Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिकेटच्या किंवा स्पर्धेच्या
क्रिकेटच्या किंवा स्पर्धेच्या नियमानुसारच जर एखाद्या संघाला विशेष फायदा मिळत असेल, तर त्यात ' कसे वाटेल ' हा प्रश्र्न गैर ठरतो, असं नाही वाटत ? ( सतत ' बॅड लक ' चे शिकार बनलेल्या द. आफ्रिकेच्या बाबतीत तर अगदीच गैर म्हणावा लागेल ! ) >> भाऊ ह्यातल्या कंसातल्या वाक्याने तुम्ही ही आफ्रिका फायनल मधे जाऊन जिंकली तर तेच योग्य आहे असे सुचवता आहत असे नाही वाटत का ? समजा ऑस्ट्रेलिया जिंकली असती तर परत कंसातल्या वाक्यामूळे त आफ्रिकेला झुकते माप दिले गेले पाहिजे असे म्हणायचे का ? एक ९१ मधला कप वगळता बॅड लक असे खरच म्हणू शकता का ? ९५ मधे लाराच्या नि ९९ मधे वॉ च्या ब्रिलियंट इनिंगचे श्रेय बॅद लक मधे घालणे कसे योग्य ? २००४ मधे डी/एल वाचले नाही हे बॅड लक कसे ? ऑन द स्ट्रेच ह्या दोन वर्षांच्या राऊंडमधे हा आफ्रिकन संघ मायदेशी भारताविरुद्ध सिरीज जिंकू शकला शकला नव्हता ह्यावेळी , किवीज वगळता इतर बलाढ्य संघ टाळलेच आहेत. त्यामूळे अतिशय सॉफ्ट स्क्येड्यूल चा फायदा मिळून फायनल मधे गेला नि तिथेही एका सामन्यामधे चांगला खेळला ह्या जोरावर टेस्ट चँपियन्शिप जिंकला आहे . उद्या जर हेच दोन संघ आफ्रिकेमधे ५ सामने खेळले तर निकाल काय लागेल हे तुम्हालाही माहित आहे
ह्या सामन्यामधे they punched above the weight and deserve accolades rightfully but that does not mean I can ignore the fact about how they got it here. Hopefully ICC will learn the lesson and allocate weights based on opposition's standing in next rounds.
*९१ मधला कप वगळता बॅड लक असे
*९१ मधला कप वगळता बॅड लक असे खरच म्हणू शकता का ? * - असामिजी, बहुतेक पराजयांमध्ये कोणत्या तरी कारणाने 'बॅड लक"चा अंश असतोच जरी जेत्याच्या श्रेयाला त्याने अजिबात बाधा येत नसली तरीही. शिवाय, पराजयापेक्षाही द. आफ्रिकेच्या वाट्याला ' चोकर्स' म्हणून हिणवण आलं, तें खरं अन्यायकारक होतं. पुन्हा तीच अवहेलना त्यांच्या पदरी पडू नये केवळ म्हणूनच मी poetic justice म्हणून तरी त्यांना आता विजय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती ! बाकी, विजय हा सरस गुणवत्तेवरच मिळावा, यावर दुमतच नाही !!
)
( रच्याकने, * ९१ मधला कप वगळता बॅड लक असे खरच म्हणू शकता का ? * -
वर्णभेदामुळे लादलेल्या दीर्घ बहिष्कारातून बाहेर आल्यावर पहिल्याच मोठ्या स्पर्धेत द. आफ्रिकेला केवळ पावसामुळे स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं, त्यावेळचे त्या खेळाडूंच्या डोळ्यातले अश्रू अजूनही मला द.आफ्रिकेबद्दल पक्षपाती बनवतात. इलाज नाही !
*Hopefully ICC will learn the lesson and allocate weights based on opposition's standing in next rounds.* - सहमत. अर्थात, एखाद्या देशाला ' कसोटी ' दर्जा दिल्यावर त्यात weightage देवून वर्गवारी करणं व त्यानुसार WTC साठी कसोटी सामन्यांचं वेळापत्रक व आयोजन करणं , हे महाकठीण आहे!
उद्या जर हेच दोन संघ
उद्या जर हेच दोन संघ आफ्रिकेमधे ५ सामने खेळले तर निकाल काय लागेल हे तुम्हालाही माहित आहे
>>>>>
न्युझीलँड भारतात खेळायला आले तेव्हा जो निकाल लागला तो कोणाला माहीत होता इथे
आफ्रिकेचा ड्रॉ यंदा सोपा आहे हे जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हाच लक्षात आलेले. पण म्हणून बलाढ्य संघाशी सामना करता ते जिंकूच शकले नसते हे कसे म्हणू शकतो?
गेल्या काही दौऱ्यात आफ्रिकेनेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात धूळ चारली आहे. भले ते संघ वेगळे असले तरी ऑस्ट्रेलिया म्हणजे काही अनबीटेबल संघ नाही हे मी या फायनल आधीच म्हणालो होतो. फायनल एकच असते आणि त्यात जो आपला खेळ उंचावतो तो जिंकतो आणि तो आफ्रिकेने उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाला पुरेपूर चान्स होता. त्यांचा पूर्ण ताकदीचा संघ होता. पण त्यांच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. आणि या उलट आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी जिगर दाखवली. टारगेट इतकेही सोपे नव्हते.
बाकी या स्पर्धेच्या
बाकी या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बरेच कमतरता आहेत. नुसते कुठले सहा संघ हेच नाही तर त्यातले कुठले तीन देशात आणि कुठले तीन परदेशात खेळणार हे सुद्धा मॅटर करते. तसेच कुठल्या संघांशी किती सामने खेळणार हे सुद्धा मॅटर करते.
उदाहरणार्थ भारत जर इंग्लंडसोबत पाच सामने खेळत असेल आणि बांगलादेशसोबत दोनच खेळत असेल तर ते भारतासाठी अनफेअर आहे. तेचा जर उलट झाले तर विचार करा पॉईंट कशात जास्त मिळतील.
दुसरे म्हणजे जर आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्याशी तुम्हाला खेळायचे आहे तर आफ्रिकेसोबत घरात आणि वेस्टइंडीज सोबत त्यांच्या देशात खेळणे हे जास्त फायदेशीर आहे. उलटे झाले तर ते अवघड ठरेल.
ही स्पर्धा दोन देशांच्या कसोटी दौऱ्यांना घेऊन बनवली आहे. त्या त्या देशांना तुम्ही या या देशाशी आणि इतकेच खेळा आणि इकडेच खेळा अशी बंधने टाकू शकत नाही. त्याला मर्यादा आहेत. यात बरेच काही तोलून मापून नसणारच हे स्वीकारायला हवे.
किंबहुना मी तर म्हणतो क्रिकेटप्रेमी म्हणून आपण या स्पर्धेचा फॉरमॅट जसा काही असेल त्याला सपोर्ट केला पाहिजे, नावे ठेवून आपण यातली मजा घालवू आणि यात अल्टिमेटली कसोटी क्रिकेटचे नुकसान होईल जे व्हावे असे इथे कोणालाच वाटत नसावे.
दोन नवीन बॉल चा नियम निदान
दोन नवीन बॉल चा नियम निदान थोडा बदलणार...
आज सारख्याच २ नवीन बॉल घेऊन पहिल्या ३४ ओव्हर होणार. पण बोलिंग कॅप्टन ला उरलेल्या १६ ओव्हर साठी त्याच दोन पैकी एक बॉल निवडावा लागणार.
म्हणजे २५:२५ ऐवजी ३३:१७ ओव्हर होतील
बदल होतोय हे सुखावाह आहे, पण याचं इम्पलिमेंटेशन थोडं वेगळं पाहायला आवडलं असतं
पॉवर प्ले १ : १-१० ओव्हर : २ वेगळे बॉल
पॉवर प्ले ३ : ४१-५० ओव्हर : २ वेगळे बॉल
पॉवर प्ले २ : ११-२० आणि ३१-४० ओव्हर : बॉल १, २१-३० ओव्हर : बॉल २
नियम फार क्लिष्ट होत चालले
नियम फार क्लिष्ट होत चालले आहेत, असं मला अधिकाधिक तीव्रतेने जाणवतं. हेतू जरी अनिश्चितता व कोणत्याही संघाला एकतर्फी फायदा मिळू नये हा असला, तरीही प्रत्यक्ष खेळातलं कसब, उत्स्फूर्तता व उत्कंठा यावर नियमातील सततच्या बदलांनी कुरघोडी करू नये, असं वाटतं. आज कर्णधार व खेळाडूंना प्रत्यक्ष खेळातील डावपेचापेक्षा नियमांकडेच अधिक लक्ष द्यावं लागत असावं अस् मला नेहमी वाटतं ! प्रेक्षकांनी नियमातील बदलांबाबत सतत जागरूक राहिलंच पाहिजे अशी अपेक्षाही बरोबर नाही व त्यांच्या आनंदात त्यामुळे मिठाचा खडा पडतो, हे तर आहेच !!
आज कर्णधार व खेळाडूंना
आज कर्णधार व खेळाडूंना प्रत्यक्ष खेळातील डावपेचापेक्षा नियमांकडेच अधिक लक्ष द्यावं लागत असावं अस् मला नेहमी वाटतं>>
+१
आता नियमांनुसार डावपेच आखावे लागतात. त्यामुळे बर्याचदा एखादी चूक प्रचंड भोवते संघाला.
सहमत. अर्थात, एखाद्या देशाला
सहमत. अर्थात, एखाद्या देशाला ' कसोटी ' दर्जा दिल्यावर त्यात weightage देवून वर्गवारी करणं व त्यानुसार WTC साठी कसोटी सामन्यांचं वेळापत्रक व आयोजन करणं , हे महाकठीण आहे! >> एव्हढे कठीण नाहिये भाऊ . WTC मानांकन प्रत्येक सामन्याआधी अपडेट होत असते. त्यानुसार weight दिलेले गुण द्यायचे. सामन्यांच्याचा वेळापत्रकामधे बदल करणे जरुरी नाही. उद्या समजा भारत हा चौथ्या क्रमांकावर खेळत असलेला देश पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या देशांशी खेळून जिंकला तर त्याला भारताने पाचव्या क्रमांकावर असलेल्या संघाशी खेळून मिळणार्या गुणांपेक्षा अधिक गुण मिळतील. ह्यात अजून पुढे जाऊन परदेशातले सामने अधिक गुण देणारे करता येईल. आज आहे त्या स्वरुपामधे प्रत्येक देश कमि जास्त सामने खेळत असल्यामूळे टोटल गुण्/टोटल सामने असे करून नॉर्मलाईझ केले जातेय त्याचेच पुढचे स्वरुप म्हणता येईल.
टेस्ट चँपियनशिपसाठी फायनल
टेस्ट चँपियनशिपसाठी फायनल खेळवायला सुरुवात व्हायच्या आधी रँकिंग ठरवताना गुण असेच दिले जायचे. म्हणजे वरच्या रँकच्या संघाला हरवले तर अधिक गुण. सामना अनिर्णित राहिला तर खालच्या रँकच्या संघाला अधिक गुण.
गेल्या काही दौऱ्यात
गेल्या काही दौऱ्यात आफ्रिकेनेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात धूळ चारली आहे. >> हे शेवटचे २०१६-१७ मधे झाले होते. गेल्या दोन वर्षांमधे म्हणजे ह्या WTC च्या कालावधीमधे आफ्रिका ऑस्ट्रेलियाशी खेळालेली नाहिये. गेल्या तीन वर्षांमधे आफ्रिकेचा संघ बर्यापैकी बदललेला आहे.
https://www.espncricinfo.com/records/headtohead/team-series-results/aust...
गेल्या दोन वर्षांमधे म्हणजे
गेल्या दोन वर्षांमधे म्हणजे ह्या WTC च्या कालावधीमधे आफ्रिका ऑस्ट्रेलियाशी खेळालेली नाहिये.
>>>>>>
म्हणजे ऑस्ट्रेलियाला सोपा ड्रॉ होता तर.. तरीच फायनल पोहोचले
रँकिंग ठरवताना गुण असेच दिले
रँकिंग ठरवताना गुण असेच दिले जायचे. म्हणजे वरच्या रँकच्या संघाला हरवले तर अधिक गुण
>>>>>>
करेक्ट!
आणि सध्याच्या रँकिंग नुसार आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे..
म्हणजे या पद्धतीच्या रँकिंग ने सुद्धा ते फायनलला जाण्यास पात्र म्हणू शकतो
आणि सध्याच्या रँकिंग नुसार
आणि सध्याच्या रँकिंग नुसार आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे..
म्हणजे या पद्धतीच्या रँकिंग ने सुद्धा ते फायनलला जाण्यास पात्र म्हणू शकतो >> एक कॉज अँड ईफेक्ट म्हणून काहीतरी असते ते बघा जरा. काही समजले तर नाहक बाष्कळ पोस्ट्स करायचा तुमचा नि वाचायचा आमचा मनःस्ताप वाचेल. अजिबात आशा धरत नाहीये हेही आधीच सांगतो.
असो, आफ्रिकेला सपोर्ट केला ते
असो, आफ्रिकेला सपोर्ट केला ते जिंकले याचा आनंद आहे.
तसेच ज्या खेळाडूंकडून अपेक्षा केली ते चमकले याने आनंद द्विगुणित झाला आहे.
आणि याचे कारण म्हणजे गेले काही काळ आफ्रिकेचे कसोटी क्रिकेट फॉलो करत आहे. त्याचे वेगवान गोलंदाज आणि कर्णधार डॉन बऊमा हे करू शकतात अशी आशा होती. उगाच खात्री होती असे म्हणणार नाही कारण ऑस्ट्रेलिया नक्कीच कागदावर मजबूत संघ होता. पण फायनल सामन्याची हीच खरी गंमत असते. फायनल तीन किंवा पाच सामन्याची मालिका न खेळवता एकच सामना खेळवला गेला पाहिजे. तरच त्या सामन्याला प्रेशर राहील. आणि जो संघ त्या फायनल सामन्याचे प्रेशर झेलून जिंकेल तोच खरा विजेता म्हणवता येईल. आणि आफ्रिका कुठलेही लक घेऊन हा सामना जिंकली नाही तर हे प्रेशर झेलून गिळून खाऊन पिऊनच हा सामना जिंकली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या चाहत्यांनी हा पराभव स्वीकारावा असे वाटते! सोशल मीडियावर जिथे तिथे अचानक या फॉरमॅट बद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा ऑस्ट्रेलिया जिंकली असती तर झाली नसती. किंवा मग ती आफ्रिका फायनल पोहोचली तिथेच व्हायला हवी होती. आता चर्चा करणे म्हणजे आफ्रिकेच्या विजयाला मुद्दाम गालबोट लावायचा प्रकार वाटतो. त्यामुळे माझ्यातर्फे सुद्धा या चर्चेला विराम.
जेव्हा एखादा स्पर्धेत सर्व सामने जिंकणारा संघ फायनल हरतो तेव्हाही फायनल तीन सामन्याची हवी या चर्चेला ऊत येतो असा अनुभव आहे. पण ते सुद्धा मनाचे एक समाधानच असते.. की तीन सामने असते तर आम्ही जिंकलो असतो वगैरे... त्यापेक्षा पराभव स्वीकारावा आणि पुढे जावे.
*त्यापेक्षा पराभव स्वीकारावा
*त्यापेक्षा पराभव स्वीकारावा आणि पुढे जावे.* +१ व जिंकल्याचाही आनंद घ्यावा पण माज करू नये !!
सोशल मीडियावर जिथे तिथे अचानक
सोशल मीडियावर जिथे तिथे अचानक या फॉरमॅट बद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. >> सॉरी तू कुठला सोशल मिडिया बघतोस ह्याची कल्पना नाही पण मी ह्याबद्दल गेले किमान सहा महिने तरी वाचत आहे. त्यावरूनच मी मागच्या डिसेंबरमधे इथेही सूतोवाच केले होते. किवीज सिरीज्बद्दल बोलताना. त्यावेळी तू "एव्हढा विचार नि प्लॅनिंग कशाला करायचा " असे झटकले होतेस.
सर्फराज ने कधी नव्हे ते अ
सर्फराज ने कधी नव्हे ते अ संघातून खेळताना दणदणीत स्टेटमेंट केले आहे. आगरकर नि गंभीरला मूग गिळून गप्प बसायला लागले आहे. हर्शित राणाला मागे ठेवण्याबद्दल वाचले. सर्फराज्लाही ठेवले असते तर बिघडले असते का ? एकीकडे फ्युचर संघ निवडायच्या गोष्टी करताना नायरला परत संधी दिली (जी योग्यही आहे) तर तीन सिरीज जो योग्य वाटला होता त्यालाही ठेवायला काय हरकत होती.
पण मी ह्याबद्दल गेले किमान
पण मी ह्याबद्दल गेले किमान सहा महिने तरी वाचत आहे. त्यावरूनच मी मागच्या डिसेंबरमधे इथेही सूतोवाच केले होते.
>>>>>>>
सहा महिन्यापूर्वी आफ्रिका फायनलच्या स्पर्धेत आल्याने ती चर्चा सुरू झाली असेल. पण मी दोन वर्षापूर्वी शेड्युल बघूनच हे म्हटले होते की आफ्रिकेचा मार्ग सोपा आहे.
पण मी, तुम्ही किंवा तुम्ही कुठले लेख वाचत असाल तिथले एक्स्पर्ट मिळून सोशल मीडिया बनत नाही.
स्पर्धेचे शेड्युल बघून चर्चा होणारच जे स्वाभाविक आहे. पण ती चर्चा आणि फायनलचा निकाल लागल्यावर चर्चेचा जो पूर येतो याची तुलना होऊ शकत नाही.
किंबहुना जी काही चर्चा करायची असेल ती आधीच करावी, मी सुद्धा केलीच. पण एकदा फायनल झाली, आणि आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन झाले की मग ती चर्चा उगाळण्यात काय अर्थ असे वाटले. किंबहुना आफ्रिकेचे अभिनंदन करताना तरी ती टाळावी असे मला वाटते.
किवीज सिरीज्बद्दल बोलताना.
किवीज सिरीज्बद्दल बोलताना. त्यावेळी तू "एव्हढा विचार नि प्लॅनिंग कशाला करायचा " असे झटकले होतेस
>>>>>>
अर्थात, कारण त्या सिरीज आधी भारताचे फायनलला जायचे चान्सेस सर्वाधिक होते. त्यामुळे किती सामने जिंकायचे वगैरे हिशोब करायचे आपल्याला गरज नव्हती. म्हणून कश्याला आताच लोड घ्यायचे म्हटले होते. दोन सामने हरता मी सुद्धा लोड घेऊ लागलो होतोच.
इथे माझा मुद्दा आहे की त्या मालिकेआधी आपणच त्यांच्याविरुद्ध फेवरेट होतो. पण तसे झाले का? उलट आपल्यालाच चक्क व्हाईट वॉश मिळाला. त्यामुळे तुम्ही जे बर म्हटले की आफ्रिका ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची मालिका झाल्यावर काय निकाल लागेल हे माहीत आहे.. तर ते कोणालाच माहीत नसते
आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये इतकी काही मोठी दरी नाहीये. रँकिंग सुद्धा तेच सांगत आहे एक संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसरा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या
आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये इतकी काही मोठी दरी नाहीये. रँकिंग सुद्धा तेच सांगत आहे एक संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. >> बाळा "रँकिंग चुकीच्या पद्धतीवर बेस्ड आहेत ह्या वादामधे रँकिंगचाच आधार देऊन मुद्दा मांडत राहणे" ह्यात काही गंडलेले आहे ह्याची अजिबात जाणीव तुझ्या मेंदूला होत नाही का ?
पण एकदा फायनल झाली, आणि आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन झाले की मग ती चर्चा उगाळण्यात काय अर्थ असे वाटले. किंबहुना आफ्रिकेचे अभिनंदन करताना तरी ती टाळावी असे मला वाटते. >> तुला तसे वाटते तर तू खुशाल चर्चा टाळ, चर्चा करू नकोस कि. आम्हाला वाटते करावी तर करू दे. मला ते अॅस्टेरिक्स कुठे तरी मांडावी असे वाटाले म्हणून इथे मांडले. एकदा तुझे मत मांडून "त्यामुळे माझ्यातर्फे सुद्धा या चर्चेला विराम." हे लिहून झाले ना तुझे ?
रँकिंग चुकीच्या पद्धतीवर
रँकिंग चुकीच्या पद्धतीवर बेस्ड आहेत
>>>
काय चुकीची पद्धत..
आणि हा वाद कुठे सुरू झाला?
तुला तसे वाटते तर तू खुशाल
तुला तसे वाटते तर तू खुशाल चर्चा टाळ, चर्चा करू नकोस कि. आम्हाला वाटते करावी तर करू दे.
>>>>
मी तुम्हाला अडवत नाहीये.
मी फक्त माझे मत मांडत आहे की अशी चर्चा अश्या वेळी करणे हे मला खेळाच्या स्पिरीटच्या दृष्टीने बरोबर वाटत नाही.
कोणाला अडवायचा मला काही अधिकार नाही.
त्यामुळे माझ्यातर्फे सुद्धा
त्यामुळे माझ्यातर्फे सुद्धा या चर्चेला विराम." हे लिहून झाले ना तुझे ?
>>>>
हो, पण मग माझा निर्णय मी बदलला.
आपला निर्णय बदलणे आपल्या हातात असते असे मला वाटते.
हे मा शे पो लिहिल्यावर सुद्धा त्या व्यक्तीला पुन्हा लिहावेसे वाटले तर तो लिहितोच. यात काही नियम नसतो की त्याने पुन्हा लिहूच नये. आणि लिहिले तर त्याची फजिती झाली वगैरे काही नसते.
यावर हवे तर मी वेगळा धागा काढतो.
आणि हा वाद कुठे सुरू झाला? >>
आणि हा वाद कुठे सुरू झाला? >> ओह म्हणजे स्वतःच स्वतःशी बोलणे सुरू आहे होय ?
भारत इंग्लंड कसोटी मालिका
भारत इंग्लंड कसोटी मालिका डीडी स्पोर्ट्स वर लाईव्ह असणार आहे असं वाचलं आज. खरं असेल तर कोणतेही शुल्क न भरता बघता येईल ही मालिका.
अगदी पाच-शून्य असा निकाल
अगदी पाच-शून्य असा निकाल लागला तरी चाले पण सरेंडर नसावे. प्रत्येक मॅच शेवटच्या सेशनपर्यंत गेली म्हणजे बरे वाटेल. एकूण पिचेस गेल्या वर्षीच्या पिचेस सारखेच आहेत असे बरेच ठिकाणी वाचले. तसे असेल तर सकाळचे सत्र वगळता बॅटींग अशक्य होउ नये. इंग्लंडच्या अॅटॅकमधे सिलेक्शनमधल्या घोळामूळे कमतरता असेल तर अजून बरे होईल. बाझबॉल चा खरा परीणाम ह्या सिरीजमधे दिसेल. काँस्टासचा अनुभव लक्षात घेऊन इंग्लंड बुमराच्या विरुद्ध अति-आक्रमक पवित्रा घेईल असे वाटते. तसे झाले तर ते आपल्या पत्थ्यावर पडले तर धमाल येईल.
भारत 200 - 2 व इथे एकही पोस्ट
भारत 200 - 2 व इथे एकही पोस्ट नाही ?
जयस्वाल शतक!
जयस्वाल शतक!
विश्वास खरा ठरवला.
त्याचे काही डाव वाईट गेले तरी त्यावर विश्वास दाखवायलाच हवा कारण जेव्हा खेळतो तेव्हा मोठी आणि मॅच विनिंग इनिंग खेळतो ज्याची इथे गरज आहे. गड्याने पहिल्याच डावात शतक मारले. आता दोनशे करावे. ती क्षमता आहे त्यात...
ऑस्ट्रेलिया सोबत सुद्धा पहिल्याच सामन्यात शतक होते आणि जिंकलो होतो.
बोलो आमीन
भारताची जोरदार सुरूवात!!
भारताची जोरदार सुरूवात!! पहिल्या सेशनला ओपनर्सने मस्त सुरूवात केली. मग लंचच्या तोंडावर दोन क्विक विकेट्स आणि नंतर शुभ-यशस्वी दुसरं सेशन.. कडक!! तिसरं सेशन ही भारताच्या बाजूने लागलं तर दणदणीत सुरू होईल ही सिरीज!!
एकही चेंडू बघायची ईच्छा नाही.
एकही चेंडू बघायची ईच्छा नाही. रोहित असता तर बघितली असती.
Pages