Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एमिली मध्ये कसले आले
एमिली मध्ये कसले आले बोडक्याचे लॉजिक, ती फक्त tp म्हणून बघायची. हा एमिली सोडून लुक, सिल्वी, मिंडी इत्यादी लोक जास्त आवडतात. सिल्वी तर फार जास्त आवडते.
+ 1
एमिली मोठ्या लोकांची परीकथा आहे . असे काही प्रत्यक्षात घडूणार नाही हे माहीत असूनही सिरीजला जी ट्रीटमेंट दिली आहे त्यामुळे बघावीशी वाटते. बादवे, नेक्स्ट सीझन हा शेवटचा सीझन असणार आहे . कालच इंस्टाग्रामवर जाहीर केल तसे
हा एमिली सोडून लुक, सिल्वी,
हा एमिली सोडून लुक, सिल्वी, मिंडी इत्यादी लोक जास्त आवडतात. सिल्वी तर फार जास्त आवडते. >>>
मलाही. काही एपिसोड मधे कंट्रिसाईड दाखवलं आहे, ते फार एंजॉय केले होते.
कोण हुकअप करतंय, कोणाचं
कोण हुकअप करतंय, कोणाचं बिनसलं, कोण रेस्टॉरंट चालू करतय, फायनान्स करतंय, मिसहॅप होताहेत मला काही पडलेली नसते.
सिल्वी एमिलीला कशी घापा बोलते, फ्रेंच अॅक्सेंट आणि अॅल्फीला ब्रिटिश अॅक्सेंट, अमेरिकन आणि फ्रेंच कल्चरल गोधळ कसे होतात, आणि समेवर येताना 'अमेरिकन कसे मुलखाचे अडाणी आहेत' हेच बघायला मी ही बघतो. हो आणि मिंडीला बघायला! ती बेस्टे.
बाकी एमिली गॅब्रियाल त्याची लेस्बिअन गफ्रे, तिचे हॉट भाऊ, आमचा ब्रिटिश अॅल्फी, पीअर कडू, त्याचा पोट्टा मरो सगळे!
मलाही एमिली इन पॅरिस काही खास
मलाही एमिली इन पॅरिस काही खास वाटली नाही. ३-४ एपिसोड्स पाहिले पण नंतर आवर्जून पाहावीशी वाटलेली नाही.
माझी पण आवडती सीरिज आहे,
माझी पण आवडती सीरिज आहे, एमिली!

गेब्रियल इज लव्ह ! त्याचे एमिलीवरचे प्रेम आणि त्या आधीच्या गर्ल फ्रेंड सोबत रहावे लागत असण्याची अगतिकता छान दाखवतो डोळ्यांतून !
बाकी तिची मैत्रीण मिंडी आणि एकूणच थिल्लरपणा सोसवत नाही ममव मनाला..पण घरच्या हॉलच्या सेफ प्लेस मधे, नुसता पाहायला चालून जातो...!
एमिली आणि इतरांचे कपडे अगदीच फैनाबाज!! असे कोण घालते? अगदी फ्रेंच ऑफिस म्हटले तरी?
कुणी फ्रेंच फॅशन इंडस्ट्री मधे काम केलेले आहे का इथे?
एमिली आणि इतरांचे कपडे अगदीच
एमिली आणि इतरांचे कपडे अगदीच फैनाबाज!!>>>> फैनाबाज म्हणजे?
फैनाबाज म्हणजे एकदम विचित्र,
फैनाबाज म्हणजे एकदम विचित्र, फॅशनेबल, आपल्या आवाक्याबाहेरचे..!!
Desi Bling पहातयं का कोणी ???
Desi Bling पहातयं का कोणी ???
बिंज वॉचिंग करून नेटफ्लिक्सवर
बिंज वॉचिंग करून नेटफ्लिक्सवर 8 एपिसोडची The Boroughs पाहिली. फार आवडली. Stranger Things च्या डफर ब्रदर्सनी काढली आहे.
एका old age community मधे घडणारी चवीपुरतं scifi + एक टेबलस्पून horror + सढळ हाताने घातलेलं thriller असं मिश्रण असलेली गोष्ट आहे.
हॉपरची आठवण येईल असं एक कॅरेक्टर आहे आणि प्लुरीबसची आठवण येईल अशी ती जागा आहे. किंबहुना, प्लुरीबसचा पुढचा सीझन शूट करायचा म्हणून ही सिरीज फक्त आठ एपिसोडची केली काय असं वाटावं.
काल अगाथा क्रिस्तीच्या सेव्हन
काल अगाथा ख्रिस्तीच्या सेव्हन डायल्स वर आधारित त्याच नावाची सिरीज नेटफ्लिक्सवर पाहिली. इतकी बोअर आहे की ज्याचं नाव ते. नाही कळाला खूनी तरी चालेल पण आता थांबवा होSss झाले. फक्त तीनच एपिसोड आहेत, त्यात दीड पाहूनच बोअर व्हायला लागले. त्यातल्या नायिकेचं नाव बंडल आहे. खरोखरच "Bundle" आहे. You look really pretty, Bundle! संवाद.
Desi Bling पहातयं का कोणी ???
Desi Bling पहातयं का कोणी ???>>> काल बघायला सुरवात केली...एक्दम कपाळ बडवती आहे..मधे आलेल्या करण क्लॅनमधल्या सिमा कपुर, निलम वैगरेचा शो बरा म्हणावा इतका हॉरिबल प्रकार वाटला.
पहिल्याच भागात कुणीतरी सतिश म्हणून बिलेनियर त्याच्या बायकोकडुन रोज सकाळी पाय चेपुन घेतो म्हणे का तर अशाने घरात लक्ष्मी येते...पुढे काहीही बघवल नाही.
करण आणी तेजस्वी नाव एकुन माहिती आहेत पण ते दाखवतात तेवढे पॉप्युलर आहेत का?
विमल खन्ना नावाची एक सीरियल
विमल खन्ना नावाची एक सीरियल प्राईम वर आहे.
मी चार - पाच भाग पाहिले. एंगेजिंग आहे.
ताजा खबर, जिओ. भुवन बाम, लीड
ताजा खबर, जिओ. भुवन बाम, लीड रोल आणि निर्माता. बाकीचे श्रिया पिळगावकर, प्रथमेश परब, अतिशा नाईक, विजय निकम, देवेन भोजानी वगैरे. भुवन बाम सार्वजनिक मुतारी सांभाळत असतो. त्या जागेला अनुसरून संवाद, तिथेच मारामारी बघून मला नंतर उबग यायला लागला आणि मी चार पाच भागानंतर बघायची सोडून दिली. भुवनला एक वरदान मिळते, त्याच्या मोबाईलवर त्याला आधीच बातम्या कळायला लागतात आणि तो बेटिंग करायला लागतो आणि खूप पैसेवाला होतो, इथपर्यंत बघितली. दोन सीजन आहेत.
मल्टी लेवल मार्केटींग वर एक
मल्टी लेवल मार्केटींग वर एक सिरीज अमॅझॉन प्राईम वर येत आहे. नाव आहे The Pyramid Scheme.
प्रमोवरून खास वाटली नाही पण नक्की बघणार कारण हा आवडीचा विषय आहे. मल्टी लेवल मार्केटींग करणार्या लोकांना मी फार छळले आहे. त्यामुळे ही सिरीज कशी बनली आहे याची उत्सुकता असणार आहे.
Jio हॉटस्टार वर एक तामिळ
Jio हॉटस्टार वर एक तामिळ सिरीज आहे 'रिसॉर्ट'. खूप भाषेत डब आहे ....मी हिंदी बघायला सुरवात केली आणि आवडली मला. महत्वाचं म्हणजे कुणाचीच ओव्हर ऍक्टिंग नाहीय. रिसॉर्ट मधले वातावरण आहे , हाऊस किपींग स्टाफ आणि शेफ यांच्यामधले किस्से, यात वेट्री या मेन कॅरॅक्टर ची ऍक्टिंग मस्त आहे .
मल्टी लेवल मार्केटींग करणार्
मल्टी लेवल मार्केटींग करणार्या लोकांना मी फार छळले आहे >> प्रचंड छळवादी लोकांना तुम्ही छळलेत!!!! :दंडवतः त्यावरुन तुम्हाला रिकृट करुन नाही घेतले का मल्टीलेव्हलवाल्यांनी?

The Boroughs>>> मामी, मी
The Boroughs>>> मामी, मी सुद्धा बघायला सुरुवात केली. ३ भाग झाले. एन्गेजिंग वाटते आहे पण स्ट्रेनजर थिंग्ज चीच जास्त आठवण आली, म्हणजे आजूबाजूला काहीतरी मोठ्या स्केल चे स्ट्रेन्ज घडते आहे आणि ते नॅन्सी ड्र्यू स्टाइल सगळे कुण्णाला कळु न देता स्वतः इन्वेस्टिगेशन करणारी ४-५ लहान क्युरिअस मुले याच्या जागी फक्त आता ४-५ म्हातारे
प्रचंड छळवादी लोकांना तुम्ही
प्रचंड छळवादी लोकांना तुम्ही छळलेत!!!! :दंडवतः त्यावरुन तुम्हाला रिकृट करुन नाही घेतले का मल्टीलेव्हलवाल्यांनी? Lol Light 1
या लोकांना छळण्याच्या नादात मीच त्यांच्यातला एक होत आहे याची जाणीव झाली आणि मग थोडे थांबलो. आता कोणी मलम (MLM) वाला भेटला तर त्याचे बोलणे ऐकून घेतल्यासारखे करतो आणि त्याची चेहर्यावर यांच्याविषयी फारच दया आली आहे असे भाव ठेवतो. समजणारे समजून जातात. पण हल्ली हे लोकं कमी झालेत. वॉटसअॅप व इतर सोशल मिडीयामुळे लोकांचा अवेरनेस वाढला आहे आणि असे फसणारे व फसवू पहाणारे लोक कमी झालेत. (मी च एक मलम सुरू करावे म्हणतोय... अमितव तुम्ही घेणार का माझ्याकडून वारसा?)
>> ते नॅन्सी ड्र्यू स्टाइल
>> ते नॅन्सी ड्र्यू स्टाइल सगळे कुण्णाला कळु न देता स्वतः इन्वेस्टिगेशन करणारी ४-५ लहान क्युरिअस मुले याच्या जागी फक्त आता ४-५ म्हातारे <<
आणि ते इन्वेस्टिगेशन करताना मुद्दाम सगळे जण वेगवेगळ्या वाटांनी जाणे, मग वाटेत जाताना थोडा ब्रीदर मिळाला की आपल्या रिलेशनशिप प्रॉब्लेम्सवर चर्चा करून ते जमले तर सोडवणे, त्या नादात बरोबर त्या सुपरनॅचरल विलनच्या जाळ्यात सापडणे, मुद्दाम काही गोष्टी लपवून ठेवून दुसऱ्याच्या जीवावर बेतवणे तरीदेखील नंतर सॉरी म्हणायला वाव ठेवणे.. वगैरे.
नेटफ्लिक्स मागच्या वर्षी बोअर
नेटफ्लिक्स मागच्या वर्षी बोअर झाल्यामुळे younger ही मालिका पाहिली.
लायझा नावाची एक चाळिशीतली महिला अनेक वर्षे घर आणि कुटुंब सांभाळल्यानंतर पुन्हा नोकरी शोधू लागते. पण तिला जाणवते की नोकरीच्या बाजारात तरुण उमेदवारांना जास्त संधी मिळत आहेत. योगायोगाने तिला स्वतःपेक्षा खूपच कमी वयाची समजले जाते आणि ती ही गैरसमजूत कायम ठेवण्याचा निर्णय घेते.
ती स्वतःला वीस-पंचविशीतली तरुणी असल्याचे भासवून एका प्रकाशन कंपनीत नोकरी मिळवते. त्यानंतर तिचे दुहेरी आयुष्य सुरू होते. एका बाजूला तिला नवी कारकीर्द, नवीन मित्रमैत्रिणी आणि आधुनिक न्यूयॉर्कचे जीवन अनुभवायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला तिचे खरे वय आणि भूतकाळ लपवण्याचे आव्हान असते.
मालिकेत कार्यालयातील राजकारण, मैत्री, प्रेमसंबंध, सोशल मीडियाचा प्रभाव आणि वेगाने बदलणारे प्रकाशन क्षेत्र यांचा विनोदी पद्धतीने वेध घेतला आहे. लायझा सतत तिचे रहस्य उघड होण्याची शक्यता असते अशा परिस्थितींमध्ये अडकते, त्यामुळे अनेक मजेशीर आणि तणावपूर्ण प्रसंग निर्माण होतात.
खूपच एंगेज झालो होतो. मात्र आता ती पुन्हा पाहवीशी वाटणार नाही आणि उगाच लईच वेळ घालवला असे वाटू लागले आहे.
यात पुस्तक प्रकाशकांचे जग आहे (नावापुरतेच) आणि भरपूर मशाला आहे, ड्रामा आहे.
चांगल्या मालिका पहायच्या
चांगल्या मालिका पहायच्या असतील तर ऍपल TV चे सब्सक्रिप्शन घ्यावे असे सुचवतो. त्यावर नुकतीच एक मालिका पाहिली. Widow's Bay.
Widow's Bay ही एका लहान किनारी गावाची कथा सांगणारी रहस्यप्रधान मालिका आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले हे गाव बाहेरून शांत, सुंदर आणि साधे वाटते. जुन्या लाकडी घरे, धुक्याने झाकलेले रस्ते, मासेमारी करणारे लोक आणि समुद्राशी जोडलेले दैनंदिन जीवन यामुळे गावाला एक वेगळे व्यक्तिमत्त्व लाभले आहे. मात्र या शांत वातावरणाच्या पृष्ठभागाखाली अनेक न सांगितलेल्या गोष्टी दडलेल्या आहेत.
गावातील लोक पिढ्यान्पिढ्या एकमेकांना ओळखतात. प्रत्येक कुटुंबाचा स्वतःचा इतिहास आहे. अनेक घटना काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्यासारख्या वाटतात, परंतु त्यांची सावली अजूनही गावावर आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गावातील लोक काहीसे अबोल आणि सावध वाटतात. जुन्या आठवणी, स्थानिक कथा आणि समुद्राशी संबंधित दंतकथा गावाच्या ओळखीचा भाग बनलेल्या आहेत.
मालिकेची सुरुवात अशा वातावरणात होते जिथे काही अनपेक्षित घटना लोकांचे लक्ष वेधून घेतात. सुरुवातीला त्या साध्या योगायोगांसारख्या वाटतात. हळूहळू अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. लोक एकमेकांपासून काही गोष्टी लपवत आहेत का, जुन्या घटनांचा आजच्या काळाशी संबंध आहे का, आणि गावातील कथांमध्ये किती सत्य दडले आहे, याचा शोध घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण होते.
या मालिकेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे वातावरण. समुद्र, धुके, पाऊस आणि सतत जाणवणारी अनिश्चितता कथेला वेगळा रंग देतात. कथानक घाईघाईने पुढे सरकत नाही. प्रत्येक भागात गावातील लोक, त्यांचे संबंध आणि त्यांच्या आयुष्यातील गुंतागुंतीचे पैलू उलगडत जातात. त्यामुळे प्रेक्षकांना त्या जगाचा एक भाग असल्यासारखे वाटते.
या मालिकेतल्या नटाची the Beast in Me ही नेटफ्लिक्सवरची मानसशास्त्रीय रहस्य आणि गुन्हेगारी नाट्य यांची सांगड घालणारी मालिका आहे. ही मालिका देखील अतिशय उत्कंठावर्धक आहे. ही कथा एका लेखिकेभोवती फिरते. तिच्या आयुष्यात मोठी वैयक्तिक शोकांतिका घडलेली असते आणि त्या घटनेनंतर ती स्वतःमध्येच गुरफटून गेलेली असते. लेखन हे तिचे आयुष्य असले तरी बऱ्याच काळापासून ती नवीन पुस्तक पूर्ण करू शकलेली नसते. दिवस जातात, ऋतू बदलतात, पण तिच्या मनावरील ओझे कमी होत नाही.
अशाच काळात तिच्या शेजारी एक नवीन व्यक्ती राहायला येते. हा माणूस अतिश्रीमंत, प्रभावशाली आणि समाजात प्रसिद्ध असतो. त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरलेल्या असतात. काही लोक त्याला यशस्वी उद्योजक मानतात, तर काहीजण त्याच्या भूतकाळाकडे संशयाने पाहतात. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका गूढ घटनेमुळे त्याचे नाव सतत चर्चेत राहिलेले असते.
लेखिकेची उत्सुकता वाढू लागते. सुरुवातीला ती केवळ निरीक्षण करते. नंतर ती त्याच्याविषयी अधिक माहिती गोळा करू लागते. हळूहळू तिच्या मनात त्या व्यक्तीचे चरित्र लिहिण्याची कल्पना आकार घेते. या माणसाच्या आयुष्याचा, त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या भोवती निर्माण झालेल्या रहस्यांचा मागोवा घेताना खरोखर ती अतिश्रीमंत व्यक्ती नेमकी वाटते तेवढी भयानक आहे की सगळे लेखिकेच्या मनाचे खेळ आहेत याविषयी संभ्रम निर्माण होतो.
दोन्ही मालिका अतिशय आवडल्या.
The Beast in Me आवडली आहे.
The Beast in Me आवडली आहे.
Widow's Bay पाहीन आता.
Beast in me वर झाली आहे चर्चा
Beast in me वर झाली आहे चर्चा इथे. चांगलीच आहे. दुसरी साठी ते ott नाही माझ्याकडे .
बावळट वाटली सिरियल एकदम.
Boroughs बघितली एकदम मनमोहन देसाई meets Duffer brothers असे फिलिंग आले
<<आणि ते इन्वेस्टिगेशन करताना मुद्दाम सगळे जण वेगवेगळ्या वाटांनी जाणे, मग वाटेत जाताना थोडा ब्रीदर मिळाला की आपल्या रिलेशनशिप प्रॉब्लेम्सवर चर्चा करून ते जमले तर सोडवणे, त्या नादात बरोबर त्या सुपरनॅचरल विलनच्या जाळ्यात सापडणे, मुद्दाम काही गोष्टी लपवून ठेवून दुसऱ्याच्या जीवावर बेतवणे तरीदेखील नंतर सॉरी म्हणायला वाव ठेवणे>> आणि हे सगळे हसत हसत, आज कुछ तुफानी करते है टाईप करणे हे पण लिहा त्यात. धन्यवाद सिरीज एकदमच.
मेड इन इंडिया - अ टायटन
मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी नक्की पहा.....
मेड इन इंडिया - अ टायटन
मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी>> भारी आहे. सगळेच कॅरेक्टर मस्त आहेत. Naseer as JRD सगळ्यात बेस्ट. त्यांच्या ग्रेट लीडरशिप क्वालिटीज फार छान दाखवल्यात.
'I don't want India to be an economic superpower. I want India to be a happy country' जे आर डीं चे हे कोट किती खर आहे. सध्याच्या वातावरणात हे खूप महत्त्वाचे वाटते.
I want India to be a happy
I want India to be a happy country' >>>>>> खरं व्हावं!
सिरीज बघतेय ! आवडतेय! स्पेशली वैभव तत्ववादी साठी सुरू केली!
नेटफ्लिक्स वर 'मा बेहेन' कुणी
नेटफ्लिक्स वर 'मा बेहेन' कुणी बघितली का माधुरीची?
बोअर आहे.
मला तरी अजिबात नाही आवडली, पण तुमचे मत जाणून घ्यायचे आहे.
मलाही नाही आवडली. उथळ विनोद.
मलाही नाही आवडली. उथळ विनोद. काही सीन फक्त ट्रेलरमध्ये दाखवण्यासाठी होते असे वाटले.
मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी नक्की पहा.....>> सुरू केली आहे. चांगली आहे.
तो सिनेमा आहे. त्यावर चिकवा
तो सिनेमा आहे. त्यावर चिकवा वर चर्चा चालू आहे.
मामला लीगल है (नेटफ्लिक्स)
मामला लीगल है (नेटफ्लिक्स) दोन सीझन्स
दोन्ही मस्त आहेत. मला आवडली ही सिरीज. नर्म, सूक्ष्म विनोद, डोकेबाजपणे लिहिलेली मालिका. साध्या, छोट्या छोट्या, एकेका सीनपुरत्या, एकाच एपिसोडपुरत्या येणार्या कलाकारांनीही झकास कामं केली आहेत.
रवी किशन एक नंबर. पूर्वी हा अॅक्टर मला विशेष आवडायचा नाही. पण त्याची सेकंड इनिंग / हिंदीतली इनिंग मस्त चालू आहे.
Pages