वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@संजय, नवीन एक भय नावाची एक वेबसेरीज मॅक्स प्लेयर वर आली .बरी आहे .पण तुम्हाला आवडते का बघा. परानॉर्मल इन्वेस्टीगेटर गौरव तिवारी मिस्टरी वर बेस्ड आहे.
बाकी काही बघाल ते बघाल पण पहिल्यांदा "मनी हाईस्ट" बघा 5 सिजन आहेत . ड्रामा आहे थोडासा पण मेन क्राईम/अ‍ॅक्शन थ्रिलर या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे. पुढचे सिजन काही उगाच, काहीही वाटतील, पण पहिला सिजन तरी नक्की बघा. मस्ट वॉच. एका दिवसात तोच पाहून होईल .जबरदस्त आहे .मी जरा उशिराच ,लॉकडाऊन मध्ये एका रात्रीत पाहिला होता, मला जाम आवडला.हो आणि सिजन पाहिल्यानंतर कोणतं कॅरेक्टर सर्वात जास्त आवडलं ते लिहायला विसरू नका.

हो पहिला सीझन भयानक फॅसिनेटिंग होता. पण दुसरा आला तेव्हा पहिला भाग पाहिला आणि समहाऊ अजिबात एंगेज झालो नाही.

<<< हिंसाचार/रक्तपात/शिवीगाळ/न्यूडिटी ह्यापैकी कुठल्याच गोष्टीचे वावडे नाही
>>>>

हे वाचून या रविवारी पाहिलेली सिंगल पापा सिरीज आठवली. त्यात हिच एक गोष्ट खटकली. फॅमिली सिरीज बनवायच्या नादात साधी एक किस सुद्धा दाखवली नाही. जेव्हा तोंडाला तोंड तुझे मिळे तेव्हा कोणाचीतरी जळे म्हणत कोणी दरवाजाची बेल वाजवायचा, कोणी हाक मारायचा किंवा लहान मूल तरी रडायचे. पण चुंबन पूर्णत्वास जायचे नाही. न्यूडीटीच्या नावावर एक बाळच काय ते उघडे दाखवले. आणि एक मुक्का मारल्यावर तोंडातून लिपस्टिक पसरल्यासारखे रक्त येते तेवढाच काय तो हिंसाचार! कुठून येते असले धाडस अंगात समजत नाही.

सिंगल पापा बघितली. ऋन्मेष म्हटल्याप्रमाणे अगदी मलाही कुणाल खेमू आमिर खानची कॉपी करतोय बर्‍याच ठिकाणी असं वाटलं.
नेटाने पाहिली ४ एपि पर्यंत मग बोर झालं. नेहा धुपियाच्या एकसुरीपणाचा कंटाळा आला. कंप्लिट नाही केली पण होप सो शेवट गोड असावा.

कुणाल खेमू आमिर खानची कॉपी करतोय >>> कॉपी मलाही वाटली पण थोडाफार प्रभाव असणारच एकत्र काम जे केलंय राजा हिंदुस्तानी मध्ये . बाळाच्या क्यूटनेस वरून आठवलं कुणाल खेमु पण लहानपणी क्यूटच होता , आताही आहे Happy . पण त्याचे बालकलाकार म्हणून केलेले चित्रपट पाहिले की लक्षात येतं की अतिशय चांगला ऍक्टर आहे .स्पेशली "जख्म" आता कुठे त्याला चांगले रोल मिळतायत. नाहीतर बालकलाकार मोठेपणी यशस्वी होण्याचं प्रमाण कमी आहे.

@संजय भावे, 'दहाड' बघा. प्राईमवर आहे. अत्यंत भारी आहे. सीरियल किलर ही थीम आहे.

नाहीतर बालकलाकार मोठेपणी यशस्वी होण्याचं प्रमाण कमी आहे.
>>>>>>>
जो क्युटनेस त्यांची लहानपणी ताकद असते, तोच मारक ठरतो.

संजय भावे, इथे सुचवलेल्या वेबसिरीज जर पाहिल्या नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायावर लोळू लागतील.

दिल्ली क्राईम्स सीझन ३ संपवला एकदाचा. एक हुमा कुरेशी सोडता कुणालाही अ‍ॅक्टिंगशी काही देणंघेणं असावं असं वाटलं नाही. शेफाली शहा नुसती मोठेमोठे डोळे करत बघते आणि तीच तिला अ‍ॅक्टींगची पराकाष्ठा वाटते. तिच्या खालोखाल रसिका दुगल. दोघींच्याही चेहर्‍यावर बारा वाजले आहेत आणि जराही एनर्जी नाही. बोअर एकदम.

हो दहाडही मस्त आहे.

"इंडस्ट्री" मधल्या लीड कॅरेक्टरचे नाव "हार्पर स्टर्न" आहे. सुरूवातीला पाहताना मला तेच कंपनीचे नाव वाटायचे Happy पण ते पिअरपॉईण्ट आहे.

त्या हार्परचा लीड/मेण्टॉर एरिक टाओ म्हणून आहे. त्याचे संवाद अफलातून आहेत. एका भागाच्या शेवटी तो आणि हार्परमधला एक सीन आहे. हार्परने कंपनीचा तोटा होईल अशी चूक केलेली असते. ती निस्तरायला तिने प्रयत्न केलेले असतात. पण हे सगळे तिने तोपर्यंत एरिकला सांगितलेले नसते. त्याबद्दल बोलताना तो सांगतो तो तिला उपदेश करतो:
There are generally two times to tell me something like this. When it's f*****d or after it's unf****d

धन्यवाद SharmilaR । माझे मन । फारएण्ड । सिमरन । वावे ।
The sopranos
Better call Saul
The Night Manager
The Test Case
पाताल लोक
द मॅन इन द हाय कॅसल
डिप्लोमॅट
द वायर
ओझार्क
इण्डस्ट्री
भय
दहाड

ह्या सर्व सिरीजची नोंद घेतली आहे 🙏

माईंडहंटर बघून पूर्ण झाली... मस्त आहे. त्यातले डायलॉग्स खूप आवडले. तिच्याबद्दल ह्या किंवा आधीच्या भागात काही चर्चा झाली आहे का?

@ फारएण्ड
>>"लाइटवेट हव्या असतील तर व्हाइट कॉलर आणि बर्न नोटिस या आता थोड्या जुन्या असल्या तरी मस्त आहेत.">>
लाइटवेट आणि जुन्या पण बघायला आवडतात. परंतु सध्या काही विशिष्ट कारणासाठी 'क्राईम थ्रिलर' पाहण्याचा सपाटा लावला आहे. ह्या दोन्हीचीही नोंद घेतली आहे.

@ सिमरन
>>"हो आणि सिजन पाहिल्यानंतर कोणतं कॅरेक्टर सर्वात जास्त आवडलं ते लिहायला विसरू नका.">>
पहिला सिझन अर्धाधिक पाहून झाला आहे, पूर्ण झाल्यावर उद्या-परवा कोणतं कॅरेक्टर सर्वात जास्त आवडलं ते सांगतो...

@ एक लेखक
>>"इथे सुचवलेल्या वेबसिरीज जर पाहिल्या नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायावर लोळू लागतील.">>
हा हा हा... तसे काही होणार नाही ह्याची काळजी घेणारच आहे 😀
वर म्हंटल्या प्रमाणे काही विशिष्ट हेतू/कारणासाठी क्राईम थ्रिलर वेबसीरीज सुचविण्याची विनंती केली असल्याने आता मला त्या बघणे हे केवळ ऐच्छिक नसून बंधनकारक आहे म्हणा ना...

सर्च नैना मर्डर केस संपली पण खूनी कोण ते सापडला नाही.
प्रेक्षकांना तर्क करू देते मालिका आणि नंतर त्यांच्या तर्कानुसार त्या त्या पात्राभोवती संशयाचं धुकं दाट होत जातं आणि ते अरेस्ट होतं तेव्हा अंदाज बरोबर आला हा आनंद होतो पण समाधान होत नाही. पुढे दुसरं पात्र संशयाच्या भोवऱ्यात येत.

अद्याप तरी अचानक कुठलंही पात्र आलेलं नाही. उपकथानकं जरा जास्तच डिटेल्स भरलेले आहेत. पण ठीक आहेत. विशेषतः कोंकणा सेन च्या पात्राची वैयक्तिक स्टोरी एका वेगळ्या सिरीयलचा विषय होईल. इथे दोन मालिका समांतर चालत असल्यासारखे वाटते.

तिची मॅरेज वाचवण्यासाठी चाललेली धडपड अखेरच्या क्षणी केस मधे अचानक घडामोडी झाल्याने वाया जाते.

आता इथे सांगायला हरकत नाही. नैनाच्या वडलांनाच जर खूनी दाखवलं असतं तर इथून पुढे सस्पेन्ससे हमे नफरत हो जाती. एखादा अपवाद असतो. पण अपवादालाच नियम बनवतात सस्पेन्सचे दुकानदार.

अर्थात संपलेली नाही. पुढचा सीझन येईपर्यंत हूक लावून ठेवला. सहा भाग पुष्कळ होते. पुढे दोन भाग ठीक वाटतील.

इण्डस्ट्रीचा पहिला सीझन एकदम ग्रिपिंग होता. पुढे अजून बघायची आहे.

रील्स मधे खूप क्लिप्स आल्याने इंटरेस्ट वाढून पूर्वी २-३ भाग बघून सोडलेली "ब्लॅकलिस्ट" पुन्हा बघायला सुरूवात केली. एकदम एंगेजिंग वाटत आहे. जेम्स स्पेडर चा स्क्रीन प्रेझेन्स जबरी आहे. ज्यांना तो फारसा माहिती नाही त्यांनी त्याची कदाचित सर्वात अतरंगी भूमिका असलेली "बॉस्टन लीगल" जरूर पाहा. नेफिवर आहे.

कुणी Dominique Lapierre च्या Freedom At Midnight वर आधारित त्याच नावाची वेब सिरीज पाहिली आहे का? कशी आहे?

सर्च नैना मर्डर केस उगीच पाहिली असं झालं सुरुवातीला चांगली चालली होती, सिरीज चा शेवट झाला. मग कळलं अर्धवट आहे. खुनी कोण ते दुसऱ्या भागात ,मला अश्या अर्धवट पोपट केलेल्या सिरीज आवडत नाहीत .पोपट ह्यासाठी की दुसरा भाग हा काही वर्षांनी येतो किंवा येतच नाही ,जसा "कर्मा कॉल्लिंग" रविनाची सिरीज होती तसा, उगाच डोक्याला भुंगा पुढे काय होणार,आणि बसा वाट बघत, याचसाठी मी माबोवरच्या ही क्रमशः कथा पण वाचत नाही.
अपवाद दोनच रानभूलीची घरटं आणि बेफिकीर यांची अन्या ,अन्या तर खूप वर्षांपासून अर्धवट आहे, आता या कथांच्या लेखकांना लवकर कथा सुचून नवीन भाग लिहिण्यासाठी वेळ मिळो हीच आशा आणि शुभेच्छा.

सिरीज बद्दल म्हणायचं झालं तर कॉमन सेन्स ने कोण नैना चा खुनी हे आपणच ठरवून टाकुन सिरीज चा चॅप्टर क्लोज करायचा.मी खुनी डीसाईड केला माझ्यासाठी सिरीज संपली.

४ मोअर शॉट्स नवा सीजन महा बोर आहे. उठ सूठ कुठे ही कुणीही कोणाशी ही चालू होतंय.. वैताग.

ती एवढी वकील असणारी अंजना सालसा क्लास लावते & पहिल्यांदाच साल्सा पार्ट्नर च्या घरी जाते.. जर्रा काही क्राईम सीरीज वगैरे बघत नाहीत का हे लोक Angry
ती स्टँड उप करणारी सिद्धी सतत पर्सनल लाईफ बद्दल जोक, से.. बद्दल जोक, आई च्या से. लाईफ बद्दल जोक. आणि त्याबद्दल टोकले गेले असता मग मी काय करू इतर टॉपिक फेल जातात उत्तर देते. तिला अमित टंडन, तत्सम स्टँड अप दाखवायला हवेत.
दामिनी फार विद्वान दाखवली आहे..आणि करते काय तर चार चौघांसारखेच पॉडकास्ट वगैरे..

माझेमन - थोडी पाहायचा प्रयत्न केला. एंगेज झालो नाही - विषय जरी खूप आवडीचा असला तरी सादरीकरण खूप डल आहे, किमान पहिले एक दोन भाग. कोणी पुढे पाहिली असेल तर सांगा.

एकतर बेन किंग्जलेचा गांधी पाहिल्यावर यातले गांधीजी एकदम बोअर वाटतात. इतरही कोणाला काही पर्सनॅलिटीच नाही असे वाटले.

पुस्तक मी वाचले आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे.

कपिल शर्मा शो लेटेस्ट एपिसोडमध्ये सुनील ग्रोवरने साकारलेला आमिर खान बघण्यासारखा आहे!
कमाल मिमिक्री करतो हा माणूस..

हो कालच बघितला. फारच बारकाईने अमिरच्या खुबी उचलल्या आहेत. छातीवर हात ठेवणं, हेअरस्टाईल, कपडे, खुर्चीत बसल्याबसल्या चुळबुळ, जीभ बाहेर काढणं सगळं फार परफेक्ट जमलंय.

ओह.. तरीच मी विचार करायचो एवढे सगळे जण इतकी नॅचरल ऍक्टिंग कसे करतात

खरेच.. मायबोली ज्ञानाचा झरा आणि माहितीचे भंडार आहे Happy

Peacock TV वर The Copenhagen Test नावाची वेब सिरीज पाहिली . खूप दिवसांनंतर उत्कृष्ट आणि थरारक थ्रिलर प्रकारातील वेब सिरीज पाहण्याचा अनुभव मिळाला.

The Copenhagen Test ची कथा विशेषतः प्रभावी आहे. माझ्या मते, biohack ही संकल्पना या सिरीजमध्ये प्रथमच सखोलपणे मांडलेली दिसते. यापूर्वी स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित Minority Report या चित्रपटामध्ये साधर्म्य असलेली संकल्पना काही प्रमाणात दाखवण्यात आली होती.

कथानकानुसार, अमेरिकेमध्ये Orphanage नावाची एक सरकारी संस्था कार्यरत असते. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे इतर गुप्तचर संस्थांमधील एजंट्सवर त्यांच्या नकळत पाळत ठेवणे. या संस्थेतील एका एजंटवर biohack केला जातो, ज्यामुळे तो एजंट सतत माहिती प्रसारित करत असतो. तो जे काही पाहतो किंवा ऐकतो, ते सर्व रिअल-टाइममध्ये निरीक्षण करता येते.

ही माहिती जागतिक पातळीवर विकून प्रचंड आर्थिक लाभ मिळवता येऊ शकतो. मात्र, Orphanage संस्थेला हा प्रकार लक्षात येतो. या कटाचा सूत्रधार शोधून काढण्यासाठी ते मुद्दाम हा hack काही काळ सक्रिय ठेवतात. ही यंत्रणा कशी कार्य करते, तसेच संबंधित एजंट हे सर्व कशा प्रकारे अंमलात आणतो, हे पाहणे अत्यंत रंजक आणि उत्कंठावर्धक आहे.

कोणी पुढे पाहिली असेल तर सांगा.>> मी आहे बघितली पूर्ण. दुसरा भाग येईल बहुदा. अगदीच टाकाऊ नाही. मी दुसरा भाग आला तर बघेन नक्कीच, तू म्हणाला तसे आवडीचा विषय आहे. माझी आधीची बॉस ऑफिस मध्ये अजिबात आवडायची नाही कोणाला, तिने ऑफिस सोडताना हे पुस्तक दिले होते सर्वांना आणि मी हसलो होतो तिच्या समोरच Proud नेहेमीप्रमाणे पुस्तक नक्कीच खूपच उजवे आहे मालिकेपेक्षा.

तस्करी मस्त एंगेजिंग आहे.
जुन्या जमान्यातले स्मगलर्स आता पिक्चरमधे दिसत नाहीत. काळा गॉगल, ओव्हरकोट किंवा अरब असल्या गेटपमधले. ते नेहमी चिरूट फु़कायचे. त्यांच्याकडे एक दुर्बिण असायची. त्यातून ते बघायचे कि एक माणूस कुणाशी तरी बोलतोय आणि गोळी सुटायची कि तो माणूस खाली पडायचा आणि दुसरा पळून जायचा.
पण नीरज पांडेने सिरीज वेगळी बनवलीय. तस्करी अशीच चालत असेल असे वाटते. थोडा फिल्मी मसाला आहे. पण ठीक आहे.

जुन्या जमान्यातले स्मगलर्स आता पिक्चरमधे दिसत नाहीत. काळा गॉगल, ओव्हरकोट किंवा अरब असल्या गेटपमधले >>>> Happy हेरही अशाच वेषांत असत ना? अरब नसतील पण ओव्हरकोट वगैरे सेम.

अमेरिकेत पीकॉक चॅनेलवर "पोनीज" नावाची मजेदार स्पाय सिरीज आली आहे. थोडी पाहिली. एमिलिया क्लार्क एक लीड आहे (गॉट मधली डेनेरिस), दुसरी कोण आहे माहीत नाही. पर्सन ऑफ नो इंटरेस्ट वरून पोनी हे नाव काढले आहे. पर्सन ऑफ इंटरेस्ट च्या उलटे. सीआयए चे दोन हेर रशियात मारले जातात. त्यांच्या बायका तोपर्यंत एम्बसीमधे सेक्रेटरी वगैरेची कामे करत असतात. त्यांनाच तो रोल दिला जातो, त्यांच्याच मागणीवरून. त्यांच्यावर कोणीही शंका घेणार नाही म्हणून. इथपर्यंत पाहिली आहे.

मर्दानी 3 चा प्रोमो पाहून दिल्ली क्राइम चं फिल्मी व्हर्जन वाटतंय...

तस्करी निम्मी झाली, अजून तरी बरी चालू आहे

तस्करी निम्मी झाली, अजून तरी बरी चालू आहे >>> मालिकेबद्दल आहे ना ?

हेरही अशाच वेषांत असत ना? >>> Lol
हो. पूर्वी हेर पण अशा ड्रेसकोड मधे असायचे कि कुणालाही तो ओळखता आला पाहीजे. Lol

Pages