Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टोक्स गेला
स्टोक्स गेला
जर बुमरा दोन टेस्ट खेळणार
जर बुमरा दोन टेस्ट खेळणार नसेल तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही... >> खरय ! टेस्ट मधे पाचच्या वरती एव्हरेजने दोन इनिंग्स्मधे ठोकलय
एक तर बोलिंग कोच चे प्लॅन्स गंडलेले आहेत किंवा बॉलर. टेक युअर पिक.
65 हवेत..
65 हवेत..
फेवरेट इंग्लंड
पण जडेजाने नुकतीच स्टोक्सची विकेट काढल्याने आपण गेम मध्ये आहोत अजून.
बुमराहने निराश केलेय.
पण शेवटच्या दोन तीन विकेट तो उडवू शकतो.
शार्दुल ला 5 पेक्षा कमी रेट
शार्दुल ला 5 पेक्षा कमी रेट नी मारूनही त्याला 3-4 ओव्हर चे 2 स्पेल
अन् 6+ च्या रेट नी मार खाल्लेला प्रसिध 14 ओव्हर टाकतोय...
लक्तरं काढली बॉलिंग ची
लक्तरं काढली बॉलिंग ची
स्टोक्स आऊट झाल्यावर बुमारा ला आणायला हवं होतं
अजून एखादी विकेट लगेच गेली असती तर काहीतरी प्रेशर टाकता आलं असतं
5 शतकं होऊनही धावा पुराल्या नाहीत
दोन्ही डावात शेपटानी शेपूट घातलेलं भोवलं
त्यापेक्षाही ड्रॉप झालेले
त्यापेक्षाही ड्रॉप झालेले कॅचेस अधिक नडलेत. असो, असेच पिचेस असतील तर किमान बॅटींग चांगली होत राहील. आर्चर, ओव्हर्टन, वूड वगैरे परत आले कि इंग्लंडची बॉलिंग अधिक स्ट्राँग होईल म्हणजे ४-० किंवा ५-० अशक्य नाहित.
सगळीकडे 4-0…5-0 असा सूर आहे
सगळीकडे 4-0…5-0 असा सूर आहे जो पटत नाही.
पाच शतके मारून जिंकलो नाही म्हणून असा नकारात्मक सूर लागला आहे.
पण दोन्ही डावात शेवटी जे झाले ते पुढील सामन्यात टाळू शकतो.
त्यांचे जे झेल सुटले ते सुधारू शकतो.
या गोष्टी झाल्या नसत्या तर या सामन्यात आपण फेवरेट होतो हे विसरता कामा नये. ऑस्ट्रेलिया गाब्बा सिरीजमध्ये आपण जिथून जिंकलो आहोत ते पाहता या सामन्यातील चुका सुधारून मुसंडी मारू अशी अपेक्षा वाटत आहे..
सगळ्यांचे माहित नाही
सगळ्यांचे माहित नाही ,माझ्यापुरते हे मी सिरीजच्या आधीच धरले होते. उगाच अवास्तव अपेक्षा धरण्यात अर्थ नाही असे माझे मत. उगाच सकारात्मक सूर म्हणण्यापेक्षा 'त्याच त्याच चूका टाळता का येत नाहित ? " ह्यावर लक्ष देणे अधिक जरुरी आहे.
या गोष्टी झाल्या नसत्या तर या सामन्यात आपण फेवरेट होतो हे विसरता कामा नये. >> कधी ? कुठे ? केंव्हा ? कोणाचे ?
ड्रॉप्ड कॅचेस आणि दोन्ही
ड्रॉप्ड कॅचेस आणि दोन्ही इनिंग्जमधले बॅटिंग कोलॅप्सेस ह्या दोन गोष्टी (सामान्य बॉलिंग अॅटॅक आहेच) प्रामुख्याने नडल्या भारताला असं मला वाटतं. ह्या दोन गोष्टी लो-हँगिंग फ्रूट्स आहेत (बॉलिंग सुधारायला वेळ लागू शकतो).
ठाकूर चं एकंदरीत योगदान (५ रन्स आणि १६ ओव्हर्स) पाहता, त्या जागेवर एक प्रॉपर बॉलर (कुलदीप) खेळवावा असं माझं मत आहे. ७ बॅट्समन जर काही करू शकणार नसतील, तर ८ वा बिट्स अँड पिसेस बॅट्समन फार काही प्रकाश पाडू शकणार नाही. त्यापेक्षा जेन्युईन विकेट टेकर महत्वाची भुमिका पार पाडू शकेल.
या गोष्टी झाल्या नसत्या तर या
या गोष्टी झाल्या नसत्या तर या सामन्यात आपण फेवरेट होतो हे विसरता कामा नये
>>
आत्याबाई ला मिशा असत्या तर...
आणि आधीच्या दोन सिरीज कचऱ्यानी हरून आलेला, त्यानंतर भरपूर बदल झालेला, नवाख्या कर्णधाराच्या नेतृत्वातला नवखा संघ आहोत आपण
केवळ पाहिला दिवस चांगला खेळ केला, पहिल्या डावात वट्ट 6 रन चा लीड घेतला, दुसऱ्या डावात एक पार्टनरशिप चांगली झाली म्हणून आपण फेवरिट होत नसतो
टेस्ट जिंकायला 20 विकेट्स घ्यायला लागतात, अन् आपला बॉलिंग अटॅक तसा कधीच वाटला नाही (5 पूर्ण बॉलर्स असूनही)
दुसऱ्या दिवशी आपण 430-3 होतो.
दुसऱ्या दिवशी आपण 430-3 होतो.
पहिल्या डावात 600 किंवा त्याहून जास्त धावा मारून एकच संघ जिंकू शकतो अशी सिच्युएशन आणू शकत होतो म्हणजे त्या क्षणी फेवरेटच होतो.
त्यानंतर भले नंतरच्या फलंदाजांनी घाण केली आणि झेल सुद्धा सोडले त्यामुळे त्यांनी सुद्धा तेवढेच मारून सामना बरोबरीत आणला.
पण पुन्हा एकदा दुसऱ्या डावात आपण पंतच्या वेगवान शतकाने अश्या स्थितीत होतो की त्यांना पाचव्या दिवशी हवे तितके म्हणजे आवाक्याबाहेर टारगेट देऊन फक्त एकच संघ जिंकेल याची काळजी घेऊ शकत होतो. म्हणजे पंत दुसऱ्या डावात बाद होईपर्यंत आपण गेम मध्ये पुढेच होतो. सारे पत्ते आपल्या हातात होते. स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा की आता भारताने कधी डिक्लेअर करावे असा विचार तुम्ही त्यावेळी करत नव्हता का?
त्यानंतर मात्र पुन्हा डाव कोसळला आणि डाव घोषित ऐवजी आपण चक्क सर्वबाद झालो आणि तिथून गेम प्रत्येक क्षणाला दूरच गेला..
*तरी पण आज खराब होण्याची
*तरी पण आज खराब होण्याची शक्यता असलेलं पीच; * - असं पीचबद्दल भाकीत करून मी अक्षरशः माती खाल्ली !
इंग्लंडने नियोजनपूर्वक , शिस्तबद्ध 4धांवा प्रती ओव्हर ही धांवगती ठेवून फलंदाजी केली व विजय मिळवला. अभिनंदन !!!
आपण फिरकीवरही विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे, हे स्पष्ट झालं. शिवाय, फलंदाजी ही सर्व 11 खेळाडूंची जबाबदारी समजली गेली पाहिजे व गचाळ क्षेत्ररक्षण सर्व चांगल्या कामगिरीला शुन्याने गुणण्यासारखं आहे, हे धडे आपल्याला गिरवावेच लागतील !!!
आता भारताने कधी डिक्लेअर
आता भारताने कधी डिक्लेअर करावे असा विचार तुम्ही त्यावेळी करत नव्हता का
>>
याचा फेवरिट असण्याशी काय संबंध?
भारताची बॉलिंग युनिट किती धावा डिफेंड करू शकेल या बाबत बिलकुल खात्री नसल्याने अन् पंत बाद झाल्यावर करुण चा अप्रोच पाहून हे लोक फास्ट खेळून शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात इंग्लंड ला बॅटिंग देऊन 100 ओव्हर मधे 450चा विचार करत नाही आहेत हे क्लिअर होतं (कारण इंग्लंड 4.5 च्या रेट नी मारू शकेल अशी आपली बॉलिंग होती) त्यामुळे पाचव्या दिवशी पर्यंत खेळून 80 ओव्हर मधे 450 द्यायचा प्लॅन असावा असं वाटलं. पण त्यासाठी बॅटिंग खेचली जाईल याचीही खात्री नव्हती कारण पहिल्या डावातली घसरगुंडी...
अपेक्षा ठेवताना प्रॅक्टिकल राहिलेलं बरं
टिपिकल इंडीयन पेरंट सारखं फेल होणाऱ्या पोराकडून अव्वल येण्याच्या अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या...
तुमच्या किंवा माझ्या अपेक्षा
तुमच्या किंवा माझ्या अपेक्षा काय होत्या हा मुद्दाच नाहीये
मॅच ची स्थिती जी होती त्यानुसार भारताचे पारडे जड होते की नाही ते सांगा?
आणि पंत शतक झाल्यावर जसे मारत होता याचा अर्थ वेगात खेळून डिक्लेअर करायचा मूड मध्येच होते.
<<<<<<
करुण चा अप्रोच पाहून हे लोक फास्ट खेळून शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात इंग्लंड ला बॅटिंग देऊन 100 ओव्हर मधे 450चा विचार करत नाही आहेत हे क्लिअर होतं
>>>>>>
करून नायर आला आणि वैयक्तिक अपयशाच्या प्रेशरमध्ये सामन्याची वाट लावली तिथे जडेजा पुढे पाठवायला हवा होता.
कारण नंतरचे फलंदाज बिलकुल दिवस खेळून काढा मूडमध्ये नव्हते. बुमराहने विचार न करता बॅट फिरवली. शेवटची विकेट गरज नसताना उचलून मारण्यात गेली.
मस्तं जिंकली इंडिया.
मस्तं जिंकली इंडिया.
मस्तं जिंकली इंडिया.>>> बोकलत
मस्तं जिंकली इंडिया.>>> बोकलत काय मिळतं हो असं करून?
अमानवीय आनंद
अमानवीय आनंद
मॅच ची स्थिती जी होती
मॅच ची स्थिती जी होती त्यानुसार भारताचे पारडे जड होते की नाही ते सांगा
>>
फक्त पहिल्या डावात गिल अन् पंत क्रीज वर असे पर्यंत
दुसऱ्या डावात राहुल अन् पंत क्रीज वर असताना जरा आशा होती पण फेवरिट नाही म्हणणार कारण शेपटाचा अन् बुमरा खेरीज इतर बॉलर्स चा परफॉर्मन्स एकदा पाहून झाला होता
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच होत नाही कसोटी क्रिकेटमध्ये..
तिथून भारत असे टारगेट देऊ शकत होते जिथून एकच संघ जिंकावा आणि तो म्हणजे भारत..
आणि भारताने असे आव्हान दिले असते तर इंग्लंड जशी खेळली तशीच खेळली नसती. मग गेम बदलला असता
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच होत नाही कसोटी क्रिकेटमध्ये..
>>>>
बाबो
रोहित शर्मा असता तर लाराचा
रोहित शर्मा असता तर लाराचा ४०० रन्सचा रेकॉर्ड मोडला असता कोहलीने पण साठ सत्तर धावा केल्या असत्या. रोहितची क्याप्टनशिप खतरनाक आहे. इंग्लंड थरथर कापले असते.
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच होत नाही कसोटी क्रिकेटमध्ये..
तिथून भारत असे टारगेट देऊ शकत होते जिथून एकच संघ जिंकावा आणि तो म्हणजे भारत..
>>
पुढच्या कसोटीतही / रादर कुठल्याही कसोटी मधे पहिला बॉल पडायच्या आधीपासून भारत असं टार्गेट देऊ शकायच्या परिस्थितीत असतो की जिथून एकच संघ जिंकावा अन् तो म्हणजे भारत, मग तर तुमच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाच कसोटीत भारत फेवरीट असणार का??
अन् हे प्रत्येकाच संघाबाबत खरं आहे...
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच
फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच होत नाही कसोटी क्रिकेटमध्ये.. >> हे आईने-अकबरीच्या लेव्हलचे आहे.
इंग्लंडने नियोजनपूर्वक , शिस्तबद्ध 4धांवा प्रती ओव्हर ही धांवगती ठेवून फलंदाजी केली व विजय मिळवला. अभिनंदन !!!
प्रसिद्ध्चा शॉर्ट पिच्ड मारा थेट मॉर्केलच्या भात्यातून उचललेला होता (फरक मॉर्केलचा पेस नि प्रसिद्धचा पेस ह्यात आहे). जाडेजाच्या जागी सुंदर, शार्दूलच्या जागी कुलदीप नि नायरच्या जागी जुरेल (प्रसिद्द्/सिराजच्या जागी अ*दीप) असा बदल होईल असे वाटते.
आपण फिरकीवरही विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे, हे स्पष्ट झालं. >> बरोबर भाऊ. साडेतिनशे चे टारगेट म्हणजे आजच्या जमान्यामधे नि तेही बाझबॉल ला प्लेज केलेल्या टीमसाठी दोन वन डे डाव लागोपाठ खेळण्यासारखे झाले. बुमरा ला पहिल्या सत्रामधे विकेट घेता न आल्यावर मॅच कुठल्या दिशेने जाते आहे हे उघड झाल्यावर थोडा वेळ खाऊ चिकीपणे अॅप्रोच घ्यायला हरकत नव्हती.
पहिला बॉल पडायच्या आधीपासून
पहिला बॉल पडायच्या आधीपासून भारत असं टार्गेट देऊ शकायच्या परिस्थितीत असतो की जिथून एकच संघ जिंकावा
>>>>>>>>>>
कसे
उगाच काहीही बोलायचे का...
सचिनने ऑस्ट्रेलियाला नो कव्हर ड्राइव्ह मारलेले तेव्हा आपले सातशे धावा झाले होते.
तिथून फक्त एकच संघ तो सामना जिंकू शकत होता आणि तो म्हणजे आपण.
पहिला बॉल पडायच्या आधीच अशी स्थिती कशी येणार जरा समजावता का?
प्रसिद्द्/सिराजच्या जागी अ
प्रसिद्द्/सिराजच्या जागी अ*दीप) असा बदल होईल असे वाटते.
>>
पण बुमरा बाहेर बसायचं म्हणाला तर??
भिती त्याचीच आहे
अतिशोयक्ती वापरतो आहे रे तो
अतिशोयक्ती वापरतो आहे रे तो तुला प्रत्त्युत्तर म्हणून
पण बुमरा बाहेर बसायचं म्हणाला तर?? >> हो.
Proud moment!शाब्बास ऋषभ पंत
Proud moment!
शाब्बास ऋषभ पंत
दुखावलेल्या क्रिकेट प्रेमी मनावर एक फुंकर
Rishabh Pant makes history by becoming the first Indian wicketkeeper-batter to accumulate over 800 rating points in the ICC Test rankings.
पहिला बॉल पडायच्या आधीच अशी
पहिला बॉल पडायच्या आधीच अशी स्थिती कशी येणार जरा समजावता का?
>>
गिल अन् पंत मारतील की द्विशतक
जुरेल पण मारेल शतक
अर्शदीप 8 विकेट काढेल..
एक काळ होता की 371 चौथ्या डावात होत नसत
आता गेल्या दोन टेस्ट मधे इंग्लंड नीच आपल्याला चोपल्या आहेत
हातात येऊ घातलेले सामने शेपूट न ठेचल्यानी गेले आहेत
चेन्नई ला सचिन गेल्यावर बाकी लोकांना 15 रन करता आल्या नाहीत
विंडीजमध्ये फॅब फोर असूनही 120 चेझ झाले नव्हते
Guarantee कसलीच देता येत नाही
फेवरेट शब्दाचा अर्थ
फेवरेट शब्दाचा अर्थ खात्रीपूर्वक शंभर टक्के जिंकणारा असा होत नाहीच बहुधा.
असो, सोडा विषय
पंतच्या बातमीने मूड छान केला आहे
कोणी विंडीज ऑस्ट्रेलिया बघतेय
कोणी विंडीज ऑस्ट्रेलिया बघतेय...
तिथे तो शामार जोसेफ पुन्हा ऑस्ट्रेलियाला नडतोय
हा तोच आहे ज्याने ऑस्ट्रेलियाची एकदा बेकार ठासलेली.
ती मॅच लाईव्ह बघितली होती. टेस्ट क्रिकेटमधील एक खतरनाक स्पेल होता
Pages