Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गिल शतक! विश्वास खरा ठरवला.
गिल शतक!
विश्वास खरा ठरवला.
इनिंगचा दुसराच बॉल समोर
इनिंगचा दुसराच बॉल समोर दिवसाचा बेस्ट बॉलर स्टोक्स आणि पंत पुढे येऊन फोर मारून खाते उघडतो.
80 ओवर होताच नवीन बॉल घेतला आणि पंत दुसऱ्याच बॉल वर फास्टरला स्लोग स्वीप फोर मारतो.
दिवसाची लास्ट ओवर आणि पंत पुन्हा प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल होत पहिल्याच बॉलवर फील्डर बाउंडरीला याची पर्वा न करता सिक्स मारतो.
बाकी इनिंग गचाळ होती त्याची आज. नेहमीसारखी मजा नाही आली. दिवसाखेरीस अर्धशतक करून नाबाद आहे हेच समाधान की उद्या काही मजा करेल.
या सामन्यातील इंग्लंडच्या बोलिंग अटेक मध्ये काहीच दम नाही. उद्या पहिले सेशन कॉलेप्स न होता खेळलो तर गेम कंट्रोल करायच्या पोजिशनमध्ये येऊ.
अहा काय मस्त दिवस निघाला आजचा
अहा काय मस्त दिवस निघाला आजचा ! एक तेव्हढा साईचा अपवाद वगळता. होपफुली त्याचे जिटर्स निघून जातील दुसर्या इनिंगमधे.
आपण हरू शकत नाही या
आपण हरू शकत नाही या स्थितीच्या आसपास पोहोचलो की ते आपल्याच पायावर कुऱ्हाड मारायला सुरुवात करायची शक्यता वाढेल.
आणि पिचमध्ये आज दम नसला तरी आजच्या सारखे उन्ह चार दिवस राहिले तर तुटू शकतो. त्या केसमध्ये आपण वेगात खेळण्यापेक्षा उद्याचा जास्तीत जास्त दिवस खेळणे गरजेचे.
स्टोक्सला आज टी नंतर रिव्हर्स स्विंग मिळत होता. तिथे आज आपण विकेट टाकली असती तर कदाचित दिवसअखेरीस 6 झाल्या असत्या. आपल्या नाही झाल्या पण इंग्लंडच्या आपण करू शकतो. बुमराह आहे या सामन्यात. पाच सामने नसणार तो. ज्यात आहे त्यात त्याला वापरून जिंकून घ्यायला हवे.
इथला ट्रॅक रेकॉर्ड वेगळा होता. पहिली इनिंग फलंदाजी अवघड आणि नंतर सोपी. चेस करणारे जिंकले आहेत.
पण हा पीच वेगळा भासत आहे. इथे मॅच सुद्धा वेगळी होईल असे वाटतेय.
दोन्ही कर्णधार प्रथम गोलंदाजी
दोन्ही कर्णधार प्रथम गोलंदाजी घ्यायचं स्वप्न बघत होते तर खेळपट्टीच्या मनात भलतंच कांही चाललं होतं ! Good toss to lose !!!
योग्य सलामी, अप्रतिम फलंदाजी !!! दौऱ्याच्या सुरवातीलाच आत्मविश्वास वाढवणारी खेळी !! इंग्लंडची गोलंदाजी सुधारली नाही, तर आपल्या फलंदाजीपुढे ही मालिका लढवणं जरा कठीणच जाईल त्यांना ! भवानी तर लई भारी झालीय, गिल अँड कंपनी !!!!
सिक्स मारून भारताचे ३०० केले
सिक्स मारून भारताचे ३०० केले
सिक्स मारून भारताचे ४०० केले.
सिक्स मारून स्वतःचे १०० केले.
सिक्स मारून गिलसोबत २०० ची पार्टनरशिप केली.
ऋषभ पंत स्पेशल बॅट्समन!
सकाळच्या सत्रात ४ बाद.
सकाळच्या सत्रात ४ बाद.
भारत ३ - इंग्लड १ (सत्रांचा विजय)
उरलेले तीन झटपट बाद झाले तर भारताच्या गोलंदाजीवर भार असेल प्रतिपक्षाचे पहिले २-३ लवकर बाद करून दबाव आणण्याचा.
ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे आज. त्याचा फायदा घेता येतो का ते बघणं मनोरंजक ठरेल.
साई आणि करुन नायर दोन आयपीएल
साई आणि करुन नायर दोन आयपीएल दिवटे शून्यावर बाद. ही यांची खरी बॅटिंग.
430/3 वरून 471 वर डाव आटोपला
430/3 वरून 471 वर डाव आटोपला...
कालचा खेळ पाहून ही आपली नवी टीम आहे का असा आश्चर्याचा धक्का बसला होता, आजचा 41 मधे 7 विकेट्स फेकण्याचा प्रकार पाहून परत बॅक टू स्क्वेअर वन होऊ नये इतकीच इच्छा...
रच्याकाने ,
रच्याकने ,
आपलं टीम किट आम टिकिया वापरून धुतल्यागत पिवळसर आहे
तर इंग्लंड चं टाईड सफेद दिसतंय...
पहिली विकेट लवकर गमावली तरीही
पहिली विकेट लवकर गमावली तरीही इंग्लंडने छान चिकाटी दाखवली. आत्ता बुमराने दुसरी विकेट घेतली.
आपली फलंदाजी चांगली झाली असली तरीही ह्या दोनगोष्टीचं भान राखणं जरुरीचं 1) 3 शतकं व बाकी अगदीच फुसका स्कोर हे फार भक्कम फलंदाजीचं लक्षण नाही व २) अजूनही इंग्लंडच्या वैशिष्ठ्यपूर्ण हवामानातील स्विंग गोलंदाजी आपल्या वाटेला आलेली नाही. !!
३ किंवा अधिक वैय्यक्तिक शतकं
३ किंवा अधिक वैय्यक्तिक शतकं असताना, नीचांकी ऑल-आऊट स्कोअर झाला भारताचा आज. शेवटच्या ७ विकेट्स ४१ धावात गेल्या. बुमराह वगळता एकही बॉलर (थोडाफार सिराजचा अपवाद वगळता) विकेट टेकिंग वाटला नाही. फिल्डिंग गचाळ होती (२ ड्रॉप्ड कॅचेस, एकाच्या जागी दोन रन्स देणं, मिसफिल्ड्स). नोबॉल्स - हे आजच्या दिवसातले कोचिंग स्टाफ साठीचे टेक-अवे आहेत.
पंत जोपर्यंत मैदानावर होता तो
पंत जोपर्यंत मैदानावर होता तो पर्यंत आयुष्य सुंदर होते...
नंतर काहीच मनाजोगते घडले नाही. कॅच सोडणे आणि नो बॉल वर विकेट हे तर त्रासदायक होते. तेव्हा तर बुमराहलाच अती झाले आणि हसू आले.
रोहीत कोहली आश्विन गेल्याने स्लिप कॅचिंग वर परिणाम झाला असेल का? फटका मात्र मोठा बसला याचा. विकेट एकटा बुमरा काढत होता आणि त्याच्या बॉलिंगला कॅच सुटत होत्या.
बुमराह शिवाय पर्याय नाही असे झाले आहे. अवघड होईल अश्याने जर परिस्थिती बदलली नाही तर..
मग त्यापेक्षा कुलदीप यादव खेळवलेला बरा. जर वेगवान गोलंदाज काही स्पेशल करू शकत नसतील तर चार खेळवण्यात अर्थ नाही.
शतक तीन जणांनी केले. पण पंतच्या शतकाने नेहमीप्रमाणे सर्वांचे मन जिंकले. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. त्याची, त्याच्या शतकाची, त्याच्या धाडसी फटक्यांची आणि त्याच्या चुम्मा स्पेशल सेलिब्रेशनची.. आमच्याकडे मुलीने त्याच्या शतकाच्या वेळी व्हिडिओ काढला आणि आधीच म्हणाली हा आता फ्रंट फ्लिप मारणार आणि त्याने तसेच केले. किती प्रेडेक्टबल आहे हा पंत
ता.क. - गावस्कर आज कौतुकाने सुपर्ब सुपर्ब सुपर्ब म्हणाला
शतक तीन जणांनी केले. पण
शतक तीन जणांनी केले. पण पंतच्या शतकाने नेहमीप्रमाणे सर्वांचे मन जिंकले.
>>
कशावरून???
भोआकफ !
४१ धावात ७ बाद
झेल सोडले
नो बॉल
कोंबडी पकडल्यासारखं गचाळ क्षेत्ररक्षण
अशानं कसोटी जिंकता येत नाहीत.
खेळाडूंना कधीकधी
खेळाडूंना कधीकधी psychotherapist ची गरज भासते.
आता काही काही चाहत्यांसाठीही ती गरजेची वाटू लागली आहे.
कशावरून???
कशावरून???
>>>>>
कारण त्याचा ऑराच वेगळा आहे. त्याचा गेम वरचा इम्पॅक्ट वेगळा आहे.
पहिल्या दिवशी सुद्धा जेव्हा तो अर्धशतक मारून परत गेला तेव्हा राहुलने त्याला आदराने नमस्कार केला.
काल त्याचे शतक झाले तेव्हा हर्षा भोगले आणि गावसकरची कॉमेन्ट्री बघा..
लवली लवली लवली
सुपर्ब सुपर्ब सुपर्ब
तो बाद झाला तेव्हाचे इंग्लिश प्रेक्षकांचे स्टँडिंग ओवेशन बघा
गॉड ऑफ क्रिकेट सचिनचे पंत बद्दलचे ट्विट बघा
काल त्याने एक विक्रम सुद्धा केला. तो इंग्लंडमध्ये एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. आजवर जगातल्या कुठल्याही फलंदाजाने इंग्लंडमध्ये जाऊन ६ सिक्स मारले नव्हते.
भारतीय विकेट कीपर मध्ये सर्वाधिक सात शतक मारणारा फलंदाज झाला..
वेगवान ३००० धावा करणारा गिलख्रिस्ट पाठोपाठ दुसरा विकेटकीपर फलंदाज झाला
पण ते विक्रम सोडा,
त्याचे सिक्स आणि शॉट सुद्धा बघा कसे स्पेशल होते
सिक्स मारून भारताचे ३०० केले
सिक्स मारून भारताचे ४०० केले.
सिक्स मारून स्वतःचे १०० केले.
सिक्स मारून गिलसोबत २०० ची पार्टनरशिप केली.
वेडा आहे तो..
दुसऱ्या बोलला स्टॉक्स ला फोर मारला तेव्हा स्टॉक्सची रियाक्शन बघा.
नवीन बॉल आल्या आल्या तुटून पडला.
दिवसाच्या शेवटच्या ओव्हरला पहिल्या बॉल वर सिक्स मारला...
९९ वर सिंगल घेता आला असता पण सिक्स मारला..
जे ओल्ड स्कूल ऑफ टेस्ट क्रिकेट मध्ये करू नका म्हणतात तेच तो करतो.. आणि हे करताना तो डॉमिनेट करतो समोरच्या संघाला. त्यांना दाखवतो बॉस कोण आहे आणि त्यांचा आत्मविश्वास खच्ची करतो.
थोडा सोशल मीडिया फेरफटका मारून या. आयसीसी स्टार स्पोर्ट्स वगैरे यांच्या ऑफिशियल साईट बघा.दिग्गज खेळाडूंचे ट्विट बघा..
अर्थात हे तर आता तुम्ही कशावरून म्हटले म्हणून लिहावे लागले आहे.
पण तुम्हालाही माहीत आहेच.
थोड्या आकड्यापलीकडे विचार केल्यास कोणीही त्याचा गेम वरील impact मान्य करेलच..
आणि म्हणून तो मन जिंकून जातोच
अशानं कसोटी जिंकता येत नाहीत.
अशानं कसोटी जिंकता येत नाहीत.
>>>>
खरे आहे सुनील... काल दिवस संपता संपता तिघांच्या शतकावर पाणी टाकताहेत का असे झाले.
पहिल्या दिवस अखेरीस म्हटले तसे पहिला सेशन जिंकून गेम कंट्रोल करायच्या पोजिशन मध्ये पोहोचत होतेच आणि तिथून सगळे उलटे घडायला सुरुवात झाली.
अश्याने कसोटी जिंकता येत नाही पण नशिबाने ती पाच दिवस आणि चार डावाची असते.. कालचा दिवस जिंकू शकलो नाही. आज परिस्थिती बदलेल अशी आशा वाटते.
ब्रूक ला बूम ने आल्या आल्या घेऊन खाते उघडावे. सिराज ने साथ द्यावी. जडेजा टिचून मारा करेलच. मला खरे तर ३५० मध्येच हवे होते ते. पण ४०० आत गुंडाळले तरी आपण गेम मध्ये पुढे राहू.
Submitted by अँकी नं.१
Submitted by अँकी नं.१
>>>>>>
हे वाचा.. त्याने इंग्लिश प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकली हे त्यांचे खेळाडूच सांगत आहेत
Broad emphasised the exceptional reception Pant received from the English crowd for his seventh Test century, noting it was one of the loudest celebrations for an opposition player in England.
"It was really well appreciated, because it was so entertaining. We didn't know what was coming! There were those falling scoops, full-blooded shots, run-out chances... everything was going on. Everything you want as a Test match fan -- patience, leaving, then, a flair shot, putting the bowlers under pressure. The crowd really appreciated everything Rishabh Pant did. Box office - truly a box office innings," Broad said.
Four catches dropped off
सामना इथे जातोय...
Four catches dropped off Bumrah's bowling this innings (three by Jaiswal & one by Jadeja) - the joint most off an Indian bowler in an innings in the database. Three catches dropped by Jaiswal is also the joint most by an Indian fielder in an innings in the database.
६ चा लीड
६ चा लीड
थोडक्यात थाला फॉर रिजन वाचले
आपले ५५० + झाले असते सहज.
आणि त्यांचे कॅच सोडले नसते तर त्यांचे ३५० अवघड होते.
कुठून सामना कुठे आला...
असो.. झाले ते झाले
आता आपली फलंदाजी
यशस्वी आता कॅच सोडल्याने काय मनस्थितीत असेल कल्पना नाही.
राहुल नेहमीसारखा बोअर क्रिकेट खेळेल.
साई सुदर्शन खेळायला हवा यावेळी. टेम्प्रामेंट चांगले आहे त्याचे. मागचे अपयश विसरून खेळू शकतो.
गिल खेळेलच असा विश्वास वाटतोय.
पंत खेळतो की नाही हा निकालातील मोठा फॅक्टर ठरू शकतो.
करुण नायर कडून अपेक्षा नाहीत फार. दबावात दिसतोय.
जडेजा चिवटपणे खेळू शकतो.
शार्दुलला संघातील जागा वाचवायला खेळावे लागेल. पण त्याचा भरवसा नाही.
शेपटाकडून पुन्हा अपेक्षा धरायची वेळ आली तर सामना संपलेला असेल. कारण चांगला स्कोअर नाही पडला तर इंग्लंड चेस करणार.. आपण ही गोलंदाजी आणि असे क्षेत्ररक्षण घेऊन त्यांच्या भरवश्यावर राहू शकत नाही.
जर सिराज (२७ ओव्हर्स मधे १२२
जर सिराज (२७ ओव्हर्स मधे १२२ रन्स) आणि कृष्णा (२० ओव्हर्स मधे १२८ रन्स) हे क्रमांक २ आणि ३ चे बॉलर्स असतील तर अवस्था बिकट आहे. इतकं होऊनही ठाकूर ६ ओव्हर्सच टाकणार असेल तर त्यापेक्षा प्रॉपर बॅट्समन का खेळवू नये?
बुमराह ज्या २ मॅचेस खेळणार नाहीये त्यात तर सिराज मुक्ख्य बॉलर असणार आहे
७ सेशन शिल्लक आहेत सामन्यात
७ सेशन शिल्लक आहेत सामन्यात
आपल्याला ४ खेळावे लागणार
गेला यशस्वी
गेला यशस्वी
मला संशय होताच जशी त्याची मनस्थिती असेल सध्या..
साई सुदर्शनकडे टेम्परामेंट आहे, आता टेक्निक टेस्ट होत आहे. तरी इथे नेहमीसारखे इंग्लिश कंडीशन नाहीयेत. थोडा कॉन्फिडन्स आणि खेळपट्टीचा अंदाज आला तर धावा येतील त्याच्या..
समोर राहुल एक आहे जो टेस्ट मेंटेलिटीने खेळू शकतो. आणि ज्याची गरज आहे सध्या.
कंडीशन आणि पीच फ्लॅट असेल तर
कंडीशन आणि पीच फ्लॅट असेल तर आपल्या गोलंदाजीचे कठीण आहे. ठाकूर chya जागी कुलदीप आणि नायर च्या जागी नितीश कुमार रेड्डी la खेळवावे लागेल.
Variety साठी अर्शदीप ला
Variety साठी अर्शदीप ला घ्यायला हवे.
Stumps
Stumps
Day 3 - India lead by 96 runs.
KL Rahul* 47(75)
Shubman Gill 6(10)
राहुल मस्त खेळला आज. फार कंफर्टेबल वाटत होता. अन्यथा बरेचदा शेल मध्ये जातो. उद्या शतक मारायला हवे. ते सुद्धा मोठे. मागे कोणाच्या भरवश्यावर राहू नये..
फेफ,
फेफ,
बॉलर्स बद्दलच्या पूर्ण पोस्ट ला मोदक...
शार्दूल रन देतो, पण ब्रेक थ्रू पण मिळवून देतो. त्याला 6 पेक्षा जास्त रेट नी मारत होते म्हणून मोठा स्पेल दिला नसेल असं म्हणावं तर प्रसिध ला त्याच्याहून जास्त रेट नी फोडलाय...
कर्णधार नवखा असल्याने अन् संघात भरपूर बदल झाल्याने प्लेअर्स चे स्पेसिफिक रोल अजून डिफाईन झाले नसावेत...
राहुल च्या पाठोपाठ पंत चं शतक
राहुल च्या पाठोपाठ पंत चं शतक
एकाच कसोटीच्या दोन्ही डावात शतकं...
याबाबत गोडवे गाणारी पाकातली पोस्ट येतंच असेल....
अहो नवीन धागा येणार.
अहो नवीन धागा येणार.
Pages