Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या इश्वरनचं काही खरं दिसत
त्या इश्वरनचं काही खरं दिसत नाही. ऑस्ट्रेलियातही फारसा चांगला खेळला नाही आणि इथंही फारशी आश्वासक पहिली खेळी नाही. पहिल्या दोन तासात खूप स्विंग आणि बाउन्स मिळत होता. यशस्वी सुद्धा चाचपडतच खेळत होता.
राहुल यशस्वी गिल हे पहिले तीन असतील तर १०-२ किंवा तत्सम धावफलक दिसेल लीड्स वर.
सामना पाहिला नाही पण स्कोअर
सामना पाहिला नाही पण स्कोअर बोर्ड बघून हाच प्रश्न पडला..
जर या सामन्यात बॉल नंतर स्विंग झाला नसेल तर यावरून फॉर्म कळतो. तंत्र टेस्ट होणार नाही. पण फॉर्म सुद्धा गरजेचा आहेच. कारण जेव्हा स्विंग होत नसेल तेव्हा आपल्यालाही वेगात धावा जमवणारे फलंदाज हवेच आहेत इथे. कारण समोरून इंग्लंड तेच करणार आहे.
तरी आपला मोठा प्रश्न ओपनिंगचा आहे असे वाटते. तिथे धावा आलेल्या बघायला आवडतील.
बाकी इंग्लडचा स्विंग नवीन बॉलच नाही तर दिवसभर सुद्धा बघायला मिळू शकतो. सुटका कोणाचीच नाही. सामने साडेतीनला सुरू होत असल्याने ऑफिसातून आल्यावर अर्धा दिवस तरी बघायला मिळतो. मजा येणार आहे पुढचे काही दिवस
“ सर्फराज ने अलर्म बेल वाजवली
“ सर्फराज ने अलर्म बेल वाजवली” -
अपेक्षितच होतं ते.
नायर, सर्फराझ आणि जुरेल छान खेळले. इंग्लिश टीममधे रेहान अहमद हा एकच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला बॉलर आहे आणि त्याला अपेक्षेप्रमाणे सव्वा-पाच च्या रेट ने धुतलाय.
गिलला चौथ्या नंबरवर खेळायचं आहे. राहूल, जैस्वाल, नायर, गिल हे पहिल्या पाचात असतील (इंज्युरी वगळता). त्या केसमधे जुरेल, इश्वरन आणि सुदर्शन पैकी कुणाची वर्णी लागेल ह्यावर २, ३ आणि ५ नंबर ठरतील. कन्झर्व्हेटीव्हली, राहूल (२), करूण (३) आणि जुरेल (५) अशी सुरूवात होईल असा माझा अंदाज आहे.
मी हा संघ उतरवला असता पहिल्या
मी हा संघ उतरवला असता पहिल्या कसोटीसाठी.
जैस्वाल
साईसुदर्शन
नायर
गिल
राहुल
पंत
जडेजा
शार्दूल
आकाशदीप
बुमरा
अर्शदीप
पण त्या गौ चं काही सांगता येत नाही.
टीममधला अनुभव (अननुभव) पाहता,
टीममधला अनुभव (अननुभव) पाहता, माझा अंदाज- जैस्वाल, राहूल, करूण, गिल, पंत, जुरेल, जडेजा, शार्दूल, आकाश/अर्शदीप, सिराज, बुमराह असा आहे.
माझा संघ असा असेल
माझा संघ असा असेल
1 जैस्वाल
2 राहुल
3 साई सुदर्शन
4 गिल
5 पंत
6 करुण नायर
7 जडेजा
8 शार्दुल
9 बुमराह
10 अर्शदीप
11 सिराज
आज एक पोस्ट वाचनात आली.
आज एक पोस्ट वाचनात आली.
जी वाचल्यावर कप्तान निवडीवरून सुरू असलेला वाद संपेल अशी अपेक्षा
Batting averages of Indian players in England.
KL Rahul - 34.11
Rishabh Pant - 32.70
Ravindra Jadeja - 29.18
Shardul Thakur - 24.71
Shubman Gill - 14.66
Jasprit Bumrah - 11.90
Gill averages more than Bumrah that's why he was selected as captain ahead of Bumrah ( TIO sports- Abhisek Kumar)
माझाही असाच नि ह्या ऑर्डरमधे
माझाही असाच नि ह्या ऑर्डरमधे असेल
1 जैस्वाल
2 राहुल
3 साई सुदर्शन
4 गिल
5 पंत
6 करुण नायर
7 जडेजा
8 शार्दुल
9 बुमराह
10 अर्शदीप/कुलदिप ( पिच स्पिनर फ्रेंडली / न्यूट्रल असेल तर)
11 सिराज
ऑस्ट्रेलिया टूरपासून राहूल ला
ऑस्ट्रेलिया टूरपासून राहूल ला एक वेगळा सूर गवसलाय. पेशन्सने इनिंग बिल्ड करतो. आजही स्विंगिंग कंडिशन्समधे त्याने तसंच शतक झळकावलं असं वाचलं. जुरेल आणि नायरने पण चांगल्या इनिंग्ज खेळल्या (जुरेल ने अर्धधतकावर समाधान न मानता, शतकाची कास धरावी). इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत. यशस्वी चा फॉर्म मात्र तितकासा आशादायक नाहीये.
*स्विंगिंग कंडिशन्समधे त्याने
*स्विंगिंग कंडिशन्समधे त्याने तसंच शतक झळकावलं असं वाचलं.* -
गिल म्हणतो, येत्या दौऱ्यासाठी माझाही फलंदाजीचा क्रमांक अजून ठरलेला नाहीं. बहुतेक, स्विंगिंग कंडिशन्सशी कोण कसं जमवून घेतो यावरच तें ठरणार असावं.
बहुतेक, स्विंगिंग कंडिशन्सशी
बहुतेक, स्विंगिंग कंडिशन्सशी कोण कसं जमवून घेतो यावरच तें ठरणार असावं. >>असे वाटातेय खरे. परत गिल नि साई दोघेही पुरेसे खेळू शकतील का टेस्ट सुरू होण्याआधी हा प्रश्नही आहेच.
कसोटी फायनल सुरू !
कसोटी फायनल सुरू !
स्ट्राँग टीम दोघात ऑस्ट्रेलियाच आहे पण इतकी सुद्धा काही अनबीटेबल चॅम्पियन टीम नाही जी आपल्या लहानपणी होती.
लो स्कोरिंग तीन साडेतीन दिवसाचा सामना झाला. रबाडा आणि यांसेन हे दोन गोलंदाज जर इंग्लिश कंडीशन फायदा उचलत घातक ठरले, यांचा काही जबरदस्त स्पेल पडला, तर आफ्रिकेचा चान्स राहील असे वाटते.
स्मिथ मात्र दोन्ही इनिंग बाद व्हायला हवा लवकर..
स्मिथ गेला एकदाचा. पण ६६ धावा
स्मिथ गेला एकदाचा. पण ६६ धावा केल्या.
रबाडा आणि यांसेन हे दोन
रबाडा आणि यांसेन हे दोन गोलंदाज
>>>>>
दोघांनी मिळून ८ काढल्या..
स्मिथ धोकादायक होताच.
मार्करर्म गेला आल्या आल्या...
बवूमा अजून आला नाही पण तो महत्त्वाचा प्लेअर आहे. जिगरबाज आहे. तो खेळायला हवा आफ्रिकेसाठी. डाव बांधून ठेवू शकतो.
पावणेतीन दिवस.
पावणेतीन दिवस.
जिंकायला २८२ करायचेत.
द.आफ्रिका करेल का ?
७०-३० ऑस्सीज.
अफ्रिका टारगेटच्या जवळ
अफ्रिका टारगेटच्या जवळ पोहोचली तर ही मॅच इंटरेस्टिंग होईल. अवघड चेस आहे, हे निश्चित. दोन्ही डावात ऑसीजचा निम्मा संघ ५०-६० च्या आसपास गारद झाला असताना त्यांना २००+ ची मजल मारू देणं अफ्रिकेला भोवू शकतं.
टारगेट अवघड आहेच. पण जेव्हा
टारगेट अवघड आहेच. पण जेव्हा धावा होत असतील तेव्हा त्याच फ्लो मध्ये करून घ्याव्यात.. फलंदाजी कंडीशन चांगली असताना वेगात जमवाव्यात. विकेट कोसळू लागल्या की झुबक्यात येणार..
द. आफ्रिका ह्या मोठ्या
द. आफ्रिका ह्या मोठ्या सामन्यात त्यांना खूप काळ चिकटलेला ' चोकर्स ' हा कलंक धुवून काढेल / काढावा अशी प्रार्थना !!!!!
चोकर्स
चोकर्स
याचीच एक भीती वाटत आहे...
अन्यथा मी सुरुवातीपासूनच आशावादी होतो आफ्रिकेला संधी आहे म्हणून...
बहुतांश भारतीय क्रिकेट प्रेमी आफ्रिकेच्या बाजूने असतील..
अवघड चेस आहे, हे निश्चित. >>
अवघड चेस आहे, हे निश्चित. >> काल संध्याकाळनंतर सूर्य आला नि पिच पण रीलॅक्स झालय. आफ्रिकेने पुरेपूर फायदा उठवलाय. उद्या सकाळी ओव्हरकास्ट असेल नि एखादी विकेट गेली तर .... आपण पॉपकॉर्न घेऊन बसलो आहोत. आफ्रिकेने ह्या दोन वर्षांमधे शेवटी मिळालेले सोपे स्केड्यूल पुरेपूर योग्य वापरलेय.
“उद्या सकाळी ओव्हरकास्ट असेल
“उद्या सकाळी ओव्हरकास्ट असेल नि एखादी विकेट गेली तर” - ह्या आशेवर सगळी ऑस्ट्रेलिया टीम आज रात्र घालवणार आहे.
प्रामाणिकपणे आफ्रिका इंग्लंड
प्रामाणिकपणे आफ्रिका इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी गेल्या दोन वर्षांमधे एकही सामना न खेळता फायनल मधे आली आहे हे मला नेहमी खटकत राहिले आहे. उद्या भारत दोन वर्षे फक्त बांग्लादेश, लंका, झिंबाव्वे, वेस्ट इंडीज असे करून फायनल मधे गेला तर कसे वाटेल ?
*...करून फायनल मधे गेला तर
*...करून फायनल मधे गेला तर कसे वाटेल ?* -
असामिजी, क्रिकेटच्या किंवा स्पर्धेच्या नियमानुसारच जर एखाद्या संघाला विशेष फायदा मिळत असेल, तर त्यात ' कसे वाटेल ' हा प्रश्र्न गैर ठरतो, असं नाही वाटत ? ( सतत ' बॅड लक ' चे शिकार बनलेल्या द. आफ्रिकेच्या बाबतीत तर अगदीच गैर म्हणावा लागेल ! ) फायनलला आल्याचं व जर द. आफ्रिकेने फायनल जिंकली तर त्याचं त्यांना निखळ श्रेय मिळणंच योग्य असं मला वाटतं .
सामना सुरू...
सामना सुरू...
डॉन बाऊमाने सिंगल काढून आफ्रिकेचे दिवसाचे खाते उघडले.
गेला बावुमा... गेम ऑन
गेला बावुमा... गेम ऑन
चोक होण्याचे क्षण मोठ्या
चोक होण्याचे क्षण मोठ्या धैर्याने टाळले.
टारगेट 50 च्या आत आले.
अजून थोड्याच वेळात विजयाची औपचारिकता शिल्लक राहील.
फायनलला आल्याचं व जर द.
फायनलला आल्याचं व जर द. आफ्रिकेने फायनल जिंकली तर त्याचं त्यांना निखळ श्रेय मिळणंच योग्य असं मला वाटतं.
+786
आफ्रिकेच्या संघांचे गेल्या काही काळातील एकूणच वातावरण मतभेद राजकारण पाहता कित्येक नवखे अननुभवी खेळाडू घेऊन हे यश मिळवणे असेही कौतुकास्पद आहे.
आणि इंग्लंड बलाढ्य म्हणाल तर या स्पर्धेचे गेले तिन्ही सायकल इंग्लंड कधी फायनल पोहोचली नाही. किंबहुना त्या रेस मध्ये सुद्धा फार दिसली नाही.
आणि गेली असती तर त्यांच्यासाठी तिन्ही सीजन फायनल होम टेस्ट झाली असती हा मोठा एडवांटेज होता..
Temba Bavuma as South Africa
Temba Bavuma as South Africa captain :
10 Tests
9 win
1 draw
1 WTC title
No noise, no drama, just dominance.
#WtcFinal2025
आफ्रिका वेल प्लेड!
आफ्रिका वेल प्लेड!
ICC टेस्ट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हार्दिक अभिनंदन!
द. आफ्रिका, अभिनंदन !!
द. आफ्रिका, अभिनंदन !!
Pages