..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

8/4

ओ हरे ताड (ताल) मिले नदी के जल मे..

हुश्श, नेटवर्कची नाटकं चालू आहेत. मघसपासून उत्तर टाकायचा प्रयत्न करतेय. आत्ता झालं. म्हटलं, नव्या बाफवर खातं खोलायचा मौका कधी मिळतोय देव जाणे! Proud

बरोबर श्र. तालवृक्ष म्हणजेच ताडाचं झाड.

८/ ४

पंचवटीतील पर्णकुटीतून राम घाईघाईनं बाहेर पडला. पर्णकुटीत सीता मूर्छित होऊन पडली होती. जवळच्या वस्तीवरून राहणार्‍या एका वैद्यमुनींनी सीतेला तपासलं ( नाही नाही, त्यांनी नाडी बघून 'सीता अब राम के बच्चे की मां बननेवाली है' वगैरे काही घोषित केलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे तोवर हिंदी सिनेमे जन्माला आले नसल्याने असला काही ड्रामा करण्याचं त्यांना कारण नव्हतं. दुसरं कारण असं की तसंही सीतेला बाळं बरीच नंतर झाली. ) तर सीतेला तपासून त्यांनी सांगितलं की हे अतिउष्णतेमुळे झालं आहे. एखाद्या पामच्या हिरव्यागार झावळ्या आणून सीतेच्या अंगावर पांघरल्यास तिला आराम मिळेल.

राम पर्णकुटीतून बाहेर पडून जंगलात भटकत हिरव्या झावळ्या शोधत होता पण सगळी पामची झाडं सुकलेली दिसत होती. शेवटी एका नदीच्या पात्रात त्याला हिरव्या पानांनी डवरलेली पामची झाडं दिसली आणि त्या झावळ्या घेऊन परत आला.

' इतका वेळ का लागला, दादा?' लक्ष्मणानं विचारलं.
रामानं सगळी रामकहाणी सांगितली.
' मग कुठे मिळाल्या या हिरव्या झावळ्या?' लक्ष्मणानं उत्सुकतेनं विचारलं.
उत्तरादाखल राम गाऊ लागला ........

उत्तर : (श्रद्धा)

ओ, हरे ताल मिले नदी के जल मे

८/५.
ती फिरायला जाते, एकटीच अगदी लांब लांब, मोठा समुद्र किनारा, नुसती वाळू असते. आस पास चिट पाखरूही नसतं.
ती निवांत बसते ध्यान लावून, डोळे मिटुन. इतक्यात तिला जवळपास काही तरी आहे असं वाटतं मग मांडीला स्पर्शही जाणवतो. ती दचकून डोळे उघडते आणि पहाते तर काय एक कुत्र्याचं पिल्लु असतं मांडीवर डोके टेकून बसलेलं, छान हिरवे हिरवे केस असतात त्याचे. आणि ती दचकली पाहून ते तिला चक्क म्हणतं " हे हे कशी घाबरली!"
तर ती कोणतं गाणं म्हणेल?

बिंगो वावे!

८/५.
ती फिरायला जाते, एकटीच अगदी लांब लांब, मोठा समुद्र किनारा, नुसती वाळू असते. आस पास चिट पाखरूही नसतं.
ती निवांत बसते ध्यान लावून, डोळे मिटुन. इतक्यात तिला जवळपास काही तरी आहे असं वाटतं मग मांडीला स्पर्शही जाणवतो. ती दचकून डोळे उघडते आणि पहाते तर काय एक कुत्र्याचं पिल्लु असतं मांडीवर डोके टेकून बसलेलं, छान हिरवे हिरवे केस असतात त्याचे. आणि ती दचकली पाहून ते तिला चक्क म्हणतं " हे हे कशी घाबरली!"
तर ती कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर: बोले रे puppy हरा, puppy हरा.

८ / ६

अत्यंत श्रीमंत अश्या करमचंद कुटुंबात लग्न होऊन आलेल्या मोठ्या मुलाच्या नव्या बायकोचं घरात खूप कोडकौतुक आणि लाड होत होते. अपवाद होता फक्त करमचंदांचा धाकटा मुलगा - तनिष. तसा लहानच होता तो - शाळकरी आणि भयंकर खोडकर. आपल्या नव्या वहिनीच्या खोड्या काढायला त्याला भारीच आनंद वाटत असे. त्याच्या या सततच्या खोड्यांनी नवी सून त्रस्त झाली होती पण तक्रार कोणाकडे करणार ? एकटीच असताना ती बिचारी गाणं म्हणू लागली ......

८/3- लहान साकेत ला जांभूळ हे फळ फार आवडत असे.. एकदा त्याला घरचे जत्रेत फिरायला घेऊन गेले. जत्रेत एक स्टॉल एका शेतकऱ्यांने लावला होता, त्यात विविध प्रकारचे फळे लावली होती, त्यात एक प्रचंड मोठे जांभूळ होते... साकेत जांभूळ बघण्यात इतका गुंग झाला कि आई बाबा यांचा हात कधी सुटला कळले नाही. हरवलेल्या साकेत ला आईबाबा दोन तासानंतर भेटले...
दुसऱ्या वेळी मात्र जत्रेत तो ठरवतोच की ते जांभूळ त्याला हवेच... तो आईबाबांना सांगतो की मला त्या जांभळासोबत प्रेम झालेय.. तो तिथून हलायलाच तयार नाही होत.. हळूहळू बातमी पसरते तिथे की एक मुलगा इतका जांभूळ वेडा झालाय.. इंडिया टीव्ही योगायोगाने तिथे असतात, ते त्याची मुलाखत घेतात विचारतात तू या जांभळासाठी काय करू शकतो... तो म्हणतो मी जीव देऊ शकतो...
उत्तर - झिलमिल

फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया
सेकंड टाइम में लव हो गया
यह अक्खा इंडिया जानता हैं
हम तुमपे मरता हैं
दिल क्या चीज हैं जामुन
अपनी जान तेरे नाम करता हैं

८/६ -
तकदीर(तक - तनिष करमचंद ,दीर) का फसाना जाकर किसे सुनाए..

हे सही आहे श्र Happy हेच उत्तर असो वा नसो. अशा प्रॉब्लेम मुळे "इस दिल मे जल रही है अरमान की चिताए" लेव्हलचा त्रास होईल का असा विचार करत होतो. पण सिरीयल मधला प्रसंग असेल तर त्यांच्या ओव्हरअ‍ॅक्टिंग मुळे तसेच वाटेल.

श्र, बरोबर उत्तर.

८ / ६

अत्यंत श्रीमंत अश्या करमचंद कुटुंबात लग्न होऊन आलेल्या मोठ्या मुलाच्या नव्या बायकोचं घरात खूप कोडकौतुक आणि लाड होत होते. अपवाद होता फक्त करमचंदांचा धाकटा मुलगा - तनिष. तसा लहानच होता तो - शाळकरी आणि भयंकर खोडकर. आपल्या नव्या वहिनीच्या खोड्या काढायला त्याला भारीच आनंद वाटत असे. त्याच्या या सततच्या खोड्यांनी नवी सून त्रस्त झाली होती पण तक्रार कोणाकडे करणार ? एकटीच असताना ती बिचारी गाणं म्हणू लागली ......

उत्तर : (श्रद्धा)
तकदीर(तक - तनिष करमचंद ,दीर) का फसाना जाकर किसे सुनाए..

इथे हे सुरेख गाणं ऐकता येईल.
लता : https://www.youtube.com/watch?v=Q3h0cS1IYFE
रफी : https://www.youtube.com/watch?v=_mfJ7YK0d1c - गाण्याच्या या व्हर्जनमधे सुरवातीचा शहनाईचा पीस काय सुंदर आहे. देस राग आहे आणि ताल दादरा आहे जो फार सुरेख ऐकू येतो शहनाईचा पीस संपून गाणं सुरु होण्याआधी. ही शहनाई ऐकताना एका पॉइंटला अचानक 'भातुकलीच्या खेळामधली' ची आठवण येते. खरंतर 'भातुकलीच्या खेळामधली' गाण्याचा राग वेगळा आहे - वृंदावनी सारंग. दोघांचे थाटही वेगवेगळे आहेत. देस राग - खमाज थाट आणि वृंदावनी सारंग - काफी थाट.
दादरा तालाचा असाच सुंदर ठेका 'ठाडे रहियो' गाण्याच्या सुरवातीला तबला सुरु होतो तेव्हा ऐकू येतो.

लिंकबद्दल धन्यवाद मामी. हे गाणं माहित नव्हतं. सनई छानच आहे; पण तो देस आहे हे कळायला त्याचा सुरुवातीचा पीस पूर्ण व्हावा लागला (म्हणजे सा कुठे आहे हे एस्टॅब्लिश व्हावं लागलं).

भातुकलिच्या खेळामधली - वृंदावनी सारंग वाटत नाही. मधमाद सारंग असावा. 'ली-च्या' मध्ये 'कोमल नी-सा' आलंय.

भातुकलिच्या खेळामधली - वृंदावनी सारंग वाटत नाही. मधमाद सारंग असावा. >> बरोबर. मलाही मधमाद सारंगच वाटला पण नक्की नव्हतं म्हणून गुगललं तर कुठेतरी हा वृंदावनी आहे असं लिहिलेलं सापडलं. करेक्ट करते. धन्यवाद.

हपा, चित्रपट संगीतातील सौंदर्यस्थळे - राग, ताल, म्युझिक पीसेस हा धागा पहा. आवडेल तुम्हाला.

८ / ७

ब्रेडक्राफ्टची स्पर्धा असते. कोणी पक्षी, कोणी नक्षी, कोणी ससा, कोणी मासा असं काय काय बनवलेलं असतं ब्रेडपासून. संतासिंगला असल्या स्पर्धांच्यात भाग घेण्याची खुमखुमी मोठी. शिवाय बोलणं मिठ्ठास आणि आत्मविश्वास जबरदस्त. त्यामुळे अंगात फार कलाबिला नसतानाही तो ब्रेडपासून एक लांबुडका गोल गोळा बनवतो, त्याला हिरवा रंग फासतो आणि आता हे प्रकरण काय म्हणून खपवावं याचा विचार करत बसतो. तेवढ्यात सौ. संतासिंग बाजारातून घरी येतात. पिशवीतली भाजी बघून संताला आयडिया सुचते. स्पर्धेच्या ठिकाणी तो स्टेजवर जाऊन तो बोलायला लागतो - मेहरबान कदरदान, श्वास रोखून बसा ... आता तुमच्या समोर येत आहे ही ब्रेडपासून बनवलेली भाजी (इथे तो एका विशिष्ट भाजीचं नाव घेतो पण मी ते तुम्हाला सांगणार नाहीये.) ......

तर हे तो गाण्यातून कसं बोलेल?

मानव ... योग्य ट्रॅक पण बोलणारा सरदारजी आहे हे लक्षात घे आणि भाजी देखिल दुसरी एखादी निवड. भाजीचं वर्णन कोड्यात दिलंच आहे.

@मानव

क्ल्यु : बोलणारा सरदारजी आहे हे लक्षात घे आणि भाजी देखिल दुसरी एखादी निवड. भाजीचं वर्णन कोड्यात दिलंच आहे.

सरदारजी बन के (पटोला) ऐवजी काय म्हणेल?

बन द करेली (उडती चिडीया पिंजरेमे) हे आलं होतं डोक्यात.
आता बन दा/दे/दी शोधतोय.

Pages