खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेंगोळे ,गवारकोफ्ते, खुडा ,भारीच मेन्यू.
San deep फोटो मस्त .पहिल्या फोटोत आईस्क्रीम जेली विथ कस्टर्ड आहे का?
ग्लासेसही मस्त आहेत, त्यांना क्रॉकरीच्या धाग्यावरही जाऊद्या.

निवग्र्या आणि फरे.. महाराष्ट्राची पूर्व झाडीपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी यांचा खाद्यसंगम
IMG-20250506-WA0004.jpg

हो कोंबडी वडे च आहेत , पहिला फोटो -Home made ice cream, jeely , and custard ,दुसऱ्या फोटोत चिकन रस्सा , चिकन रवा फ्राय , आणि सोल कढी , तिसरा fanta float..

मनीम्याऊ, खाद्यसंगम ज़ोरदार !
झाडीपट्टीचे फरे मिथिला/ बिहारच नाही तर थेट नेपाळ पर्यंत लोकप्रिय आहेत. फक्त तिकडे दाल के फरे - विथ स्टफिंग ऑफ चना दाल. Almost Zero oil रेसिपी.

सिमरनच्या रेसिपीने वांगी बटाटा केला. मस्त झाला आणि जास्ती कापाकापी नाही त्यामुळे सोपे काम. धन्यवाद Happy

IMG-20250507-WA0020.jpg

वाह मस्त..
मी गेले दोन दिवस घरून काम करतोय.. छान पावसाळी वातावरण होतेय भर दुपारी.. त्यामुळे भज्या, थालीपीठ, पोहे, साबू खिचडी असेच प्रकार चालू आहेत दुपारचा लंच स्किप करून

इथे भरपूर फोटो डकवायचे असतात, परंतु “खाजगी जागा” फोटो अपलोड मुळे संपली असे दिसत आहे. नवीन फोटो अपलोड करायला काय करावे लागेल ? जुने बरेच फोटो उडवले तरी आता जागा नाही.

तुम्ही लोक काय करता ?

मी जुने फोटो डिलीट करतो. (जिथे त्यांच्या संदर्भाची गरज नाही तिथले).
तुम्ही या धाग्यात दुसऱ्या/तिसऱ्या पानावर जाऊन अथवा याच्या आधीच्या धाग्यावर जाऊन पहिल्या आणि शेवटल्या पानांव्यतिरिक्त इतर पानांवरील पोस्ट्स/फोटो बघता का?
कोण बघतं? काही महिन्यांपूर्निंवी अनिंद्य/ऋन्मेष/अस्मिता/प्राजक्ता/म्हाळसा यांनी काय फोटो शेअर केले होते बघुया म्हणुन कोण तेवढ्या जुन्या पोस्ट्स बघतं?

अर्थात गुगल ड्राईव्ह आणि इतर ऍप्स /संकेतस्थळांवरून फोटो शेअर करणे पर्याय आहेच. कोणीतरी त्याबद्दल सांगेलच.

अरे हो की सामो. आणि अनिंद्य
माय बॅड!
मग एक सोपा उपाय म्हणजे ऋन्मेषची ट्रिक वापरा.
अजून एक माबो अकाउंट - उदा: अनिंद्य_फोटो

माझा उपाय सोपा आहे तसा. मी दुसऱ्या ब्राउजरने ते फोटो अपलोडवाले प्रोफाईल उघडतो. त्यामुळे सारखे लॉग आऊट लॉगिन झंझट राहत नाही.
माझे असे तीन प्रोफाईल भरले आहेत. चौथे चालू आहे.
मी त्यांना नाव ऋन्मेऽऽष फोटो अपलोड १/२ असेच दिले होते जेणेकरून तिथूनच फोटो टाकावा वाटला तर हा कोण मध्येच म्हणून कोणाचा गोंधळ उडू नये.

बाकी मला ते जुने फोटो उडवणे नाही जमत. त्यात मन अडकले असते Happy

तुम्ही लोक काय करता ? >>> मी सध्या गूगल फोटोजवरूनच शेअर करते आहे लिंक देऊन. त्याचं प्रमुख कारण म्हणजे फोटो इथे टाकताना त्याचा साइज लहान करावा लागतो आणि फोटो क्वालिटी गंडते.

फोटो इथे टाकताना त्याचा साइज लहान करावा लागतो आणि फोटो क्वालिटी गंडते.
>>>>
मी फोटो व्हॉट्सॲपवर शेअर करून तिथून सेव्ह करतो. यात साईज कमी होते पण क्लॅरिटी ठिकठाक राहते. शेवटी आपण एकमेकांशी तसेच तर फोटो शेअर करतो.
किंवा स्क्रीनशॉट घेणे हा दुसरा ऑप्शन.

फोटो व्हॉट्सॲपवर शेअर करून तिथून सेव्ह करतो.

+१

हे मी करतो. नवीन प्रोफाइल साठी नवीन ईमेल लागतो का ?

गूगल ड्राइव्ह बघतो कसे ते

करेक्ट! मी पण बरेचदा ऋ सारखंच करते. पण आता इथली अलॉटेड जागा कमी राहिली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे फोटो टाकायचे असतील तर हल्ली मी गूगल फोटोजच वापरते.

@अनिंद्य,

गुगल फोटोज वरून फोटो डकवायचे असतील तर एक तिथे एक अल्बम क्रिएट करा. त्याच्या permissions सेट करताना anyone with the link अशी सेट करा. मग हवा तो फोटो त्या अल्बम मधे add करा. यानंतर त्या अल्बम मधे जाऊन तो फोटो उघडा. फोनवरून शेअर करत असाल तर शेअर मधे जाऊन create link क्लिक करून link copy kara. लॅपटॉप वरून करत असाल तर इमेज वर right click करून copy link करा. आता माबोवर इमेज देताना ही लिंक वापरा.

गुगल लिंक वापरून फोटो देण्याचा प्रयत्न करत होते. पण लिंक च दिसतेय फोटो दिसत नाहीये

Pages