वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूजा दलालचे शाळेचे बोअर वाटतात मला, बाकी चांगले असतात. खान्देशी गर्लपण चांगली रील बनवते.

अग ती पुजा दलाल भन्नाट क्रियेटर आहे, मी तिचे व्हीडिओ बघितलेत...फार मस्त करते.>>>+111.. मला पण आवडतात...

नेफ्लि वर मिलियन डॉलर सिक्रेट नावाचा रिएलिटी शो आहे. सहज म्हणून बघितला आणि दोन्ही सीझन्स बघून संपवले. ट्रेटर्स टाइप कन्सेप्ट आहे साधारण पण मला मजा आली बघताना. ट्रेटर्स पण आवडते मला.

हनिमून से हत्या - झी ५
पहिले दोन भाग बघितले. पहिला भाग राज कुस्वाह, राजा रघुवंशी आणि सोनम. अगदी थाटामाटात लग्न आणि लग्नाचे खरे व्हिडीओ आणि खरे विधी असे सगळे दाखवले आहे. फोन रेकॉर्डिंग पण खऱ्या आहेत. राजाचे सगळे कुटुंब बोलले आहे, आई,वडील, दोन भाऊ. सोनमच्या घरचे काही समोर आले नाहीत. एक फर्निचरचं दुकान चालवणारी मुलगी त्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या प्रेमात पडते जो तिच्यापेक्षा रंग, रूप, आर्थिक परिस्थिती कशातही बरोबरी करू शकत नाही. तो तिला सोनम दीदी म्हणत असतो आणि त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर तसाच सेव केलेला असतो. राजा रघुवंशी खरोखर देखणा होता. मुलीकडचे लग्नाची घाई करतात आणि सोनम साखरपुडा झाल्यावर राजाशी फोनवर जास्त बोलतही नसते, या मुद्द्यावर तरी मुलाकडच्यानी तिचा नीट तपास करायला हवा होता. मुलगी, तिचा प्रियकर आणि तिचे आई वडील या सगळ्यात बिचारा राजा जीव गमावून बसला. सोनमचे वडील तिला निर्दोष सोडून द्यावे म्हणून अजून कोर्टात तिची बाजू मांडत आहेत. कशी हिम्मत होते हे सगळे करण्याची. मला राजासाठी फार वाईट वाटले.
दुसरी स्टोरी रील बनवणाऱ्या बाईवर आहे जिचे पस्तीस हजार फॉलोअर आहेत. तिच्या नवऱ्याला तिचे रील बनवणे पसंत नसते, त्याचे उत्पन्नही कमी असते, तो दारुही पीत असतो, अशा सगळ्या कारणामुळे ती त्याला मारून टाकते आणि त्याचा मृतदेह स्कुटरवर मध्ये बसवून घेऊन जाते आणि नदीत टाकून देते. हे खून करणारे आणि त्यांना मदत करणारे काहीतरी वेगळ्या मातीचे बनलेले असतात बहुतेक.

Pages