क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टॅटिस्टिक्स एखाद्या लेखापालासारखे असते, ज्याला फक्त किंमत आकड्यात दिसते मूल्य नाही >> मला ह्यापेक्षा स्टॅटिस्टिक्स एखाद्या मिनि स्कर्ट सारखे असते. हा कोट जास्त अ‍ॅप्ट वाटतो. Happy

मिनी स्कर्ट नाही रे, बिकिनी बिकिनी
(टोन : अनुराधा नाहीं, बिंदू बिंदू )

Business Professor and economist Aaron Levenstein once said, “statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.”

Happy मी चर्चिलचा कोट धरत होतो रे - good conversation should be like mini skirt, long enough to cover the subject and short enough to create the interest. दोन्ही मिक्स झाले Happy

असामी कमिन्स आणि स्टार्क अपवाद आहेत.>>> कमींस आणि स्टार्क माहीत आहेत पण असामीजी तुम्ही कुठल्या टीमकडून खेळता?

हे काय प्रकरण आहे?

IPL हंगामाच्या सुरुवातीला एक अनपेक्षित आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक इरफान पठान याला यंदाच्या आयपीएलच्या कमेंट्री पॅनलमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्यावर काही खेळाडूंनी वैयक्तिक अजेंडा चालवण्याचा आरोप लावला असून त्यामुळेच इरफानला या पॅनलमधून वगळण्यात आल्याचे समजते.

कुठल्या खेळाडूंवर टीका केली माहीत नाही. कारण भारतीय कर्णधार रोहीत शर्माच्या तर तो प्रचंड प्रेमात आहे.
विराट कोहली, येस त्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बरेच परखड मत व्यक्त केले होते गावस्कर सोबत.
अजून कोणाबद्दल रोखठोक म्हणाला कल्पना नाही.

काही जण त्याचा भाऊ युसुफ पठाण तृणमूल काँग्रेस खासदार असल्याने राजकारण झाले म्हणत आहे तर कोणी मुस्लिम भाजप अँगल जोडत आहेत.

मला राजकारणात रस नाही आणि काही समजत सुद्धा नाही.
ड्रेसिंग रूममध्ये काय चालते ते सुद्धा नेमके माहीत नाही.

पण भारत जिंकल्यावर दरवेळी सर्वात जास्त इरफान पठाण याला आनंदाने नाचताना पाहिले आहे.
अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले तेव्हाही कसला खुश होता.

सच्चा भारतीय क्रिकेट चाहता आहे तो हे दिसून येते. त्यामुळे वाईट वाटले.

ड्रेसिंग रूममध्ये काय चालते ते सुद्धा नेमके माहीत नाही. >> टी.व्ही वर गांगूलीला रूमच्या बाहेर आलेले पाहून त्याने काय विचार केला हे सांगणारा तू ! ही वेळ आली तुझ्यावर ! Wink बॉलर्स वर टीका केली होती पठाणने ती वाचलेली - जी फार ऑड होती.

टी.व्ही वर गांगूलीला रूमच्या बाहेर आलेले पाहून त्याने काय विचार केला हे सांगणारा तू !
>>>>>

ओह, सचिन १९४ नाबाद.
ते तर उघड होते. दादाने सरळ सरळ बोट दाखवून इशारा केलेला लाईव्ह पाहिलेले.

“ ते तर उघड होते.” - मॉडेस्टी मॉडेस्टी म्हणतात ती काय वेगळी असते? खेळाडूंच्या मनातल्या गोष्टी ओळखणार्या, पावसाचे चार शिंतोडे पडल्याबरोबर डीएलएस चं टारगेट मॅच रेफ्रीच्या आधी कॅल्क्युलेट करणार्या महात्म्याने इतका पराकोटीचा नम्रपणा दाखवावा! कमाल आहे!! Happy Happy

अय्यर अर्धशतक
यावेळी पंजाब आयपीएल ट्रॉफी जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका..
अय्यर अश्या फॉर्ममध्ये आहे जिथे जातोय तिथे ट्रॉफी जिंकतोय Happy

हे नडले इरफान पठाण याला.
विराट कोहलीवर टीका केली.
गेला कॉमेंट्री पॅनल मधून बाहेर.
इथे फक्त उदो उदो करणाऱ्यांना जागा आहे.

१) सुपरस्टार कल्चर आणि विराट कोहलीच्या कसोटी संघातील जागेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
https://youtube.com/shorts/QEGp7sLg1y4?si=Y5I2uo2g3eoRP0OF

२) विराट कोहली सातत्याने कसोटीत एकाच प्रकारची चूक करतोय यावर टिप्पणी केली
https://youtube.com/shorts/u40gNMw_zcI?si=p8L20Tu8c727JYt-

रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त! >> थोडेसे वाईट वाटले. त्याच्या सेकंड इनिंगला साजेशी इनिंग झाली असती तर छान वाटले असते. त्याच्या अल्प पण तरीही इंपॅक्टफुल कॅप्टन्सीला पण साजेसा शेवट मस्त वाटला असता. किवीज नि ऑसीजच्या दौर्‍याच्या वाईट आठवणींशी निगडीत शेवट नकोसा वाटतो.

बुमरा - गिल काँबो येतील असे वाटते. दुखापतग्रस्त बुमरा दुर्दैवाने शॉर्ट टर्म उपाय वाटतो. गिलला तीन वर ढकलून पाची टेस्ट्स खेळाव्या लागतील.

कॉनवे ला काय झालय नक्की ? केव्हढा गंडलेला वाटतोय सध्या. सी एस के चे काही कळत नाही. दुबे गेल्या वर्षी जबरदस्त खेळत होता. यंदाही त्याने सुरूवात नीट केली होती तर त्याला वर-खाली करून निव्वळ फुकट घालवलाय.

कसोटी कप्तानी बुमराह आणि गिल असेच मलाही वाटते.
दुसरीकडची पोस्ट कॉपी पेस्ट करतो.

संघात जागा बुमराहची एकट्याचीच पक्की वाटत आहे. पण फिटनेस पाहता तो सर्व कसोटी खेळू शकत नाही. खेळवू सुद्धा नये.
गिल अजून आपल्यातील क्षमतेला न्याय देणारे कसोटीत खेळत नाहीये. पण त्याला काढून घेणार तरी कोणाला अशी स्थिती असल्याने त्याची जागा पक्की समजून लाँग टर्म विचार करता त्याला कर्णधार किंवा तूर्तास उपकर्णधार तरी बनवता येईल.

राहुलही स्वतः कप्तान म्हणून इंटरेस्टेड असेल असे वाटत नाही. गंभीरने नेहरासारखे बाऊंडरी वर उभे राहून गाडा हाकलावा Wink

राहुलची जागा कसोटीत पक्की नाहीये. लिमिटेडमध्ये तो चांगल्या फलंदाजीसोबत विकेट कीपिंग सुद्धा करतो. पण कसोटीत निव्वळ फलंदाज म्हणून त्यात सातत्याचा अभावच आहे. एकूणच आपला कसोटी फलंदाजीचा दर्जा खालावल्याने अध्येमध्ये वासरात लंगडी गाय वाटतो तितकेच..

श्रेयस अय्यरचा विचार करायला काय हरकत आहे ?
>>
तसं पाहिलं तर योग्य प्रोफाईल
पण सध्या कसोटी संघाबाहेर (कोहली 4 नंबर चा स्लॉट सोडे पर्यंत तिथे चान्स मिळण्याची शक्यता कमी)
3 वर खेळवायचं तर प्रिन्स गिल चं काय करायचं??
5 वर खेळवावं तर त्याला स्लॉट सूट होत नाही

रहाणे ला परत एक चान्स द्यावा का? सध्या फॉर्म चांगला, 5 वर खेळतो, नखरे नाहीत अन् कॅप्टन म्हणून प्रूव्हन
एक ते दोन वर्षाचा प्लॅन करून तेवढ्यात पंत / अय्यर / गिल ना ग्रूम करता येईल. जो चांगला ग्रूम होईल तो पुढे कॅप्टन...

आणि जयस्वाल सोबत ओपन कोण करणार?
गिल तयार झाला तर खूप प्रश्न सुटतील. पण नाही झाला तर?
ऋतुराज इंज्युअर्ड, पृथ्वी चा ऐटीट्यूड प्रॉब्लेम, मयंक आउट ऑफ साईट, राहुल हाच पर्याय दिसतो पण तो ही भरवशाचा नाही

अय्यर सेना देशात कसोटी खेळला आहे का अजूनपर्यंत? त्याशिवाय त्याची जागा संघात पक्की होत नाही. त्यामुळे त्याचा कर्णधार म्हणून विचार होऊ शकत नाही.

बाकी कोहली संघात आहे तोपर्यंत अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. चौथ्याचा हट्ट कश्याला. पंत सहाव्या क्रमांकावर खेळेल.

बाकी कोहली संघात आहे तोपर्यंत अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. चौथ्याचा हट्ट कश्याला.
>>
कोहलीला सोडू दे की चौथ्या चा हट्ट
तशीही खूप वर्ष नाही राहिली त्याची

अनलेस कमल फॉर्म मधे आला तर

काढून टाका कोहलीला. मला काही आक्षेप नाही.
पण जर तो संघात आहे तर तो चौथा आणि अय्यर पाचवा हेच योग्य आहे.
आणि अय्यर मोठे फटके लीलया मारतो. गरज पडल्यास तळाच्या फलंदाजाना घेऊन इतर कोणापेक्षा तो जास्त चांगला खेळू शकतो असे मला वाटते.

पण जर तो संघात आहे तर तो चौथा आणि अय्यर पाचवा हेच योग्य आहे. >> +१. अय्यरवर मुख्य आक्षेप हाच होता कि शॉर्ट पिच्ड बॉलिंग खेळता येत नाहि पण दोन आयपीएल मधे त्याने त्यावर काम केलेले दिसते आहे. त्याआधी त्याची चर्चा भावी कप्तान म्हणून होत होती. अजून कोणीही त्याच्या कॅप्टन्सीवर शंका घेतल्याचे वाचलेले/ऐकलेले नाहिये. तो संघात असे ल तर खरच त्याचा विचार केलेला बरा. हा दौरा खडतर असेल हे लक्षात घेऊन गिलला बळीचा बकरा बनवण्यात काही हशील नाही. त्याला उपकतान करून सातत्याने पाची टेस्ट्स खेळू दे.

गिल तयार झाला तर खूप प्रश्न सुटतील. पण नाही झाला तर? >> नको, राहुल ला दोन दौर्‍यांचा अनुभव आहे. परत ऑस्ट्रेलियामधे त्याने त्याच्या टेक्निकमधला बदल दाखवला आहे. तो अधिक सूटेबल होईल. पण पंटच करायचा असेल तर - इंग्लंड सध्या ज्या तर्‍हेचे क्रिकेट खेळते ते बघून त्यांना प्रतिशह द्यायचा असेल तर अतिअ‍ॅग्रेसिव्ह ओपनर घेऊन जा. फेल्युअरचा विचार न करता 'गो हार्ड' ची परवानगी देऊन त्याला खेळू द्यावे (लेफ्टी असेल तर अजूनच चांगले कारण तेव्हढे स्विंग विरुद्ध अधिक प्रोटेक्शन मिळेल. ) - प्रियांश आर्य किंवा प्रभसिमरन सिंग (वैभव किंवा आयुष खूपच बच्चे आहेत म्हणून नको). जाता जाता त्या सर्फराजला एक तरी सामना बाहेर खेळून किमान फेल व्ह्यायची संधी तरी द्या रे , त्यावर खेळता येत नाही हा शिक्का मारण्याआधी.

साई सुदर्शनला संघात कुठे तरी - १५ मधे - बघायला आवडेल. तो ग्राऊंड शॉट्स मारतो नि त्याने जबरदस्त टेंपरामेंट दाखवले आहे.

Pages