..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ARमाँ >> Lol Lol
हे कुठल्या तरी कोड्यात घालू शकला असता. भारी आहे!

तेरे बिना जिंदगी से कोई या गाण्याच्या वेळी वद्य पक्ष असणार असं आर्ग्युमेंट एका मित्राने केलं होतं मागे एकदा Wink कारण म्हणे 'तुम जो कह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं'
(वद्य पक्षात चंद्र सूर्योदयाच्या नंतर मावळतो)

जबरी! हे आवडलं.

सूर्यास्त के आधीच, दिवसा ढवळ्या डूबेगा.

रे बिना जिंदगी से कोई या गाण्याच्या वेळी वद्य पक्ष असणार असं आर्ग्युमेंट एका मित्राने केलं होतं मागे एकदा Wink कारण म्हणे 'तुम जो कह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं'
(वद्य पक्षात चंद्र सूर्योदयाच्या नंतर मावळतो) >> Biggrin प्वाईंट आहे.

Happy
तर त्यामुळे वद्य पक्ष म्हटल्यावर मला हेही गाणं आठवत होतं सारखं. झिलमिलने 'मुन्डा बिगडा जाए' ओळखलं म्हणजे खरंच ग्रेट.

हा बाफ फारच मागे गेलाय. वर आणण्यासाठी एक सोपे कोडे.

८/१६ -

https://youtu.be/YBlctlrHCSU

राजकपूरचा हा लेजेंडरी प्रपोज सीन माहीतच असेल. यात अनेक लल्ले होतील, वगैरे ऐकून पद्मिनी फायनली लाजून पळून जाते. तर राजकपूर गाणे म्हणू लागतो. कुठले? (अगदी सोपे आणि सरळ आहे. शब्दच्छल वगैरे वगैरे काही नाही.)

करेक्ट आहे झिलमिल.. Proud

८/१६ -

https://youtu.be/YBlctlrHCSU

राजकपूरचा हा लेजेंडरी प्रपोज सीन माहीतच असेल. यात अनेक लल्ले होतील, वगैरे ऐकून पद्मिनी फायनली लाजून पळून जाते. तर राजकपूर गाणे म्हणू लागतो. कुठले? (अगदी सोपे आणि सरळ आहे. शब्दच्छल वगैरे वगैरे काही नाही.)

उत्तर (झिलमिल) - मेरा दिल ले गई ओए कम्मो किधर..

(वद्य पक्षात चंद्र सूर्योदयाच्या नंतर मावळतो) >> >>> Lol हे सही आहे.

सूर्यास्त के आधीच, दिवसा ढवळ्या डूबेगा. >>> और पवळ्या भी डूबेगा. कारण ढवळ्या शेजारी पवळ्या असतो व त्याला गुण लागतो Happy

ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला अशी म्हण आहे ना.
कोणाचा गुण कोणाला लागला हे स्पष्ट केले नाहीये.

ढवळ्या म्हणजे पांढरा आणि पवळ्या म्हणजे पिवळा (असं मला वाटतं Happy ) त्यामुळे पवळ्याचा वाण (म्हणजे रंग) ढवळ्याला नाही लागला तरी त्याचा गुण लागला.

पवळ्या म्हणजे "पोवळे" चा बोलीभाषेतील उच्चार ना? लालसर रंगाचा बैल पवळ्या असेल असा माझा समज होता.

बरं बैलांची चर्चा स्टॉक मार्केट च्या धाग्यावर उत्साहवर्धक होत असली तरी इथे अवांतर होत आहे. ती मीच अवांतर केल्याने धागा पुन्हा लाइनीवर आणायला एक सोपे गाणे:

८/१७ - बंगाली मिठाई येते पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही अशी सीमेवरच्या सैनिकाची तक्रार Happy

Pages