
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
@ भरत, वाचता आले नाही.
@ भरत, वाचता आले नाही. अस्पष्ट आहे किंवा मग माझा चष्म्याचा नंबर वाढलाय 🙈
@ आंबा अपडेट
दरवर्षी करतो तसे यावर्षी फस्त केलेल्या आंब्यांच्या कोयी कुंड्यांमधून पेरल्या नाहीत, म्हणून यंदा आंब्याची रोपे नाहीत.
अशी रोपे तयार करून थोडी मोठी झाली की जमिनीत लावायला इतरांना देणे हे मागची काही वर्ष करतो आहे, पण इच्छुक कुणी नसल्याने यंदा ब्रेक.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/88503
दिवाळीनंतर सुरू होऊन नुकत्याच संपलेल्या आंब्यांच्या दिवसांबद्दल लिहीलेलं नक्की वाचा.
खूप सुंदर लिहिलेत @ अनया.
खूप सुंदर लिहिलेत @ अनया.
अनिंद्य, तुमच्यासारख्या
अनिंद्य, तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून दाद मिळाली, आनंद झाला. धन्यवाद
युद्धस्य कथा रम्या: म्हणतात.
युद्धस्य कथा रम्या: म्हणतात. पण “आंबे चोरणे” हे दोन राज्यामधील १२ वर्ष चाललेल्या युद्धाचे कारण ठरले असे कधी वाचलेय तुम्ही ? वाचा ही धमाल कहाणी -
राजाचे आंबे पळवले आणि युद्ध पेटले:
चेऊलचे भोज राजे व ठाण्याचे बिंब राजे यांच्या मधे तंटा होता. शक ११४६ तील युद्ध संपल्या वर चेऊलकर भोजाचा व केशवदेवाचा तह होऊन मित्रभाव उत्पन्न झाला. मित्रत्वाच्या नात्यानें भोजराजानें केशवदेवाला भेट म्हणून आंब्यांची फर्मास पाठविली, ती आंब्यांची डाली मध्यें रस्त्यांत भैसेदुर्गाचा राजा जो जश्वद्या ऊर्फ जसवंतदेव त्यानें जप्त केली.
शक ११४६ तील युद्धांत हा जश्वद्या केशवदेवाच्या हातीं जिवंत सांपडला होता. त्याला केशवदेवानें जीवदान देऊन त्या वेळीं सोडून दिलें. ह्या नंतर जश्वद्या सिंघण यादवाला भेटून देवगिरीकर यादवांचा मांडलिक बनला. केशवदेव अनहिलवाडकर चौलुक्यांचा स्नेही पडला. सबब सम्राट जो सिंघण यादव त्याचें व केशवदेव याचें सहज वैर उद्भवलें. सिंघण यादव आपल्या हाता खालील मांडलिकांचा तोरा चालवून घेणा-या पैकीं नव्हता. सर्व उंचवटे खणून पाडून मैदान सपाट करणा-यां पैकीं होता. अश्या पराक्रमीं व वचकबाज सम्राटाची बगलबच्चेगिरी करणा-या जश्वद्यानें केशवदेवाला पाठविलेले आंबे मध्यें च उर्मंटपणें खाऊन टाकले.
केशवदेवाची हि या काली वाढती कमान होती. त्यानें चेऊलच्या भोजाला पराभूत करून, शिलाहारसत्ता तर अगदी च संपुष्टांत आणून ठेविली होती. अश्या त्या केशवादेवाला आंब्यांची अफरातफर झालेली रित्या वेठ्यांच्या मुखजबानीनें कळली. केशवदेवानें जश्वद्या कडे भाट सांगून. पाठविला कीं तुमच्या सारख्या भल्या लोकांनीं चो-या कराव्या हें युक्त नव्हे, तो निरोप ऐकून जश्वद्यानें उलट निरोप पाठविला कीं, मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलपें फोडून आपले आंबे परत घेऊन जावे.
निरोप ऐकून केशवदेव कोपला. जश्वद्या वर स्वारी करण्या करितां देशाला हंकारा केला. नगा-या घाव घातला. शेषवंशी, सूर्यवंशी व सोमवंशी, असे सर्व योद्धे मिळाले. भैसेदुर्गा वर चालले. वेढा घातला. बारा वर्षे वेढा पडला. परंतु किल्ला हातीं आला नाहीं ! चिंचांचें चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचो-या ज्या पडल्या त्या रुजून त्यांचे वृक्ष होऊन त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या. पण गड हातीं येता दिसे ना. तेव्हां भेद केला. आंधेरीचा कोणी म्हातरा होता. त्याची वृत्त तेथील देसायानें काढिली होती. तो पळून जाऊन जश्वद्याच्या आश्रयानें भैसेदुर्गा वर पाइकी करून पोट भरी. त्याला स्वदेशाची फार खंत उत्पन्न होऊन, किल्याचे दरवाजे चोरून खोलण्याची कामगिरी आपण करूं अशी इच्छा त्यानें केशवदेवाला कळविली, आणि त्या प्रमाणें तें नीच कृत्य त्या अधमानें बजाविलें. किल्ला केशवदेवाच्या हातीं पडला. जश्वद्या पुनः जिवंत सांपडला.
महिकावती (माहिम)ची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दस्तावेजातून साभार.
सदर दस्तावेज आता प्रताधिकारमुक्त आहे.
व्वा!!
व्वा!!
तिकडे सोमनाथ वारंवार उध्वस्त होत होतं आणि हे अनहिलवाडकर आपलं शौर्य गाजवत होते नातेवाईकांच्या आंब्याच्या टोपल्या परत मिळवण्यासाठी….
महिकावतीची बखर वाटलीच होती
महिकावतीची बखर वाटलीच होती मला, एक प्रत आणून ठेवली आहे मी घरी पण वाचायला मुहूर्त लागेना. आता मात्र काढायलाच हवी.
जेम्स,
जेम्स,
मजेदार वाटले म्हणून इथे फक्त आंब्याच्या लढाईबद्दल टंकले, पण तुम्हाला रुची असेल तर पूर्ण बखर जरूर वाचा.
एक तर कितीतरी नवीन (actually जुने) मराठी शब्द समजतात, which is fun. उदा वर आलेले आंब्यांची फर्मास / डाली.
आणि
मुंबई- बृहनमुंबई - ठाणे - कल्याण हाच फोकस एरिया असल्याने आंधारी (अंधेरी), वेसावे, घोडबंदर, सोपारा, मरोळ, वाळकेश्वर, माहीम, मार्वे, मढ, ठाणे, शीळ, कल्याण, वसई, दमण, दीव, जोगेश्वरी, पोवई, पोयसर, कुरार अशी परिचित नावे वारंवार येतात त्याने मजा येते वाचता वाचता तत्कालीन घडामोडींना आजच्या geography शी को-रिलेट करायला. 👍
@ माझेमन,
… तिकडे सोमनाथ वारंवार उध्वस्त होत होतं…
याचाही उहापोह आहे बखरीच्या प्रस्तावनेत. पण युद्धाचे कारण म्हणून “आंबा” मंदिरा पेक्षा सरस ठरला हे ही आहेच
अनिंद्य छान रोचक माहिती.
अनिंद्य छान रोचक माहिती.
याचाही उहापोह आहे बखरीच्या
याचाही उहापोह आहे बखरीच्या प्रस्तावनेत >> ओके. वाचली पाहिजे ही बखर.
अनिंद्य, रोचक माहिती.
अनिंद्य, रोचक माहिती.
एक प्रत आणून ठेवली आहे मी घरी पण वाचायला मुहूर्त लागेना>>>>>> same here.
किशी अरोरा यांच्या लेखातली
किशी अरोरा यांच्या लेखातली सगळी माहिती तर देता येणं कठीण आहे.
आंब्याच्या वेगवेगळ्या जाती, त्या कुठल्या आणि त्यांची विशेषता
१. Rataul पश्चिम उत्तर प्रदेश -लहान - तीव्र सुवास.
२. दशेहरी - मलिहाबाद north indian summer staple
3 लंगडा - बनारस आणि पूर्व उत्तर प्रदेश -
४ चौसा - उ.प्र. आणि बिहार - पराकोटीचा रसाळ. made for two hands
5 जर्दाळू - बिहार - सुवास
६ हिमसागर - प. बंगाल - fibreless
7 लक्ष्मणभोग - प. बंगाल - balanced and beautifully coloured
8 केसर - गुजरात - रस काढण्यासाठी
९ हापूस - महाराष्ट्र - भारताबाहेर सगळ्यात जास्त ज्ञात
१० पायरी - महाराष्ट्र - आमरसासाठी
११ सुंदरजा - मध्य प्रदेश
१२ बदामी - कर्नाटक - कर्नाटकचा हापूस
१३ रसपुरी - कर्नाटक
१४ बंगनपल्ली - आंध्र प्रदेश most widely eaten table mango
15 हिमायत - तेलंगण -a connoisseur's mango
16 नीलम - तमिळनाडू - जरा उशिराने येतो
१७ मानकुराद - गोवा - तिथे हापुसपेक्षा अधिक पसंत केला जातो
१८ klichundan केरळ - पोपटाच्या चोचीसारखा आकार
१९ naadan केरळ
२० bombai आसाम
which mango for what
Eating fresh no fuss - rataul, langra, chausa, jardalu, himsagar
Aamras - kesar, payri
Mango shake or lassi - safeda - dasheri, raspuri
Chhesecake - alphonso, amrapali
cakes and tarts - alphonso , banganpalli
pancakes - amprapali
ice cream - alphonso, kesar
grilling - alphonso , banganpalli
fruit salad - himsagar, rataul
mango salsa - banganpalli , neelam
panna - raw totapuri
hing wala achar - rajapuri, totapuri
raw chutney - raw langra, raw totapuri
mango jam - pairi, alphonso
त्यांच्या टेरेस गार्डनमधले आम्रपाली.
https://www.facebook.com/photo?fbid=1413541077462704&set=pcb.14135411174...
छान संकलन आहे भरत. यादीतले
छान संकलन आहे भरत. यादीतले बहुतेक आंबे खायला मिळाले आहेत, २-३ अपवाद. अशी घरात टेरेसवर लागवड म्हणजे भारीच.
which mango for what… ही यादी झकास. 👍
आता तर चौसा दशहरी सुद्धा संपले. आंब्याच्या सीझनचा पटाक्षेप!
माहितीपूर्ण पोस्ट भरत. यापैकी
माहितीपूर्ण पोस्ट भरत. यापैकी चार पाच आंब्याचे प्रकारच खाल्ले आहेत. ही पोस्ट वाचून "व्हॉट झुमका?" सारखं "व्हॉट आंबा?" झालं.
जगातले सगळ्यात महागडे आंबे,
जगातले सगळ्यात महागडे आंबे, जॅपनीज मियाझाकी आंबे ज्यांना Taiyo no Tamago (Egg of the Sun) नावाने पण ओळखले जाते. प्रीमियम क्वालिटी म्हणजे जॅपनीज स्टँडर्ड्स नुसार किमान ३५० ग्रॅमचे फळ आणि किमान शर्करा १५% किंवा त्याहून जास्त, बिना दशा मांसल आंबा. बाजारात (आंतरराष्ट्रीय) किंमत २.५ - ३.० लाख रुपये किलो फक्त. मध्य प्रदेश मध्ये एका शेतकऱ्याने सहज म्हणून ह्याची तीन कलमे लावली, अपेेक्षा काहीच नाही पण त्याला ही सुंदर जांभळी फळे धरली वयात येता. चौकशी करता मियाझाकी बद्दल कळले तसे त्या गड्याने चक्क झाडाच्या सेफ्टीसाठी ३ विक्राळ कुत्र्यांसह बाऊन्सर्स वगैरे आणून बसवले रानात २४/७. एका झाडाचे आंबे त्याने जवळपास ३ कोटीला विकले एका एजंटला त्याने फळ उतरवून नेले.
मला वाटते मियाझाकी म्हणजे आंब्याच्या राज्यातील वाग्यु बीफ असल्यासारखेच आहे जणू.
पर्पल कोहिनुरच जणू !! फळ फार
पर्पल कोहिनुरच जणू !! फळ फार सुरेख दिसतय
२.५ - ३.० लाख रुपये किलो आंबे
२.५ - ३.० लाख रुपये किलो आंबे !!
मियाझाकी आंब्याची माहिती झकास. पण असा पर्पल रंगाच्या सालीचा आंबा आपल्या भारतीय मनातल्या आंब्याच्या प्रतिमेशी जुळत नाही समहाऊ
… एक प्रत आणून ठेवली आहे मी
… एक प्रत आणून ठेवली आहे मी घरी पण वाचायला मुहूर्त लागेना>>>>>> same here.
ऋतुराज, माझेमन, जेम्स….
आता ही जालावर उपलब्ध आहे, प्रताधिकारमुक्त आणि फ्री.
जमेल तेव्हां वाचता येईल तुम्हाला फोनवरच 👍
Pages