Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंगल पापा खरंच मस्त
सिंगल पापा खरंच मस्त हलकीफुलकी आहे. जास्त नाटकं नाहीत. कुणाल खेमु तर बेश्ट आहे. त्याला कॉमेडी छान जमतेच.
पूर्वी हेर पण अशा ड्रेसकोड
पूर्वी हेर पण अशा ड्रेसकोड मधे असायचे कि कुणालाही तो ओळखता आला पाहीजे >>>
मला फरिश्ते मधला कुलभूषण खरबंदा आठवला. भारतातील खेड्यात तो ओव्हरकोट, हॅट वगैरे घालून फिरतो.
'तस्करी' सिरीज मस्त आहे. आवडली. पहिले दोन भाग पाहून झाले.
तस्करी बघते आहे. छान वाटते
तस्करी बघते आहे. छान वाटते आहे. २ भाग झालेत. पुढे बघायची उत्सुकता अजून तरी टिकून आहे.
तस्करी चोवीस तासात संपवली.
तस्करी चोवीस तासात संपवली.
सलग बघावी अशी जमली आहे.
सुरुवातीला फार नाट्यमय घडामोडी न घडता सुद्धा कस्टमची दुनिया बघायला बरी वाटते. ज्यात स्टोरी फार पुढे सरकली नाही तरी सारे प्रसंग वेगवान वाटतात त्यामुळे कंटाळा येत नाही.
सर्व नाट्यमय घडामोडी ऍक्शन ड्रामा ट्विस्ट टर्न शेवटच्या दीड दोन भागात बघायला मिळतात.
मला आवडली. दिवस खर्च झाल्याचे समाधान लाभले.
पहिला भाग आवडला. दुसऱ्या
पहिला भाग आवडला. दुसऱ्या भागात ओळखपरेड लांबली म्हणून बंद केली. आता इतक्या लोकांना आवडलीय तर परत बघेन.
पोनीज" बघायला हवी
पोनीज" बघायला हवी
महत्वाचं राहिलंच.
महत्वाचं राहिलंच.
तस्करी मधेही चुंंब्रान हाश्मीला वाया घालवलेय.
ताक : गगनचुंबी हा शब्द ऐकला तरी तोच आठवतो.
सुरुवातीला फार नाट्यमय
सुरुवातीला फार नाट्यमय घडामोडी न घडता सुद्धा कस्टमची दुनिया बघायला बरी वाटते >>> हो मलाही त्यामुळे जास्त आवडली. तसेच अशा कथांमधे काही ठराविक सीन्सचे पॅटर्न्स असतात - ते यात टाळले आहेत. त्यामुळे "आता हे असे करणार" हे आपण अशा सिरीज/असे पिक्चर पाहायच्या सवयीने गृहित धरतो पण तसे होत नाही.
मात्र आता पाच भाग बघून झाल्यावर कस्टमचा भाग कमी आणि हीरोज व व्हिलन यांचे डावपेच जास्त असे काहीतरी होण्याची शक्यता वाटते. तसे नसेल तर चांगले आहे.
सगळे वॉटरटाइट आहे असे नाही - इटलीत रस्त्यात गाडी रिपेअर करायला बसलेल्या त्या बाईचा सीन अगदीच कायच्या काय आहे. तसेच विमानाच्या सीट पॉकेट मधे ठेवलेल्या गोष्टी - जेव्हा विमान ले-ओव्हर करता थांबते तेव्हा तेथील सफाई वाले येउन साफ करून जातात. ते यात सामील असल्याशिवाय सीट पॉकेट मधे ठेवलेल्या गोष्टी इतक्या खात्रीशीर तशाच राहतील अशी गॅरंटी नाही - म्हणजे त्यावर विसंबून अशी तस्करी सतत चालणार नाही.
परदेशातून येणारे विमान एका ठिकाणी थांबून मग तसेच पुढे देशांतर्गत प्रवास करते असे आहे का आपल्याकडे? देशातल्या देशात एकापेक्षा जास्त ठिकाणी जाणार्या फ्लाइट्स पाहिल्या आहेत - पुणे-बंगलोर-चेन्नई वगैरे.
इटलीत रस्त्यात गाडी रिपेअर
इटलीत रस्त्यात गाडी रिपेअर करायला बसलेल्या त्या बाईचा सीन >>>> हो ते एकदम पठाण टायगर लेव्हलचे होते आणि शेवट सुद्धा तसा फिल्मी झाला आहे. पण त्या आधीची दहशत जमली आहे.
तस्करी सिरीज आवडली. पूर्ण
तस्करी सिरीज आवडली. पूर्ण बघून व्हायची आहे अजून.
तस्करी अशा प्रकारे होते आणि पकडली जाते ते जवळच्या व्यक्तीकडून ऐकून माहिती होते.
सिनेमात किंवा सिरिज मधे पहिल्यांदाच बघितले त्यामुळे नवीन विषय.
ती बाईक दुरुस्त करणारा सीन काहीच्या काहीच.
परदेशातून येऊन मग डोमेस्टिक मध्ये बदलणारी फ्लाईट आहेत, असे आठवतेय.
पण नंतर घरात रेड वगैरे प्रकार पटले नाहीत. कस्टम अधिकाऱ्यांना घरी किंवा ऑफिसमध्ये रेड टाकायची परवानगी नसते बहुतेक.
परदेशातून येणारे विमान एका
परदेशातून येणारे विमान एका ठिकाणी थांबून मग तसेच पुढे देशांतर्गत प्रवास करते असे आहे का आपल्याकडे?
>>
बऱ्यापैकी B777 चे रूट आहेत असे
लंडन - दिल्ली - मुंबई / कोलकता वगैरे
पण सिरीज मधे बाहेरून फक्त अन् फक्त narrow body प्लेन घेतली आहेत. बिझनेस क्लास अपग्रेड वाल्या सीन मधेच wide body चं इंटेरियर दिसतं
हो असं व्हायचं. पूर्वी काही
हो असं व्हायचं. पूर्वी काही सहकारी अशा फ्लाईटसची स्वस्त तिकीटं घेत. आम्हाला कधीच जमले नाही ते.
@ सिमरन
@ सिमरन
>>>"बाकी काही बघाल ते बघाल पण पहिल्यांदा "मनी हाईस्ट" बघा 5 सिजन आहेत . ड्रामा आहे थोडासा पण मेन क्राईम/अॅक्शन थ्रिलर या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे. पुढचे सिजन काही उगाच, काहीही वाटतील, पण पहिला सिजन तरी नक्की बघा. मस्ट वॉच. एका दिवसात तोच पाहून होईल .जबरदस्त आहे .मी जरा उशिराच ,लॉकडाऊन मध्ये एका रात्रीत पाहिला होता, मला जाम आवडला.हो आणि सिजन पाहिल्यानंतर कोणतं कॅरेक्टर सर्वात जास्त आवडलं ते लिहायला विसरू नका.">>>
गेल्या आठवड्यात "मनी हाईस्ट" चे सर्वच्या सर्व सिझन बघून झाले!
तुम्ही विचारल्या प्रमाणे पाहिला सिजन पाहिल्यानंतर पहिल्या सिझमध्ये मला सगळ्यात जास्ती आवडलेले कॅरेक्टर म्हणजे 'टोकियो' (दुसऱ्या सिझन पासून तीच सगळ्यात जास्त डोक्यात गेली हा भाग वेगळा 😀)
दुसऱ्या सिझनमध्ये 'नैरोबी' जास्ती आवडली.
सगळ्या सिझनमध्ये आवडलेले एकमेव कॅरेक्टर म्हणजे 'डेनव्हर'...
बाकी खूप पाणी ओतून पुढचे साडेतीन सिझन बनवल्यामुळे कितीतरी एपिसोड्स कंटाळवाणे वाटले!
@ SharmilaR
ह्या आठवड्यात 'Better call Saul' बघायला सुरुवात केली असून जवळपास दिड सिझन पाहून झाला आहे. मस्त आहे!
'ब्रेकिंग बॅड' मधल्या सगळ्यात आवडलेल्या पात्रांपैकी हे एक पात्र असूनही ही सिरीज मी अजूनपर्यंत का बघितली नव्हती हा प्रश्न पडला 😀
ह्या विकएंडला बिंज वॉचिंग करून हिचे सगळे सिझन्स बघून संपवणार 👍
सगळे सीजन संपवले ...सही ! हो
सगळे सीजन संपवले ...सही ! हो टोक्यो मलाही सुरुवातीला आवडली होती, तिच्याच नजरेतून सिरीज नरेट केलीय .तसं बर्लिन चं ही कॅरेक्टर चांगलं होतं पण त्याचा रोल लवकर संपवलाय. अजून मला बर्लिन स्पेशल जो एपिसोड आहे तो बघायचा राहिलाय .
कसला भारी रोल आणि कॅरेक्टर आहे.मी तर फॅन झाले त्या स्पॅनिश ऍक्टर ची, सिरीज बघून, त्याने मस्त काम केलंय.
पण माझं सर्वात आवडतं कॅरेक्टर म्हणजे वन अँड ओन्ली प्रोफेसर
मनी हाईस्ट पहिला सीझन चांगला
मनी हाईस्ट पहिला सीझन चांगला होता आणि दुसरा जरा बरा होता. त्यापुढे मी नाही बघू शकलो.
>>>"तसं बर्लिन चं ही कॅरेक्टर
>>>"तसं बर्लिन चं ही कॅरेक्टर चांगलं होतं पण रोल लवकर संपवलाय. ">>>
संपवलाय???
उलट त्या मेलेल्या पात्राला पुढच्या साडेतीन सिझनमधल्या जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये त्याचा (खरंतर अनावश्यक आणि कंटाळवाणा) फ्लॅशबॅक दाखवून उगाच बोअर केले आहे असे मला वाटले. जी गत बर्लिनची तीच त्या आर्तुरोची... त्यालाही तिसऱ्या सिझनपासून उगाचच घुसवल्यासारखे वाटले 😀
प्रोफेसर तर लीड रोल मध्ये असल्याने झकासच, बाकी रकेल आणि सीएरा ह्या दोघी लेडी इन्स्पेक्टर जाम डोक्यात जातात, पण त्या चांगल्या अर्थाने... त्यांचा तिटकारा यावा इतक्या चांगल्या भूमिका त्या दोन्ही अभिनेत्रींनी निभावल्या आहेत!
>>>"मनी हाईस्ट पहिला सीझन
>>>"मनी हाईस्ट पहिला सीझन चांगला होता आणि दुसरा जरा बरा होता. त्यापुढे मी नाही बघू शकलो..">>>
खरं आहे! अनावश्यक पात्रांची खोगीरभरती, LGBTQ चा फुकाचा सोस, "अरे लेकानो तुम्ही बँकेवर दरोडा घालायला आला आहात की प्रेमलीला करायला?" असा प्रश्न पडावा इतके अस्थानी प्रेमप्रसंग अशा गोष्टींमुळे टोटल चार सिझन्समध्ये संपू शकेल असे कथानक उगाचच साडेपाच सिझन्सपर्यंत ताणले असल्याने तिसऱ्या सिझनपासून कंटाळा येतो....
पुढचे सीजन मी आधीच सांगितलं
पुढचे सीजन मी आधीच सांगितलं होतं कायच्या काय आहेत स्पेशली ऑपरेशन वगैरें आणी शेवटचे .त्यात तो डोळ्याला लागलेला कॅरेक्टर वाला तर अजिबात आवडला नाही, (आता नाव आठवत नाही)कोणाशीच पटत नसतं त्याचं, नुसतीच हुशारी असून काय उपयोग.
पुढचे सीजन पॉप्युल्यारीटी बघून पाणी घालून वाढवलेत. पण मला एकंदर भारी वाटली वेबसिरीज बाकीच्या इंग्लिश वेबसेरीज पेक्षा आता ब्रेकिंग बॅड बघायचीय. खूप कौतुक ऐकलंय ,तुम्ही पण बघा संजय, सिरीज चं रेटिंग खूप चांगलं आहे
>>>"आता ब्रेकिंग बॅड बघायचीय.
>>>"आता ब्रेकिंग बॅड बघायचीय. खूप कौतुक ऐकलंय ,तुम्ही पण बघा संजय, सिरीज चं रेटिंग खूप चांगलं आहे">>>
मी 'ब्रेकिंग बॅड' बघितली आहे... अनेक एपिसोड्स मध्ये फॅमिली ड्रामा जरा जास्तच आहे, पण सिरीज चांगली आहे.
तुम्ही दोन्ही 'नार्कोस' (पाब्लो एस्कोबार वाली आणि मेक्सिको) बघितल्या असतील तर त्यातल्या ड्रग कार्टेल्स पुढे ब्रेकिंग बॅड मधला ''हायझेनबर्ग' (वॉल्टर व्हाईट) अगदीच मध्यमवर्गीय (चिंधीचोर वगैरे टाईप 😀) वाटेल, पण एकंदरीत सिरीज नक्की आवडेल.... अवश्य बघा!
सिरीज नक्की आवडेल.... अवश्य
सिरीज नक्की आवडेल.... अवश्य बघा!>>नार्कोज पण बघायचीय .दोन्ही नक्की बघेन 👍
तस्करी बघून संपवली.
तस्करी बघून संपवली.
खूप छान आहे.
मला एअरपोर्टच्या ग्लॅमरस दुनियेचे विलक्षण आकर्षण आहे. ते काही अंशी पूर्ण झाले.
इतका मोठा सेट उभारला असेल.का? कुठे केले असेल शूटिंग?
मला फक्त रविंद्र च्या घरात सापडलेल्या पन्नास लाख कॅश चे गूढ कळले नाही. व शेवट थोडा घाईत गुंडाळ्यासारखा वाटला.
पण इम्रान हाश्मी चा सुपरीटेंडंट अर्जुन मीना मस्त !
ती हिरोईन ही दिसायला ठीक आहे. पण अर्जुन आणि तिचे मिठी मारण्याचे सीन्स फारच ऑकवर्ड वाटतात....! अगदीच.
मीही पाहिली तस्करी, एक दोन
मीही पाहिली तस्करी, एक दोन भाग वेगळीच दिनिया म्हणून एन्गेजिंग वाटले पण सगळि बघून झाल्यावर पूर्ण सीरीज मला आवडली नाही. सगळे टू ईझी, टू कन्विनियन्ट. अनेक लॉजिकल फ्लॉ आहेत. शेवटचे २ भाग तर अगदीच अचाट आणि अतर्क्य कॅटेगरी वाटले.
* स्पॉयलर*
*
*
*
हाश्मीला फोन करून चौधरी म्हणतोय की तुझे लोकेशन मला कळते आहे तर ते कसे? हा विचार न करता तसाच धावत पळत प्रियाला बघायला सेफ हाउस ला जाऊन तिचेही लोकेशन कॉम्प्रमाइज करायचे? प्रियाच्या इतक्या फसवणुकी नंतरही तिच्यावर विश्वास ठेवून तिला त्या जिपिएस रिंग सकट आपल्या लोकेशन ला का घेऊन जातात ते लोक? का तर म्हणे ती सांगते मी तुमच्या गद्दार माणसाकडुन माहिती काढू शकते की हा कुणाला इन्फर्मेशन देत होता!! ते तर तिला माहित असणारच आहे कारण तो कस्टम्स ऑफिसर्स नाच देत होता ना माहिती ?!! हा तिच्या विश्वासार्ह हेतूचा पुरावा कसा ?:हाहा: आणि त्या अल डेरा मधला कस्टम्स इन्टेलिजन्स मधला तो पावरफुल माणूस प्रियाला आधीच्या केस मधे सोडवतो, राहुल ला वाळवंटात सोडण्याचे अरेन्ज करतो. पण तेव्हा ( आणि त्याधीची वर्षनुवर्षे तस्करी चालू आहे तेव्हा) त्या लोकांना पकडत/ हात लावत नाही , मग आता असे कोणते पुरावे मिळालेत की ज्यामुळे तो पूर्ण सिंडिकेट वर मोठे सैन्य, हेलिकॉप्टर वगैरे घेऊन कारवाई करतो ??? आणि शेवटी सोने कॉफिन मधून नाही तर फर्निचर मधून येते आहे हे हाश्मीला कळण्याचा आणि त्याने तो सिनियर चा आदेश धुडकावून ते टेबल फोडणे हे सगळेच अतर्क्य वाटते.
मला हेही कळले नाही, की अर्जुन
मला हेही कळले नाही, की अर्जुन ला अचानक प्रकाश कुमार गद्दार आहे हा साक्षात्कार कसा होतो ते! आणि त्या तकलादू फर्निचर मधून धडाधड सोन्याच्या चिपा पडतात....इतक्या तकलुपि पद्धतीने फिट केल्या होत्या?
प्रिया चे बडा चौधरी ला भेटणे मलाही हास्यास्पद वाटले.
तो पॉवरफूल माणूस अगदी परफेक्ट काम करतो !!
लाँग विकेंडचा पुरेपूर उपयोग
लाँग विकेंडचा पुरेपूर उपयोग करत "Better call Saul" चे सगळे सहा सीझन्स बघून झाले.
एकंदरीत सिरिज सहापैकी साडेपाच सीझन्स पर्यंत खूपच मस्त जमून आली आहे, पण पुढे मात्र भरकटल्यासारखी वाटली! शेवट तर मला अजिबात आवडला नाही, तिथे कथानकाने अक्षरशः 'माती' खाल्यासारखे वाटले. 'क्राईम नेव्हर पेज' वगैरे ठीक आहे, पण तेच तत्व पाळूनही ह्या सुंदर सिरीजचा शेवट कितीतरी चांगल्याप्रकारे करता आला असता अशी भावना मनात घर करून बसली आहे.
तस्करी पाहिली.
तस्करी पाहिली.
आनंद नाही , दुंख नाही, राग नाही, लोभ नाही, चिडचिड नाही, आनंदोत्कटता नाही, कंटाळा नाही, उत्कंठा नाही, आवडली नाही, नावडली नाही. संतपदाला पोहोचले.
>>>" संतपदाला पोहोचले.">>>
>>>" संतपदाला पोहोचले.">>>
अभिनंदन 😀
तस्करीचा वेग चांगला होता. मला
तस्करीचा वेग चांगला होता. मला आवडली. पण वरचे प्रश्न मलाही पडले.
दलदल म्हणुन एक दिसली प्राईमवर. जरा कंटाळवाणीच आहे.
इथे कोणी NOS4A2 बघत आहे का?
इथे कोणी NOS4A2 बघत आहे का? किंवा बघितली आहे का? माझे ३ episode झाले बघून. भन्नाट आहे आत्तापर्यंत तरी. हॉरर आहे. ह्याचे नाव म्हणजे एका गाडीचा नंबर आहे.
दलदल म्हणुन एक दिसली प्राईमवर
दलदल म्हणुन एक दिसली प्राईमवर>>> मी बघतेय. पण भुमी विचित्र (दिसणे, वागणे) , वैतागलेली आणि डीस इंट्रेस्टेड अशी एकत्र वाटली..
मी पण कालच चालू केली 'दलदल'.
मी पण कालच चालू केली 'दलदल'.
बरी वाटते आहे. भूमी पेडणेकर, संदेश कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, वनिता खरात, संदीप कुलकर्णी असे भरपूर मराठी चेहेरे आहेत.
Pages