खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋणमेश यांच्या पोस्टमधील पदार्थ दही तडका दिसतो आहे . इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेली बरीच मध्यंतरी.
दह्याला लाल तिखटाची फोडणी देतात . दही तडका/ दही तिखरो अशी नावे आहेत.

प्राजक्ता, हे एकदम कलरफुल आहेत. हे असेच रंगीबेरंगी असतात का ?

मला मागे एकदा कुणी पार्सल पाठवले होते त्याचा चुरा झाला होता, म्हणून आकार समजण्याचा प्रश्नच नव्हता. पण तो चुरा रंगीत नव्हता म्हणून विचारले.

धन्यवाद सगळ्याना!
प्राजक्ता, हे एकदम कलरफुल आहेत. हे असेच रंगीबेरंगी असतात का ?>>> नाही प्लेन पण असतात, हे पाकातले केलेत...पिठिसाखर भुरभुरलेले पण असतात.

Screenshot_20251019_194503_Gallery.jpg
ऑफिसमध्ये वाढदिवसानिमित्त मिळालेली रगडा पॅटिस पार्टी.

फराळाच ताट ,पिठल भाकरी, रगडा पॅटिस सगळच यम्मी एकदम
माझेमन चिरोटा अगदी गुलाबाच फुलच तोडून ठेवल्यासारखा वाटतोय..

ऋ, किट्टु मस्त.
प्राजक्ता आणि माझेमन -फारच भारी फोटो.

@ माझेमन

हो हे ताट बघितले होते, त्यातल्या बोरांची खमंग चर्चा केली होती आपण मागच्या वक्ताला 🙂

सुंदर आहेत रंगीत चिरोटे तुमचेही

लंपन यांनी दिलेल्या कृतीप्रमाणे रवा नारळ लाडू आणि मठरी केली.
IMG-20251019-WA0008(1).jpg
मठरीIMG-20251019-WA0003(1).jpg
चिवडा
IMG-20251018-WA0002_0.jpg

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

सासुरवाडीचा फराळ
लाडूच तीन प्रकारचे केले होते.
पण मला करंजी आणि चिवडा फार आवडतो त्यांचा.

IMG-20251021-WA0004.jpg
.
IMG-20251021-WA0005.jpg

मस्त दिसतोय फराळ !
सगळे जावई लाडकेच असतात...दोडक्या त्या सुना!!

जावई सगळेच लाडके असले तरी मी जरा वेगळ्या लेव्हलचा लाडका आहे.. का कसा ते पुन्हा कधीतरी स्वतंत्र लेखात Happy

आणि नातवंडांना फराळ फारसा आवडत नसल्याने (अपवाद बेसन लाडू आणि तोच यात नाहीये) हा फराळ स्पेशली माझ्यासाठीच आला आहे Happy

माम चिरोटे फार सुम्दर दिसताहेत. करंज्याही सुंदर.

प्राजक्ता तुमचे चिरोटेही छान आहेत. पण मला जरा सौम्य रंगातले बघायला आवडतात. समहाउ चिरोटे हा प्रकार फारसा खाल्ला नाहीय आणि जेव्हा खाल्ला तेव्हा परत परत खाईन इतका आवडला नव्हता. पण रंगित चिरोटे बघायला मात्र आवडतात.

प्राजक्ता तुमचे चिरोटेही छान आहेत. पण मला जरा सौम्य रंगातले बघायला आवडतात.>> हो थोडा डार्कच आलाय रन्ग पण फराळाच्या ताटात उठुन दिसतात..जरा कलरफुल होत ताट!

Pages