Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Bridgerton S4 बघितला. Nothing
Bridgerton S4 बघितला. Nothing interesting.
तेच तेच विषय. लग्न करून मुलं जन्माला घालण हेच आयुष्याचं अंतिम ध्येय आहे सगळ्यांच्या.
ती Penelope डोक्यात जायला लागलीयं.
सोफी पण काय फार उजेड पाडत नाही.
बेनेडीक्ट महामूर्ख आहे.
जी मुलगी एवढी वेड लावते , तिच्या ओठाची ठेवण , डोळ्याचा रंग लक्षात आहे , ती समोर असताना 2 सेंटीमिटर अंतरावरून तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो तरी जराही संशय येत नाही.
रब ने बनादी चा second part आहे.
रानभुली - कोहरा २ -
रानभुली - कोहरा २ - नेटफ्लिक्स
मी अजून बघितलेली नाही पण खूप जणांनी खूप चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत . मी पण नोट केली आहे .
कोहरा २ साठी पहिला सिझन
कोहरा २ साठी पहिला सिझन बघावाच लागेल का?
अमर विश्वास बघतोय
अमर विश्वास बघतोय
च्यायला, कुठल्या कोर्ट चं कॅन्टीन इतकं चकाचक असतं???
बाकी पुस्तकातला गोल्डी डॅशिंग वाटायचा अन् दीक्षित वेंधळे
इथे दीक्षित फारच करारी दाखवलेत अन् गोल्डी च्या रोल मधला अनिल कधीही स्क्रीन वर आला तरी पुढच्या सेकंदाला रोहित शेट्टी च्या सिनेमातल्या सारखी कॉमेडी करेल की काय असंच वाटत राहतं
कोहरा २ साठी पहिला सिझन
कोहरा २ साठी पहिला सिझन बघावाच लागेल का? >>> नाही. फक्त अमरपालच्या आयुष्यात काय चाललंय ते सुरुवातीला कळणार नाही.
अमर विश्वास -मी पहिला भाग सु
अमर विश्वास -मी पहिला भाग सु शिंचा अमर विश्वास कसा अडाप्ट केलाय हे बघायला पाहिला. काही मजा नाही आली. हा अमर मख्ख आहे नुसता. मिश्किल पणा, दिक्षित कॉमेडी काहीच नाही. नुसता कोर्ट रुम ड्रामा बघायचा तर इतर बरेच आहेत. तसेही त्या कथा तशाच्या तशा घेतल्या तर आता आउटडेटेड वाटणार. त्यामुळे पुढे बघेन असे वाटत नाही.
नेटफ्लिक्स वर हिज अँड हर्स ही मिनि सीरीज बघितली. चांगला थ्रिलर आहे. ६-७ च भाग आहेत, एका लहान गावातल्या मर्डर केस चा तपास, पण जसे भाग उलगडतात तसे विक्टिमशी गावातले इतर मह्त्त्वाचे लोक, पोलिस, रिपोर्टर्स सगळेच कुठे ना कुठे केस शी कनेक्टेड आहेत असे दिसते. बरेच अनपेक्षित ट्विस्ट्स आहेत. एकूण एन्गेजिंग वाटली.
अमॅझॉन प्राईमवर दिसत नाही
अमॅझॉन प्राईमवर दिसत नाही बहुतेक.
कोहरा 1 पाहिलेला
कोहरा 1 पाहिलेला
आता आठवत नाहैये कथानक
पंजाब हरियाणा मध्ये घडणारे कथानक आहे का?
वेबसिरीज पण एव्हढ्या झाल्यात
वेबसिरीज पण एव्हढ्या झाल्यात कि कधी कधी एखादी सुरू केल्यावर दुसर्या भागात लक्षात येतं कि, "अरेच्चा पाहिलीय कि ही"
मी कोहरा एक सुरु केली बघायला
मी कोहरा एक सुरु केली बघायला आणि आठवतं आहे कि आधी पाहिली आहे , पण काहीही आठवत नाहीये . त्यामुळे आधी हि संपवणार मग दुसरा सिझन .
बाकी पुस्तकातला गोल्डी डॅशिंग
बाकी पुस्तकातला गोल्डी डॅशिंग वाटायचा अन् दीक्षित वेंधळे
इथे दीक्षित फारच करारी दाखवलेत अन् गोल्डी च्या रोल मधला अनिल कधीही स्क्रीन वर आला तरी पुढच्या सेकंदाला रोहित शेट्टी च्या सिनेमातल्या सारखी कॉमेडी करेल की काय असंच वाटत राहतं>>>>>>>>>>>>>>>
अगदि हेच.... आता सुरुवात केलिय, पण सॉफ्ट पॉर्न बघतोय कि असं वाटायला लागलं. मी माझ्या मुलांना सुशिंबद्दल बरेचदा सांगितलं पण अशी वेब्सिरिज... ???
हो ना ! पूर्ण कपड्यातले ते
हो ना ! पूर्ण कपड्यातले ते स्त्री पुरूष एकमेकांना स्पर्श काय करतात, एकमेकांकडे पाहतात काय ! डेंजरच ब्वॉ !
गुहेतून नुकत्याच बाहेर आलेल्यांना हा धक्काच आहे.
बॅरीस्टर दीक्षित - रवी बहल * बूगी वूगी वाला.
पुस्तकाप्रमाणे स्टारकास्ट पाहीजे असेल तर -
अमर विश्वास - मिलिंद सोमण / ऋत्विक रोशन / अर्जुन रामपाल
बॅरीस्टर दीक्षित - किकू शारदा / स्व. अ तुल परचुरे / राजू खेर
गोल्डी - दयानंद शेट्टी( दया ) / सुनील शेट्टी / देवदत्त नागे
इथे वाचून कोहरा बघितली.
इथे वाचून कोहरा बघितली. स्लो आहे पण ठीक आहे.
प्रत्येक पात्राला प्रॉब्लेम्स देण्यात रीळं वाढली आहेत. शेवटी रहस्याची उकल होण्यासाठी काही पात्रं आफ्टरथॉट म्हणून मागच्या काही एपिसोडसमधे घुसडलीत असं वाटलं. स्पॉयलर होईल म्हणून इतकेच. बाकी तपास खर्या तपासापेक्षा रटाळ झाला आहे. खूनाचा तपास काही मनोरंजक नसेलच. पोलीस उत्तेजित होऊन डायलॉगबाजी करत नसतील. अगदी नेहमीच्या टोनमधेच या चर्चा चालत असतील हे अगदी बरोबर दाखवलं आहे.
कलाकार सगळेच उत्तम आहेत.
एक लेखक तुम्ही अगदी माझ्या
एक लेखक तुम्ही अगदी माझ्या मनातलं लिहिलंत . प्रत्येक पात्राला काहीतरी इश्यू पाहिजेच हा अट्टहास वाटला मला . प्रत्येक सिरीज मध्ये तपास करणाऱ्या पोलिसांचे खाजगी आयुष्य सुद्धा घुसडलेले असते .
वेबसिरीज पण एव्हढ्या झाल्यात
वेबसिरीज पण एव्हढ्या झाल्यात कि कधी कधी एखादी सुरू केल्यावर दुसर्या भागात लक्षात येतं कि, "अरेच्चा पाहिलीय कि ही"-> मला वाटल माझच अस होत का काय. हुश्श....
नेटफ्लिक्स वर हिज अँड हर्स ->+१११
राम कपूरला ओसीडी असतो आणि तो
राम कपूरला ओसीडी असतो आणि तो सस्पेंडेड पोलीस अधिकारी असतो पण केसेस सोडवायला जस्सी झालेली कोण आहे ती , तिचं नाव मी विसरले , तिला कन्सल्टन्ट म्हणून मदत करत असतो . राम कपूरची असिस्टंट झालेली actress फार गोड़ आहे.
ती गोड actress म्हणजे शिखा तलसानिया आहे. टिकू तलसानियाची मुलगी.
गोल्डी - दयानंद शेट्टी( दया )
गोल्डी - दयानंद शेट्टी( दया ) / सुनील शेट्टी
>>
सुनील शेट्टी मधे कायम मला फिरोज इराणी दिसायचा
VFX नी इराणी कॉम्प्लेक्शन आणायला लागेल फक्त
आणि अमर कथा असूनही रातों का
आणि अमर कथा असूनही रातों का राजा चं दर्शन ही नाही???
हे काही बरोबर नाही
कोहरा २ ची जाहिरात पाहिली
कोहरा २ ची जाहिरात पाहिली म्हणून कोहरा १ बघीतली. मला आवडली.
मुळ तपास कथानक तितके स्लो वाटले नाही. फक्त पोलिसांच्या वैयक्तीक जीवनातले प्रॉब्लेम दाखवले नसते तर चालले असते. सुविंदर विकी व त्याचा सहकारी पोलीस झालेला वरूण सोबती यांनी एकदम मस्त काम केले आहे. त्या दोघांमुळेच कोहरा १ मस्त वाटली. (सुविंदर विकी ला या सिरीजमधल्या अभिनयामुळे पारीतोषिकही मिळाले आहे).
आणखी एक गोष्ट म्हणजे, लगान मधली एलिझाबेथ म्हणजे राशेल शेली हीने सुद्धा या सिरीजमध्ये चांगले काम केले आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये ती, मनिष चौधरी, सुविंदर विकी यांचा एक सिन मस्त झाला आहे. सर्वांचा अभिनय एकदम मस्त...
अमर विश्वास आजच सुरू केली.
अमर विश्वास आजच सुरू केली.
आजच संपवली.
छान आहे.
पुरेशी उत्कंठावर्धक आहे आणि फालतू फाफटपसारा जराही नाही. हिरोची लव्ह स्टोरी सुद्धा मोजकेच चार सीन पुरते ठेवली आहे. त्यात शाहरुखची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण ते सीन त्याला कॉपी करत केले आहेत.
अजून एक जमेची बाजू म्हणजे विषय मॉडेल आणि त्यांच्या लैंगिक शोषणाचा असला तरी अश्लील आणि वल्गर दृश्ये नाहीयेत. फॅमिली वेबसिरीज आहे. अश्याच आवडतात. त्यामुळे दिवसभर टीव्हीवर बघता आली.
दलदल चे पहिले दोन भाग अगदी
दलदल चे पहिले दोन भाग अगदी नेटाने बघावे लागले. पण दुसर्या भागाच्या शेवटी ग्रिप घेतली. भूमीच्या कॅरेक्टरच्या वागण्याला तसे कारण असले तरी तिचे सादरीकरण आपल्याला एंगेज करत नाही. त्यामुळे सुरूवातीला कंटाळा येतो. एखादी व्यक्तिरेखा मरण्यापूर्वी तिच्या व्यक्तिरेखेचे सेलिब्रेशन करणे हे आता क्लिशे झाले. गॉट वगैरे पासून अचानक कोणालाही मारतात हा पॅटर्न जास्त कॉमन आहे.
सादरीकरणातली अजून एक गोची म्हणजे खुनी व्यक्तीची अंगकाठी पाहता तिने मारलेल्यांपैकी बरेच जण किमान तिच्यापासून सहज वाचू शकले असते असे वाटते.
मराठी कलाकार बरेच आहेत. चिन्मय मांडलेकर आता वेगळाच दिसतो. कॉलेजमधला शिडशिडीत मित्र नोकरीनंतर दोन तीन वर्षांनी बघितल्यावर आकाराने दुप्पट झालेला असतो तसा वाटला तो. भूमीची साहाय्यक "म्हात्रे" दाखवली आहे ती फार छान काम करते. तिला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते - ती 'लापता लेडीज' मधे दीपकची आई आहे. त्यात अगदी हसतमुख रोल होता तिचा, इथेही बर्यापैकी तसाच आहे. गीता अगरवाल शर्मा नाव दिसते तिचे. विकीवर लिस्ट पाहिली तर त्यातले बरेच पिक्चर मी पाहिलेले नाहीत. यात तिचे मराठी उच्चार अस्सल वाटले. "धावत जा आणि पळत ये" हे बर्याच दिवसांनी ऐकले
मिस्त्री - webseries हॉट
मिस्त्री - webseries हॉट स्टार
मस्त हलकीफुलकी आणि रोचक आहे.
राम कपूरने कामात ब्रिलियंट आणि मानसिक संतुलन बिघडलेला अशी दोन्ही रूपे एकाच वेळी दाखवताना कमाल acting केली आहे.
प्रत्येक भागात वेगळी केस असल्याने ब्रिंज वॉच न करता बघता येते. पण मी वीक डे च्या दोन रात्रीत संपवली.
पुढच्या सीजनची आवर्जून प्रतीक्षा राहील...
56 Days (प्राइम)
56 Days (प्राइम)
कुणीतरी भारतीय वंशाचा अभिनेता लीड रोलमध्ये दिसतोय, बघुया तरी कसा वाटतोय - निव्वळ याच उत्सुकतेपोटी बघायला सुरू केली मालिका. सगळी मालिकाच काय, पहिला एपिसोडसुद्धा सगळा बघेन याची खात्री नव्हती. पण मालिका खूप आवडली.
सर्वसाधारण मर्डर मिस्टरीमध्ये कुणाचा खून झाला आहे हे सुरुवातीलाच, फार फार तर पहिल्या एक दोन एपिसोडमध्ये समजते. मग उरलेली मालिका / चित्रपट खूनी आणि खूनाचे कारण यावर केंद्रीत असते. इथे कुणाचा खून झालाय हेच रहस्य मुळात खूप उशीरा उलगडते. खूनाचे सर्वसाधारण कारण मात्र बर्यापैकी आधी उघड केले आहे. सर्वसाधारण अशाकरता की प्रिसाइज कारण शेवटीच उलगडते. मालिकेची ही मांडणीच खूप रोचक आहे.
कोण खरं आणि कोण खोटं यावर संशयाची सुई सतत फिरत राहते. आणि त्याच संशयाच्या सुईला प्रेमकथेचा एक धागा पण जोडला आहे. त्यामुळे प्रेमात कोण शिकारी आणि कोण सावज हे जोखण्यात आपण गुंतून जातो. रहस्य मालिका असल्यामुळे जास्त काही लिहीत नाही.
I wanted you to tell me that - खूप वेळेला आपल्याला सत्य माहित असते पण त्याला क्लोजर तेंव्हाच मिळते जेंव्हा समोरचा ते कबूल करतो. प्रेमकथेचा सगळा डोलारा यावर उभा केला आहे. त्यामुळे तो संवाद (शब्द थोडेफार वेगळे असू शकतात) खूपच आवडला.
I know. I knew. - आणखी एक फार फार आवडलेला डायलॉग. चारच शब्द, पण त्यामागची पार्श्वभूमी आणि तो ज्या ताकदीने सादर केलाय ते खूप आवडले. क्रियापदाचा फक्त काळ बदलून चारच शब्दात केवढे काही सांगता येते त्याचे सुरेख उदाहरण आहे.
अवन जोगीया - ज्याच्याकरता ही मालिका बघायला सुरू केली तो हा अभिनेता. याआधी त्याने बरेच काम केले आहे पण मला तो नवीनच होता. खूप प्रॉमिसींग वाटला.
डव्ह कॅमरून/ कॅमरन - कधीकधी खूप झूम्ड आऊट वाटते ही पण इतर वेळेस जबरी काम केले आहे.
सूचना - मुलांसोबत अजीबात बघू नका. पहिलाच प्रेत सापडण्याचा सीन बराच अंगावर येतो आणि आपल्याच मनातून चटकन जात नाही. मुलांना खूपच त्रासदायक वाटेल. इतरही अॅडल्ट कंटेंट्स आहेत.
माधवची पोस्ट वाचुन आवडेल असं
माधवची पोस्ट वाचुन आवडेल असं वाटतं. बघतो ५६ डेज.
Thank you माधव.
Thank you माधव.
56 days पहायला सुरुवात केलीय.
Poster पाहून 365 days सारखी असेल असं वाटलं म्हणून ignore केलेली अगोदर.
आता आवडतेयं.
Lead male actor भारी आहे.
मी पण बघतेय ५६ दिवस
मी पण बघतेय ५६ दिवस
Lead male actor>>>> प्रतीक बब्बर सारखा वाटतो मला बर्याचदा. ती हिरॉईन नाही एवढी आवडली. एआय वाटते.
ए आय !
ए आय !
ती हिरॉईन नाही एवढी आवडली>>+१
ती हिरॉईन नाही एवढी आवडली>>+१ बोटॉक्स केल्या सारखी वाटतेय. हिरो भारी आहे..त्याला अरियाना ग्रांडे सोबत जुन्या सिरियल मधे पाहिलेय..भारतीय मुळ आहे.
मी पण बघतेय ५६ दिवस....
मी पण बघतेय ५६ दिवस....
56 days बिन्ज वॉच करून
56 days बिन्ज वॉच करून संपवली . आवडली
अगदी शेवटपर्यन्त काय होईल म्हणून उत्कंठा लागून होती .
पूर्ण वेळ "शिकार खूद यहां शिकार हो गया " वाली फिनीन्ग होती
कोण खरं , कोण खोटं , कोण निरपराध , कोणाची चूक -सुई नुसती गरागरा फिरत होती .
Pages