क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज तरी पंतचे कौतुक अपेक्षित होते.
आज सुद्धा मन जिंकलेले दिसत नाही त्याने

केशवकूल कुठे आहेत ते?
आयपीएल नंतर गायबेलच....

आज खेळायला देणार
बुमराह चार ओवरचा स्पेल त्यांना खेळावं लागणारच..
मग उद्या सकाळी पुन्हा बुमराह फ्रेश स्पेल टाकेल..
या दोन स्पेल मध्ये सामना कुठे जातोय हे समजेल.

कालची पोस्ट
राहुल मस्त खेळला आज. फार कंफर्टेबल वाटत होता. अन्यथा बरेचदा शेल मध्ये जातो. उद्या शतक मारायला हवे. ते सुद्धा मोठे. मागे कोणाच्या भरवश्यावर राहू नये..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 June, 2025 - 23:02

आज तरी पंतचे कौतुक अपेक्षित होते.>>>> कौतुक सगळ्यांनाच आहे, पण तुम्ही जे चेकाळल्यासारख्या पोस्ट्स टाकता , त्यामुळे विट येतो

पंतचे शतक झाल्यावर गावसकरची रिएक्शन बघायला मजा आली... स्टुपिड स्टुपिड स्टुपिड.. नंतर सुपर्ब सुपर्ब सुपर्ब.. आणि आज तेच रिपीट रिपीट रिपीट.. क्रिकेटप्रेमी असावे तर असे.. गावस्कर, शास्त्री, हर्षा भोगले यांना बघणे आणि ऐकणे एक आनंद असतो Happy

बाशिरचा एक चेंडू खुप वळला व खाली राहिला. ( नशिबाने नायर पायचीत झाला नाही ). भारतासाठी हे चांगले लक्षण आहे !

बॉलर्स बद्दलच्या पूर्ण पोस्ट ला मोदक... >> +१ सिराज वगळता, काल सिराज ची बॉलिंग सुंदर होती. तो दुर्दैवी होता कि त्याला विकेट्स मिळाल्या नाहित असे मी म्हणेन. पहिल्या दिवसा नंतर त्याने एकदम बदलता अ‍ॅप्रोच दाखवला होता.

राहुल ची दुसरी इनिंग कसली प्रेक्षणीय होती. ऑफ चे शॉट्स पारणे फेडून टाकणारे होते. पंत समोर असतानाही राहुल स्ट्राईकवर यावा असे वाटत होते. गिल नि राहुल दोघेही जसे बाद झाले आहेत ते बघून प्रसिद्ध धडा घेईल अशी आशा ठेवूया. ठाकूर बदलेल अशी आशा ठेवूया.

मला ब्रॉक ला चॅलेंजिंग विकेट्स वर खेळताना बघायचे आहे. तो एकंदर जसा खेळतो ते सगळे बासनात गुंडाळून उभे राहण्याचे स्किल आहे का ते कळेल. त्यावरून दोन्ही कार्तिक(स) ना ब्रूक्स बद्दल बोलताना प्रत्येक वेळी आयसीसी रेटींग मधे दोन नंबरवर असलेला बॅटसमन असे म्हणणे बंधनकारक आहे का ? किती इरिटेटींग प्रकार आहे तो. प्रसिद्द ने लीज बॉल टाकला , ब्रूक ने फोर मारला तर लगेच 'आयसीसी रेटींग मधे दोन नंबरवर असलेला बॅटसमसीला असा बॉल टाकल्या वर हे एक्स्पेक्टेड होते' किंवा सिराजला क्रॉस बॅट शॉट मारल्यावर 'आयसीसी रेटींग मधे दोन नंबरवर असलेला बॅटसमन त्याची पॉवर दाकज्वत आहे'. हे काय आहे नक्की ?

पाकातली पोस्ट Lol

मॅच बघत नाहीये पण वाचतोय इथे.
आणि मध्ये मध्ये स्कोर कार्ड बघतोय.
आज राहुल आणि पंत ने सांभाळले.
मागच्या इनिंग मध्ये नंतर डाव कोसळला.
अश्या चुका व्हायला नाहै पाहिजेत.
इंग्लंडच्या शेपटाने भर घातली.

पंतचा एकंडर वर्कलोड बघता, बुमरा च्या बरोबर त्यालाही ब्रेक द्यावा लागेल असे वाटते. नायर्/साई च्या जागी जुरेल येईल म्हणजे पंत फक्त ब्बॅटसमन म्हणून खेळू शकेल १-२ कसोटींमधे.

बाशिरचा एक चेंडू खुप वळला व खाली राहिला. ( नशिबाने नायर पायचीत झाला नाही ). भारतासाठी हे चांगले लक्षण आहे ! >> टंग नि कार्सचे चेंडू अधिकच उसळत होते. एकंडर पिचेस ब्रेक डाऊन होतेय.

आपलेच ऑल आउट होत आहेत.. डिक्लेअर कधी करायचे याचे गिलला टेन्शन नको.

जडेजाला करुण नायरच्या आधी पाठवायला हवे होते या ईनिंगला. करुण नायरला थोडे वाईट वाटले असते पण चालले असते Proud

आयसीसी रेटींग मधे दोन नंबरवर असलेला बॅटसमसीला असा बॉल टाकल्या वर हे एक्स्पेक्टेड होते' किंवा सिराजला क्रॉस बॅट शॉट मारल्यावर 'आयसीसी रेटींग मधे दोन नंबरवर असलेला बॅटसमन त्याची पॉवर दाकज्वत आहे
>>
चक दे इंडिया मधली कॉमेंट्री आठवली

नवा बॉल राहुल बाद झाल्यावर अ‍ॅटॅक का नाहि केला देव जाणे ? तशाही विकेट्स जाणारच होत्या, किमान एजेस वगैरे लागून थोडेफार रन्स लागले असते.

आता १-२ उडाले तर मजा येईल. इंग्लंड तलवार परजतच येईल. उद्या क्लाऊडी डे असावा अशी आशा धरूया Happy

चक दे इंडिया मधली कॉमेंट्री आठवली >> Lol

ऑफिस मधून निघताना 332/4 होते
घरी आलो तर 362/9

त्या 30 पैकी 23 जडेजा च्या

पहिल्या डावात 41 मधे 7 जण गेले
आत्ता 31 मधे 6

India's top five vs bottom six in this Test
Top five: 721 runs
Bottom six: 65 runs
The difference of 656 runs bw top five and bottom six is the highest for India in a Test.

काही डिटरमीनेशन दाखवतच नव्हते. बॉडीलॅंग्वेज बघून जाणवते ते..
पहिल्या डावात ४१ मध्ये ७
आता ३१ मध्ये ६

डिक्लेअर करायची हीच योग्य वेळ होती. पण अशा विकेट टाकल्या नसत्या तर ३०-४० धावा जास्त असत्या..

इंग्लंड २१-०
उद्या ३५० हवेत.
वाईट गोष्ट म्हणजे आज जे काही खेळले त्यात बरेच कंफर्टेबल दिसले.
ऑल रिझल्ट पॉसिबल. मजा आहे उद्या. शुभरात्री.

"इंग्लंड तलवार परजतच येईल." - शेवटच्या दिवशी ३५० चं टारगेट, १० विकेट्स हातात, फारसं खराब न झालेलं पीच, बुमराह चा अपवाद वगळता सामान्य बॉलिंग अ‍ॅटॅक आणि बॅझबॉल - England's match to lose. (I would love to be proven wrong).

@ असामी,
पंत वर्कलोड बद्दल मी अगदी सेम पोस्ट लिहिली होती.
--------
पंत असेच धावा बनवत असेल तर ज्युरेल कीपर म्हणून खेळवून पंत फुल टाईम बॅट्समन म्हणून खेळवता येईल.
पंतला कीपिंग करायची नसल्यास तो शतक झाल्यावर उगाच मारण्यात विकेट न फेकता द्विशतक करून देईल. आजही तो खेळत असताना इंग्लंडने सामना सोडून दिला होता.

>> बुमराह चा अपवाद वगळता सामान्य बॉलिंग अ‍ॅटॅक आणि बॅझबॉल

अतिसामान्य !

पावसाचा व्यत्यय नाही आला तर इंग्लंड जिंकण्याची शक्यता जास्त.

फेफ म्हणाले तसं हे वरचं वाक्य चुकीचं ठरो अशी आशा आणि थोड्याशा का होईना अपेक्षा....

RIP दिलीप दोशी!! ७०-८० च्या काळातला एक चांगला लेफ्ट आर्म स्पिनर. हा सुद्धा बेदीच्या काळातलाच, पण गोयल-शिवलकरच्या तुलनेत नशीबवान.

*दिलीप दोशी!*. - RIP ! खूप काळ राष्ट्रीय संघात उपयुक्तता सिद्ध करून राहिलेला खेळाडू !!!
*....फारसं खराब न झालेलं पीच..* - तरी पण आज खराब होण्याची शक्यता असलेलं पीच; कांहीं चेंडू काल अचानक अधिक वळत होते व खाली रहात होते ! मला वाटतं इंग्लंड सामना वाचवण्यालाच अग्रक्रम देईल/ द्यावा !

आपल्या शेपटाची फलंदाजी व क्षेत्ररक्षण ( विशेषतः , क्लोज इन ) याबाबत खूपच मेहनत व शिस्त अत्यावश्यक आहे, हे निर्विवाद !!

लंच ला 30 ओव्हर्स मधे 117/0 स्कोअर आहे (3.9 चा रेट)
अजून 66 ओव्हर्स बाकी आहेत ज्यात 254 करायच्या आहेत (3.8 रेट नी)

सध्या तरी पारडं इंग्लंड च्या बाजूला झुकलं आहे...
प्रसिध ला आजही 6+ नी फोडलं आहे
शार्दुल च्या 3 ओव्हर मधे ही 5+ नी धावा गेल्या आहेत अन् ब्रेकथ्रू मात्र मिळाला नाहीये

जर बुमरा दोन टेस्ट खेळणार नसेल तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही...

लंच नंतर 17 ओव्हर्स मधे 98 रन चोपल्या आहेत
त्यात 13 अन् 15 व्या ओव्हर्स मधे प्रसिध ला विकेट्स आल्या...

आता 50 ओव्हर्स मधे 156 हव्या आहेत
अन् बोलिंग कुठल्याही अँगल नी त्याला रोखायला समर्थ दिसत नाहीये

We need a miracle...

ठाकूर दोन लागोपाठ
स्टोक्स तूर्तास कंफर्टेबल वाटत naajeey

लॉर्ड शार्दुल नी परत आल्यावर दुसऱ्याच ओव्हर मधे लागोपाठच्या बॉल वर डकेट आणि ब्रुक ला काढलं

Pages