छान आहे. साध्यासुध्या भावाला (डबलू, बबलूपैकी कोण कुठला यात अजूनही माझा गोंधळ होतोय) इथे एकदाच मोठे, लांब डायलॉग मिळालेत. ते त्याने मस्त केलंय.
कुमुद मिश्रा आणि मोनिका पनवरची जुगलबंदी एकदम टशन आहे. त्यांचे सीन्स बघताना फार मजा आली. कारमधल्या दृश्यात टेन्शन शिगोशीग भरलेलं आहे.
एकूण दोन्ही भाग मिळून 'गँग्ज...'पेक्षा हा जास्त आवडला.
धुरंधर पाहिला.
धुरंधर पाहिला.
काही भाग उत्तम आहेत. अक्षय खन्ना जबरदस्त. रणवीर सिंह छानच. पण खूप गरज नसताना रक्त मांस गोर दाखवले आहे. सिनेमा प्रचंड लांबलेला आहे. ४५ मिनिटे सहज कट होऊ शकतात. पार्श्वसंगीत छान आहे पण बऱ्याच ठिकाणी इतके जास्त कर्कश आहे की डायलॉगच ऐकूच येत नाहीत.
प्रो भाजप राजकारण अतिशय ओव्हर्टली दाखवले आहे.
आणि सिनेमा खऱ्या घटनांवर प्रेरित आहे पण भरपूर नाट्यीकरण आहे असे डिस्क्लेमर येते. पण दिग्दर्शक स्वतःच मध्ये मध्ये खऱ्या घटनांची फुटेज घालून खरे आणि फिक्षन ह्यातली लाइन धूसर केलीय.
आर्यन आवडला. चुका काढायचा
आर्यन आवडला. चुका काढायचा वेळच दिला नाही.
सुंदरी नावाचा पिक्चर कुणीही रिको दिला तरी बघू नका. नेटाने कसा बसा अर्धा तास पाहिला. विकृत आहे.
मिराज नावाचा मल्ल्यलम सिनेमा
मिराज नावाचा मल्ल्यलम सिनेमा आहे . छान सस्पेन्स आहे. सोनी लिव वर आहे.
राभू हा नुसताच सुंदरी वेगळा
राभू हा नुसताच सुंदरी वेगळा आहे का? बाकी परम सुंदरी वगैरेही आलेत म्हणून विचारतोय की तुम्ही शॉर्ट मधे लिहीलेले नाही ना?
ल-प्रि - मी ही दुसरा भाग साधारण अर्धा पाहिला. पहिल्याच्या मानाने थोडा स्लो आहे पण तरीही एंगेजिंग वाटतोय. बहुधा उरलेल्या तासाभरात वेग पकडेल असे दिसते.
नेटफ्लिक्समधे यश चोप्राचे बरेच पिक्चर्स एकदम आलेत. शाखाचे जवळजवळ सगळे असावेत. बच्चनचे काला पत्थर आणि कभी कभी दिसत आहेत. काला पत्थरचे बच्चनचे, त्याच्या शत्रूघ्न बरोबरच्या खुन्नसचे सीन्स बाकीचे पळवून परत पाहिले (अपवाद शशी कपूर परवीनला कोळशाबद्दल "माहिती" देतो तो सीन). ते कधीही मस्त वाटतात. बाकी कम्युनिस्ट सोशालिस्ट अंडरटोन आहेच तेव्हाच्या अनेक पिक्चर्स सारखा. गाण्यातील साहिरच्या ओळी आणि संवादांतील सलीम-जावेदची वाक्ये एकाच व्यक्तीने लिहील्यासारखी कन्सिस्टंट वाटतात. खाणमालक मात्र एकदम ढोबळ आहे
त्याला मजुरांची काळजी नसेल पण किमान काही काळ आपली खाण बंद पडेल व त्यातून उत्पन्न मिळणार नाही यावर तरी तो विचार करेल? तीही काळजी त्याला दिसत नाही 
त्या बोलबच्चन धाग्यावरून
त्या बोलबच्चन धाग्यावरून कुतुहल जागे होउन त्यावेळेसचे काही पिक्चर वगैरे पाहावेसे वाटले. पीकॉक वर "डंकर्क" थोडा पाहिला. तो नेमका दुसर्या दिवशी त्यांनी काढला असे दिसते. पण जेवढा पाहिला तेवढा एंगेजिंग वाटला. नेफिने मग "चर्चिल अॅट वॉर" नावाची एक चार भागांची डॉक्युमेण्टरी सजेस्ट केली. ती मला खूप आवडली. दुसर्या महायुध्दाच्या वेळचा काळ जास्त दाखवला आहे पण थोडे आधी व नंतरचेही आहे. मुख्य म्हणजे चर्चिलची काळी बाजूही तितकीच दाखवली आहे - बंगालच्या दुष्काळाच्या वेळची त्याची भूमिका वगैरे. तसेच पहिल्या महायुद्धाच्या वेळचे त्याचे अपयशही. या विषयाची आवड असेल तर नक्की बघा. नेटफ्लिक्सवर आहे.
अमेरिकेला सुरूवातीला या युद्धात काही इंटरेस्ट नसणे हा एक भाग आणि अमेरिकेने अटलांटिक कराराच्या वेळेस ब्रिटनला वसाहतींमधून बाहेर पडण्याचा आग्रह करणे हे दुसरे - माबोवर इतरत्र चर्चिले गेलेले हे दोन्ही विषय यात ठळकपणे आले आहेत.
नुसताच सुंदरी वेगळा आहे का? >

Pages