..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झार्‍याच्या कोड्याचं उत्तर बरोबर आहे श्रवु.

आता फक्त गाणं योग्य निवड. तव्यानं आपली ओळख करून दिली आहे. एका गाण्याची केवळ पहिली ओळ.

नाही ही नाही. म्हणजे ही देखिल चालतील पण माझ्या मनात वेगळं आहे.

mami तुमच्या मनात वीर झारा मधले असेल.. मितवा शब्दाची खूप छान गाणी आहेत.. ऑफिस टाईमिंग मध्ये थोडे लिमिटेशन्स येतात..

ओके माझ्या मनात 'मितवा रे मितवा' ( पूरब ना जैयो पश्चिम न जैयो मेरे दिल मे रहियो) हे गाणं होतं.

ओ मितवा सून मितवा हे गाणं देखिल फिट बसतंय. त्यामुळे तु उत्तर ओळखलं असं समजायला हरकत नाही.

८ / १०

स्वयंपाकघरातील विविध भांडी, आयुधं यांचं एक गटग होतं. त्यात झार्‍यानं सगळ्यांसाठी एक खेळ घ्यायचा ठरवला. एकेका भांड्याची अथवा आयुधाची केवळ २ वैशिष्ट्य सांगितली जातील आणि त्यावरून ते कोण हे इतरांनी ओळखायचं. समजा कोणाला ओळखता नाही आलं तर त्या त्या भांड्यानं/आयुधानं पुढे येऊन आपली ओळख द्यायची असा तो खेळ होता.

सर्व उत्तरं सगळ्यांना आली पण केवळ एकच प्रश्न असा होता जो कोणीच सोडवू शकलं नाही. त्यामुळे प्रश्नाची वेळ संपल्यावर ज्याच्यावर आधारित तो प्रश्न होता त्यानं पुढे होऊन आपली ओळख दिली.

खालच्या क्ल्यू वरून शोधा बरं तुम्हाला तरी ओळखता येतंय का की कोणतं भांडं / आयुध होतं ते आणि आपली ओळख त्यानं/तिनं कोणतं गाणं म्हणून दिली .....

झार्‍यानं दिलेली दोन वैशिष्ट्य होती - गोल, गरम

उत्तर : (श्रवु)
माझ्या मनातील - मी तवा रे मी तवा
श्रवु - ओ, मी तवा सून मी तवा

८ /११

"ही घ्या यादी. सगळं व्यवस्थित आणा. काहीही विसरू नका. मुख्य म्हणजे आज रविवार आहे त्यामुळे मटणाच्या दुकानातून लेग नक्की घेऊन या. नेहमीसारखा वेंधळेपणा करू नका. लक्षात ठेवा, लेग आज हवाच आहे. ह्म्म जा आता चटकन आणि लवकरात लवकर या आणि लेग घेऊन यायला विसरू नका." सतराशे साठ सुचना देऊन काकींनी काकांना बाजारात पिटाळले. तासाभरानंही काका परत आले नाहीत म्हटल्यावर काकींनी मोबाईलवर फोन केला - " अहो, किती वेळ झाला. केव्हा येताय? ......... अच्छा बरं बरं. आणि हो, लेग घेतला ना? काय विचारतेय? काय हो की नाही? जोरात बोला, ऐकू येत नाहीये. हो की नाही? ......"

तिथे काका फोनवर उत्तरादाखल गाणं म्हणत होते .........

ऐकू येत नाहीये नंतर ते गाणं म्हणतात, म्हणजे हे 'चुकीचं ऐकू आलेलं गाणं' तर नाही ना? >> नाही. पण ऐकू येत नसल्यामुळे ते एक शब्द पुन्हा पुन्हा बोलतात.

क्ल्यु १: एका हिंदी नृत्य गाण्याची पहिली ओळ. एकूण २ शब्द. पहिल्या शब्दाची फोड करून ३ शब्द पण त्यातील शेवटचा शब्द चारवेळा रिपीट.
क्ल्यु २ : हिंदी गाणं असलं तरी एक क्रियापद सोडता बाकी शब्द मराठी होतात.

बरोबर मानव.
८ /११

"ही घ्या यादी. सगळं व्यवस्थित आणा. काहीही विसरू नका. मुख्य म्हणजे आज रविवार आहे त्यामुळे मटणाच्या दुकानातून लेग नक्की घेऊन या. नेहमीसारखा वेंधळेपणा करू नका. लक्षात ठेवा, लेग आज हवाच आहे. ह्म्म जा आता चटकन आणि लवकरात लवकर या आणि लेग घेऊन यायला विसरू नका." सतराशे साठ सुचना देऊन काकींनी काकांना बाजारात पिटाळले. तासाभरानंही काका परत आले नाहीत म्हटल्यावर काकींनी मोबाईलवर फोन केला - " अहो, किती वेळ झाला. केव्हा येताय? ......... अच्छा बरं बरं. आणि हो, लेग घेतला ना? काय विचारतेय? काय हो की नाही? जोरात बोला, ऐकू येत नाहीये. हो की नाही? ......"

तिथे काका फोनवर उत्तरादाखल गाणं म्हणत होते .........

उत्तर : (मानव)
पाय (मटणाचा leg) लिया
हो हो हो हो

Lol
हो हो हो हो <<<<< काकांचं हे 'हो हो हो हो' ऐकून त्यांना ख्रिसमससाठी पार्ट टाइम सॅंटा म्हणून जॉबसुद्धा मिळाला असेल.

8/12
नकुल नयनाशी विवाहबद्ध होता. पण तो प्रीतीच्या मोहात पडला. बरेच महिने हे प्रकरण चालल्या वर बायकोला संशय यायला लागला होता. आणि अशातच त्याची बायको आणि प्रेयसी योगायोगाने एकमेकींना कुठेतरी भेटल्या, कुठून तरी तिसरीकडून ओळख निघाली. पण हे नकुलला कळताच तो दिवसरात्र चिंतेत बुडाला. आणि प्रितीशी ब्रेक अप करताना हेच कारण तो तिला गाण्यातून सांगत होता.

8/12
झुट का पत चल केनी मोहसे नैना मिलाईके

श्रद्धा बिंगो!
8/12
नकुल नयनाशी विवाहबद्ध होता. पण तो प्रीतीच्या मोहात पडला. बरेच महिने हे प्रकरण चालल्या वर बायकोला संशय यायला लागला होता. आणि अशातच त्याची बायको आणि प्रेयसी योगायोगाने एकमेकींना कुठेतरी भेटल्या, कुठून तरी तिसरीकडून ओळख निघाली. पण हे नकुलला कळताच तो दिवसरात्र चिंतेत बुडाला. आणि प्रितीशी ब्रेक अप करताना हेच कारण तो तिला गाण्यातून सांगत होता.

उत्तर (श्रद्धा)

जबसे मिले नैना, तुमसे मिले नैना
तड़प तड़प दिन बीते, और जागी जागी रैना

८ / १३

" अरे ए वाण्या, इतकी वर्षं तुझ्याकडून सर्व माल घेतोय आणि तरीही तू भेसळीचा माल देतोस? कब सुधरोगे?" बाबू वाण्यावर ओरडत होता.
अर्थात वाणी पार पोचलेला होता "अरे बाबू, बनिया हूं, बनियागिरी तो करुंगा ना? अपनी बनियागिरीही छोड दुंगा तो पैसे कैसे कमाउंगा? हमारे बनियागिरी का कोई इलाज नाही है भाई. "त्याने प्रामाणिक उत्तर दिलं. हे सत्य ऐकून बाबूला धक्काच बसला. रागारागात तो दुकानातून निघाला.

बाबू एका बंगाली कुटुंबात नोकर म्हणून काम करत होता. 'रे बंगला' चे फाटक उघडून बाबू घरात पोहोचला. दिवाणखान्यातच मेखलादि बसल्या होत्या.

बाबूला घुश्श्यात बघून मेखलादिंनी विचारले "अरे काय झालं बाबू? असा का चेहरा दिसतोय? कोणावर आणि का रागावलायस? "

बाबूला ज्या सत्याचा नुकताच साक्षात्कार झाला होता ते सत्य त्यानं गाणं म्हणून मेखलादिंना सांगितलं....

क्ल्यु १ : हिंदी गाण्याची पहिली ओळ
क्ल्यु २ : गाण्याच्या ओळीतला दुसरा शब्द फोडून त्यातील पहिले अक्षर पहिल्या शब्दाला जोडायचे आहे. आपल्या कोड्यांचा जो स्पेसिफिक नावांबद्दल नियम आहे त्याचा विचार करा.
क्ल्यु ३ : दुसर्‍या शब्दातील उरलेला भाग हा बनियागिरीला समानार्थी ठरेल असा एक शब्द बनतो. हा शब्द रुढ भाषेत नाहीये पण असता तर त्याचा अर्थ साधारण तोच ठरेल.

Pages