Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DITra3dJLG6/
तो ताईत म्हणजे एक छोटीशी
तो ताईत म्हणजे एक छोटीशी क्रायो कॅप्सूल असे. दर अमावस्येला तिच्यात लिक्विड नायट्रोजन भरत.
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/1666576597308335
हे शाळेत शिकवायला हवे -
हे शाळेत शिकवायला हवे -
*1)* 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.
*2)* 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु.
प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
*3)* या सर्व पत्त्याची बेरीज 364
*4)* एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
*5)* 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
*6)* 52 पत्यातील 12 चित्र पत्ते.
म्हणजे 12 महिने
*7)* लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
*1)* दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.
*2)* तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश
*3)* चौकी म्हणजे चार वेद
(अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेवेद)
*4)* पंजी म्हणजे पंच प्राण
(प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
*5)* छक्की म्हणजे षड रिपू
(काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,
लोभ)
*6)* सत्ती- सात सागर
*7)* अटठी- आठ सिद्धी
*8)* नववी- नऊ ग्रह
*9)* दसशी- दहा इंद्रिये
*10)* गुलाम- मनातील वासना.
*11)* राणी- माया.
*12)* राजा-सर्वांचा शासक.
*13)* एक्का- मनुष्याचा विवेक.
*14)* समोरचा भिडू - प्रारब्ध.
*पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!*
काय अरसिकपणा हा!
काय अरसिकपणा हा!
छान मजा घेत पत्ते खेळायचं सोडुन त्यात आयुष्याचा अर्थ शोधत बसायचं म्हणे.
गोटू, राणी आणि राजाला
गोटू, राणी आणि राजाला अनुक्रमे कार्यकर्ता, नगरसेविका आणि नगरसेवक म्हणावे. किंवा कंपाउंडर, फार्मसिस्ट आणि डॉक्टर असं पण चालेल.
बाकी सगळं ठीक आहे... समोरच्या भिडूला प्रारब्ध हे कुठून आलं मध्येच! आणि जोकरचा अर्थ पण सांगा की! जोकरला वॉर्डबॉय?
ही ऍडीशन कशी वाटतेय? -
ही ऍडीशन कशी वाटतेय? -
किलवर म्हणजे धर्म, अर्थ, काम हे ३ पुरुषार्थ. ते पार पाडताना बदाम म्हणजे ह्रदयातील भावनांना समाजाची चौकट घालत आलेल्या अडचणी प्रयत्नांच्या इस्पिकने(तलवारीने) उडवत चतुराईने खेळणाराच डाव जिंकतो.
चार पानांच्या क्लोव्हर लीफसारखा मोक्ष दूर्मिळ.
जोकरला राजकारणी. कुठूनही येऊन
जोकरला राजकारणी. कुठूनही येऊन वाट्टेल तसा गेम चेंज करणारे….
बाकी जाऊ दे, पण मूळ फॉरवर्डात
बाकी जाऊ दे, पण मूळ फॉरवर्डात "समोरचा भिडू - प्रारब्ध" हे भारीये
बाकी जाऊ दे, पण मूळ फॉरवर्डात
बाकी जाऊ दे, पण मूळ फॉरवर्डात "समोरचा भिडू - प्रारब्ध" हे भारीये >>>>> +१
पत्त्यांच एक फॉरवर्ड आधी आलं
पत्त्यांच एक फॉरवर्ड आधी आलं होतं पहिल्या भागात. त्यावरही धमाल पोस्टी आल्या होत्या.
इंद्रिये तर पाचच असतात ना?
इंद्रिये तर पाचच असतात ना?

(यांनी पाच हा आकडा पंचप्राणात कंझ्यूम केल्याने, इंद्रिये दहा झाली असावीत!)
आणि समोर एका ऐवजी तीन चार भिडू असतील...तर मल्टिपल प्रारब्धे काय?
सगळेच
सगळेच
समोर एका ऐवजी तीन चार भिडू असतील...तर मल्टिपल प्रारब्धे काय >>>
माझेमनची अॅडीशन भारी!
सगळ्यात कहर म्हणजे हे शाळेत शिकवायला हवे म्हणतायत
चार ऋतू कोणते?
चार ऋतू कोणते?
एक तर ते सहा हवेत नाहीतर तीन.
सगळ्यात कहर म्हणजे हे शाळेत शिकवायला हवे म्हणतायत>>>>>>
चार ऋतू कोणते?
चार ऋतू कोणते?
एक तर ते सहा हवेत
>>>> बरोबर पकडलंत. एकीकडे भारतिय संस्कृतीच्या बाता करायच्या नी सोयिस्कर तिथे पाश्चात्य गोष्टी उचलायच्या.
चार ऋतू कोणते? >>> ते गाणं
चार ऋतू कोणते? >>> ते गाणं ऐकलं नाहीत का - पतझड, सावन, बसंत, बहार एक बरस के मौसम चार
खरंच की. म्हणजे लिहिणाऱ्याने
खरंच की. म्हणजे लिहिणाऱ्याने सखोल अभ्यास करून लिहिले आहे.
ते गाणं ऐकलं नाहीत का - पतझड,
ते गाणं ऐकलं नाहीत का - पतझड, सावन, बसंत, बहार एक बरस के मौसम चार>>>> माझ्या मनात हेच आलं होतं.
पण my lord माझा ह्या गाण्यावरच आक्षेप आहे.
बसंत आणि बहार हे दोन ऋतू कसे?
आणि त्यात पाचवा मौसम प्यार का, इंतजार का म्हटलं आहे.
त्यावर काय मत आहे.
बसंत spring चैत्र आणि बहार
बसंत spring आणि बहार summer = चैत्र वैशाख

बहार नॉर्थमध्ये खरंच बहारीचा असतो.
आपल्याकडे फक्त कमी उन्हाळा, जास्त उन्हाळा आणि पाऊस
प्यार का मौसम नेहमीच असतो
बसंत spring आणि बहार summer =
बसंत spring आणि बहार summer = चैत्र वैशाख>>>> तरीही "प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे." हे गणित जुळेना
प्यार का मौसम नेहमीच असतो>>
प्यार का मौसम नेहमीच असतो>> हो, तो चार पेक्षा वेगळा नाही, तर त्यांना समांतर मौसम आहे. केव्हाही प्यार करा, इंतजार करा/करायला लावा.
तरीही "प्रत्येक ऋतू चे 13
तरीही "प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे." हे गणित जुळेना >> सरासरी असेल. नाहीतर किल्वरचे १९ पत्ते आणि इस्पिकचे फक्त ८ असतील हुकूम किल्वर करणाऱ्यांची चांदी होईल.
जुन्या काळात एक गाणं
जुन्या काळात एक गाणं होतं
असे हे ऋतुचे फिरे चक्र बाळा
हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा..
तेव्हा हवामान खात्याने तीनच ऋतू असावेत असा निसर्गाला आदेश दिला असेल.
हुकूम किल्वर करणाऱ्यांची
हुकूम किल्वर करणाऱ्यांची चांदी होईल. >>
चार सूटस ना चार दिशा असा बदल सुचवतो. आणि आठ सिद्धी आणि दहा इंद्रिये कोणती ते एकाला माहीत नाही ते समजलंय बरका!
आणि सात ला सागर हे अगदीच पुचाट आहे.... सात रंग घ्या, सात स्वर घ्या.. सात च्या आत घरात अशी शिकवण द्यायची तरी स्कोप आहे... सात सागरांनी फारतर सात वेळा प्राण तळमळून घेता येईल. त्याशिवाय जीवनाला त्याचा काय उपयोग? आर्टिक पॅसिफिक आणि भूमध्यसामुद्रधुनी!
अमितव
अमितव
चार दिशा? 'पोटासाठी दशदिशा' विसरलात का?
आठला अष्टलक्ष्मी सुचवते मी.. अष्टसिद्धींपेक्षा गूगलायला सोपं
अष्टसिद्धींपेक्षा गूगलायला
अष्टसिद्धींपेक्षा गूगलायला सोपं >>
बाकी पत्ते खेळताना अठ्ठी वर
बाकी पत्ते खेळताना अठ्ठी वर गोटू किंवा राणी टाकून हात झाला, म्हणजे आठ सिद्धींवर वासना आणि माया जिंकल्या असं म्हणायचं का?
आणि एक्का असून असून एकच असणार, विवेक इज डिमिनिशिंग!
मी जर जेलर झालो तर 'पतझड सावन
मी जर जेलर झालो तर 'पतझड सावन' , 'तेरी मेहेरबानिया', 'परबतोंसे आज मै' ही गाणी सकाळी स्पीकर वर लावेन मग कैद्यांच्या डोक्यात दिवसभर तीच गाणी बसतील.
पाचवा मौसम प्यार का, इंतजार
पाचवा मौसम प्यार का, इंतजार का >>> जियो ऋतू.
मी वाटच पाहत होते कोणाला तरी आठवेल.
माझेमन इज राइट, हा मौसम नेहमीच असतो
हुकूम किल्वर करणाऱ्यांची चांदी होईल>>>
अमित
कैद्यांच्या डोक्यात दिवसभर तीच गाणी बसतील >>> विकु
विकु,
विकु,
खरेच असे गाणे डोक्यात बसणे म्हणजे भयंकर शिक्षा आहे...
जाता जात नाही.
मी तर गाणी ऐकत वॉक ला जाऊन आल्यावर, लगेच अंघोळ करून पूजा करायला बसले तर .
तेरे संग पानियोसा पानियोसा पानीयोसा बेहता रहू....मनात वाजत असते आणि आपोआप म्हटलेही जाते!
बॉलीवूड पूजा!!
Pages