क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरला बॅटिंग स्किल साठी नेण्यापेक्षा अय्यर कसा काय प्लॅन मधे फिट झाला नाही? > >अँकी सुंदर हा जाडेजाचा बॅकप आहे असे वाटते. कोणीतरी जो बॅटींग करू शकेल नि स्पिनर म्हणून पण वापरता येईल असा. आता तू मग हर्श दुबे. , शम्स मुलानी हे लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट किंवा गेलाबाजार किमान तुशार कोटियन जो मागच्या दौर्‍यावर गेला होता तो ह्यांना का निवडले नाही असे जरुर विचारू शकतोस. ... मला नाही आगरकरला Happy

आयपीएल बघून कसोटी संघाची निवड होते, ते देखील इंग्लंड दौऱ्यासाठी, हे जरा देखील पटत नाही. >> ते वाक्य आयपीएल पण बघून निवड केली आहे असे वाचले तर जास्त पटते. डोमेस्टिक, आयपील, जजमेंट कॉल नि आधीच्या निवडींचे सातत्य ह्यांचे मिश्रण केले आहे असे वाटते. स्लॉटप्रमाणे कुठल्या पर्यायाला वेट अधिक द्यायचे हे वैयक्तिक मतांवर ठरलेले दिसतेय.

ह्या सगळ्या प्रकारात फक्त इंङ्लंड जे अ‍ॅग्रेसीव्ह क्रिकेट खेळत असते ते कसे टॅकल केले जाणार आहे ह्याचा विचार होपफुली झाला असेल अशी आशा धरूया.

श्रेयस अय्यर la पहिले भारतात संधी द्यावी
>>
या लॉजिक नी साई सुदर्शन पण गळतो

पंत कसोटी संघातील आपला महत्वाचा खेळाडू आहे. इतके पराक्रम त्याने केले आहेत. त्याची संघातील जागा सुद्धा पक्की आहे.
>>
भाऊ, पंत च्या निवडीबद्दल नाही म्हणत आहे काही.
व्हाइस कॅप्टन होण्याजोगी लीडरशिप स्किल्स कुठे दिसली? आयपीएल मधे ही त्याच्या कॅप्टन्सी मुळे काही विशेष प्रभाव पडला नाहीये

कसोटीत कोण आयपीएल बघते
>>
गिल ची कॅप्टन्सी ही आत्ता तरी आयपीएल मधेच प्रूव्हन आहे अन् जर त्याला कॅप्टन करताना हा मुद्दा लक्षात घेतला असेल तर पंत च्या व्हाइस कॅप्टन इलेक्शन मधे त्याच्या फेल्ड आयपीएल कॅप्टन्सी ला का नजरेआड केलं??

पण १९६ मधे तिथे यशस्वी पदार्पण केलेले खेळाडू आठवावे लागले ह्यात सगळे आले.
>>>
मी तुमचा मुद्दा खोडत नाहीये.. तर नाईनटीज किड ची टी एक गोड आठवण आहे म्हणून उगाळली Happy

गेलाबाजार किमान तुशार कोटियन जो मागच्या दौर्‍यावर गेला होता तो ह्यांना का निवडले नाही असे जरुर विचारू शकतोस. ... मला नाही आगरकरला Happy
>>
तनुष कोटियन कडे ऑस्ट्रेलिया चा व्हिसा असल्याने त्या वेळी त्याला पाठवलं होतं असं वाचलं होतं, पण त्याला रीटेन करता आलं असतं

एकुणात मला पिच नुसार नितीश, जडेजा, कुलदीप अन् शार्दुल पैकी दोघंच खेळतील असं वाटतं. बाकी 3 पूर्ण पेसर असतील. या सिच्युएशन मधे सुंदरला नेण्यापेक्षा अय्यर ला राहुल चा बॅक अप म्हणून न्यायला हवं होतं. आता त्या कंडीशन मधे नितीश किंवा ज्युरेल ला खेळवतील, पण प्युअर बॅटर म्हणून मला अय्यर कधीही उजवा वाटतो. आत्ताचा त्याचा फॉर्म न बघता ही...

मी सुद्धा पंतच्या निवडीबद्दल नाही तर त्याला उपकर्णधार करण्याबद्दलच ती कारणे दिली आहेत..
सध्याच्या संघात अनुभवी, दोन इंग्लंड दौरे, संघात जागा पक्की, आणि विकेटकीपर म्हणून मैदानातली मोक्याची जागा... हे सर्व बघून त्याला उपकर्णधार केले आहे.

राहिला प्रश्न आयपीएल कप्तानी...
तर विराट कोहलीने त्याच्या आयुष्यात एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीये. तरी तो भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कसोटी करणार आहे Happy

गिल ची कॅप्टन्सी ही आत्ता तरी आयपीएल मधेच प्रूव्हन आहे अन् जर त्याला कॅप्टन करताना हा मुद्दा लक्षात घेतला असेल तर पंत च्या व्हाइस कॅप्टन इलेक्शन मधे त्याच्या फेल्ड आयपीएल कॅप्टन्सी ला का नजरेआड केलं??
>>>>

गिलची आयपीएल कप्तानी बघून त्याला कर्णधार केले हे पहिले गृहितक तुम्हीच मांडत आहात Happy
तेच चुकीचे आहे समजा..

भारताचा आजवरचा सर्वोत्तम कर्णधार धोनीबाबत त्याला कर्णधार करताना त्याची कुठली कप्तानी बघितली गेली होती... भविष्याचा विचार करून लाँग टर्म पर्याय ठरेल या आशेवर गिल याला कर्णधार केले आहे. कारण त्याच्याकडे ऑल फॉर्मेट प्लेअर म्हणून बघितले जात आहे. गेला फेल कप्तानीत तर बदलतील. त्यात एवढे काही नाही.

गिलची आयपीएल कप्तानी बघून त्याला कर्णधार केले हे पहिले गृहितक तुम्हीच मांडत आहात
>>

चीफ सिलेक्टर अजित आगरकर प्रेस कॉनफरन्स मधे हे म्हणाला आहे: At the moment, from what we're looking...be it franchise cricket, you can see that he's relishing the role. This is obviously going to be a lot harder. But those are the challenges you face playing international cricket,

त्याला कर्णधार करताना त्याची कुठली कप्तानी बघितली गेली होती...
>>
धोनी तो पर्यंत टीम मधे प्रॉपर सेट झालेला होता. गिल मागल्याच टूर मधेच सगळ्या टेस्ट खेळाला नाही आहे...

बाकी कप्तानीची कमाल गेले वर्षभर तर अय्यर करतोय..
नुसती कप्तानी नाहीतर खेळाडू म्हणून सुद्धा चमकत आहे..
भारतासाठी खेळताना देखील त्याने चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वात महत्त्वाचा रोल निभावला..
पण त्याचा तर संघात देखील समावेश केला गेला नाही.
गिलचे आयपीएल कप्तानी बघणे दूरचे, त्याचे संघातले स्थान सुद्धा धोक्यात असायला हवे होते असा त्याचा आशियाबाहेर कसोटी परफॉर्मन्स आहे.

एखादा खेळाडू लाडका सुद्धा असतो.. एक वशिला सुद्धा असतो.. एखाद्याची ब्रँड व्हॅल्यू सुद्धा असते.. जी दुसऱ्या फॉरमॅटमध्ये चमकून तयार झाली असते.. कोणाला पटो न पटो बरेच पैलू असतात..

हे बघा
IMG-20250525-WA0060.jpg

“अय्यर ला राहुल चा बॅक अप म्हणून न्यायला हवं होतं.” - मला वाटतं राहूल ला ओपनर म्हणून निवडलाय आणि त्याला बॅक-अप म्हणून इस्वरन ला निवडलंय. (बिचारा कित्येक टूर्स बॅक-अप ओपनरच आहे. कधीतरी खेळायला मिळेल ही आशा आहे).

एक उगाच त्रिव्हिया:
गेल्या वेळी जेव्हा करुण नायरला इंग्लंडला नेलं होतं तेव्हा त्याला एकही सामना खेळवलं नव्हतं. रादर मधेच हनुमा विहारीला बोलावून डेब्यू ची संधी दिली होती.
तसं निदान यावेळी होऊ नये...

एक उगाच त्रिव्हिया: >> हे तर नेहमीचेच आहे ना. सर्फराजला घेऊन गेलेले तेंव्हा जुरेल नि पड्डिकलला खेळवले इत्यादि. सर्फराज ऑस्ट्रेलिया किंवा इंङ्ळंडमधे टेस्ट खेळण्यासाठी टेक्निकली अ‍ॅडेप्ट नाहिये पण अ संंघातून खेळण्याएव्हढा आहे हे काही झेपत नाही Happy करुण केंट्विरुद्ध खेळलाय म्हणून थेट टेस्ट संघात येऊ शकतो पण त्यानेही अ संघातून खेळणे जरुरी केलेले आहे हा अजून गोंधळ आहेच.

हे तर नेहमीचेच आहे ना
>>
हो ना
२०१५ वर्ल्डकप ला टीम मधे धवल कुलकर्णी असताना मोहित शर्माला ईशांत शर्माची रीप्लेसमेंट म्हणून बोलावलं अन् कुलकर्णीला पूर्ण टूर्नामेंट बाकावर बसवलं

“ सर्फराजला घेऊन गेलेले तेंव्हा जुरेल नि पड्डिकलला खेळवले इत्यादि.” - सर्फराझचा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असावा. मध्यंतरी क्रिकइन्फो वर आकाश चोप्राचा एक व्हिडिओ होता ज्यात त्यानं सर्फराझ टीम मॅनेजमेंटला नकोय अश्या आशयाचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या निवडीविषयी शंका व्यक्त केली होती.

त्यानं सर्फराझ टीम मॅनेजमेंटला नकोय अश्या आशयाचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या निवडीविषयी शंका व्यक्त केली होती. >> तेच असावे असे वाटाते. फिटनेस (तो इतक्या रणजी सामन्यांमधे खेळलाय तेंव्हा खरच हे कारण असावे कि नाही ह्याबद्दल शंकाच आहे) तेंव्हा खरच अजून काय वेगळे कारण असू शकेलही.

मोहित शर्मा >>> त्याला त्या वर्ल्ड कपमध्ये खेळवणं किंवा एकंदरीतच संघात घेणं ह्यामागे धोनी / सिएसके कनेक्शन असावं. तो बर्‍यापैकी सुमार बॉलर होता!
अय्यरला टेस्ट टीममध्ये घ्यायला हवं होतं. त्याने मागच्यावर्षी रणजी खेळायला नकार देऊन उगीच वाद ओढवून घेतला होता.

धोनी / सिएसके कनेक्शन असावं. तो बर्‍यापैकी सुमार बॉलर होता!
>>
अर्थात
शिवाय त्या वेळी त्याची प्रोफाईल मॅनेजमेंट ऋती स्पोर्ट्स कडे होती

*गेला फेल कप्तानीत तर बदलतील. त्यात एवढे काही नाही.* -
प्रश्न कप्तानीत यशस्वी/ फेल होण्याचा नाहीं, फलंदाज म्हणून तसं होण्याचा आहे; इंग्लंडमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून यशस्वी होण्यासाठी नवीन , तरुण फलंदाजाला पूर्ण फोकस फलंदाजीवर ठेवणं हितावहच नाही तर अत्यावश्यक आहे ! जर गिल मुख्यतः फलंदाज म्हणून संघाला दीर्घकाळ हवा असेल, तर नेमकं इंग्लंडमध्येच त्याला कर्णधाराची अतिरिक्त जबाबदारी देणं म्हणूनच तर्कशुद्ध वाटतं नाहीं. ( अशोक मंकड सारखा अभ्यासू, मेहनती व मुंबईचा अनुभवी, विश्वासार्ह सलामीचा फलंदाज इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात आपली उमलती , संभाव्य दीर्घ करिअर कायमची मिटवून बसला होता ! )

धोनी / सिएसके कनेक्शन असावं. तो बर्‍यापैकी सुमार बॉलर होता!
अर्थात
शिवाय त्या वेळी त्याची प्रोफाईल मॅनेजमेंट ऋती स्पोर्ट्स कडे होती

>>>>

यावरून तुम्हाला समजले असेल की निवडसमितीने एखाद्याला निवडायचे जे कारण दिले आहे ते तेवढेच कधी नसते Happy
अर्थात निवडसमितीने तुम्ही वर दिलेले कारण उघड तर सांगितले नसणारच. हे तुमचेच अंदाज आहेत असे गृहीत धरतो.

गिल योग्य नसेल तर दुसरा कोणता खेळाडू आहे का कर्णधार पदासाठी. >> बुमरा ! गिल ला उपकप्तान म्हणून नेता आले असते. बुमरा ज्या सामन्यांमधे खेळणार नाही त्या मधे गिल कप्तान नि पंत उपकप्तान झाला असता. गिल नि बुमरा दोघेही नसते तर पंत-जैस्वाल अशी जोडी करता आली असती. बुमरा हि स्टॉप गॅप अ‍ॅरेंएंजमेंट हे उघड आहे.

टी. शेखरला परत फिलिडं कोच म्हणून परत आणले रोहितच्या आग्रहावरून असे वाचले. रोहित रीटायर व्ह्यायच्या आधी ह्याची सुरूवात झाली असावी. पण म्हणजे रिटायरमेंटचा निर्णय प्लॅन्ड नव्हता का काय ?

गिल योग्य नसेल तर दुसरा कोणता खेळाडू आहे का कर्णधार पदासाठी.
>>>>>
जर गिल सध्याच्या निवड समितीचा किंवा बीसीसीआयचा लाडका असेल तर विषयच संपला.

सचिन गेला नंतर कोहली आला, गेल्या काही वर्षात रोहीत सुद्धा यात होता.. आता भारतीय क्रिकेटला एका नवीन चेहर्‍याची गरज आहे. आणि गिल कडे त्या नजरेतून बघितले जात असेल तर त्याला एक्स्ट्रा संधी मिळणारच हा मुद्दा देखील लक्षात घ्या.

आणि हो, नवीन पिढी मध्ये अ‍ॅक्चुअली गिल पॉप्युलर आहे.

*गिल योग्य नसेल तर ..* माझ्यापुरतं एक स्पष्टीकरण - कर्णधार म्हणून गिलच्या योग्यतेबद्दल ( आणि, पॉप्यूलारिटी बद्दलही ! ) मी अजिबात साशंक नाहीं; इंग्लडमध्ये आत्ता त्याला ही जबाबदारी देणं त्याच्या व संघाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने योग्य आहे का, इतकीच माझी शंका आहे.

Pages