
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
आंब्याचा सुगंध इथपर्यंत
आंब्याचा सुगंध इथपर्यंत दरवळतोय, सुंदर शेक आहे. फोटो जबरदस्त आला आहे अनिंद्य.
मँगो शेक भारी दिसतोय. करायला
मँगो शेक भारी दिसतोय. करायला हवा!
@ प्राजक्ता,
@ प्राजक्ता,
नेटकिश्श्याबद्दल अनभिज्ञ आहे. प्रकाश पाडा.
>>https://www.youtube.com/watch?v=P9y17dSDydE&t=9s
As always, the host was super
As always, the host was super gracious, will let her know the praise received here. Many thanks, friends!
@ प्राजक्ता, now I got your point
No connect between this and the “pati”
मेक्सिकन आंब्यांबद्दल बरेच
मेक्सिकन आंब्यांबद्दल बरेच ऐकले इथे. लेकिन कभी दीदार नहीं हुआ.
कोणकोणते असतात, कसे दिसतात त्याची उत्सुकता आहे.
कुणी फोटो डकवा प्लीज.
आमच्याकडे मॅरेथॉन म्हणून
आमच्याकडे मॅरेथॉन म्हणून मिळतात. सध्या आपल्या देशी आंब्यांच्या गर्दीत ते दिसत नाहीयेत पण जरा नंतर मिळाले, आणले तर नक्की टाकेन फोटो.
साईझला मोठे असतात आणि आम्ही त्याचा आमरस करुन हापूसची भूक भागवली आहे. रस जरा लाईट केशरी असतो.
पुन्हा गेले देशी दुकानात की
पुन्हा गेले देशी दुकानात की टाकेन फोटो.
गेली काही वर्षं इथे डॉमिनिकन आंबेही मिळतात - त्यांची चव मेक्सिकन आंब्यांहून जास्त आवडली होती मला, आणि रंगही सुंदर होता.
यंदा देशी वाण सहज उपलब्ध झाल्यामुळे कुठलेच इतर प्रकार आणले गेले नाहीत.
नंतर मिळाले, आणले तर नक्की
नंतर मिळाले, आणले तर नक्की टाकेन फोटो.
+
गेले देशी दुकानात की टाकेन फोटो.
येस प्लीज. 👍
मॅरेथॉन हा ब्रँड आहे
मॅरेथॉन हा ब्रँड आहे


इथे मिळणार्या मेक्सिकन आंब्याच्या व्हरायटीज म्हणजे केन्ट किंवा हेडन , जे मला तरी सिमिलर वाटतात. हे रसाळ आणि फ्लेवरफुल असतात, बरेच पायरी च्या जवळपास जाणारे. आमरस करायला मस्त. दुसरे म्हणाजे अताउल्फो - हे घट्ट गराचे आंबे असतात. हापूस चे गरीब चुलत भाऊ म्हणता येतील .
हे कापून खायला बरे असतात. अगदी खूप गोड, आणि पातळ साल. रेषा नसतात. पण हापूस सारखा तो अरोमा नसतो .
पूर्वी म्हणाजे २ वर्षापूर्वीपर्यन्त देशी आंबे इथे मिळत नव्हते त्यामुळे हेच खाल्ले जायचे. आता देशी मिळतात पण हेही चांगले दिसले की आणतो आम्ही. शिवाय हे बरेच स्वस्तही असतात
छान दिसतायेत.
छान दिसतायेत.
@ maitreyee
@ maitreyee
थँक्यू. व्यवस्थित सचित्र प्रतिसाद. केन्ट लाल सालीचा दिसतोय.
परफेक्ट, एम्टी!
परफेक्ट, एम्टी!
हा डॉमिनिकन मिन्गोलो:

गुजराथमधे एका जंगलाजवळ एक
गुजराथमधे एका जंगलाजवळ एक रिसॉर्ट वगैरे आहे, तिथे एका बागेत आंब्याच्या जगभरातील प्रचंड व्हरायटीज आहेत (एका डोंबिवलीकराचाच व्लॉग बघितलेला) .
मस्त नवीन नवीन माहिती आणि
मस्त नवीन नवीन माहिती आणि फोटो पाहायला मिळतायेत.
डॉमिनिकन मिन्गोलो,
डॉमिनिकन मिन्गोलो,
मँगो व्हरायटीज बाग
= 👌
< img src="https://lh3
आता डोमेनिका आणि मेक्सिकन पाहुणे आले आहेत तर त्यांच्या भेटीला हे देशी पाहुणे :
“तोतापुरी” कैरी आणि “मल्गोबा” आंबा. लोणचं घाला की रस करा. किंवा कापून खा.
ह्या कैरीच्या करकरीत फोडी + मीठ+ लाल मिर्ची पावडर is recipe for food orgasm.
मल्गोबा भारतात खाल्लेला आहे.
मल्गोबा भारतात खाल्लेला आहे. गुळमट गोड असतो का?
@ मलगोबा
@ मलगोबा
ह्याचा गर firm bodied/ dense असतो. कोय लहान, पांढरी. गोडव्यासोबत हलकासा आंबटपणा असतो. वजनावर विकतात, नग-डझनावर नाही. कापून खायला जास्त चांगला.
ओके मग माझी स्मृती मला दगा
ओके मग माझी स्मृती मला दगा देते आहे. तो गुळमट आंबा वेगळा असेल.
मल्गोबा पहिल्यादाच नाव एकल!
मल्गोबा पहिल्यादाच नाव एकल! किवा आमच्याकडे काहितरी वेगळ नाव असेल...आमच्या घराच्या मागे एरिगेशन डिपार्टमेन्टची काही एकरानी जागा राखिव होती त्यात खुप आब्याची झाड होती..त्याच्या कैर्ञा पाडायला सुट्टित आम्ही जायचो..मज्जा यायची..त्या कैर्याच गर वर मल्गोबाच वर्णन केला तस होता..घट्ट्,पाढराशुभ्र .
प्राजक्ता, आंब्याचा गर केशरी
प्राजक्ता, आंब्याचा गर केशरी - यलोच. कोय पांढरी म्हणालो मी.
मल्गोबा म्हणजे बदामी आंबा का?
मल्गोबा म्हणजे बदामी आंबा का? फोटोतला आंबा तसाच दिसतोय. बदामीचा गरही खूप घट्ट असतो (रसाळपणा कमी असतो). तो चाटून पुसून खाण्याइतका काही मला आवडत नाही त्यामुळे बाठ कधी बघितली नाहीये.
का त्या दोन्ही वेगळ्या जाती आहेत?
रायवळ इवले इवले से काय गोंडस
रायवळ इवले इवले से काय गोंडस बाळं असतात.
दोन्ही वेगळ्या जाती असाव्यात.
दोन्ही वेगळ्या जाती असाव्यात.
रायवळ इवले इवले = यांच्या कैऱ्या तर त्याहून जोर. त्यात कोय धरली नसते तेव्हां खायला 😋
बाठ / कोयीवरून आठवले. त्याचे
बाठ / कोयीवरून आठवले. त्याचे तुम्ही काय करता ? अनेकदा वाळत घालून कुंडीत पुरल्या आहेत. काही उगवतात, उरलेल्यांचे खत होते. मुख्य लेखात एक फोटो आहे हापूसच्या रोपाचा.
आंब्याच्या आतल्या कोई (की कोयी ?) भाजून खाण्याबद्दल कुणीतरी लिहिले होते. अजून काय काय?
त्या कोयीचा लोणी काढा.
त्या कोयीचा लोणी काढा.
कोयी कडकडीत वाळवून मग वरची खपली आरामात निघते.
मग आतला गर भाजायचा. आणि परत अगदी पातळ वरची खपली काढून कुटायच्या घाण्यात मग गाळून येते ते तेल थिजले की मॅम्गो बटर , भाजून घेतल्यानं ज्यास्त दिवस टिकतं लोणी.
हापूस सरले. आता रायवळ खाऊक
हापूस सरले. आता रायवळ खाऊक येवा.
हे लोणी- मँगो बटर नवीन ऐकले.
हे लोणी- मँगो बटर नवीन ऐकले. शिया बटर सारखाच प्रकार दिसतो आहे. करायला खटाटोप आहे
याचा वापर कसा करतात? साबण-सौंदर्य प्रसाधनात वापरत असावेत. की edible असते ?
प्रकाश पाडा प्लीज.
>>>>साबण-सौंदर्य प्रसाधनात
>>>>साबण-सौंदर्य प्रसाधनात वापरत असावेत.

कोयीच्या भुकुटीचा चांगला स्क्रब होइल.
माझ्याकडे आलमंड-मँगो डव्ह स्क्रब होता. कसला ग्रेट होता. सुगंधी.
सध्या हिमालयन सॉल्ट + रोझ ऑइल आहे. तोही काय सुगंधी आहे.
कोयीच्या भुकुटीचा स्क्रब ?
कोयीच्या भुकुटीचा स्क्रब ?
होत असावा.
तुमच्या डव्ह प्रोडक्टमधे मँगो बटर आहेच. ही पोस्ट तिकडे स्नानांतरवरही शोभेल.
Pages