वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुमी विचित्र (दिसणे, वागणे) , वैतागलेली आणि डीस इंट्रेस्टेड अशी एकत्र वाटली.. >> हो.
बाकी तिचे पात्र व इतर मुख्य पात्रे ‘तशी’ का आहेत त्यालाही कारणे आहेत पण ती मनावर ठसवण्यात मालिका कमी पडली. तेचतेच प्रसंग येत रहातात. खूपवेळा मालिकेत शांतता आहे. चांगल्या मालिकेत त्या शांततेत पण काहीतरी होत आहे असं वाटत रहातं पण इथे शांत म्हणजे मालिका थांबल्यासारखीच मला वाटले. व्हिलनच्या पात्राला अभिनय जमला नाही.

मला तस्करी आवडली खूप. इम्रानची मी तशीही फॅन आहे.
फारच अचाट आतर्क्य अहे आणि शेवट पटापट गुंडाळला आहे.

भूमी विचित्र (दिसणे, वागणे) , वैतागलेली आणि डीस इंट्रेस्टेड अशी एकत्र वाटली.. >> हो.+1
याही सिरीज मध्ये पोलिसांचं पर्सनल लाईफ संसार मोडलेलाच !.भूमीच्या चेहर्यावर उगाचच खूपच गंभीर भाव आहेत,जरी सिरीज इंटेन्स असली तरी, त्यात वर तिने मेकअप केला नाहीये. कमीतकमी नो मेकअप लुक हवा होता जसा राणीचा मर्दानी 3 मध्ये आहे.

झी ५ वर देवखेळ बघितली. मेन लीड अंकुश चौधरी आहे. प्राजक्ता माळी नावाला आहे.
गुहागर मधे दरवर्षी होळीला एक खुन होत असतो आणि गावकर्‍यांची समजूत असते तिथला शंकासूर पापी माणसांना मारतो (शिक्षा करतो). अंकुश पोलिस इन्स्पेक्टर आहे आणि त्या गावी त्याची बदली झालेली असते आणि या खुनांचा तपास करायचा तो ठरवतो.
सिरीजचा विषय चांगला होता पण ट्विस्ट जमले नाहीयेत. ७ भागांचीच आहे.

हो नवीनच आहे ही सिरीज. अंकुश विचित्र बारीक दिसतोय खरा त्याला काही लिव्हरचा आजार आहे वाचण्यात आलं.

देवखेळ - गुंतवून ठेवणारा!

दशावतार बघितल्यावर कधीतरी कोकणात पाहिलेल्या नमन/ खेळे आणि शंखासू राची ही आठवण झाली.

देवखेळ ही वेबसिरीज कोकणातील शिमगा, पालखी, खेळे आणिं त्यात नाचणारा शंखासूर याभोवती केंद्रित आहे.

देवतली, गावात शिमग्याला गावातील एका पापी माणसाला, अवचित येऊन शंखासुर मारतो… कधी, कसा याविषयी कोणाला थांगपत्ता लागत नाही, पण दुसऱ्या दिवशी प्रेत सापडते. सलग पंधरा वर्ष हा प्रकार चालू असतो, पण रूढींच्या भीतीमुळे, जन प्रक्षोभाच्या भीतीने त्या केसेस अशाच बंद केल्या जातात.

त्या गावात नव्याने बदली झालेला अंकुश चौधरी ( इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे) याच्यावर याचा तपास करण्याची जबाबदारी येऊन पडते.. तो ती कशी पार पडतो, शंखासुराचे सत्य जे असते, खून होत असतात की काही अमानवी शक्ती कार्यरत असते.. सिरीज बघितलेत की कळेल. २५ मिनिटांचा एक एपिसोड , असे ७ एपिसोड आहेत.

मला आवडली .
अंकुश चौधरीने चांगल काम केलंय. बऱ्याच वर्षांनी, त्याच काम बघायला मिळालं. प्राजक्ता माळी, अरुण नलावडे, यतीन कारेकर यांची कामेही चांगली झाली आहेत. पण त्यांच्या भूमिका खूप कमी लांबीच्या आहेत.
लहानपणी जेव्हा शंखासुर बघितला हित तेव्हा प्रथम मनात भीती वाटली होती. ते भीती किंवा गुढतेचे वलय इथेही वाटत राहते.

कोकण दर्शन फारच नेत्रसुखद! सगळ्यात भावल ते संगीत - लोकसंगीताचा बाज, असलेल गूढता, भीती या छटा ही जाणवत राहतात.

मातीतले विषय घेऊन थोडी हटके आणि थोडी वेगवान अशी ही सिरीज आवडली.

Lincon Lawyer S4 आलाय.
बघायला सुरुवात केली , अजुन पकड घेत नाहीये.

हेली खूपच सुंदर दिसतेय आता.

Lincon Lawyer S4 - बघितला . डोक्याला मुंग्या येतील किंवा खूप भारी वकिली डावपेच असतील असं वाटलं तर तस काही नाहीये पण छान आहे बघायला.

देवखेळ बघितली. खूपच त्रुटी आहेत. दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवत राहतो. आणि जुन्या काळातील, खेडेगावातील garib स्त्री - रघुची आई - तिची आधुनिक पिन अप केलेली झुळझुळीत साडी खूपच खटकते. शिवाय तिचा पांढरपेशा, सुशिक्षित लुक आणि मुलगा एकदमच वेगळा...हे काही पटत नाही.
प्राजक्ता माळी ला अगदीच थोडे काम आहे. तिच्या बहिणीचे कथानक अपूर्ण वाटते.
शेवटचा खून त्याने का केला ते समजत नाही.

कोहरा सीझन २ छान आहे. शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. बरुण सोबती आणि मोना सिंग दोघांनीही काम चांगले केले आहे.

कोहरा सीझन २ छान आहे. >>>> +1 राजेश आणि त्याच्या मुलाबद्दल वाईट वाटत राहातं शेवटी अरेरे वाटतं त्या मुलाबद्दल .

शेवट चांगला केलाय.एकंदरीत पोलिसांच्या लाईफच्या बाबतीत. बरुण सोबती आणि मोना सिंग दोघांनीही काम चांगले केले आहे.

सुहास शिरवळकर फॅन्स साठी खूषखबर !
बॅरिस्टर अमर विश्वास आता ओटीटीवर आला आहे. अ‍ॅमेझॉन मॅक्स प्लेयर वर अमर विश्वास याच नावाने वेबसिरीज आली आहे. कादंबरीत "निळ्या डोळ्याचं बेणं" असलेला अमर विश्वास च्या भूमिकेत राजीव खांडेलवाल आहे. त्याच्या नाकाच्या शेंड्यावर म्हशीने पाय दिलेला असल्याने तो या भूमिकेत अनफिट वाटला. शिवाय अमर विश्वास बेरकी, मिस्कील होता. कोर्टात तो बॅरिस्टर दीक्षितांच्या फिरक्या घ्यायचा. य मालिकेत बॅरिस्टर दी़क्षित जास्त स्मार्ट घेतला आहे.

बाकी पात्रांपैकी गोल्डी पण यात आहे. धुरंधर मधे ही आहे तो, नाव लक्षात नाही.
त्या वेळी मोबाईल फोन, जी पे यातलं काहीही नव्हतं. इथे अमर विश्वास आजच्या काळात घेतला आहे. ब्रेकींग न्यूज सुद्धा आहेत. पहिला भाग तरी आवडला.

जे सुशि फॅन्स नाहीत त्यांना आवडण्याची शक्यता कमी. याच साठी वेगळा धागा काढला नाही. नाही तर वेगळा धागा एव्हढ्यासाठी का काढला म्हणून कुणी तरी तुटून पडलाच असता. तसंही पडेलच म्हणा ! Wink
जर आधीच निगेटिव्ह सूर लावला तर "मला तरी आवडली" अशीही प्रतिक्रिया आली असती. म्हणून प्रामाणिक मत दिलंय. Wink

यातली कथा वाचल्याचे आठवत नाही. असेल पण. किंवा आता लक्षात नसेल. नव्याने लिहीली असेल तर कशी पुढे जाते माहीती नाही.
ज्यांना अमर विश्वास माहीतीच नाही त्यांनी मालिकेवरून मत बनवू नये. नंतर पुस्तक वाचा.

संपूर्ण पाहिली अमर विश्वास. कोर्टाच्या कामकाजाबद्दल बर्‍यापैकी बरोबर आहे, पण काही काही गोष्टी खटकल्या. त्या सोडल्या तर उत्कंठावर्धक आहे. सुशिंचा काळ बघता डाऊट बदलता ठेवणे हे खूप कॉमन होतं त्या वेळी, किंवा धक्के देणं हेच त्या वेळी युएसपी असायचं.

अदालत च्या मानाने कोर्ट रूम ड्रामा लाऊड होणार नाही हे बघितलं आहे. मेरी जंग सारखा इमोशनल ड्रामा पण नाही. अमर विश्वास फारच सिरीयस दाखवलाय जे सुशिंच्या मानसपुत्राचं बदललेलं रूप आहे. स्टार हंटर नावाची ही कादंबरी कधीच ऐकली नाही. कदाचित अप्रकाशित असावी.

शेवटचं क्लोजिंग स्टेटमेण्ट मात्र एकदम भारी आहे. इथल्या काही महिलाविरोधी धाग्यांवर ते डकवायला पाहीजे. सतत अपवादात्मक केसेस घेऊन स्त्रियांना समान गुन्हेगार मानणार्‍या अशा सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. रिकमेण्डेशन - आपल्या जबाबदारीवर बघा.

कोहरा सीझन २ छान आहे. >>>> +1 राजेश आणि त्याच्या मुलाबद्दल वाईट वाटत राहातं शेवटी अरेरे वाटतं त्या मुलाबद्दल .

शेवट चांगला केलाय.एकंदरीत पोलिसांच्या लाईफच्या बाबतीत. बरुण सोबती आणि मोना सिंग दोघांनीही काम चांगले केले आहे.

>>>> +१

Kohra 2 - खूप स्लो आणि डिप्रेसिंग आहे. चांगला मुड असेल तर बघु नका.

अमर विश्वास मला पण आवडला. राजीव खंडेलवाल नेहमीच आवडतो .
. डोक्याला मुंग्या येतील किंवा खूप भारी वकिली डावपेच असतील असं वाटलं तर तस काही नाहीये पण छान आहे बघायला. >>> Lincon Lawyer S3 पेक्षा S4 चांंगलाच आहे.
वकिली डावपेचात S1 आणि S2 जास्त चांगले होते.
S2 मध्ये ती judge मस्त comedy होती. विनोद खुसखुशीत होते. पण ती Andrea आवडली नव्हती.
S4 मधली Dana 'Ice' berg जास्त आवडली. आणि judge Stone चा आवाज फार भारी आहे.

अमर विश्वास मला पण आवडला. राजीव खंडेलवाल नेहमीच आवडतो .
. डोक्याला मुंग्या येतील किंवा खूप भारी वकिली डावपेच असतील असं वाटलं तर तस काही नाहीये पण छान आहे बघायला. >>> Lincon Lawyer S3 पेक्षा S4 चांंगलाच आहे.
वकिली डावपेचात S1 आणि S2 जास्त चांगले होते.
S2 मध्ये ती judge मस्त comedy होती. विनोद खुसखुशीत होते. पण ती Andrea आवडली नव्हती.
S4 मधली Dana 'Ice' berg जास्त आवडली. आणि judge Stone चा आवाज फार भारी आहे.

जिओ हॉट स्टार वर राम कपूर ची मिस्त्री (Mistry) नावाची एक सिरीज पाहिली .
मला तरी खूप आवडली. जरूर बघा.

राम कपूरला ओसीडी असतो आणि तो सस्पेंडेड पोलीस अधिकारी असतो पण केसेस सोडवायला जस्सी झालेली कोण आहे ती , तिचं नाव मी विसरले , तिला कन्सल्टन्ट म्हणून मदत करत असतो . राम कपूरची असिस्टंट झालेली actress फार गोड़ आहे.

Mistry म्हणजे देसी monk ना?
बघायला हवी.

कोहरा मला स्लो नाही वाटली. उलट खूप सारे सबप्लॉटस् असूनही जास्त रेंगाळत नाही असं वाटलं.
वातावरण डिप्रेसिंग आहे हे खरं पण.

Lincon Lawyer S3 पेक्षा S4 चांंगलाच आहे.
वकिली डावपेचात S1 आणि S2 जास्त चांगले होते.
S2 मध्ये ती judge मस्त comedy होती. विनोद खुसखुशीत होते. पण ती Andrea आवडली नव्हती.
S4 मधली Dana 'Ice' berg जास्त आवडली. आणि judge Stone चा आवाज फार भारी आहे. >>> +१००

हो मलाही आवडली मिस्त्री, ती राम कपूर ची असिस्टंट शरण्या (शिखा तलसानिया) आणि जससी म्हणजेच ए सी पी सहमत (मोना सिंग) दोघी छान काम करतात . ती असिस्टंट झालेली शिखा ,आलोक राजवाडे ललित प्रभाकर यांच्या मराठी वेबसेरीज "शांतीत क्रांती " मधेही होती.तिथेही छान काम केलंय.

असिस्टंट झालेली actress फार गोड़ आहे.>>+1

मागच्या पानावरचा प्रतिसाद होता माझा. त्या आधीही आणि नंतरही अनेक वेबसिरीजचा रेको इथे आलेला आहे. वेबसिरीज संपवायला पुष्कळ वेळ लागतो. सध्या पिक्चरही बघून होत नाहीये. यातल्या उत्कृष्ट असतील त्या बघायचा प्रयत्न करीनच.
मिस्त्री, लिंकन लॉयर , देवखेळ, दलदल नोट केल्या आहेत. अजून कोण कोणत्या आहेत चांगल्या ?

Pages