..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८/२२

सुनितानं पत्र उघडून वाचलं : " ....... तुझ्या लग्नात येऊ शकले नाही पण माझी प्रेमाची भेट म्हणून माझ्या आईचं म्हणजे तुझ्या आजीचं जुनं जातं तुला पाठवत आहे. आवडलं का ते सांग. - तुझी लाडकी आत्या." सोबतचं जड पार्सल उघडून तिने ते अनेक पिढ्यांनी वापरलेलं देखणं कोरीवकाम केलेलं जातं पाहिलं आणि आत्याला लगेच पत्रातून कळवलं .....

८/२२ - Lol
मस्तच मामी!!

8/22 -
'आते' 'जाते' खूबसूरत (आवारा सडकोंपर...)?
हे आहे का उत्तर?

भारीच श्रद्धा आणि मामी!
उप-कोडं: ८/ २३
आत्याने नुसतंच पत्र पाठवलं असतं आणि जातं पाठवायला विसरली असती तर सुनिता कुठलं गाणं म्हणाली असती? Wink

करेक्ट श्र!

८/२२

सुनितानं पत्र उघडून वाचलं : " ....... तुझ्या लग्नात येऊ शकले नाही पण माझी प्रेमाची भेट म्हणून माझ्या आईचं म्हणजे तुझ्या आजीचं जुनं जातं तुला पाठवत आहे. आवडलं का ते सांग. - तुझी लाडकी आत्या." सोबतचं जड पार्सल उघडून तिने ते अनेक पिढ्यांनी वापरलेलं देखणं कोरीवकाम केलेलं जातं पाहिलं आणि आत्याला लगेच पत्रातून कळवलं .....

उत्तर : ( श्रद्धा)
आते, जाते खूबसुरत

उप-कोडं:
आत्याने नुसतंच पत्र पाठवलं असतं आणि जातं पाठवायला विसरली असती तर सुनिता कुठलं गाणं म्हणाली असती?

>>>>. वावे, उपकोडं असेल तरी नंबर दे प्लीज.

नाही झिलमिल..
जाते हा एक्झॅक्ट शब्द नाहीये.

हुश्श! शाब्बास मृणाली!

उप-कोडं: ८/ २३
आत्याने नुसतंच पत्र पाठवलं असतं आणि जातं पाठवायला विसरली असती तर सुनिता कुठलं गाणं म्हणाली असती?

उत्तर- (mrunali.samad)
जाता है तू कहां रे बाबा जाता है तू कहां- येस बॉस

८/२४

चटचट विणकाम करणार्‍यांचे भराभर चालणारे हात बघून कौतुक वाटतं पण त्याचबरोबर त्या दोन सुयांना किती कामाला लावलं जातं याचा कधी कोणी विचार केलाय का? शेवटी बिचार्‍या लोकरीला त्यांची दया आली.

"किती गं काम करता तुम्ही दोघी. कधीतरी विश्रांती घ्या. बोला की या हातांच्या मालकिणीशी. आपल्या हक्कांकरता आपणच आवाज उठवायला हवा." दोन सुयांमधून सरसर पुढे सरकताना लोकर त्यांच्या कानात कुजबुजली. बाजूला ठेवलेल्या सुयांच्या सेटमधील काम नसल्यामुळे आरामात पडून असलेल्या सुयांनी ही कुजबुज हेरली आणि त्यांची उत्सुकता चाळवली.

रात्री लोकरकाम खाली ठेवल्यावर या दोन कामसू सुया आता फ्री आहेत ही संधी साधून त्यांच्या इतर सख्यांनी त्यांना विचारलं की ती लोकर काय सांगत होती तुम्हाला?

त्यावर सुयांनी उत्तर दिलं ........

करेक्ट झिलमिल.

उत्तर : (झिलमिल)

'ऊन' (लोकर) को ये शिकायत है के हम कुछ नही कहते

लोकरला ऊन म्हणतात हे पण मला माहित नव्हते.
इतकं काय काय माहीत नाही मला, परत पहिलीत जाऊन बसावसं वाटतंय.

धागा वर काढायला म्हणुन काहीतरी देतोय.
(जरा विषयांतर करून, कुठलं गाणं म्हणेल ऐवजी कुठलं गाणं ऐकत होता/ती कोडं:)

८/२५ एक मुलगा मुकेशचं एक गाणं ऐकत असतो. आणि मध्येच "तेरे" असं म्हणत असतो, धृपद (की मुखडा काय ते) आलं की. तर तो कोणतं गाणं ऐकत होता आणि त्याचं नाव काय असतं?

8/25 -

'मेहबूब मेरे मेहबूब मेरे' का? त्याचं नाव मेहबूब असणार.

नाही. त्या ओळीतून त्याला तसे म्हणण्याची सूचना मिळतेय असे त्याला वाटते.

मी आर्या यांनी दिलेल्या गाण्यात क्लु आहे नावाचा.

Pages