..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स्स्स बरोबर मानव.

८ / ७

ब्रेडक्राफ्टची स्पर्धा असते. कोणी पक्षी, कोणी नक्षी, कोणी ससा, कोणी मासा असं काय काय बनवलेलं असतं ब्रेडपासून. संतासिंगला असल्या स्पर्धांच्यात भाग घेण्याची खुमखुमी मोठी. शिवाय बोलणं मिठ्ठास आणि आत्मविश्वास जबरदस्त. त्यामुळे अंगात फार कलाबिला नसतानाही तो ब्रेडपासून एक लांबुडका गोल गोळा बनवतो, त्याला हिरवा रंग फासतो आणि आता हे प्रकरण काय म्हणून खपवावं याचा विचार करत बसतो. तेवढ्यात सौ. संतासिंग बाजारातून घरी येतात. पिशवीतली भाजी बघून संताला आयडिया सुचते. स्पर्धेच्या ठिकाणी तो स्टेजवर जाऊन तो बोलायला लागतो - मेहरबान कदरदान, श्वास रोखून बसा ... आता तुमच्या समोर येत आहे ही ब्रेडपासून बनवलेली भाजी (इथे तो एका विशिष्ट भाजीचं नाव घेतो पण मी ते तुम्हाला सांगणार नाहीये.) ......

तर हे तो गाण्यातून कसं बोलेल?

उत्तर : (मानव)

bun दा परवर, थाम लो जिगर

खरंतर पटोला एका अर्थी बरोबर. परवराला बंगाली पोटोल की कायसं म्हणतात. पण हे लिहिलं असतं तर उत्तर सांगितल्यासारखं झालं असतं म्हणून गप्प बसले. आणि पडवळ नाही. परवर ही एक वेगळी भाजी आहे. तोंडल्याचा मोठा भाऊ.

धागा पुढे नेण्यासाठी खूप सोपे-
8/8
बजरंगी भाईजान च्या शुटीं ग चा किस्सा...
सीन असा होता की मुन्नी , नवाजुद्दीन आणि सलमान एका टनेल मध्ये जातात, अंधार असतो, अचानक मुन्नी मशाली ची वात पेटवते.आणि उजेड पडतो..
टेक सुरू होतो, पण मुन्नीला वात पेटवायला जमेचना... सलमान मदत करायला येतो त्यालाही जमत नाही, मग नवाजुद्दीन येतो आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतो, सगळीकडे उजेड पडतो...
मुन्नी काय गाणे म्हणेल??

चांद वरून बरीच शोधली, पण लॉजिक मधे बसत नाहीत
हे असेल का?
जब कोई बात (वात) बिगड जाए
जब कोई मुश्किल पड जाए
तुम देना साथ मेरा ओ हम नवाज
???

धागा पुढे नेण्यासाठी खूप सोपे-
8/8
बजरंगी भाईजान च्या शुटीं ग चा किस्सा...
सीन असा होता की मुन्नी , नवाजुद्दीन आणि सलमान एका टनेल मध्ये जातात, अंधार असतो, अचानक मुन्नी मशाली ची वात पेटवते.आणि उजेड पडतो..
टेक सुरू होतो, पण मुन्नीला वात पेटवायला जमेचना... सलमान मदत करायला येतो त्यालाही जमत नाही, मग नवाजुद्दीन येतो आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतो, सगळीकडे उजेड पडतो...
मुन्नी काय गाणे म्हणेल??

उत्तर - झिलमिल.
जब कोई बात बिगड जाए
जब कोई मुश्किल पड जाए
तुम देना साथ मेरा ओ हम नवाज

Happy

नाही.
दोन शब्दांच्या फोडी करायच्या आहेत.
हास्यदर्शक लेखी एकाक्षरी शब्द कोण कोण ते विचार करा.
एका शब्दाची फोड केली की सरपटणारा प्राणी आणि हास्य दर्शवणारा एकाक्षरी शब्द मिळतो.

गाणं आठवेना.

पालखी मे हो के सवार चली रे हेच. आठवतंय

पहिल्या ओळी नंतर तो कुणाचा तरी जयजयकार करतो.

गाणं तसं फार फेमस नव्हतं. पण तू ऐकलेलं असावंस.
श्रद्धा, झिलमील, फारेन्ड यांनाही माहीत असावं.

बहुतेक हे वाटतय..

आती है पालकी सरकार की
जय हो जय हो ज़मीदार की
चित्रपट - हम पांच

बरोबर झिलमील :). मी पण ते पालखी नसून पालकी आहे हिंदीत हे काही वेळा पूर्वीच पाहिलं.

८/९ सरपटणारा प्राणी येतोय असं हसून सांगून, बाजूला व्हा ना म्हणतो तो. कुठल्या गाण्यात?

उत्तर: मामी + झिलमील
आती है पाल 'खी!' सरका रं की!
(जय हो जय हो जमीनदार की)

मामी, धन्यवाद
नाहीतर आम्ही साप, मगर, नाग, ह्यातच अडाकलो होतो Happy

आती है पालकी सरकार की
जय हो जय हो ज़मीदार की
चित्रपट - हम पांच >>> बापरे झिलमिल हे गाणं तुला माहित आहे हे ग्रेटच.

कोडं छान होतं.

मी 'सरडा आला' हे कुठे 'मार डाला' सारख्या ओळीत बसवता येतंय का बघत होते >>> Lol

८ / १०

स्वयंपाकघरातील विविध भांडी, आयुधं यांचं एक गटग होतं. त्यात झार्‍यानं सगळ्यांसाठी एक खेळ घ्यायचा ठरवला. एकेका भांड्याची अथवा आयुधाची केवळ २ वैशिष्ट्य सांगितली जातील आणि त्यावरून ते कोण हे इतरांनी ओळखायचं. समजा कोणाला ओळखता नाही आलं तर त्या त्या भांड्यानं/आयुधानं पुढे येऊन आपली ओळख द्यायची असा तो खेळ होता.

सर्व उत्तरं सगळ्यांना आली पण केवळ एकच प्रश्न असा होता जो कोणीच सोडवू शकलं नाही. त्यामुळे प्रश्नाची वेळ संपल्यावर ज्याच्यावर आधारित तो प्रश्न होता त्यानं पुढे होऊन आपली ओळख दिली.

खालच्या क्ल्यू वरून शोधा बरं तुम्हाला तरी ओळखता येतंय का की कोणतं भांडं / आयुध होतं ते आणि आपली ओळख त्यानं/तिनं कोणतं गाणं म्हणून दिली .....

झार्‍यानं दिलेली दोन वैशिष्ट्य होती - गोल, गरम

Pages