वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

56 days बिन्ज वॉच करून संपवली . आवडली
अगदी शेवटपर्यन्त काय होईल म्हणून उत्कंठा लागून होती .

पूर्ण वेळ "शिकार खूद यहां शिकार हो गया " वाली फिनीन्ग होती Happy
कोण खरं , कोण खोटं , कोण निरपराध , कोणाची चूक -सुई नुसती गरागरा फिरत होती .

सुनील शेट्टी - फिरोझ इराणी?? ईईई

५६ डेज - ट्रेलर बघून इग्नोर केली होती. आता बघावी काय असं वाटायला लागलं.

STEAL (Prime) - जरा वेगळा विषय आहे. Money heist , पुढे प्रकरण चिघळत जातं.
वेगवान स्टोरी आहे. ६ च एपिसोड्स आहेत. कलाकार चेहरे वेगळे आहेत.
शेवटपर्यंत सस्पेन्स चांगला राखलाय. पुढचा सीझन येईलसं वाटतं, कारण गुन्ह्याचा सूत्रधार प्रत्यक्षात टोळी कशी जमवतो, ती माणसं गुन्हा करायला कशी काय तयार होतात, हे काही पहिल्या सीझनमध्ये सांगितलेलं नाही.

अनुभव मासिकात यंदा 'रंजन-बिंजन' सदरात वेब सिरीजवरचे लेख असणार आहेत.
मार्च अंकात अस्मिताचा 'द क्वीन्स गॅम्बिट' सीरीजवर लेख आहे.

Pages