
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
उकडांबा
उकडांबा
भारीच दिसतोय , रेसिपी लिहा
भारीच दिसतोय , रेसिपी लिहा माधव...
रेसिपी लिहा माधव…
रेसिपी लिहा माधव…
+ १
शॉर्ट रेसिपी विल डू 👍
शेप्रेट धागा काढून लिहिलीत तर इथे लिंक डकवा प्लीज.
(No subject)
फणस आणि आंबा साटं गावाहून मागवलेली. यंदा आमची घरची नाहीत, गरेही नाहीत त्यामुळे गावातील दोन जणांकडून विकत घेतलं आम्ही, जे आमचे नातेवाईकच आहेत. सगळ्यांचे एकेक पाकीट माहेरीही दिलं. दिर देवगडला कामासाठी येणार होते, त्यामुळे ते कुरियर करू शकणार होते, अजून काही हवं का विचारलं त्यामुळे कुळीथ पीठ पाव kg आणि हातसडीचे लाल तांदूळ एक किलो सांगितले. दिरांनी घरचे तूप पाठवलं, ते फ्री
. अजूनही प्रॉपर रेट सांगितला नाहीये दिरांनी, ते पुढच्या महिन्यात येतील इथे तेव्हा देऊ, सध्या पुण्यात आलेत.
मायबोलीवरची नं.१ लोकप्रिय
अंजूताई, साटं बघून जीव अर्धाअर्धा झाला!
मायबोलीवरची नं.१ लोकप्रिय 'मलई बर्फी', आंब्याचा आटवलेला रस घालून.
करेनही पुन्हा, कोणी सांगावं! 
फोटो जुना आहे, पण उत्साह नव्याने आला आहे.
सहीच, यंदा आटवलेला रस नाही
सहीच, कातील एकदम. यंदा आटवलेला रस नाही घरचा आणि मागवलाही नाही दुसरीकडून.
… फोटो जुना पण उत्साह नव्याने
… फोटो जुना पण उत्साह नव्याने आला आहे 👍
जय हो. आहेत आंबे तोवर करा झडकरी बर्फ्या-कलाकंद-शिरे
“आम के आम, गुठलियों के दाम”
“आम के आम, गुठलियों के दाम” या म्हणीचे दृष्यरूप.
आधी आमरस रिचवला. 😍

मग बी पेरले.
आता थोडे मोठे झाले की रोप जमीनीत लावायला योग्य व्यक्तीला देणार. 👆
वा वा, मी ही वेगवेगळ्या
वा वा, मी ही वेगवेगळ्या आंब्यांचे बाठे कुंडीत पेरलेत, काही रोपं आली. कदाचित खाली जाऊन लावेन, पेरते व्हा कर्म करीत रहा करत, फळाची आशा धरायची नाही, अर्थात सर्व सोसायटीसाठी लावते कारण ती जागा सोसायटीची. सर्व नीट लाऊन, आजूबाजूने दगड विटा ठेऊनही रान साफसफाई करायला येतात त्यांच्याकडून उपटली जातात. मी दिवसा झोपते म्हणून मला समजतही नाही, कधी आलेले साफसफाई करायला, नवरा फार लक्ष देत नाही.
… पेरते व्हा कर्म करीत रहा
… पेरते व्हा कर्म करीत रहा करत, फळाची आशा धरायची नाही…
हो हो, लष्कराच्या भाकऱ्याच ह्या. पण मिळणारे समाधान अनमोल.
देशात आंब्याचं लागवड क्षेत्र
देशात आंब्याचं लागवड क्षेत्र आक्रसत आहे आणि रासायनिक खते -औषधे यांच्या बेसुमार उपयोगामुळे भारतीय आंब्यांची गुणवत्ता घसरते आहे :
India's mango, long the ‘king of fruits’, is facing a crisis, from shrinking orchards and chemical abuse to climate disruptions and export hurdles. Orchard owners are abandoning age-old practices to contractors who exploit trees for short-term gains using chemicals like paclobutrazol. Over 70% of India's mangoes are now grown this way, resulting in poor-quality, chemically laced fruits that are harvested prematurely and artificially ripened.
Climate change is intensifying the problem, with erratic flowering and rain-drenched harvests in Tamil Nadu, Andhra Pradesh, and Uttar Pradesh crashing prices and sparking regional tensions. Yields remain stagnant at 9.5 tonnes/hectare despite India producing over 23 million tonnes annually. Yet, less than 0.5% is exported due to the fruit’s short shelf life and lack of pan-India market connectivity.
Unless India boosts scientific investment and curbs chemical exploitation, the nation’s beloved mango may soon be a shadow of its glorious past.
(From "MINT")
यंदा मला चौसा मिळाला. तारीफ
यंदा मला चौसा मिळाला. तारीफ करणार्याने चोखून खायचा आंबा असे वर्णन केले होते. एवढा मोठा आंबा चोखून कसा खायचा हा प्रश्न पडला होता पण पहिल्या वेळेसे पुस्तकी ज्ञान वापरावे म्हणून गप गुमान चोखून खाल्ला. महाराष्ट्रातल्या रायवळचीच चव वाटली बरीचशी पण आंब्याचा आकार : बाठीचा आकार हे गुणोत्तर यात बरेच कमी आहे (रायवळच्या तुलनेत).
तारीफ करणार्याला लगेच पोच दिली फोन करून "ऐसे जंगली आम को तू हापूस से कंपेअर करता है? तेरे रेको पे भरोसा करना मुष्किल होगा अब"
>>>>>>जंगली आम
>>>>>>जंगली आम
जंगली का आकाराने मोठा म्हणुन?
मी मल्लिका जातीचा आंबा खाल्ला
मी मल्लिका जातीचा आंबा खाल्ला इतक्यात. 2 वेळा आणून खाल्ला. नेहमीच्या भाजीवाल्या दादांनी आग्रहाने 1 न्यायला लावला, आवडला तर पैसे द्या म्हणून. 400 gram वजनाचा आहे 1 आंबा. पण सुरेख चव, अगदी गोड!
जंगली का. >>> रायवळचा एक अर्थ
जंगली का. >>> रायवळचा एक अर्थ जंगली असाही होतो ना?
होय रायवळ म्हणजे मुद्दाम, न
होय रायवळ म्हणजे मुद्दाम, न लावताही उगवलेला आंबा करेक्ट. धन्यवाद.
“रायवळ” ची माझी पोस्ट पुन्हा
“रायवळ” ची माझी पोस्ट पुन्हा डकवतो :
“रायवळ” हा शब्द गावठी, specific / विशेष नाव नसलेल्या आंब्यासाठी वापरतात कोकणात.
महाराष्ट्रात अन्यत्र रायवळ हा शब्द जंगली लाकडासाठी वापरात आहे. घरबांधणी, फर्नीचर करायला अयोग्य कनिष्ट दर्ज्याच्या लाकूडफाट्याला “रायवळ” म्हणतात.
Some Mango Updates :
Some Mango Updates :
♠ उत्तर भारतात “लंगडा आम” चे फार कौतुक. साधारण २५० वर्षापूर्वी एका पायाने अधू असलेल्या बागवानाने विकसित केलेले कलम म्हणून “लंगडा” असे नाव पडले आंब्याला. हो, तेव्हां “दिव्यांग” वगैरे शब्द कॉइन नव्हते झाले.
(लंगडा पिकला तरी साल हिरवीच)
♠ आंब्याच्या सीझनमधे थोडा उशिरा येणारा लंगडा. साधारण जूनच्या शेवटी.
♠ सहारनपुरमधे जास्त बागा असल्या तरी वाराणसीचा बनारसी लंगडा उच्चप्रतीचा समजला जातो. त्याला GI Tag मिळाला आहे.
♠ लंगडा आणि दशहरी दोन्ही आंबे पिकल्यावर रंग बदलतीलच असे नाही.
♠ यंदा रिलायंस ग्रुपच्या जामनगर आणि अन्यत्र असलेल्या बागांमधले लंगडा आणि दशहरी बाजारात, विशेषत: त्यांच्या मॉल्समधून विकायला आहेत. महामूर पीक आहे यावर्षी. ते खास नाहीत चवीला असा वैयक्तिक अनुभव.
♠ यावर्षी आणलेल्या लंगडा आणि दशहरी दोघांचीही चव कुठेच माझ्या स्मृतीतल्या चवीशी जुळली नाही याचे फार दु:ख झाले. 👎
… मी मल्लिका जातीचा आंबा
… मी मल्लिका जातीचा आंबा खाल्ला…
@ प्रज्ञा९ , कापून खाण्याचा होता का? जमल्यास फोटो डकवा प्लीज.
@ माधव, “चौसा”नी निराशा केली म्हणायची.
मी पण इथे मल्लिका आंब्याचे
मी पण इथे मल्लिका आंब्याचे सांगायला आले.
खूपच गोड होते. साखरेचं पोतंच जणू . आवडले.
@ अनिंद्य >> आधी वाचले असते तर फोटो काढला असता. टेस्ट करण्यासाठी २ च आणले होते . खाऊन झाल्यावर इथे लिहायला आले .
उभट कोयरी सारखा आकार . घट्ट हापूससारखाच गर . कोय एकदम पातळ चपटी उभट S आकाराची होती . कापूनच खाल्ला . खूप आवडला मल्लिका .
यावेळी बरेच नवीन प्रकारचे आंबे चाखून पाहिले .
मल्लिका फुल रेको दिसतोय इथे !
मल्लिका फुल रेको दिसतोय इथे !
.. बरेच नवीन प्रकारचे आंबे चाखून पाहिले… जय हो !
हो मीपण संपवला आणि मग इथे
हो मीपण संपवला आणि मग इथे लिहिलं.
आम्रखंड खाताना आंब्याचा जो स्वाद/ चव/ गंध असतो त्याच्या बरीच जवळपास जाणारी चव आहे. भरपूर गर असलेला (आणि चक्क माझ्या साबांना हापूस च्या खालोखाल आवडलेला) आंबा!
आज धाग्यावरचे प्रतिसाद पुन्हा
आज धाग्यावरचे प्रतिसाद पुन्हा वाचतांना “भरत” यांनी केलेली कमेंट प्रतिसादांच्या गर्दीत दुर्ल़क्षित झाल्याचे ल़क्षात आले:
.. आपलं एक सांस्कृतिक प्रतीक असल्यासारखी कोय / कोयरी ही आंब्याची इमेज…
बँग ऑन ! !
आंबा फक्त एक फळ नाही, तो भारतीय कलाविश्वातले एक ठळक totem/ motif / गणचिन्ह/ प्रतीकचिन्ह म्हणून सुस्थापित झाला आहे.
तमिळ घरापुढच्या रांगोळीतले “मनकोलम्” असो की मराठी मानबिंदू असलेल्या पैठणीवरची “कुयरी”, कश्मीरी कशीद्यातली “आंबी”, मल्याळी आज्या-पणज्यांच्या गळ्यातला “मंगामलाई” दागिना असो की भरजरी जरदोजी भरतकामातले “अमिया” मोटिफ.

आंबा सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, अनादिकाळापासून भारतीय कलाप्रांतात मिरवतो आहे.
ब्रिटिश आणि इराणी शासकांनी हा खासा भारतीय कलानिधी the paisley म्हणून जगभर नेला आहे.
वा!
वा!

हो, मेंदीत वापरल्या जाणार्या मोटिफ्सपैकीही बहुधा सर्वात कॉमन.
हळद-कुंकू ठेवायचा करंडाही अनेकदा कुयरीच्याच आकाराचा असायचा घरोघरी.
माझ्याकडे साधारण आहे कुयरी,
माझ्याकडे साधारण आहे कुयरी, मला मोठ्या चुलतवहिनीने लग्नात दिलेली. फक्त खण दोन आहेत.
कुयरी आकाराचे फार महत्व आहे आपल्या संस्कृतीत. भरत यांनी योग्य लिहिलंय, परत जाऊन वाचेन.
हळद-कुंकू ठेवायचा करंडाही
हळद-कुंकू ठेवायचा करंडाही अनेकदा कुयरीच्याच..
स्वाती, त्याला कोयरीच म्हणतात ना?
कोयीच्याच आकाराचा असे म्हणायला हवे.
की कोयी ला कोयरी पण म्हणतात?
कुयरीच म्हणतात आमच्याकडे,
कुयरीच म्हणतात आमच्याकडे, आकार कुठलाही असला तरी.
आधीच्या माझ्या पोस्टमध्ये साधारणनंतर अशीच शब्द हवा होता, आता एडिट करता येत नाहीये.
कैरी-आंब्याचं सांस्कृतिक
कैरी-आंब्याचं सांस्कृतिक विवेचन-चर्चा आवडली.
आमच्याकडेही कुयरी म्हणतात. "आई, तु कुयरी का म्हणतेस, कैरी म्हण की" अस मी लहान असताना आईला म्हणायचो.
कुयरी हा शब्द कैरी या शब्दाचे एक रूप असावे, तिचा कोयीशी काही संबंध नसावा असे वाटते.
मेहंदी मोटिफ्समधे कैरी-आंबा
मेहंदी मोटिफ्समधे कैरी-आंबा सुपर लोकप्रिय हे खरं आहे आणि कुंकवाचा करंडा हमखास याच आकाराचा असतो हे ही.
हा आमच्या घरचा, स्टेनलेस स्टील भारतात नवीन असतांना ते लोकप्रिय करण्यासाठी एका ब्रिटिश कंपनीने बनवलेला.
आकार कैरी-आंब्याचाच. आता embossed ब्रँडनेम वापरापरत्वे विरळ झाले आहे.
आत खण तीन. वय सुमारे ६०, जास्त असण्याची शक्यता.
# करंडा/ कुयरी / कोयरी
# Metal Art in SS
# Mango Motif @ daily life
# Britain’s Love for Indian Mango
अनिंद्य, कोयरी छान आहे.
अनिंद्य, कोयरी छान आहे. जुन्या घाटाची, जड असेल असं वाटतंय. तुमच्या आजी-आईची बोटं ह्या कोयरीला कितीवेळा लागली असतील. सणावाराला त्यांनी ती स्वच्छ करून त्यात हळद कुंकू भरलं असेल. ठेवा आहे हा.
Pages