Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आताही इंग्लड दौरा म्हटले की
आताही इंग्लड दौरा म्हटले की सर्वप्रथम कसोटी सामनेच डोळ्यासमोर येतात. कसोटीला मरण नाही असे मला वाटते. >> आमेन ! पण हे मेनली भारतीय संघ कसा खेळेल ह्यावर ठरेल. (अॅशेसचा अपवाद वगळता) २००२ किंवा २०१४ ह्या दोन्ही पिरीयड्सच्या आधी आपण सेनामधे दणकून हरत होतो तेंव्हा एकंदर कसोटी सामन्यांच्या इच्छेला मरगळ आलेली आठवते. टेस्ट्सचा खप कमी झालेला होता. दोन्ही वेळेला आपली कामगिरी उंचावत गेली (भले थेट सिरीज जिंकल्या नसतील पण सामने चुरशीचे झालेले) त्याच्बरोबर टेस्ट ची लोकप्रियता वाढत गेली. खेळाडू सुद्धा अधिक प्राधान्य देऊ लागले.
माझ्या मते तरी कसोटी क्रिकेट
माझ्या मते तरी कसोटी क्रिकेट शेवटच्या घटका मोजतेय.
विराट कोहली विल बी मिस्ड!
विराट कोहली विल बी मिस्ड! गेल्या इंग्लंड दौर्यात पहिल्या कसोटीमध्ये त्याने मारलेले संयमी शतक म्हणजे कसोटी प्रकारातल्या बॅटींगचा उत्तम नमुना होता.
)
फिटनेस, आक्रमकता हे तर होतेच पण खेळाव्यतिरिक्त मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा मॅच्युअर होत गेलेला त्याचा वावरही कौतुस्कापद आहे! (गिरीश कुबेरांनी ह्याचं क्रेडीट "अनुष्का शर्मा सारख्या विचारी अभिनेत्रीशी झालेल्या लग्नाला" दिलं होतं.
त्यावरून ... ते अॅज अ कपल मस्त आहेत!
पण हे मेनली भारतीय संघ कसा
पण हे मेनली भारतीय संघ कसा खेळेल ह्यावर ठरेल.
>>>>
हो, हे आलेच.
आणि यात निकालापेक्षा महत्वाचे आहे लढणे. जर ते फायटिंग स्पिरीट दिसले तरी कसोटीची क्रेझ कायम राहील.
दादा द्रविड आले तेव्हा आपण अचानक फार काही जिंकायला लागलो अशातला भाग नाही कारण तसेच वेगवान गोलंदाज नव्हते. पण फलंदाजीत लढू लागलो होतो. सेहवाग आणि फॅब फोर खेळले तर एखादा ऍडलेड आगरकर स्पेल पडेल आणि आपण जिंकू अशी अपेक्षा वाटू लागली आणि परदेश कसोटीतील रस वाढू लागला.
मला दादा द्रविडचे पदार्पण आजही लख्ख आठवते. त्या आधीच्या सामन्यात सचिनचा वन मॅन शो होता पण ती कसोटी फार आठवत नाही. कारण निकाल नेहमीसारखा विरोधात होता. पण पुढच्या कसोटीत ज्या दिवशी समजले की आज दोन नवीन फलंदाज भन्नाट खेळून गेलेत तेव्हा तिथून ती कसोटी मालिका बॉल टू बॉल बघितली. तो सामना अनिर्णीत राहिला तरी आपला अपर hand होता. इंग्लंडला वाचवावी लागली होती. त्यातही दादानेच येऊन विकेट काढल्या होत्या तेव्हा असे झाले की काय नवीन प्लेअर मसीहा बनून आलेत. फलंदाजी तर फलंदाजी, गोलंदाजी सुद्धा करतात..
त्या पुढच्या कसोटीत पुन्हा टीव्ही समोर चिकटलो. आपल्या नेहमीसारख्या दोन विकेट पडल्या. दादा आला. आणि त्याने आल्या आल्या ऑफला एक दोन बाउंडरी मारल्या आणि तो क्लास मी बघतच बसलो. तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो. त्या दिवशी पूर्ण दिवस सचिन दादा नाबाद राहिले. अदभुत होते ते. पुढे त्याला ऑफ साईड गॉड वगैरे नाव पडले. माझ्यासाठी पहिले दोन फोर बघूनच झाला होता. (आधीच्या कसोटीत त्याला लाईव्ह खेळताना पाहिले नव्हते.)
त्यावरून ... ते अॅज अ कपल
त्यावरून ... ते अॅज अ कपल मस्त आहेत!
>>>>
+७८६
लग्नाआधी त्यांच्या रिलेशनमध्ये ब्रेकअप सिच्युएशन सुद्धा आली होती. तेव्हा त्या दोघांनी मिडिया फार चांगल्या पद्धतीने हॅण्डल केला होता. एकमेकांवर कॉमेंट करून गॉसिपिंगला विषय देणे टाळले होते. त्यामुळेच पुन्हा एकत्र यायला सुद्धा स्कोप राहिला. आणि पुढेही सेलिब्रिटी कपल आहोत हे समजून उमजून जिथे गरज नाही तिथे दुर्लक्ष करायला शिकले. अन्यथा आपल्या इकडे खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसून खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करणारे, मीम बनवणारे यांची कमी नाही.
दादा द्रविड आले तेव्हा आपण
दादा द्रविड आले तेव्हा आपण अचानक फार काही जिंकायला लागलो अशातला भाग नाही कारण तसेच वेगवान गोलंदाज नव्हते. >> माझ्या पोस्ट्स चा ह्याच्या संबंध कळला नाही. मी २००२ चा उल्लेख केला आहे. दादा तेंव्हा कप्तान होऊन वर्ष उलटले होते. द्रविड त्याधिच मसिहा होण्याच्या मार्गावर होता. लक्ष्मण स्थिरावला होता. सेहवाग सुरू झाला होता. श्रिनाथ बरोबर झहीर , आगरकर , नेहरा आले होते नि कुंबळे बरोबर भज्जी. त्याधी एखाद दुसर्या इनिंग्सच्या आशादायी शलाका असत फक्त. (सचिनचा अपवाद वगळता)
मी त्यावर भाष्य नाही केलं..
मी त्यावर भाष्य नाही केलं..
जर खेळाडू स्वतःला सिद्ध करायला डेडिकेशन दाखवत चांगल्या ब्रँडचे कसोटी क्रिकेट खेळतील तर येत्या दोन वर्षात भले त्यांना सेना देशातील दौरे खडतर गेले तरी कसोटी क्रिकेटचे किंबहुना क्रिकेट या खेळाचे चाहते त्यांना सपोर्ट करतील आणि त्यांचा कसोटी बघण्यातील इंटरेस्ट कायम राहील असे म्हणायचे होते.
म्हणून मी दादा द्रविड पदार्पणाचे उदाहरण दिले. उदाहरणार्थ त्या आधीचे सिद्धू मांजरेकर यांच्याकडे बघून यांना परदेशात कसोटी जिंकायचे काही पडले आहे असे वाटतच नव्हते. नव्वदी दशकाचा पूर्वार्ध फार बोरिंग ब्रँडचे क्रिकेट खेळले जायचे असे वाटते.
I may sound harsh or
I may sound harsh or unsentimental
पण विराट अथवा रोहित निवृत्त झाल्याचे एवढे दुःख झाले नाही. म्हणजे बातमी वाचल्यावर अच्छा ठीके एवढच वाटल . याला कारणीभूत विराटच्या केस मध्ये त्याच काही वेळच उर्मट वागणे आणि रोहितच्या केसमध्ये त्याचा खेळ कमी बघितला असणे हे फॅक्टर असावेत. किंवा वय झाल !
तेंडुलकर/ द्रविड/गांगुलीच्या वेळेस मात्र मनापासून वाईट वाटले होते .
विराटच्या केस मध्ये त्याच
विराटच्या केस मध्ये त्याच काही वेळच उर्मट वागणे आणि रोहितच्या केसमध्ये त्याचा खेळ कमी बघितला असणे हे फॅक्टर असावेत
>>
विराटचं उर्मट वागणं त्यानी बदलल्याला, नंतर कमाल फॉर्म मध्ये अनेक खेळ्या केल्याला, तो फॉर्म जाऊन खडतर पॅच आल्याला बरीच वर्ष झाली. यातच मधे रोहितची टेस्ट मधे ओपनर म्हणून री एन्ट्री झाली अन् तिथून तो टेस्ट कॅप्टन होऊन रिटायर झाला.
पण तुम्ही ज्या अर्थी रोहिताचा खेळ पाहिला नाही त्याच वेळी बहुतेक तुम्ही कोहलीचा ही बराच खेळ पाहिला नसावा असं वाटतं आहे. त्यामुळेच तुमच्या डोक्यात त्याची दहा एक वर्ष जुनी उर्मट प्रतिमा आहे...
माझा विराट कौतुकाचा धागा
माझा विराट कौतुकाचा धागा बहुधा २०१६ चा आहे. तेव्हा त्याने आपले उर्मट वागणे कंट्रोल केले म्हणून आवडू लागला असा उल्लेख आहे.
पण यामध्ये जो मूळ स्वभावाचा वाटा आहे तो आजही अध्येमध्ये उफाळून येतोच. त्याचे आयपीएल मध्ये ज्युनिअर खेळाडूंशी ठस्सणने वागणे भले ऑन द फिल्डच का असेना बरेचदा रुचत नाही. ऑस्ट्रेलियात तो नवीन ओपनर पोरगा आलेला त्याला धक्का मारणे हे सुद्धा रुचले नव्हते. पण जिथे तो उर्मट खेळाडूंना अरे ला कारे करतो, समोरच्याचे ऐकून घेत नाही तिथे आवडतो सुद्धा.. ते मिस करणार यापुढे. नवीन पोरे तो अॅटीट्यूड दाखवतील सुद्धा. जसे जयस्वालने स्टार्कला दाखवला होता. पण त्यानंतर विराट दर्ज्याचा खेळ सुद्धा दाखवायला हवा तरच त्याला अर्थ.
जाई थोडे हार्श वाटेल पण
जाई थोडे हार्श वाटेल पण तुम्ही त्यांचा खेळ बघितला नसेल तर तुमचा लॉस एव्हढेच म्हणता येईल फार तर. शक्य असेल तर कोहलीची २०१८ मधली मेल्बर्न मधली इनिंग नि रोहित ची २०२१ मधली ओव्हलवरची ह्या दोन इनिंग्स बघाच. मिस केल्याचे मनापासून वाईट वाटेल.
गिल ने दाढी मिशा वाढवल्या तर
गिल ने दाढी मिशा वाढवल्या तर त्याला नक्की कॅप्टन करतील का?
शर्मा नंतर कर्णधार कोण या
शर्मा नंतर कर्णधार कोण या स्पर्धेत बुमराहने आपले नाव मागे घेतले असे कानावर येतेय, त्यामुळे गिल प्रमुख दावेदार समजला जात आहे.
शुबमन गिल कसोटी सरासरी
ओवरॉल ३५ (५९ ईनिंग)
परदेशात खेळताना २७.५ (२८ ईनिंग)
सेना देशात खेळताना २५.७ (२१ ईनिंग) शून्य शतक
ईंग्लंडमध्ये खेळताना १४.७ (६ इनिंग)
जमेची बाजू ईतकीच की २०२४ साली कामगिरी तुलनेत चांगली ४०+ सरासरी, तीन शतके आहेत.
पण हे आकडे पाहता त्याचे कसोटी संघातील स्थान तरी निश्चित धरावे का हा प्रश्न आहे?
याउलट पंतचे ऑस्ट्रेलियातील काही आत्मघाती फटके नजरेआड केल्यास त्याचे संघातील स्थान पक्के आहे.
अय्यरला संधी मिळाली तर तो देखील आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवायची शक्यता आहे.
त्यामुळे थेट गिल याला कर्णधार करण्यापेक्षा येत्या ईंग्लंड मालिकेत बुमराहलाच कर्णधार करावे, झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत राहुलला उपकर्णधार करावे, नाहीतर रहाणेला परत बोलवावे. पण काही काळ गिल, पंत, अय्यर यापैकी कोण आपला दावा बळकट करतो याची वाट बघावी. उगाच घाई केली आणि यांच्यात संगीत खुर्ची खेळावी लागली तर या खेळाडूंमध्ये ईर्ष्या निर्माण होईल आणि संघातील वातावरण बिघडण्याची शक्यता राहील.
अर्थात ड्रेसिंग रूममध्ये सध्या काय ईक्वेशन चालू आहे, आणि बहुतांश खेळाडू कोणाला कर्णधार म्हणून स्विकारताहेत याची सध्या कल्पना नाही. पण पांड्याला २०-२० कर्णधारपदापासून दूर ठेवले ते पाहता लक्षात येते की या मुद्द्याचाही विचार केला जातोय.
Full India squad: Shubman
England Tour
Full India squad: Shubman Gill (c), Rishabh Pant (vc), Yashasvi Jaiswal, KL Rahul, B Sai Sudharsan, Abhimanyu Easwaran, Karun Nair, Nitish Reddy, Ravindra Jadeja, Dhruv Jurel, Washington Sundar, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Prasidh Krishna, Akash Deep, Arshdeep Singh, Kuldeep Yadav
बहुतांश संघ निवड अपेक्षित.
अपवाद श्रेयस अय्यर. त्याला संधी मिळाली नाही.
पण भारतात कसोटी असतील तिथे श्रेयस अय्यरला सुद्धा पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा.
*अपवाद श्रेयस अय्यर. त्याला
*अपवाद श्रेयस अय्यर. त्याला संधी मिळाली नाही.* - अय्यरला संधी मिळायला हवी होती. इंग्लंड ही संपूर्ण नवा, तरुण संघ घेवून खेळण्याची योग्य जागा नाही, संघाकरता व खेळाडूकरताही, असं मला वाटतं .
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा,
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा, तरुण संघ घेवून खेळण्याची योग्य जागा नाही. ❞
लाख रुपये की बात है भाऊ.
मधली फळीच विस्कळीत वाटतेय मला. अय्यर हवाच होता पण रहाणेचा विचारही व्हायला हवा होता.
अय्यर तसा इंग्लडसाठी नवा आणि
अय्यर तसा इंग्लडसाठी नवा आणि तरुणच आहे. पण त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल हाय आहे सध्या.
रहाणे हवा होताच. पण जर अश्या नवख्या संघासोबत इंग्लडला तो नाही तर मग पुढे त्याचा विचार होणे अवघड वाटत आहे.
Rishabh Pant (vc) आरारा.
Rishabh Pant (vc) आरारा.
अय्यर आउट, नायर इन.
IPL बघून निवड केली. अर्थात पंतला हे लागू नाही बरका, इति निवड समिती, आगरकर.
उद्धवा अजब तुझे सरकार.
IPL बघून निवड केली. अर्थात
IPL बघून निवड केली. अर्थात पंतला हे लागू नाही
>>>>
आयपीएल बघून कसोटी संघाची निवड होते, ते देखील इंग्लंड दौऱ्यासाठी, हे जरा देखील पटत नाही.
किंबहुना पंत उपकर्णधार होणे हेच दर्शवते. कसोटीमध्ये तो एक ग्रेट खेळाडू आहे, त्याची हक्काची जागा त्याला मिळाली.
नायर डोमेस्टिक गाजवत आहे म्हणून त्याला संधी मिळाली. अन्यथा आयपीएल मध्ये एक चमकदार खेळी करून पुढे अपयशी ठरल्याने तो संघाबाहेर गेला होता.
अर्सदीप शमीच्या अनुपस्थितीत आणि बुमराह सारे सामने खेळू शकत नसल्याने आला. इंग्लंड कंडीशन मध्ये फायदेशीर ठरू शकतो. गोलंदाजी ताफ्यात वरायटी आणतो.
सिराज कसोटी स्थान पक्के होते. शार्दुल रणजीमध्ये तुफान फॉर्मत होता आणि या आधी इंग्लंड मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
आयपीएल फॉर्म बघितले तर धावांची टाकसाळ उघडलेल्या आणि तेराच्या तेरा इनिंग मध्ये सातत्यपूर्ण खेळत 25+ स्कोअर करणाऱ्या सूर्याला संघात स्थान द्यायला हवे. पण त्याचा विचार कसोटी सोडा आता एकदिवसीयसाठी सुद्धा होताना दिसत नाही.
आयपीएल न खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला धक्का नाही लावला. आकाशदिप सुद्धा ट्वेंटी नाही तर कसोटी फॉर्मेट चा प्लेअर आहे हा विचार करून कायम ठेवला. ध्रुव ज्युरेल हाच पर्यायी विकेटकीपर राहिला. प्रसिद्ध कृष्णा सुद्धा आयपीएल आधीपासून कसोटी संघाचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियात होताच.
फक्त साई सुदर्शन की अय्यर हा इतकाच प्रश्न होता.
अय्यर यांची भारता बाहेरील 6
अय्यर यांची भारता बाहेरील 6 कसोटीत 15 ची सरासरी आहे
कर्णधाराची इंग्लंड मधे ३
कर्णधाराची इंग्लंड मधे ३ कसोटी सामन्यात सरासरी १४.६७ आहे.
हेच लिहायला आलेलो सुनील..
हेच लिहायला आलेलो सुनील..
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा,
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा, तरुण संघ घेवून खेळण्याची योग्य जागा नाही. ❞ >> +१. इथे गाजराची पुंगी विचार केलेला वाटतो. राहुल ओपन करणार असेल तर मधल्या फळीत नायर आणाण्याचे एकमेव कारण त्याला केंट कदून खेळण्याचा अनुभव हे असावे. तो , पंत नि जाडेजा ( नि शर्दुल) ह्यांच्यावर भिस्त ठेवली आहे असे वाटते.
मला गिल ची कॅप्टन म्हणून निवड
मला गिल ची कॅप्टन म्हणून निवड पटली नाही. टेस्ट कॅप्टन म्हणून अगदीच अननुभवी आहे. त्यात इंग्लंड मधेही पूर्वी काही खूप ग्रेट परफॉर्म केलं आहे असं नाही. रोको असते तर पाची टेस्ट खेळला असता का नाही हे ही सांगता येत नाही. आयपीएल मधला कॅप्टन्सी परफॉर्मन्स धरला तर मग पंत ला कशाच्या आधारावर व्हाइस कॅप्टन केलं हे ही लॉजिक अगाध आहे. व्हाइस कॅप्टन असल्याने त्याला जुरेल च्या वर प्रेफरन्स मिळणं सोडून अजून काय अचीव होणार आहे देव जाणे.
बुमरा अन् शमी जर 3- 3 च टेस्ट खेळणार असतील तर अनुभवी पेसरचा स्लॉट कव्हर करायला दोघंही संघात नकोत का? आता बुमरा नसलेल्या दोन टेस्ट मधे अगदीच नवखा अटॅक असणार आहे.
जडेजा अन् कुलदीप संघात असताना इंग्लंड मधे सुंदरला बॅटिंग स्किल साठी नेण्यापेक्षा अय्यर कसा काय प्लॅन मधे फिट झाला नाही?
इतके दिवस ओपनार / तीन नंबर ला खेळलेला गिल आता चार नंबरला येऊन आणखी खेळाडूंचा स्लॉट ब्लॉक करणार असं वाटतं आहे. त्यात तो कॅप्टन, म्हणजे मनमानी ला पूर्ण स्कोप...
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा,
❝ इंग्लंड ही संपूर्ण नवा, तरुण संघ घेवून खेळण्याची योग्य जागा नाही. ❞
>>>>>
द्रविड आणि दादा आठवले
मला तरी वाटते की टीम काही
मला तरी वाटते की टीम काही वाईट निवडली नाही, बुमराह जर तीनच कसोटी खेळणार असेल तर गिल ची निवड योग्य आहे. श्रेयस अय्यर la पहिले भारतात संधी द्यावी. आजकाल कसोटी सामने पण बॅटिंग डेप्थ असली तर जिंकले जातात, जी या टीम मध्ये आहे. करुण नायर ला एक संधी देण्यात काही चूक नाही
आयपीएल मधला कॅप्टन्सी
आयपीएल मधला कॅप्टन्सी परफॉर्मन्स धरला तर मग पंत ला कशाच्या आधारावर व्हाइस कॅप्टन केलं हे ही लॉजिक अगाध आहे.
>>>>>>
कसोटीत कोण आयपीएल बघते. या हिशोबाने रहाणे पुजारा कधी आयुष्यात कसोटी खेळले नसते.
१) पंत कसोटी संघातील आपला महत्वाचा खेळाडू आहे. इतके पराक्रम त्याने केले आहेत. त्याची संघातील जागा सुद्धा पक्की आहे.
२) पंतकडे दोन इंग्लंड दौऱ्याचा अनुभव आहे. तिथे त्याचे दोन कसोटी शतक आहेत. त्याचे एकमेव एकदिवसीय शतक सुद्धा तिथेच आले आहे.
३) पंत विकेट कीपर असल्याने तिथून त्याला खेळाचे आकलन इतर कोणापेक्षा जास्त होऊ शकते.
आजकाल कसोटी सामने पण बॅटिंग
आजकाल कसोटी सामने पण बॅटिंग डेप्थ असली तर जिंकले जातात, जी या टीम मध्ये आहे.
>>>>>
हो,
पूजारा राहणे कोहली ही मिडल ऑर्डर जेव्हा मधल्या काळात काही विशेष करत नव्हती आणि एकत्रितपणे फ्लॉप होत होती तेव्हा पंत जडेजा आणि मग पाठीमागे कधी आश्विन, शार्दुल, सुंदर वगैरे लोअर मीडल ऑर्डर फलंदाजच आपल्याला यश मिळवून देत होते.
टेस्ट टीममधे काही सरप्राझेस
टेस्ट टीममधे काही सरप्राझेस नाही वाटली. अय्यरविषयी चुटपुट वाटणं स्वाभाविक असलं तरिही तो गेले वर्षभर टेस्ट टीमचा भाग नाहीये. बुमराह संपूर्ण आणि सलग खेळण्याविषयी शंका असताना आत्ताच्या सेट-अपमधे गिल सोडून फार ऑप्शन्स नव्हते. गिल-पंत भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय वाटतो.
त्यातल्या त्यात मला ठाकूर च्या पुनरागमनाबद्दल आश्चर्य वाटलं, पण त्या जागेवर दुसरा कुणी प्रबळ दावेदार दिसतही नाही (how I wish, Hardik was still playing tests).
टेस्ट टीममधे काही सरप्राझेस
टेस्ट टीममधे काही सरप्राझेस नाही वाटली. >> +१. जास्तीत जास्त मुकेश कुमारला न्यायला हवे होते असे वाटले कारण तो मेट्रोनॉमिकल आहे नि बॉल चांगला स्विंग करतो. बुमरा भेदक स्पेल टाकत असताना दुसरी बाजू पकडून ठेवायला कामी आला असता.
द्रविड आणि दादा आठवले >> भारत जवळजवळ दर तीन - चार वर्षाआड इंग्लंडला जातो पण १९६ मधे तिथे यशस्वी पदार्पण केलेले खेळाडू आठवावे लागले ह्यात सगळे आले.
Pages