मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायनली ! गार्डियन मधे असे आर्टिकल अजून कसे आले नाही याचीच वाट पाहत होतो, आणि ते आलेच.

The one change that worked: I stopped listening to podcasts – and my mind flooded with ideas

https://www.theguardian.com/lifeandstyle/2026/aug/31/the-one-change-that...

Lol हे आर्टिकल एकदम 'पेहेमे मै बोहोत मोटा था, जंक खाता था, एक जगह बैठके टीव्ही देखता रेहेता था, बाबा मंगतराम बंगालीने मेरे जीवन मे बदलाव ला दिया' छाप आहे. Biggrin

The one change that worked: I stopped listening to podcasts
आता या शीर्षकाचे पॉडकास्ट आले की मी सु डो मी !

Lol

आरपार मध्ये स्मिता जयकरची मुलाखत ऐकली. आवडली. पाठारे प्रभू दिसतायत. का माहीत नाही खूप फॅमिलिअर स्टाइल वाटली तिच्या बोलण्याची. सीकेपी आणि पाठारे यांच्या वागण्याबोलण्यात साम्य असेल तर माहीत नाही पण लहानपणी बाबांकडच्या काकी, आत्या वगैरे जश्या ऐकल्या तसेच वाटले ऐकताना. आत्मविश्वास, प्रॅक्टिकॅलिटी हे सगळं आठवलं.

वीणा पाटील यांनी घेतलेल्या दोन मुलाखती उत्सुकतेने बघितल्या. अच्युत गोडबोले, भरत दाभोळकर.
हे सेलिब्रिटी लोक कामानिमित्ताने चिकार जगभर फिरत असतात त्यामुळे खरंतर त्यांच्याकडे त्याबद्दल सांगण्यासारखं खूप असू शकेल म्हणून त्यांच्या प्रवासांवर, त्यातल्या किश्श्यांवर मुलाखतींचा जास्त भर असेल असं वाटलं होतं पण तसं काहीच दिसलं/ऐकू आलं नाही. बराचसा वेळ त्यांच्या करीयरवर बोलण्यातच गेला. त्याबद्दल त्यांच्या इतरत्र असलेल्या मुलाखतींमध्ये असंख्यवेळा ऐकून झाले आहे. त्यामुळे कंटाळा आला. वीणा पाटीलही मध्येमध्ये बोलून संभाषण फार तोडतात असं वाटलं.

https://www.youtube.com/watch?v=Ir8E2xCixdE

मायो ही जपानी मुलगी भारताबद्दल चांगलं मत जपानमधे मांडते. ती उत्तम हिंदी बोलते. तिचे अनेक व्हिडीओज पाहिले आहेत. लेख वाचलेले आहेत. काही बाळबोध आहेत, काही भारताबद्दलची निरीक्षणे भाबडी होती. पण आता अनुभवाने ती भारतात येणारे टिपिकल अनुभव सुद्धा सांगते, पण तक्रार नाही. त्याच वेळी जपान मधे लग्न न होण्याच्या प्रॉब्लेमवर बोलते. प्रश्न विचारणारे जरा आंडदांडच आहेत.

जपानमधे अ‍ॅरेज्ड मॅरेज हा प्रकार नाही याबद्दल तिने पूर्वीही सांगितलेले आहे. एकत्रित कुटुंबव्यवस्थेबद्दल तिचं मत चांगलं आहे. ते प्रत्येक जपान्यांचं असेल असं नाही. एकूणच खूप प्रगती किंवा खूप बुरसटलेपण हे काहीच कायमचे प्रश्न सोडवत नाहीत असं वाटलं. प्रगती नवे प्रश्न घेऊन येते. ज्यांची लग्नं होत नाहीत ते दुर्दैवी होत. पण जपानमधे काही बागांमधे विवाहेच्छुक मुला मुलींच्या पालकांचे मेळावे भरतात. तो प्रकार नवलाईचा आहे. ज्यांची लग्नं होतात ते सुखी. पण जोडीदार न सापडणे खूपच दुर्दैवी आहे. सोशल सर्कल नसणे, माहिती न मिळणे (आजच्या युगात) अजब आहे. वर्कोहोलिक असावं, पण जीवन पण जगावं

हे सगळं या मुलाखतीत नाही आलेलं. पण एक असा व्हिडीओ पाहिलात कि फीडमधे येईलच ते.

स्मिता जयकरांनी डॉक्टर अनिल जोशींची घेतलेली मुलाखत आवडली. स्मिता जयकर वय छान कॅरी करतात. ग्रेसफुल वाटतात.
डोक्टर अनिल जोशी यांचे फिल्ड आपल्यासाठी किती वेगळे आहे. मेडिकल फॉरेन्सिक सायन्स, पोस्टमार्टेम या विषयावर सिनेक्षेत्रातल्या अभिनेत्रीने मुलाखत घ्यावी याचंच अप्रूप जास्त वाटलं. पण मुलाखत छान होती. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व किस्से अद्भुत होते.

राम दास - रिचर्ड आलपर्ट - ही इज अ जिनिअस. हा माणूस त्याचे विचार मला फार आवडतात. हा इन्टरव्ह्युअर फार अ‍ॅबसर्ड, मठ्ठ प्रश्न विचारतोय. ऐक ना ते काय सांगतायत ते.

आशा फॅन साठी. हृदयनाथ ह्यांची मुलाखत उत्तरा मोने नी घेतली आहे. आशाताई आणि मी असे शीर्षक आहे. आज सह्याद्री ने ती यूट्यूब वर प्रसारित केली आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

हिच्याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. अजून हिला जिवंत कसं ठेवलंय असा प्रश्न पडला मुलाखत ऐकताना.
मायबोलीवरच्या काही आयड्यांनी नक्कीच बघायला हवी.

https://youtu.be/3aceWlkot_4?is=G7hlD1mIqmVPHDHm

मायबोलीवरच्या काही आयड्यांनी नक्कीच बघायला हवी.>>> काहीही फरक पडणार नाही. बाकीचेच धर्म कसे चुकीचे आहेत यावर सार्कास्टीकली टिपण्या/टोमणे होतील.

काहीही फरक पडणार नाही. बाकीचेच धर्म कसे चुकीचे आहेत यावर सार्कास्टीकली टिपण्या/टोमणे होतील.>>>+१

ह्या इन्टरव्ह्यु मधली ती मुस्लिम बाई ‘नाझिया सनातनी‘ हिंदू धर्माचं कौतुक करत स्वतःच्या धर्माला नावं ठेवतेय हे अजूनही पचनी पडत नाहीये माझ्या. म्हणजे मुस्लिम असून देवळात जाणं, कुंकू लावणंही समजू शकते. पण स्वतःच्या धर्माविरूद्ध उभी राहिली आहे आणि अजूनही जिवंत आहे ह्याचं आश्चर्य वाटतंय. म्हणजे राहू देतच.

थिंकबँकवर मुक्ता बर्वेची मुलाखत काल ऐकली. आवडली. एकदम प्रगल्भपणे बोलली आहे. विचारपूर्वक उत्तरं दिली आहेत. नाटकाचा प्रयोग कुठे करतोय, यावर कलाकार अभिनय 'फाईन ट्यून' करतात, याबद्दल ऐकायला मजा वाटली.
https://youtu.be/WDJ80gB5dBk?si=-8QpjQM-WRFO1VF0

नाटकाचा प्रयोग कुठे करतोय, यावर कलाकार अभिनय 'फाईन ट्यून' करतात, याबद्दल ऐकायला मजा वाटली. >>> इंटरेस्टिंग. बघते.

वावे, मुक्ता बर्वेची मुलाखत पाहिली.
छान बोलली आहे ती.
बोलताना तिचा खालचा पट्टीतला सूरही परिणाम करतो.

Pages