Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ फेवरेट याचा अर्थ जिंकणे
“ फेवरेट याचा अर्थ जिंकणे असाच होत नाही कसोटी क्रिकेटमध्ये..” - और यह लगा सिक्सर!!!
दोन्ही डावात भारताला डॉमिनेशनची संधी होती असं काहीसं म्हणायचं असावं तुला.
या शब्दांच्या खेळात मुद्दा
या शब्दांच्या खेळात मुद्दा राहतो.
आपण हरलो. पण इंग्लंडने आपल्याला सर्व डिपार्टमेंट मध्ये मात दिली आहे का? तर नाही..
जेव्हा आपण पहिल्याच सामन्यानंतर म्हणतो की सिरीजमध्ये आपण दणकून मार खाणार आहोत तेव्हा त्या सामन्यात हे असे होणे गरजेचे. पण तसे झाले नाहीये.
फलंदाजीत आपल्या चार फलंदाजांनी पाच शतके मारली. दोन्ही वेळा फलंदाजांनी कॉलेप्स होण्याआधी आपल्याला गेम मध्ये पुढे नेले होते.
पहिल्या डावात झेल सुटले नसते , no ball wicket नसती तर गेम आपला असता ते सोडा पण गोलंदाजांचे सुद्धा आपण कौतुक करत असतो.
क्षेत्ररक्षणाचा चुका सुधारल्या जातील. डाव कोसळू नये याची काळजी फलंदाजीचा ॲप्रोच बदलून घेऊ शकतो.
दोन्ही संघ उन्नीस वीस असताना आणि खरे तर चौथ्या दिवसापर्यंत आपण त्यातले वीस असताना बरेच ठिकाणी निराशेचा आणि नकारात्मक सूर दिसतोय.
यामागे एक सायकॉलॉजीकल angel सुद्धा आहे.
म्हणजे पाच शतके मारून सुद्धा हरलो मग आता आणखी काय करणार, पुढच्या सामन्यात काही ती होणार नाहीत तर नक्कीच हरणार वगैरे विचार मनात लगेच घर करतात. मानवी स्वभाव!
पण तसे नसते कारण त्याच वेळी इंग्लंडसाठी सुद्धा काही त्यांचा हाच परफॉर्मन्स कायम नसणार. प्रत्येक सामना वेगळा असतो. मॅटर करते ते पोटेन्शियल. गोलंदाजीची बोंब आहे हे कबूल. पण दौरा सुरू होण्याआधी फलंदाजी सुद्धा इंग्लिश वातावरणात नवखी असल्याचे टेन्शन होते. ते निघून गेले आहे. त्यामुळे आता झोप सुद्धा छान येईल. शुभ रात्री.
जेव्हा आपण पहिल्याच
जेव्हा आपण पहिल्याच सामन्यानंतर म्हणतो की सिरीजमध्ये आपण दणकून मार खाणार आहोत तेव्हा त्या सामन्यात हे असे होणे गरजेचे. >> पहिल्याच सामन्यात मार खाल्ला तरच सगळ्या सामन्यांमधे मार खाणार हे लॉजिक डोक्यावरून गेलय. कोणाकडेच क्रिस्टल बॉल नाहिये पण दोन्ही संघ ज्या पॉईंटवर उभे आहेत नि बॅकप बघून जे उपलब्ध आहेत ते बघून शक्यता तर मांडता येतात ना ? तुझ्या पुढच्या पॅरामधल्या वाक्यात "फलंदाजीत आपल्या चार फलंदाजांनी पाच शतके मारली. " हे आलय. तेव्हढे होऊनही पुरेसे पडले नाही हा मुद्दा येतोच ना ? " गोलंदाजीची बोंब आहे हे कबूल. " हे म्हटल्यावर नि तो पटकन सॉल्व्ह होणारा इश्यू नाहिये हे बघता सिरीज कुठल्या दिशेने जाण्याची शक्यता अधिक वाटते ? मला चुकीचे ठरलो तर आनंदच होईल पण फाजील आत्मविश्वास बाळगण्याची गरज भासत नाही. सिरीज हरलो तरी नवोदित संघ एकत्र येणे मह्त्वाचे आहे, ते झाले तरी मिळवली.
सिरीज हरलो तरी नवोदित संघ
सिरीज हरलो तरी नवोदित संघ एकत्र येणे मह्त्वाचे आहे, ते झाले तरी मिळवली.
+1
“ नवोदित संघ एकत्र येणे
“ नवोदित संघ एकत्र येणे मह्त्वाचे आहे” +१
सिरीज जशी जशी पुढे सरकेल, तसं तसं ही टीम शुभमन गिल ची टीम होताना पहायला आवडेल मला. एकदम सगळे पीसेस जागेवर पडतील असं नाही, पण त्या प्रवासाची सुरूवात तरी व्हायला हवी.
४-५ झेल सोडून अशी निर्लज्ज
४-५ झेल सोडून अशी निर्लज्ज कृती कशी काय करु शकतो कुणी?
अशाचमुळे रहाणेने भर सामन्यात याला मैदानाबाहेर पाठवलं होतं बहुधा.
फाजील आत्मविश्वास बाळगण्याची
फाजील आत्मविश्वास बाळगण्याची गरज भासत नाही.
>>>>
तो कोणी बाळगला आहे इथे?
नकारात्मक विचार न करणे म्हणजे डायरेक्ट फाजील आत्मविश्वास होतो का?
भारत पुढचे सगळे सामने जिंकेल असे म्हणत आहे का कोणी इथे?
उलट ही मालिका आपण तिथे हरायला जात आहोत असेच वाटत होते.
कारण गोलंदाजी मार खाते आपली हे ओळखायला काही पाहिला सामना व्हायची गरज नव्हती. ते आपण आधीच्या मालिकेत पाहिले आहेच. त्यात आयपीएल मध्ये दमून आलेले आहेत सारे.
पण फलंदाजी सुद्धा नवखी आहे आणि ती सुद्धा काही विशेष करणार नाही असे वाटत होते ती एक चिंता तरी थोडीफार मिटली आहे. फलंदाजांनी फॉर्म दाखवला आहे.
पण पहिल्या सामन्यातील खेळामुळे खरे तर आता लढत देऊ अशी आशा वाटत आहे.
सोच का फरक है..
आशा करतो चाहते कसाही विचार करूदेत किमान भारतीय खेळाडू आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासोबत असणारा सपोर्ट स्टाफ माझ्या सारखा विचार करत असतील.
या वर मुलांनो (कम ऑन गाईज) हा
या वर मुलांनो (कम ऑन गाईज) हा खेळ आहे. लहान लहान पोरं इंग्लंडला खेळायला गेलेत ते काय सैनिक वैगरे बनून लढायला नाही गेलेत. करू द्या थोडी मजा मस्ती. सध्या रोज वाईट घटना घडत आहेत ते पाहता आपली पोरं इंग्लंडला सुखरूप पोहचली यातच आनंद आहे. हार जीत तर काय होत राहते.
उलट ही मालिका आपण तिथे हरायला
उलट ही मालिका आपण तिथे हरायला जात आहोत असेच वाटत होते. >> वेट, हरलोच आहोत आपण पहिला सामना ! पाच शतके लागूनही हरलो आहोत. तू वेगळी मालिका बघतो आहेस का ? दोन सलग मालिकांमधे बॉलिंगच्या त्रुटी उघड्या झाल्यावरही कसला कप्पाळचा "सोच का फरक है.." करताय राव ? " सिरीज हरलो तरी नवोदित संघ एकत्र येणे मह्त्वाचे आहे, ते झाले तरी मिळवली." ह्याला नकारात्मक विचार म्हणत असशील तर खरच "सोच का फरक है.." म्हणायचे.
पहिल्या सामन्यानंतर लगेच
पहिल्या सामन्यानंतर लगेच सिरीज हरलो तरी अमुक तमुक झाल्यास समाधान.....
किलर इन्स्टिंक्टचा अभाव वाटतो हा मला..
खरेच सोच का फरक आहे.
आणि हो..
आणि हो..
मूळ नकारात्मक वाक्य हे कोट केले होते. ते पलटू नका
४-० किंवा ५-० अशक्य नाहित.
Submitted by असामी on 25 June, 2025 - 00:49
सगळीकडे 4-0…5-0 असा सूर आहे जो पटत नाही.
पाच शतके मारून जिंकलो नाही म्हणून असा नकारात्मक सूर लागला आहे.
मूळ नकारात्मक वाक्य हे कोट
मूळ नकारात्मक वाक्य हे कोट केले होते. ते पलटू नका >> कधी बदलले वाक्य ? अजूनही पोस्ट तसेच आहे. "नकारात्मक विचार न करणे म्हणजे डायरेक्ट फाजील आत्मविश्वास होतो का?" हि संधी तू जोडली आहेस, मी नाही. मी अजूनही तेच म्हणतोय " सिरीज हरलो तरी नवोदित संघ एकत्र येणे मह्त्वाचे आहे, ते झाले तरी मिळवली." मी सामना सुरू होण्याआधीपासून ह्याच भूमिकेमधे आहे.
पाच शतके मारून जिंकलो नाही
पाच शतके मारून जिंकलो नाही म्हणून असा नकारात्मक सूर लागला आहे.
>>
हे केवळ तुझं मत आहे.
बाकी लोकांना विस्कळीत बोलिंग, खराब फील्डिंग, शेपटानी काहीही लढत न देता टाकलेली नांगी, बॉलर्स हाताळण्यात अपयशी कॅप्टन या व अशा बऱ्याच वेग वेगळ्या कारणांनी असं वाटतं आहे...
ओके
ओके
ग्लास अर्धा रिकामा आहे
ग्लास अर्धा भरलेला आहे
शुभरात्री
ग्लास संपवायला गेलास का ?
ग्लास संपवायला गेलास का ?
ग्लास अर्धा रिकामा आहे
ग्लास अर्धा रिकामा आहे
ग्लास अर्धा भरलेला आहे
>>
मॅच ड्रॉ झाली असती तर असं म्हणता आलं असतं
पण ग्लास थोडासाच भरलाय अन् बराच रिकामा आहे...
एक सकारात्मक लेख
एक सकारात्मक लेख
जे मला म्हणायचे होते ते यात आलेय
https://www.espncricinfo.com/story/eng-vs-ind-2nd-test-how-india-almost-...
तो लेख बॉलिंग एव्हढी काही
तो लेख बॉलिंग एव्हढी काही वाईट नव्हती असे म्हणतोय रे. तू पाच शतकांच्या भरवशावर किल्ला लढवत होतास. वेगळ्या गोष्टी आहेत. आता हे सगळे अध्याॠतच होते वगैरे म्हणत असशील तर जाऊ दे.
मी बॅटिंगचे सुद्धा कौतुक केले
मी बॅटिंगचे सुद्धा कौतुक केले आणि गोलंदाज क्षेत्ररक्षण तळाची फलंदाजी हे सारे पुन्हा तसेच वाईट होणार नाही, सुधारणे शक्य आहे हा विश्वास सुद्धा दाखवला.
तसेच भारतच चार दिवस ही कसोटी डॉमिनेट करत होती हे सुद्धा म्हटले होते.
त्या साईटवरचा आर्टिकल माझ्या या एकूण एक विचारांना सपोर्ट करत आहे.
India dominated large chunks of it with bat and ball, but still lost. Despite the somewhat-deserved flak the Indian bowlers are getting, they consistently created more chances than England's bowlers did.
India have to back themselves to get into good positions with the bat again, and be more ruthless if they do.
The main job is to get into those positions again. In the Tests Jasprit Bumrah plays, the bowling will only get better. The inexperienced Prasidh showed significant improvement over five days at Headingley. Mohammed Siraj can't continue being unlucky for too long. Kuldeep Yadav, Akash Deep or Arshdeep Singh will be an improvement over Thakur. The matches without Bumrah will be a challenge, but they should all individually get better by then, provided Bumrah plays the Edgbaston Test, which starts next Wednesday. One of the improvements they will need to make is to bowl better lines, according to the field, and keep England under 4.5 an over.
The Headingley defeat was galling, the kind that can be difficult to recover from, but India have the batting to get back into positions they can dominate from. Their bowling is not much behind England in terms of quality and experience.
आणि हे बघा मी वरतीच लिहिलेले.
पहिल्या डावात झेल सुटले नसते , no ball wicket नसती तर गेम आपला असता ते सोडा पण गोलंदाजांचे सुद्धा आपण कौतुक करत असतो.
क्षेत्ररक्षणाचा चुका सुधारल्या जातील. डाव कोसळू नये याची काळजी फलंदाजीचा ॲप्रोच बदलून घेऊ शकतो.
चल त्यांनी ते आर्टीकल तुझेच
चल त्यांनी ते आर्टीकल तुझेच पोस्ट्स वाचून लिहिले असे म्हणूया. तुला खरच फरक कळत नसेल तर जाऊ दे. एव्हढे कट पेस्ट करायचा कंटाळा येतोय शुक्रवारी.
मलाही कंटाळा आलेला... पण
मलाही कंटाळा आलेला... पण माझेच विचार त्यात दिसले म्हणून कष्ट घेतले
आता दुसर्या कसोटी
आता दुसर्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडा.
बुमराह नसेलच, प्रसिद्ध कृष्णा तरी असेल का? का कुणि भारतातून बोलवायचे आर्शदीपच्या जोडीला?
नि करुण नायर नि साई सुंदरन यांचे काय? का पृथ्वी शॉ ला बोलवायचे? तेंडुलकरचा आवडता आहे तो.
कॅप्टन गिलच की पंत, की राहुल?
आयसीसीने ' वाइड बॉल' ' च्या
आयसीसीने ' वाइड बॉल' ' च्या नियमात गोलंदाजांना दिलासा देणारा बदल केला आहे. शेवटी, कुणाला तरी फलंदाजांच्या बाजूनेच सर्व नियम कलताहेत हे जाणवलं, असं दिसतंय !
त्या साईटवरचा आर्टिकल माझ्या
त्या साईटवरचा आर्टिकल माझ्या या एकूण एक विचारांना सपोर्ट करत आहे.
>>
हा अग्रलेख वाचा
या फेफरवाल्याचा अन् माझा मत तर बराब्बर जमताय...
“ हा अग्रलेख वाचा
“ हा अग्रलेख वाचा
या फेफरवाल्याचा अन् माझा मत तर बराब्बर जमताय” -
इंडिया वि. इंग्लंड - मुलींची
इंडिया वि. इंग्लंड - मुलींची मॅच मस्त चाललीय. स्मृती मंधाना ने कडक सेंच्युरी मारली आणि बॉलर्सने इंग्लंडच्या नाड्या आवळल्या आहेत. इतक्या फ्लॅट पीचवर सुद्धा इंडियाचे स्पिनर्स मस्त बॉलिंग करतायत.
इंग्लंडने स्मृतीला एका धावेनं
इंग्लंडने स्मृतीला एका धावेनं हारवलं.

या फेफरवाल्याचा अन् माझा मत
या फेफरवाल्याचा अन् माझा मत तर बराब्बर जमताय >>
शेवटी, कुणाला तरी फलंदाजांच्या बाजूनेच सर्व नियम कलताहेत हे जाणवलं, असं दिसतंय ! >> चार नियम फलंडाजांच्या बाजूने करतात पण हो
उद्यापासून दुसरी कसोटी सुरु
उद्यापासून दुसरी कसोटी सुरु होत आहे. सगळीकडे घमासान चर्चा चाळू आहे. कोण आत कोण बाहेर. मायबोलीवर मात्र सारे कसे शांत शांत . आश्चर्य आहे.
कोण आत कोण बाहेर मॅटर नाही
कोण आत कोण बाहेर मॅटर नाही करत.
बुमराह आहे की नाही हे उद्याच समजेल.
आणि मॅचचे म्हणाल पंतचे पुन्हा शतक यायला हवे.
एकही चालेल. पण यंदा विजयात.
या मालिकेत त्याने द्विशतक मारावे अशी फार इच्छा आहे.
Pages