Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुनील शेट्टी - फिरोझ इराणी??
सुनील शेट्टी - फिरोझ इराणी?? ईईई
५६ डेज - ट्रेलर बघून इग्नोर केली होती. आता बघावी काय असं वाटायला लागलं.
STEAL (Prime) - जरा वेगळा विषय आहे. Money heist , पुढे प्रकरण चिघळत जातं.
वेगवान स्टोरी आहे. ६ च एपिसोड्स आहेत. कलाकार चेहरे वेगळे आहेत.
शेवटपर्यंत सस्पेन्स चांगला राखलाय. पुढचा सीझन येईलसं वाटतं, कारण गुन्ह्याचा सूत्रधार प्रत्यक्षात टोळी कशी जमवतो, ती माणसं गुन्हा करायला कशी काय तयार होतात, हे काही पहिल्या सीझनमध्ये सांगितलेलं नाही.
अनुभव मासिकात यंदा 'रंजन
अनुभव मासिकात यंदा 'रंजन-बिंजन' सदरात वेब सिरीजवरचे लेख असणार आहेत.
मार्च अंकात अस्मिताचा 'द क्वीन्स गॅम्बिट' सीरीजवर लेख आहे.
सुनील शेट्टी - फिरोज इराणी
सुनील शेट्टी - फिरोज इराणी ,काही कळलं नाही बुवा.
शेट्टीचं इराणी रेस्टॉरण्ट >>
इडमी विथ बनमस्का !
थॅंक्यू ललिता प्रीती. येथे
एचबीओ वर "डी टी एफ सेण्ट लुईस
एचबीओ वर "डी टी एफ सेण्ट लुईस" ही एक नवीन सिरीज आली आहे (डीटीएफचा फुल फॉर्म साधारण अंदाज येईल तसाच आहे
). आत्तापर्यंत दोन भाग आलेत. चांगली वाटते. आरामशीर वेग आहे, हळुहळू मुख्य लीड्सबद्दल माहिती उलगडत जाते. मर्डर मिस्टरी आहे हे बर्यापैकी सुरूवातीलाच उघड होते, त्यामुळे तपास, फ्लॅशबॅक यावरच भर आहे. ग्रिम अजिबात नाही. डार्क कॉमेडी असे वर्णनात आहे. माझ्याकडून रेको.
जेसन बेटमन ओझार्कच्या मानाने एकदम वयस्कर दिसू लागला आहे. तो, आणि मुख्य पोलिस अधिकारी - हेच ओळखीचे कलाकार वाटले. लीड अॅक्ट्रेस आहे तिलाही कोठेतरी पाहिले आहे. पण इन जनरल फार ओळखीचे कलाकार नाहीत.
मी खास गेम ऑफ थ्रोन्स पहायला
मी खास गेम ऑफ थ्रोन्स पहायला एचबीओ मॅक्स घेतले. जबरदस्त मालिका!!!!
अजुन कोणत्या चांगल्या मालिका आहेत का तिथे?
सुनिधी अमेरिकेत ना?
सुनिधी अमेरिकेत ना?
द वायर, आण्टुराज (entourage), बिग बँग थिअरी, सिलिकॉन व्हॅली, सक्सेशन. इण्डस्ट्री
फ्रेण्ड्स आहेच. वेस्ट विंग आता आहे का माहीत नाही, कारण नेफिवर आली आहे.
मी वेस्ट विंग बघायचा एकदोनदा
मी वेस्ट विंग बघायचा एकदोनदा प्रयत्न केला पण अगदीच झेपलं नाही. व्हाईट हाऊसमधल्या स्टाफची अनावश्यक बडबड आणि मासळी बाजारात असावा तसा कलकलाट. लोकं किती बिझी आहेत हे दाखवायला सगळे नुसते इथून तिथून फिरतायत.
चर्नोबिल पण तिकडेच होती ना?
चर्नोबिल पण तिकडेच होती ना?
मी यू ट्यूब वर सध्या 'जुडवा'
मी यू ट्यूब वर सध्या 'जुडवा' नावाची पाकिस्तानी सिरिज बघते आहे. हलकी फुलकी आहे, मला आवडते आहे. एकूण 61 भाग आहेत बहुतेक. माझे 16-17 बघून झालेत.
कराची आणि हैदराबाद (पाकिस्तानातले) या दोन शहरात विभागलेली कथा. दोन जुळ्या बहिणी, एक आईकडे आणि एक वडिलांकडे ( नणंद काड्या करते त्यामुळे संसार फाटलेला आहे.) जी मुलगी आईकडे आहे ती एकदम dashing आणि स्मार्ट आहे. वाडिलांकडची मुलगी आत्याच्या जाचा मुळे बुजलेली, घाबरलेली. त्यात वडील ही मुलगी अगदी तान्ही असताना दुसरे लग्न करतात, त्या बाईला मूल होऊ शकत नसते. (ही मुलगी सुद्धा नणंद शोधून आणते) कारण तिचा प्लान प्रॉपर्टी हडपण्याचा असतो. स्वतच्या मुलाचे या बुजऱ्या मुलीशी लग्न लावलं की प्रॉपर्टी आपलीच. असा साधा हिशोब.
पुढे योगायोगाने या बहिणी एकमेकांसमोर येतात, आता dashing मुलगी काहीतरी पावले उचलून एकमेकांची घरं बदलून आत्याला धडा शिकवेल आणि बापाचे डोळे उघडतील असं असावं.
कथा अगदीच बाळबोध आहे पण मला आवडतेय सिरियल.
सीता और गीता स्टोरी दिसतेय ही
सीता और गीता स्टोरी दिसतेय ही.
हो हो तशीच असणार 100%
हो हो तशीच असणार 100%
पण मला ती उर्दू टच असलेली हिन्दी ऐकायला फार आवडते. म्हणून मी आवडीने बघते. चार दोन शब्द ऐकून बोलताना फेकून मारता येतात मग मस्त. :लोल:
अरे वा फारेन्ड, मस्त यादी.
अरे वा फारेन्ड, मस्त यादी. एकेक पाहीन आता. थँक्स थँक्स.
ही डिस्नेच्या Parent Trap
ही डिस्नेच्या Parent Trap सारखी कथा वाटत आहे. तो मस्त होता पिक्चर. त्यात तेव्हा लिण्डसे लोहन लहानच होती म्हणून एकदम सूट झाली जुळ्या बहिणींच्या रोल मधे. आपल्याकडे त्यावर काजोलला घेउन "कुछ खट्टी कुछ मीठी" काढला होता. तो पाहिलेला नाही. पण मुळात काजोल इतकी लहान तेव्हाही नव्हती.
अमित - हो चेर्नोबिलही. तशा खूप आहेत. ट्रू डिटेक्टिव्ह. मी सध्या "बॅन्शी" नावाची क्राइम थ्रिलर पाहतोय. एकदम एंगेजिंग आहे.
सुनिधी - एचबीओ वर पिक्चर्सही भरपूर आहेत चांगले. पूर्ण हॅरी पॉटर सिरीज आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्ज आहे.
सायो
परत ट्राय कर कधीतरी. सध्याच्या राजकीय सिच्युएशन्स सुध्दा आठवतील.
५६ डेज चिकवा वर मेन्शन केले
५६ डेज चिकवा वर मेन्शन केले होते. पाहून संपवली. १ वेळ बघण्या सारखी आहे. हीरो फार नेत्रसुख कॅटेगरीत येतो
बरेच लूप होल्स आहेत...
स्पॉईलर
.
.
.
.
.
ज्याच्या वर आरोप ढकलला जातो, त्याचा मोटिव्ह, मेलेल्याशी संबंध वगैरे अगदीच इग्नोर केले आहेत.. इन्स्पे़क्टरीन चा बाह्य संबन्ध उगा बळे बळे वाटतो. खरं तर हे काही स्पोईलर नाही पण असो.
हो मला पण त्या इन्स्पेक्टरची
हो मला पण त्या इन्स्पेक्टरची स्टोरी फार बोर झाली.
बाकी पण ओकेच आहे. आवर्जून काही लिहावं इथे अशी नाही वाटली नंतर.
प्राईम वर बँडवाले सिरिज
प्राईम वर बँडवाले सिरिज चांगली आली आहे असं ऐकलं.. स्वानंद किरकिरे आहे.
कपिल शर्मा शो - वरून आणि
कपिल शर्मा शो - वरून आणि डेव्हिड धवन पितापुत्रांचा एपिसोड छान आहे. सुनील ग्रोव्हरचा कादर खान वायरल झाला आहे. मिमिक्रीचा बाप माणूस आहे तो.
STEAL (Amazon Prime) बघितली
STEAL (Amazon Prime) बघितली नाही का कुणी?
पाहतोय मी
पाहतोय मी
३ भाग झालेत पाहून.. सोफिया टर्नर आवडली होती GOT मध्ये. इथे पण छान काम केलंय
Landman - Goliath
Landman - Goliath बघितल्यानन्तर Billy Bob Thornton आवडु लगला . त्याच्यासाठी ही मालीका चालु केली आणि त्याने निराश नाही केले.
ही मालिका अमेरिकेतील टेक्सास भागातील तेल व्यवसाय, जमीन व्यवहार (land deals) आणि त्या भोवती फिरणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर केंद्रित आहे. सन्वाद खुप मस्त आहेत.
माझ्याकडुन रेको. Paramount+ वर आहे.
>>Landman - Goliath
>>Landman - Goliath बघितल्यानन्तर Billy Bob Thornton आवडु लगला <<
इथे वेस्टर्न, निओ-वेस्टर्न बघणारे/आवडणारे जवळपास नाहित, सो आयॅम प्लेझंटली सरप्राय्ज्ड. लँडमॅन आवडली असेल तर शेरीडनच्याच यलोस्टोन - त्याचे स्पिनॉफ १८८३, १९२३ या वेब्सिरीज बघा. शेरिडन भन्नाट लिहितो. तल्सा किंगच्या बद्दल हि मी पुर्वि लिहिलं होतं. सगळे सिझन्स मस्त आहेत. शेरिडन एंजॉय करायला टेस्ट अॅक्वायर/डेवलप करावी लागेल...
बँडवाले (प्राइम)
बँडवाले (प्राइम)
कर्दनकाळ बापाला घाबरणारी नायिका. पण तिला कवितेचं अंग आहे. लग्न, संसार, स्वयंपाकपाणी यात अडकायचं नाहीये. कविता हा तिचा श्वास आहे. धाकट्या बहिणीच्या साथीने ती त्यासाठी काही ना काही खटपट करते. वडिलांसमोर तिचं काही एक चालत नाही. मग त्यातून येणार्या अडचणी. त्यात तिला मदत करणारी काही अतरंगी पात्रं.
मला सर्वात आवडलेलं म्हणजे मालिकेत वेळोवेळी येणार्या (मुक्तछंद) कविता. बहुधा सगळ्या स्वानंद किरकिरेच्या असाव्यात. मालिकेत त्याचा बराच हात आहे (created by, written by वगैरे), कविताही त्यानेच लिहिल्या असाव्यात असं मी धरून चाललेय.
त्याला अभिनयाची आवड आहे असं मागे कधीतरी त्याच्या मुलाखतीत वाचलं होतं. ती हौस त्याने इथे भागवून घेतली आहे. पण त्याचं पात्र आणि उपकथानक खूप ड्रॅग झालंय. मला तरी कंटाळा आला.
तसंच, बापाने मुलीचं लग्न ठरवण्यासाठीचा आटापिटा खूप ड्रॅग झालाय. त्याचाही पुढेपुढे कंटाळा येतो.
इतरही बरेच ट्रॅक्स आहेत, मुलगा व्हावा यासाठीचा हव्यास, भिन्न लैंगिकता, अनाथपणातून येणारं दु:ख, पारंपरिक संगीत वि. आधुनिक ढणढणाट. सगळ्याची खिचडी करण्याचा अट्टहास कशाला असा प्रश्न पडला.
रतलाम शहरात घडणारं कथानक. पण रस्त्यात येता-जाता प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत असतो अशी दृश्यं. ते शहर इतकंही लहान नसणार. 'ये शहर ऐसा ही है'टाईप डायलॉग आहेत, मात्र ते 'शहरपण' दिसत नाही.
अतरंगी पात्रातलं दुसरं पात्र , एक डीजे, ही भूमिका झाहान कपूरने केलीय. (शशी कपूरचा नातू) कपूर खानदानाला जी काही अभिनयाची नैसर्गिक देणगी असेल त्यात बसेल तेवढं काम त्याने केलंय.
पहिल्याच एपिसोडमध्ये कथानकाचा अँकर मुद्दा चांगला आणलाय,
मालिका चांगली असेल असेल म्हणत बघत जावं तर डिरेल व्हायला लागते,
डिरेल झाली म्हणे-म्हणेपर्यंत पुन्हा ट्रॅकवर येते,
आपला इंटरेस्ट टिकून राहतोय वाटेपर्यंत परत डिरेल होते,
अशी रडतखडत कशीबशी शेवटी फार डिरेल न होता, दुसर्या सीझनची तजवीज करून संपते.
काल मुहूर्त लागला फॅमिली मॅन
काल मुहूर्त लागला फॅमिली मॅन सीझन तीन बघायला. शेवटचा भाग अपलोडच केला नाही कि काय?
अर्धवट कोण सोडतं असं? जयदीप अहलावत ने जाने मन मधे कमाल केली होती. इथे ठीक ठाक. सफाईदार.
आता राहून गेलेला पंचायतचा चौथा सीझन सुरू करणार आहे. केव्हढा मोठा बॅकलॉग होता!
माझेही पंचायत आणि फॅमिली मॅन
माझेही पंचायत आणि फॅमिली मॅन दोन्ही latest सिझन बघायचे राहिले आहेत.
माझेही पंचायत आणि फॅमिली मॅन
माझेही पंचायत आणि फॅमिली मॅन दोन्ही latest सिझन बघायचे राहिले आहेत. >>>
दिलासादायक बातमी. आपण एकटेच जगाच्या खूप पाठीमागे आहोत ही टोचणी कमी झाली थोडी तरी. थँक्यू 
पंचायतचा लेटेस्ट सीझनचा पहिला एपिसोड पाहिला. स्लो पेस , वातावरण आवडतंच. पण आता एकूणच राजकारण जास्त महत्वाचं होत चाललंय बहुतेक. मागचा सीझन पाहून बराच काळ झाल्याने खटकलं नाही इतकंच.
गेले साडेतीन दिवस किती
गेले साडेतीन दिवस किती सिनेमे पाहिले, वेबसिरीज पाहिल्या.
पंचायत संपत आली आहे. पहिल्या भागांपेक्षा थोडी फिकी, पण आता अस्तित्वात असलेल्या सगळ्यात उजवी आहे.
आता राजकारण या विषयात अडकत चालली आहे. मोजक्याच पात्रांचा समावेश असतो. पूर्वीसारखे वेगवेगळे गावकरी, साध्या साध्या घटना, मार्मिक प्रसंग हे कमी होत चालले आहे. तरीही पंचायतला पर्याय नाही.
या वेळी वनराकस आणि गँग पण आवडली.
हम्मम राजकारण अति आहे समजलं
दिलासादायक बातमी
तशीही मी जगाच्या खूप पाठीमागे असते.
हम्मम राजकारण अति आहे समजलं मागेच, तेव्हापासून बघू की नको विचार करतेय.
सध्या youtube वर पौर्णिमेचा फेरा दुसरा सिझन बघतेय.
आपण एकटेच जगाच्या खूप
आपण एकटेच जगाच्या खूप पाठीमागे आहोत >>> माझी पण राहिली आहे फॅमिली मॅन
जियोवर चिरैया बघितली आवडली.
जियोवर चिरैया बघितली आवडली.
Pages