वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या दोन सीरीज आलटून पालटून बघतेयं ,
Succession - media moughal आजारी पडतोय , डोक चालत नाही पण आपण साम्राज्य सांभाळायला सक्षम आहोत अस त्याला वाटतयं. त्याच्या एका मुलाला कारभार सांभाळायचा आहे . शह काटशह ,इ इ . 1-२ एपिसोडस् नंतर मालिका पकड घेते.
Banshee - हिरो 15 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर पडलाय , काही जूने हिशोब चुकते करायला. कथानक वेगवान आहे पण बरेचसे सीन्स - मारामार्या , पाठलाग खूप लांबले आहेत. आतापर्यंत बरेच विषय येऊन गेले - drugs , sexual assult , hostage situations , rebel kids , etc etc , full Bollywood matetial वाटलं. हिरो बरा वाटला पण कोणीतरी आणखी उंच , तगडा हवा होता. हिरोईन आवडली.
हिंदीत वरूण धवन (बदलापूर वाला) आणि क्रिती सनोन ला घेतलं असतं.
सगळी स्त्रीपात्र जरा धाकड दाखवली आहेत. मुळूमुळू नाही. काही बेसिक प्रश्न पडले पण दुर्लक्ष केलं मी.
Adult content आणि violence खूप आहे.

Succession - ८.८ रेटिन्ग आहे. बघायलच्च पाहिजे.
लँडमॅन - दोन्हि सिझन सम्पवले . खुप आवडले.
शेरीडनच्याच यलोस्टोन - त्याचे स्पिनॉफ १८८३, १९२३ या वेब्सिरीज बघा-> धन्यवाद राज .. बघतो.

इथे अनेकदा सक्सेशनबद्दल वाचून बघायला सुरुवात केली. पहिला सीझन नेटाने संपवला. पण मला काही मजाच येऊन नाही राहिली. त्यामुळे नाद सोडला.

>>पण मला काही मजाच येऊन नाही राहिली. त्यामुळे नाद सोडला.<<
सक्सेशन वेबसिरीजचं इंस्पिरेशन मर्डाक फॅमिली आहे. त्यावरची रियल लाइफ डॉक्युमेंटरी - डाय्नेस्टि - द मर्डाक्स बघा.. नेफिवर आहे...

सक्सेशन वेबसिरीजचं इंस्पिरेशन मर्डाक फॅमिली आहे
>>> रुपर्ट मर्डाकची फॅमिली का?
मग जाऊ दे. त्या कुटुंबातले (किंवा कोणत्याही बड्या कुटुंबातले) वारसाहक्काचे ड्रामे बघण्यात फारसा रस नाही. कदाचित याच कारणाने सक्सेशन आवडली नसावी मला.

सोनी लिव्हवर मागे कधीतरी UNदेखी मार्क करून ठेवली होती.
बघायला सुरुवात केली. पहिले काही एपिसोड बरी वाटली स्टोरी. पण आता कंटाळा आला. पहिला सीझनही पूर्ण पाहीन का नाही माहिती नाही.
उत्तर भारतातल्या रासवट श्रीमंत पंजाबी कुटुंबाचे कारनामे आहेत. पण शिव्यांच्या अधेमध्ये संवाद आहेत. सरसकट सगळीच मुख्य पात्रं असंच बोलतात. Uhoh त्याचा कंटाळा आला. रासवटपणा दाखवण्याचा अतिअट्टहास!

हो मी ही एक का दोन सीझन्स पाहिली. पुढे कंटाळा आला.

सक्सेशन मस्त आहे.

गोलायाथचा पहिला सीझन मस्त होता. कदाचित दुसराही पाहिला असेल. यलोस्टोन सुरूवातीला प्रचंड एंगेजिंग होती. तिचा एक शेवटचा सीझन बहुधा बघायचा बाकी आहे अजून. लॅण्डमॅन पाहिलेली नाही. पाहायची आहे. आता पॅरामाउण्टचे(ही) सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

काही काही सिरीयल्स त्या त्या भूमिकेत शिरून बघाव्यात म्हणजे जास्त मजा येते. यलोस्टोन बघताना चेकर शर्ट घालून फ्रंट पोर्च मधे बिअर पीत बसणार्‍या क्लिंट ईस्टवूड सारख्या पण मध्यमवयीन रिपब्लिकन माणसाच्या भूमिकेत शिरावे. म्हणजे थोडासा यातला केविन कोस्टनर. लोकांशी वागणे जनरली "फेअर" असावे पण लोकांबद्दल थोडा अविश्वास आणि आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांबद्दल, वेगळ्या मतांच्या लोकांबद्दल एक जनरल Disdain असावा. मग मजा येते Happy

हॉट स्टार वर पॅरडाइज नावाची सिरीज आहे. दुसरा सीझन सुरू आहे. Post-apocalyptic परिस्थिती पासून वाचण्यासाठी अमेरिकन सरकार एका अंडर ग्राउंड बंकरमध्ये एक पूर्ण शहर वसवते. आणि पुढे काय घडते ते बघायला मिळते. पहिला सीझन बंकरमधील शहरात आणि दुसरा बंकरबाहेरील परिस्थिती दाखवतो.
पॉलिटिकल थ्रिलर आवडत असेल तर नक्की बघा.

झी५ वर उमेश कामत, प्रिया बापट, उदय टिकेकर, शुभांगी गोखले यांची हे काय नवीन वेब सिरीज पाहिली. चांगली वाटली.

उका प्रिबा चाळीशीतलं कपल आहे. ती जॉबमधून ब्रेक घेऊन नव्याने स्वतःचा क्लोथिंग ब्रँड बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेते. त्यात तिला येणारे practical challenges, self-doubt, फॅमिली सपोर्ट त्याच वेळी, या कपलसमोर “बाळ होऊ द्यायचं का नाही” हा निर्णय घेणं! असं सगळं पॅरलली चालू आहे. उका नेहेमीप्रमाणे समंजस, सपोर्टीव्ह, थोडा वेंधळा दाखवला आहेच. त्याचा आणि शुभांगी गोखलेचा सीन छान आहे जनरेशन गॅपब्द्दल चा.

एकूण सिरिज फार serious न होता मधे मधे उकाच्या हलक्याफुलक्या कॉमेडीमुळे सुसह्य आहे. प्रीबाचं, शुभांगी गोखलेंचं dressing मस्त वाटलं. त्यांचं दाखवलेलं घर आणि आई बाबांचा बंगला पण फार आवडला. तिघी सिनेमात बहुतेक हाच बंगला दाखवला आहे. बाहेरची बोगनवेलची कमान, त्या आईला उचलून नेतात तो जिना अगदी सेम आहे.

नेफिवर His & Hers बघतेय . thriller , murder mystery.
पहिल्या भागाची सुरुवात होते - रात्रीच्या वेळी एका जंगलात कारच्या बॉनेटवर एका तरूणीचा म्रुतदेह पडलायं ईथपासून .
मग एकेका पात्राचा प्रवेश होतो आणि त्यांचा वर्तमान्काळ , भूतकाळ त्यांचे एकमेकांशी संबन्ध हळूहळू उलगडू लागतात .
यापेक्शा काही जास्त सांगत नाही .

मिनीसिरीज आहए. मी सध्या चौथ्या भागावर आहे. काही गोष्टींचा अंदाज आला तरी सस्पेन्स टीकून आहे .
बघायला आवडतेय .

काल ऍमेझॉन प्राइमवर मटका किंग सुरू केली. डिरेक्शन आणि एक्टिंग चांगली आहे. विजय वर्मा नेहमीप्रमाणे अमेझिंग! बाकी पण सगळे छान काम करत आहेत.
अजून तरी एंगेजिंग वाटते आहे. मटका लागला ह्या वाक्प्रचाराचा उगम इथुनच झाला का?

इथे वाचून Goliath (Prime) बघितली.
लीगल थ्रिलर म्हणून छान आहे. जरा डार्क वाटली. मुख्य म्हणजे स्टाइलच्या फार फंदात न पडता, फारसा आव न आणता, स्टोरीशी प्रामाणिक राहून केलेली वाटली. तरी झिरो फिगर मॉडेल-लाइक वकील बाया आहेतच.

पहिल्या सीझनची कथा पहिल्या सीझनमध्ये संपवलीय, ते आवडलं.
सीझन-२ बघेनच असं नाही.

मटका किंग - पहिला एपिसोड पाहिला.
नागराज मंजुळेची म्हणून बघावी वाटतेय, विजय वर्माही आवडतोच, तरी फार एंगेजिंग वाटली नाही.
२-३ दिवस मध्ये गेले, पण दुसरा एपि. लावला गेला नाही.

मटका किंग बघतेय..
आजकाल सगळीकडे सई ताम्हणकर का दिसतेय कळेना.. मराठीत पण तीच, हिंदी मधे पण ती. दुसर्या काही हीरोईन्स नाहीत का काय..जशी ती राधिका आपटे जळी थळी झाली होती तसेच.

सई ताम्हणकर फार अंडर रेटेड अभिनेत्री आहे. मराठी बोल्ड गर्ल या इमेजमध्ये तिच्यातील अभिनयक्षमता झाकोळली गेली. ओटीटीच्या काळात तिला न्याय मिळत आहे. बरे वाटत आहे.

मटका किंगचा पहिला एपिसोड भारी वाटला होता. नंतर एंगेजिंगपणा ओसरला. तरीही पाहतोय. सर्वांची कामे चांगली आहेत. कंटाळा येत नाही पण "अजून एक एपिसोड पाहू" लेव्हल उत्सुकता येत नाही.

काल मटका किंग संपवली. शेवटचे दोन भाग तर फारच ताणली आहे.
सगळ्यांची कामं चांगली आहेत. सिद्दू सगळ्यात बेस्ट आहे. पण फार पसरट होत जाते. इतका दम नाही कथेत पण उगा पाणी घालून आठ भाग केलेत. चारच भागांची चांगली झाली असती. सई आवडतेच. इथे तिला फार वाव नाही, पण काम चोख केले आहे. सगळीकडे म्हणजे कुठे सईला बघता येईल?

Lol बघ!

मटकाकिंग बघू की नको? नक्की काय ते सांगा. >>> "बघणेबल" आहे.

बाय द वे, सैराट कनेक्शन ओळखलेत का? कॉलेजातील हडकुळा मुलगा नोकरीनंतर दोन वर्षानी भेटला की फुगलेला दिसतो तसा आहे पण ओळखाल Happy

नाही, तो नाही Happy त्याचा एकच सीन पाहिला आहे पण तो म्हणजे पूर्वी ७०ज पिक्चर्स मधे दिसणारा थोड्या डाव्या विचारांचा आदर्शवादी तरूण वाटतो, ज्याच्या प्रेमात एखादी श्रीमंत मुलगी पडते. नंतर मग चाँदी की दीवार ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया वगैरे होते.

मी म्हणतोय तो वेगळा. आत्तापर्यंत एक दोन सीन्स मधेच दिसला आहे.

ओके बघते आज. काल लावला होता पण जास्त लक्ष देऊन बघणं शक्य नव्हतं. मग एमिली इन पॅरिस लावली म्हणजे जास्त लक्ष द्यायला नको.

मी पौर्णिमेचा फेरा नावाची वेबसिरीज youtube वर बघितली. पहिले दोन सिझन ठीक वाटले पण तिसरा मला आवडला. शेवट आवडला आणि तीन सिझनमध्ये संपवली हे आवडलं. कोकण पार्श्वभूमी आहे.

Pages