वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्केशन - सीझन ४. टोटली ग्रिपिंग आहे. सध्याच्या अमेरिकेतील मीडिया स्कॅण्डलची आठवण येइल Happy

लिंकन लॉयर (सिझन 2) (नेटफ्लिक्स) -

गोष्ट तशी प्रेडिक्टबल आहे पण टाईमपास म्हणून बघायला मस्त आहे.

सिझन 2 दोन भागात रिलीझ करणार आहेत - पहिला भाग आत्ता आलाय दुसरा ऑगस्ट मध्ये येईल

फॅमिली मॅन समहाऊ पाहायची राहिली होती. चांगली वाटते. पहिल्या की दुसर्‍या भागात एक सीन आहे. त्यात मनोज वाजपेयी मुंबईमधे एकाचा पाठलाग करत बहुधा लोकल स्टेशनच्या पुलावर येतो. सध्या "सत्या" पिक्चरला २५ वर्षे झाल्याने त्याबद्दल बरीच माहिती फेबु व इतरत्र येत होती. त्यामुळे त्याला त्या पुलावर पळताना बघून वाटले की हा एक मिनीट इथे थांबेल आणि म्हणेल "यहींपे XXX ठोक दिया था गुरू नारायण को" Happy

"यहींपे XXX ठोक दिया था गुरू नारायण को"
>>>
अरे, भारी! गुरु नारायण हे नाव विसरायला झालं होतं.
(बाकी, नो कमेन्ट्स ऑन फॅमिली मॅन Proud )

अधुरा बघितली.. रात्री 3.30 वाजता संपली पाहून.. खुप भयंकर. बऱ्याच दिवसांनी घाबरण्यासारखी सिरीज पाहीली.

अधुरा खास वाटली नाही. सुरूवातीला वेगळे वातावरण, वेगळा प्लॉट, थोडासा द ओमेनचा फिल वगैरेंमुळे सुरूवात केली. नंतर खूप ताणलेली आहे असे वाटले. खूप प्रेडीक्टेबल तर आहेच, पण तेच तेच प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहतात. उगीच आता पूर्णच करू म्हणून पाहिली. मधे पकड सुटून पूर्ण भरकटलेली असल्याने शेवटी एक ट्विस्ट विनाकारण आला आहे. शेवटच्या ओव्हरमधे हाणामारी करून मॅच फिरवायचा प्रयत्न केल्यासारखे वाटले.

ऍमेझॉन prime वर मिनी TV वर
ये मेरी जिंदगी नामक सेरीज सिजन 1 पाहिला
TVF वाल्यांची आहे
छान वाटली. हलकीफुलकी विनोदी.
एका टीनेजर जो थोडासा आगावू देखील वाटतो केव्हा केव्हा , त्याच्या नजरेतून संपूर्ण सेरीज. हा मुलगा तोच आहे ज्याने असुर मध्ये छोटा शुभ साकारलाय.
साधारण 95 ते 2000 चा काळ दाखवण्याचा प्रयत्न.
सर्वांची acting खूप छान.
मध्ये मध्ये जाहिराती येतात mini TV वर.

नाईट मॅनेजर बघत आहे. सिध्हार्थ ची कमाल वाटते. चेहरा, बरा अभिनय, बॉडी असं सर्व पॅकेज असूनही एखादा सोडून ह्याचे चित्रपट सहसा आपटतात Sad शोभिता फार हॉट दिसली आहे..कमाल ड्रेसेस.
अनिल कपूर काय अफू ची गोळी खातो माहित नाही..कसलेला अभिनय & मस्त दिसतो
:डोळ्यात बदाम:

ही वेब सिरिज नाही , जुनी टीव्हीवर लागून गेलेली सिरिअल आहे . श्श्श फिर कोई है या त्यावेळच्या हॉरर मालिकेत निशान नावाची 8 एपिसोड्स ची एक सिरिज होती . आता डेलीमोशन वर आहे .

पूर्वी लहानपणी हे हॉरर genre खूप आवडायचं .. आता पण आवडतं पण ती ऍक्टिंग आणि डायलॉग बघवत नाहीत , फार उथळ वाटतात .. लहानपणी चांगली आणि वाईट ऍक्टिंग यातला फरक न समजल्यामुळे ते चालून जायचं

श्श्श कोई है , मध्ये 5 - 6 किंवा 7 - 8 एपिसोड च्या सिरिज असायच्या एक स्टोरी घेऊन .. त्यातल्या काही चांगल्या होत्या बाकीच्या सिंगल स्टोरी एपिसोडस पेक्षा ... ही त्यातली एक .. पुढे पुढे प्रेडिक्टेबल आणि टिपिकल झाली आहे पण कथेतले बारकावे आणि बऱ्यापैकी संयत अभिनय , म्युजिक , मुकेश खन्ना यांची डायलॉग डिलिव्हरी आणि एहजाझ खानचा , ज्वालिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अभिनय या सगळ्यामुळे मूळची विक स्टोरी खपून गेली आहे .. कधी वेगळं काही बघावंसं वाटलं , हिंदी - फॅन्टसी टाईप तर बघायला म्हणून चांगली आहे .. मूड नसताना पाहायला गेलं तर कदाचित एवढी खास वाटणार नाही .

फॅमिली मॅन माझी बघायची राहूनच जातेय, सुरू करायला हवी, विसरून जाते . कधी मुहूर्त मिळणार आहे काय माहिती, पुढच्या आठवड्यात try करते.

त्यामुळे त्याला त्या पुलावर पळताना बघून वाटले की हा एक मिनीट इथे थांबेल आणि म्हणेल "यहींपे XXX ठोक दिया था गुरू नारायण को >>> Lol Lol

अंजू >> फॅमिली मॅन बघाच.

नाईट मॅनेजर >> बघायची आहे

the trial hotstar.

पहिला एपिसोड पाहिला, तद्दन बॉलिवुडी केस solution.

Original "The good wife " बघितल्यानंतर Trial बघायची इच्छा नाही.

काहीच नवीन नाही The trial मध्ये. काजोलचा रोल आणि अभिनय छान आहे. तिच्या नेहमीच्या साच्यापेक्षा वेगळा आहे. बाकी पात्रं फार लक्षात रहात नाहीत.

यू ट्यूब वर संदीप भैया म्हणून पाच भागांची सिरीज आहे. अप्रतिम आहे. टीव्हीएफ च्या aspirants सिरीज चाच पुढचा भाग म्हणता येईल.
सगळ्या कलाकारांचा सुंदर अभिनय, उत्तम स्क्रिप्ट, छान संवाद.
यू पी एस सी aspirants चे विश्व रेखाटले आहे. जरूर पहा.

Original "The good wife " बघितल्यानंतर Trial बघायची इच्छा नाही.
>>> गुड डिसिजन... जमली नाहीय...

Trial पाहिली
Ok ok वाटली

संदीप भैय्या पाहिली युट्युब वर
आवडली. प्रयागराज देखील aspirant चे battle ground हे नव्हते माहीत.
तिथल्या छोट्या गल्या, गरिबी, पोपडे उडालेल्या रूम, light जाणे सारखे छोटे छोटे प्रॉब्लेम्स , सरकारी नोकरी मिळवण्याची धडपड पाहून जाणवलं की महाराष्ट्रात हे वातावरण अजून त्या लेवल वर नाहिये.
Actor सगळे छान त्यात.

मुखबिर बद्दल या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांकडून ऐकलेले होते. कदाचित त्यामुळेच असेल थोडा अपेक्षाभंग झाला. अन्यथा निव्वळ एंगेजिंग म्हणून चांगला टाईमपास आहे. काही काही गोष्टी जाणीवपूर्वक वेगळेपणा जपण्यासाठी स्मार्टली घेतल्या आहेत असे वाटले. बजेट देखील इश्यू असावा. पाकिस्तानातले बाजारातले सीन्स हे सेटवर घेतल्याचे जाणवते. सेट उभारायला चांगली मेहनत घेतली आहे. पण सेटचा सपाट प्लोअर, त्यावर कचरा नसणे, पाण्याचे ओघळ नसणे यामुळे कृत्रिम गोष्टी कळून येतात.

हेर कथा म्हटली कि त्याला एक तर सुपरमॅन दाखवायचे किंवा मग त्यांना पकडल्यावर कसे खाते हात वर करते यावर फोकस करायचा यात मध्य काढण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटले. एखाद्याला धोका देणे, जीव घेणे हे हेराला जमतेच असे नाही असे दाखवायचा प्रयत्न इतका काही खास जमलेला नाही. सनसनाटी टाळण्याचा प्रयत्न आहे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
रहस्य असे काहीही नाही तरीही रसभंग होऊ नये.
सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या खास व्यक्तींच्या संपर्कात येण्यासाठी केलेली धडपड आणि त्या व्यक्तीचे महत्व न उरणे ही गोष्ट क्लायमॅक्स सपक करते. जर शेवटी साहसच करायचे होते तर मग याची गरज नव्हती. अर्थात क्लायमॅक्स साठी चढती भाजणी रचत गेलं तरी ते झेपत नाही. त्यामुळे दाखवायचे तरी काय हे मान्य आहे.

शेवट उगीच ताणला आहे. तो संपादीत करता आला असता.

Pages