..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ / १३

" अरे ए वाण्या, इतकी वर्षं तुझ्याकडून सर्व माल घेतोय आणि तरीही तू भेसळीचा माल देतोस? कब सुधरोगे?" बाबू वाण्यावर ओरडत होता.
अर्थात वाणी पार पोचलेला होता "अरे बाबू, बनिया हूं, बनियागिरी तो करुंगा ना? अपनी बनियागिरीही छोड दुंगा तो पैसे कैसे कमाउंगा? हमारे बनियागिरी का कोई इलाज नाही है भाई. "त्याने प्रामाणिक उत्तर दिलं. हे सत्य ऐकून बाबूला धक्काच बसला. रागारागात तो दुकानातून निघाला.

बाबू एका बंगाली कुटुंबात नोकर म्हणून काम करत होता. 'रे बंगला' चे फाटक उघडून बाबू घरात पोहोचला. दिवाणखान्यातच मेखलादि बसल्या होत्या.

बाबूला घुश्श्यात बघून मेखलादिंनी विचारले "अरे काय झालं बाबू? असा का चेहरा दिसतोय? कोणावर आणि का रागावलायस? "

बाबूला ज्या सत्याचा नुकताच साक्षात्कार झाला होता ते सत्य त्यानं गाणं म्हणून मेखलादिंना सांगितलं....

उत्तर : (वावे)

मेरेदि (मेखला रे दिदि), वानेपन (वाणीपणा=बनियागिरी) की भी दवा नही (बनियागिरी का कोई इलाज नहीं)

८/१४

दिनांक ४ ऑगस्ट २०२१ - ए आर रेहमानची आई त्याला सांगते, की अरे आज किशोरकुमारचा जन्मदिन आहे. रेहमानला कळत नाही, तारखेनी की तिथीनी. तो बाहेर जाऊन चंद्र बघतो आणि आईला त्या चंद्राच्या बदलत जाणाऱ्या कलेबद्दल सांगतो. ते तो कुठल्या गाण्यात सांगेल?

क्लू क्र २ (ह्याचा काय उपयोग आहे माहीत नाही, पण) हे गाणं किशोर किंवा रेहमान ह्यांपैकी कुणाचंच नाही, नदीम श्रवणचं आहे.

चंद्राच्या कलेचा, तिथीचा, वाढदिवसाचा काही संबंध गाण्यात आहे का? आणि चंद्राच्या कलेबद्दल काय सांगतो तो? मला कोडं कन्फ्युजिंग वाटतंय.

हे उत्तर असेल तर झिलमिलला खरोखर दंडवत. _/\_
किंवा हा वद्य पक्ष असल्याने बिगडा जाए म्हणजे कमी कमी होतोय असंही असेल.

झिलमिल, उत्तर बरोबर आहे! खतरनाक!!

वद्य पक्ष असल्याने बिगडा जाए म्हणजे कमी कमी होतोय असंही असेल. >> बरोबर. तसंच आहे ते.

८/१४

दिनांक ४ ऑगस्ट २०२१ - ए आर रेहमानची आई त्याला सांगते, की अरे आज किशोरकुमारचा जन्मदिन आहे. रेहमानला कळत नाही, तारखेनी की तिथीनी. तो बाहेर जाऊन चंद्र बघतो आणि आईला त्या चंद्राच्या बदलत जाणाऱ्या कलेबद्दल सांगतो. ते तो कुठल्या गाण्यात सांगेल?

उत्तर (झिलमिल)

अम्मा देख, तेरा मून-डा बिगडा जाए

झिलमिल, ग्रेटच!

किशोरकुमार, रहमान, डा ... लै गोष्टी उगाचच होत्या.

८/१५

बंडू आणि त्याची आई शेवटी कृष्णपक्षातील सप्तमीच्या त्या रात्री चालत चालत एकदाचे त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुप्त गुहेपाशी पोचले. त्या गुहेतल्या सातव्या दालनातल्या सातव्या फडताळातल्या सातव्या चोरकप्प्याची फळी उचकटल्यावर त्याखाली त्यांना त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेल्या धनाची घागर गावणार होती. अर्थात अश्या बहुमूल्य ठेव्यापर्यंत पोचण्याचा मार्गही सहजसाध्य असणारा नव्हता. तोही तितकाच खडतर होता. किंबहुना आपल्या पुढच्या पिढीतील जो कोणी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात हा अवघड मार्ग पार करून ठेव्यापर्यंत पोचू शकेल त्यालाच तो धनसंचय मिळावा अशी योजना मोठ्या खुबीने त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवली होती. गेले कित्येक महिने बंडू आणि त्याच्या आईने या मोहिमेच्या तयारीसाठी अगदी कमालीच्या चिकाटीने खर्ची घातले होते. या गूढातला एक एक धागा, एकेक दुवा, यांचा कमालीच्या संयमाने संबंध जोडत जोडत ते आजच्या क्षणापर्यंत पोचले होते. या त्यांच्या कष्टाचे, अभ्यासाचे सार असे होते की - गुहेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना विशिष्ट वाक्ये उच्चारायची आवश्यकता होती. पण ही काही ठराविक वाक्ये नव्हती तर त्या क्षणाला त्या गुहेच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आढळतील, त्यावरून ती वाक्ये त्यांना जुळवायची होती. ती वाक्ये उच्चारताच गुहेच्या तोंडावरची माती आपोआप ढासळून त्यांना आत प्रवेश मिळणार होता. आत प्रवेश मिळताच एकाने पुढे चालायचे आणि दुसर्‍याने बरोबर त्याच्या पावलांच्या ठश्यांवर आपली पावले टाकून त्याच्यामागून चालणे आवश्यक होते. वाक्ये बरोब्बर जुळली तर या सगळ्या कष्टाचे चीज होणार होते.

शेवटी ते आज इथे आले होते. इथे आल्यावर त्यांनी गुहेच्या आजूबाजूच्या परिसराचा अगदी डोळ्यात तेल घालून आढावा घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांना गुहेच्या तोंडावरच्या भिंतीवर वरच्या दिशेला तोंड केलेले सात बाण आढळले. चांगले टोकदार बाण होते. पण होते मातीचेच! बाण म्हणावे की माती? जवळच्या एका चाफ्याच्या झाडावर एक गुबगुबीत घुबड बसले होते आणि आज ते गुहेच्या तोंडाजळ असलेल्या पाणवठ्यातल्या मगरीला एकसारखे हाका मारत होते. बंड्याच्या चेहर्‍यावरचे खोल विचारपूर्वक भाव बघून आपल्या बंडूल्याला आता नक्की काहीतरी हुकमी लिंक लागली आहे याची आईला खात्री पटली. थोड्याच वेळात त्याने आईला आत प्रवेश करण्यास सज्ज होण्यास सांगितले. ती पुढे राहणार होती. बंडू तिच्या पाठीमागे राहून ती जुळवलेली परवलीची वाक्ये उच्चारणार होता. गुहेचे तोंड मोकळे होताच आई पुढे आणि तिच्या मागून तो ठश्यांचा नियम पाळून बंडू आत जाणार होता. आई थोडी साशंक होती. ते पाहून बंडू एक गाणे म्हणतो. त्यात ती दोन परवलीची वाक्ये असतात आणि नंतर आईला तू पुढे चाल मी मागून येतोय हा संदेश. अशी दोन पाखरे एका गाण्यात (मातीच्या बाणात?) बंडू मारतो. मातीचे बाण, मगरीला आमंत्रण आणि आईला खुलासा इ. सगळ्या गोष्टी कोणत्या एकाच गाण्यातून बंड्याने साधल्या असतील बरे?

मामी, ते 'डा' उगाचच नव्हतं हा! अम्मा आणि डा हे तमिळ पार्श्वभूमी एस्टॅब्लिश करण्यासाठी होतं. बाकी मात्र उगाचच Wink

शर्म आती (शर माती) है मगर आज ये कहना होगा >>> Lol बरोबर वाटतंय. मस्तच. लगेच ओळखलंत.

गजाभाऊ कोडं मस्त आणि अदभुत होतं. मजा आली वाचताना.

मामी, ते 'डा' उगाचच नव्हतं हा! अम्मा आणि डा हे तमिळ पार्श्वभूमी एस्टॅब्लिश करण्यासाठी होतं. बाकी मात्र उगाचच Happy

हरचंद, बरोबर! __/\__

८/१५

बंडू आणि त्याची आई शेवटी कृष्णपक्षातील सप्तमीच्या त्या रात्री चालत चालत एकदाचे त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुप्त गुहेपाशी पोचले. त्या गुहेतल्या सातव्या दालनातल्या सातव्या फडताळातल्या सातव्या चोरकप्प्याची फळी उचकटल्यावर त्याखाली त्यांना त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेल्या धनाची घागर गावणार होती. अर्थात अश्या बहुमूल्य ठेव्यापर्यंत पोचण्याचा मार्गही सहजसाध्य असणारा नव्हता. तोही तितकाच खडतर होता. किंबहुना आपल्या पुढच्या पिढीतील जो कोणी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात हा अवघड मार्ग पार करून ठेव्यापर्यंत पोचू शकेल त्यालाच तो धनसंचय मिळावा अशी योजना मोठ्या खुबीने त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवली होती. गेले कित्येक महिने बंडू आणि त्याच्या आईने या मोहिमेच्या तयारीसाठी अगदी कमालीच्या चिकाटीने खर्ची घातले होते. या गूढातला एक एक धागा, एकेक दुवा, यांचा कमालीच्या संयमाने संबंध जोडत जोडत ते आजच्या क्षणापर्यंत पोचले होते. या त्यांच्या कष्टाचे, अभ्यासाचे सार असे होते की - गुहेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना विशिष्ट वाक्ये उच्चारायची आवश्यकता होती. पण ही काही ठराविक वाक्ये नव्हती तर त्या क्षणाला त्या गुहेच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आढळतील, त्यावरून ती वाक्ये त्यांना जुळवायची होती. ती वाक्ये उच्चारताच गुहेच्या तोंडावरची माती आपोआप ढासळून त्यांना आत प्रवेश मिळणार होता. आत प्रवेश मिळताच एकाने पुढे चालायचे आणि दुसर्‍याने बरोबर त्याच्या पावलांच्या ठश्यांवर आपली पावले टाकून त्याच्यामागून चालणे आवश्यक होते. वाक्ये बरोब्बर जुळली तर या सगळ्या कष्टाचे चीज होणार होते.

शेवटी ते आज इथे आले होते. इथे आल्यावर त्यांनी गुहेच्या आजूबाजूच्या परिसराचा अगदी डोळ्यात तेल घालून आढावा घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांना गुहेच्या तोंडावरच्या भिंतीवर वरच्या दिशेला तोंड केलेले सात बाण आढळले. चांगले टोकदार बाण होते. पण होते मातीचेच! बाण म्हणावे की माती? जवळच्या एका चाफ्याच्या झाडावर एक गुबगुबीत घुबड बसले होते आणि आज ते गुहेच्या तोंडाजळ असलेल्या पाणवठ्यातल्या मगरीला एकसारखे हाका मारत होते. बंड्याच्या चेहर्‍यावरचे खोल विचारपूर्वक भाव बघून आपल्या बंडूल्याला आता नक्की काहीतरी हुकमी लिंक लागली आहे याची आईला खात्री पटली. थोड्याच वेळात त्याने आईला आत प्रवेश करण्यास सज्ज होण्यास सांगितले. ती पुढे राहणार होती. बंडू तिच्या पाठीमागे राहून ती जुळवलेली परवलीची वाक्ये उच्चारणार होता. गुहेचे तोंड मोकळे होताच आई पुढे आणि तिच्या मागून तो ठश्यांचा नियम पाळून बंडू आत जाणार होता. आई थोडी साशंक होती. ते पाहून बंडू एक गाणे म्हणतो. त्यात ती दोन परवलीची वाक्ये असतात आणि नंतर आईला तू पुढे चाल मी मागून येतोय हा संदेश. अशी दोन पाखरे एका गाण्यात (मातीच्या बाणात?) बंडू मारतो. मातीचे बाण, मगरीला आमंत्रण आणि आईला खुलासा इ. सगळ्या गोष्टी कोणत्या एकाच गाण्यातून बंड्याने साधल्या असतील बरे?

उत्तर : हरचंद पालव
(शर माती है, मगर आज ये ) कहना होगा (ही दोन वाक्य पासवर्ड म्हणून म्हणावी लागतील)
अब हमें आप के कदमों ही मे रहना होगा (बंडूला आईच्या पावलावर पाऊल टाकून चालावे लागणार आहे)

शर्म आती हैं मगर, आज यह कहना होगा
अब हमें आप के कदमों ही मे रहना होगा

वा! मला आयुष्यात पहिल्यांदाच जमलंय उत्तर बरोबर द्यायला. त्याबद्दल मी स्वतःला अर्धी झुमरी तलैया बक्षीस देतो.

आयला डोक्याची पार मंडई झाली. आपल्याला काय यायचं नाही हे प्रकरण. ह पां च्या कोड्यात तर मी काय काय विचार केला : कि शोर कु मार , रेम मान , चांद, चंदा कला, मून, त्यात कृष्ण पक्ष

पण गाणं वेगळंच निघालं : भ्यां ssss

Pages