वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हर्जिन रिव्हर टाईप गुडी गुडी सिरीज म्हणजे ‘स्वीट मॅग्नोलियाज’. नेटफ्लिक्सवर आहे. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या ३ मैत्रीणी. त्या आणि त्यांच्या फॅमिलीज. त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे सगळा मसाला. व्हर्जिन रिव्हरमध्ये कसं जॅकचं रेस्टॉरंट असतं तसं इथेही एक आहे जिथे ह्या गोड गोड टाऊनमधली गोड, समजूतदार लोकं जमतात. मी कंटाळ्यावर मात करायला आणि डोकं बाजूला ठेवून बघायला म्हणून दोन सीझन पाहिले आणि बंद केली.

प्रेमाला conditions apply... पाहिली. बरी वाटली... A bit realistic .. about this generation... मुलीचं वागणं थोडं जास्तच अग्रेसिव & काही वेळा childish! Second season कधी येणार माहिती नाही. कोणाला कशी वाटली सांगा

बेस्ट मेडिसिन - नेटफ्लिक्स. लाइट कॉमेडी आहे. एक भाग पाहिला. अगदी खिळवून ठेवत नाही पण कंटाळाही येत नाही. जॉश चार्ल्स हा अनेक सिरीयल्स आणि पिक्चर्स मधे दिसणारा यात लीड आहे. त्याचा लक्षात राहणारा आधीचा रोल म्हणजे द गुड वाइफ मधला तिचा सहकारी आणि बहुधा ते दोघे प्रेमातही असतात, तो. हाय प्रोफाइल लॉयर म्हंटल्यावर जसे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येईल तसा आहे. मात्र यात तो डॉक्टर आहे.

मला आवडलेल्या काही सिरीस -

१. प्रीतम & पेद्रो
२. Everwood - Netflix छान आहे
३. अग आई, अहो आई - झी ५
४. Movie - Devil wears prada - १&२
५. जुईमुई - ऑटिस्टिक मुलीची स्टोरी something like attorney woo - Jiohotstar
६. Brothers & Sisters - Jiohotstar

ग्राम चिकित्सालय सिझन 2 बघितला, शेवटचा भाग फार इमोशनल आहे.

आवडले दोन्ही सिझन. प्राईमवर आहे.

१) अग आई अहो आई
२) हे काय नवीन

मी गेले चार दिवस रोज दोघांचा एकेक एपिसोड बघत आहे.
४-४ एपिसोड बघून झाले.
दोन्ही छान हलक्या फुलक्या आहेत.
एपिसोड संपताना ताणलेली उत्सुकता नसल्याने ब्रिंजवाच न करता निवांत एकेक एपिसोड बघता येतात.

यातली पहिली थोडी पाहिली आहे. चांगली वाटली. दोन्ही झी वरच आहेत का?

ऑडेसिटी - नेटफ्लिक्स. मस्त आहे. सिलिकॉन व्हॅलीतली कथा आहे. पण एचबीओवरच्या महाधमाल "सिलीकॉन व्हॅली" सिरीजपेक्षा खूप वेगळी आहे. मला एकदम एंगेजिंग वाटत आहे.

लॅण्डमॅनचा पहिला सीझन पूर्ण झाला पाहून. चांगली आहे. लावली की इंटरेस्टिंग वाटते. पण अनेकदा आवर्जून पाहावीशी वाटत नाही. पॅरॅमाउण्टवर आहे.

अग आई अहो आई , काल एका दिवसात बघून संपवली . छोटीसी हलकीफुलकी आहे .
सगळ्यात जास्त ह्रुता आणि रेणुका शहाणे आवडल्या .
काही काही भांडण , छोटे छोटे सीन्स आणि आईचे टोमणे आणि सल्ले एकदम रीलेट झाले . Happy
काही छोट्या छोट्या गोष्टी खटकल्या , पण ठीक आहे . निर्मिती सावन्तनी गोड सासू मस्त केलीय .
शेवट थोडासा अपे़क्शित होता
सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर कपडेपट , विशेश्तः ह्रुता चा . तिच्या साड्या , ड्रेसेस , फ्रॉक्स अगदी नाईट ड्रेस सुद्धा कुठेही खटकत नाहीत , प्रसंगानुरुप वाटतात . ती दिसलीय ही खूप सुन्दर .
एक लक्शात आलेली गोष्ट म्हणजे , ती हॉस्पिटलमध्ये येते तेन्व्हा ती सरळ पर्टीवरून आलीय , त्यामुळे तसे कपडे , मेकप आणि ज्वेलेरी आहे . वर तिने अनिश च जॅकेट घातलयं , त्याचाही शर्ट एकदम पार्टीवेअर आहे. . तसचं दिवाळ्सणावरून घरी आल्यावर अहो आई साडी बदलते , ब्लाउज तोच असतो , साडी जरीची बदलून ,, रोजच्या वापरातली नेसते . एक्दम अहाहा वाटलं तेन्व्हा डिटेलिन्गसाठी

नेटफ्लिक्स वर एक whodunit सीरीज पाहिली -- Summer'36
फार धक्कादायक असं काही घडत नाही . हळू तपास चालू राहतो , थोडसा फॅमिली ड्रामा होतो , शेवटी गुन्ह्याची उकल होते , सारे सुरळीत होउन मार्गी लागते . फार खिळवून ठेवणारी सिरीज नाहीये पण बघू शकता

फ्रान्समधील नीस शहरात , एका कंपनीचे सगळे काम्गार आणि कर्मचारी paid vacation वर येतात . ( एक मोठ्ठा उसासा Happy )
बरीच पात्र आहेत कथेत .
कंपनीचा म्हातारा मालक , त्याची बायको , तिची बहिण , मालकाची मुलगी , जावई आणि टीनेजर नात . मालकाची घर सोडून गेलेली दूसरी मुलगी , तिचा नवरा , तरूण दीर , एक टीनेजर मुलगा , हॉटेल मालक , हॉटेलमधली मुख्य हाउसमेड , एक बार्टेन्डर , एक प्रॉसीक्युटर , एक वर्तमान पत्राचा मालक , तपास करणार्या पोलीसाना मदत करणारी एक तरूणी , खुन्याच्या आरोपात तुरुंगात असणारे तिचे वडील .
सगळी पात्रे या ना त्या कारणाने एकमेकांशी जोडलेली आहेत .
हॉटेलमध्ये एक खून होतो , सीरीज फ्लॅशबॅकमध्ये जाते , जसजशी कथा पुढे सरकते , तसतशे बरेच संशयीत समोर येतात .
मूळ फ्रेन्च सिरीज , डब्ड आहे , कदाचीत त्यामुळे असेल पण काही गोष्टींचा पटकन संदर्भ लागत नाही . lost in translation.

स्वस्ति, वर्णन वाचून हे शेवटी मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस चं रूपांतर निघेल असं वाटतंय.
नुकतंच एक मर्डर ऑन ओरिएंट एक्सप्रेस चं सिमल्यातलं हिंदी बंगाली रूपांतर पाहिलं.स्वतःच्या लाईफ चॉइसेस बद्दल जोरदार शंका यायला लागली हे पाहिल्यावर.4 एपिसोड कसंबसं सहन करून बंद केली.मर्डर ऑन ओरिएंट एक्सप्रेस हे इतकं शक्तिमान कथानक आहे की त्याला सिनेमा/मालिकेत कन्व्हर्ट नीट करणे जवळजवळ अशक्य.

दोन्ही झी वरच आहेत का?
>>>
हो, दोन्ही झी वर आहेत.

दोघांचे तीन-तीन एपिसोड बघून झाल्यावर मी आई वाली सहा एपिसोड बघून संपवून टाकली.
हे काय नवीन उमेश कामत मुळे बघायला आवडते. पण आता स्टोरी जरा फास्ट पुढे जायला हवी. असे चौथा एपिसोड अर्ध्यावर सोडताना वाटले..

नेटफ्लिक्स सफेद सागरची फार चर्चा ऐकल्याने आता ती बघायला घ्यावी असा विचार करतोय. पण ती विकेंड ब्रिंजवॉच करायला मजा येईल.

स्वस्ति, वर्णन वाचून हे शेवटी मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस चं रूपांतर निघेल असं वाटतंय. >>> नाही ,अजिबात नाही . But now that you say , कुठेतरी हलकीशी Ms Marple च्या कथाबीजाची आठवण येते. पण फार अपेक्षा ठेवून बघू नये. बरेच ठिकाणी "काहीही हं "असं होऊ शकतं

Netflix वर operation safed sagar बघितली.

छानच आहे.
आवडली.

उगीच emotional drama, शिव्या, नको ती पात्रे, ओतावि असले काही न करता एकदम सटीक बनवली आहे.

अहो आई अग आई बघितलेल्या लोकांना एक गोष्ट लक्षात आली का , zee TV च , "clientसाठी presentation" बद्दलचं obsession अजूनही तसंच आहे.

"clientसाठी presentation" बद्दलचं obsession अजूनही तसंच आहे. >> Lol बघायला हवे म्हणजे Happy

नेफिवरच्या ऑडेसिटीबद्दल वरती लिहीले होते. दुसर्‍या तिसर्‍या एपिसोड्स पासून मस्त ग्रिपिंग होते. ८ भाग आहेत. नंतर खूप रंगत गेली आहे. जबरी ड्रामा. फुल रेको माझ्याकडून. बे एरियातल्या टेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट ड्रामाबद्दल आहे. लोकांचा डेटा, प्रायव्हसीशी कसे खेळ चालू असतात याचे अफलातून चित्रण आहे. व्हेटरन्स अफेअर्स च्या एकाशी यांचा संबंध येतो आणि त्यांच्याबद्दलही यांचे वागणे, विचार वगैरे बघून फार वाईट वाटते. ही सिरीज कॉमेडी नाही. ड्रामा कॅटेगरी आहे पण फार गंभीरही नाही.

झॅक गॅलिफिनॅकस हा एकच ओळखीचा आहे. त्याचा हँगओव्हर पिक्चर्स मधला रोल फेमस आहे पण इथे तो सिरीयस रोल मधे आहे. मस्त केले आहे काम त्याने. तो मुख्य लीड नाही. तो कोण आहे तो ओळखीचा नाही.

बे एरियातल्या टेक-रिच लोकांचे लाइफ दाखवताना हायवे २८० च्या आसपासचे चित्रण आहे त्यामुळे ते चपखल वाटते.

कोणी यूट्यूब वर जेफ डनहॅम आणि त्याच्या बोलत्या बाहुल्यांचा खेळ बघितला आहे का ? अहमद द डेड टेररिस्ट, वॉल्टर, पीनट्स, होजे हालेपिन्यो (ऑन ए स्टिक), बब्बा जे अशी व्हरायटी आहे पूर्ण बाहुल्यांची त्याची आणि अतिशय उत्तम आर्टिस्ट आहे.

कोणी यूट्यूब वर जेफ डनहॅम आणि त्याच्या बोलत्या बाहुल्यांचा खेळ बघितला आहे का ? >>> पाहिले आहेत काही वर्षांपूर्वी. छान आहेत. अजून एक आहे ब्रिटिश नीना कोनटी. तिचे जास्त विनोदी वाटले. तिचे मंकी चे पात्र एकदम गोंडस आणि खोडकर आहे. आपल्याकडे अशा कार्यक्रमांची वानवा आहे. म्हणजे यूट्यूब वर तर मला सापडले नाहीत.

कॅफे मुसाफिर - नेटफ्लिक्स

मी काल जवळपास दीड दोन महिन्याने नेटफ्लिक्स चालू केले. आणि बरेच दिवसांनी रात्री दोन ते पहाटे साडेसहा एखादी सिरीज ब्रिंजवॉच करून बघितली. कारण विक्रांत मासी तसा आवडतो. सिरीज सुद्धा आवडली. स्पेशली पहिले चार-पाच एपिसोड लव्ह स्टोरी बघायला फ्रेश वाटली. बऱ्याच विचारांसोबत स्वतःला रिलेट करता आले. शेवटच्या काही एपिसोडमध्ये इमोशनल ड्रामा सुरू झाला. पुढचा सीजन लगेच आला तर बरे.. लिंक तुटली तर पुन्हा कनेक्ट व्हायला अवघड जाते.

कोणी Netflix वर Gentleman बघितली असेल तर Season2 आलाय .
पहिल्या सीजनपेक्षा हा जास्त नाट्यमय आहे म्हणून जास्त आवडला.
Duke म्हणजे complete डोळ्यात बदाम category आहे.

सफेद सागर - नेटफ्लिक्स
६ पैकी ३ एपिसोड बघितले.
भारी आहे. १ किंवा २ एपिसोड बघून झोपणार होतो. पण टाईम स्ट्रेच करावासा वाटला. आताही पुढे काय डोक्यात ठेवून झोपायला जीवावर आलेय..

HouseMD-s1-UK-DVD.jpg

पुन्हा एकदा पारायण सुरू केले आहे, डॉक्टर ग्रेगरी हाऊस आणि त्याची टीम त्यांचे डिपार्टमेंट ऑफ डायग्नोस्टिक मेडीसीन त्यांचे प्रिन्स्टन प्लेन्सबोरो टीचिंग हॉस्पिटल त्यांच्या केसेस सगळे काही लैच भारी वाटते, कित्येकवेळा बघितले तरीही !

Gentleman बघायला लागलो होतो. पण Fauda release झाली मग gentleman सोडून ती बघत बसलो. तसही gentleman बोअरींग वाटली. Fauda is far better and fast. English language with subtitles Select करून 75% संभाषण Hebrew आणि अरबी मध्ये आहे. पण त्याने काही फरक पडत नाही.

इन्स्टामध्ये प्रोमो रील आले, काही चांगले जोक पाहीले (अजगराच्या मरणाचा सिन) म्हणून चुंबक ही सिरिज नेटफ्लिक्सवर पहायला सुरूवात केली. पण दुसर्‍याच भागात कंटाळलो. कुठल्याही सिनला तितके हसू येत नाही. सुमित राघवन, संदीपा धार, देवेन भोजवानी, नीना गुप्ता वगैरे आहेत. एकाच कॉलनीतील बाजूबाजूला असणार्‍या रो हॉऊसेस मध्ये रहाणार्‍या चार पाच श्रीमंत कुटूंबाची कहाणी आहे. प्रत्येक छोटा मोठा प्रॉब्लेम एकत्र कसा सॉल्व करतात वगैरे. त्यात एका फॅमिलीमधली बायको खूप म्हणजे खूप डंब दाखवली आहे, तर दुसरे पारसी कुटूंब व त्यांच्या घरातले सासू सुन वादविवाद. ते पण उगाचच ओढून ताणून पारसी बोलणे दाखवत... जे बोअर होते. भाऊ कदम पण आहे पण दुसर्‍या भागाच्या शेवटापर्यंत त्याचे नक्की काम काय ते समजले नाही कारण एकदाच एका सिनला त्याला दाखवले आहे व त्यातही एकही संवाद त्याला दिलेला नाही. नीना गुप्ता व तिचा नवरा म्हणून मुद्दाम म्हातारा केलेला देवेन भोजवानी फार कंटाळा आणतात.

पुढचे भाग पहावे का नाही त्याचा विचार करतोय. टोटल सोळा भाग आहेत.

Pages