Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्युबीली बघायला सुरुवात केलीय
ज्युबीली बघायला सुरुवात केलीय . फार स्लो आहे , पण आवडतेय .
५० च्या दशकातला काळ आवडतोय . पण सुमित्रा आणि निलोफर चे कपडे आधुनिक वाटतायेत .
अपारशक्ती खुराना आवडला . आणि बॅकग्राऊन्ड म्युजिक भारी आहे , गाणी पण आवडली.
श्रीकांत रॉय हा जुन्या काळातील विश्वजीतचा मुलगा आहे . अरूण गोविल ला बरेच दिवसानी पाहिलं
द डिप्लोमॅट नेट फ्लिक्स वर
द डिप्लोमॅट नेट फ्लिक्स वर आली आहे छान आहे सिरीअल. हिरवीण गोड दिसते. नवरा चालबाज आहे. वेस्ट विंग मॅरीज ग्रेस आनाटमी आहे. ह्याच नटीची एक अमेरिकन्स म्हणून आहे सिरीअल ती ही मजेशीर आहे.
मेड बद्दल खूप छान रिव्यु वाचले. सिंगल पेरेंटिन्ग चे त्रास आता बघवत नाहीत. द फेज इज ओव्हर. बघु का तरीपण? सध्या घरचे नेट गंडले आहे त्यामुळे अनुपमा आई कुठे काय करते पण आज बघितले नाही.
बघु का तरीपण?>>> शेवट चांगला
बघु का तरीपण?>>> शेवट चांगला आहे. त्यामुळे बघू शकता.
नाइट एजन्ट बघते आहे. वेगवान
नाइट एजन्ट बघते आहे. वेगवान कथा असल्यामुळे विचाराला वेळ मिळत नाही, त्यामुळे एन्गेजिंग वाटते आहे. पण काही प्रेडिक्टेबल गोष्टी ही आहेत.
बघू आता एन्ड कसा होतोय ते.
मार्वलस मिसेस मेजल ही एक आवडती सिरीज. तिसरा सीझन जरा रेंगाळला होता म्हणून बघायची राहिली होती. पण आता पुन्हा मी चौथ्या सीझन पर्यन्त कॅच अप केले आहे कारण आता शेवटचा म्हणाजे ५ वा सीझन रीलीज झाला आहे. स्टोरी एकदम फील गुड आहे. सर्व मेन अॅक्टर्स फार भारी आहेत त्यामुळे अजूनच मजा येते.
>>द डिप्लोमॅट नेट फ्लिक्स वर
>>द डिप्लोमॅट नेट फ्लिक्स वर आली आहे छान आहे सिरीअल.<< +१
पोलिटिकल, फॉरेन रिलेशन्स्वर ड्रामा आहे. टिपिकली अंबॅसेडरहि ग्लोरिफाय्ड पोस्ट असते - सॉर्ट ऑफ ऑर्डर टेकर, मेसेंजर. पण इथे लार्जर दॅन लाइफ पोर्ट्रे केली आहे. सिझन २ ची सोय करुन ठेवलेली आहे...
नाइट एजन्ट मी पण संपवली पाहून
नाइट एजन्ट मी पण संपवली पाहून.
सस्पेन्स अगोदरच उलगडून दाखवला आहे पण तरीही काय आणि कसे... ही उत्सुकता टिकून राहते.
मस्त आहे ट्रीटमेंट
मस्त आहे द डिप्लोमॅट. चार भाग
मस्त आहे द डिप्लोमॅट. चार भाग पाहिलेत आत्तापर्यंत. कथेचा वेग चांगला आहे. विषय गंभीर असला तरी ब्रिटिश व अमेरिकन राजकारणी एकत्र आल्यावर होणारे विनोदही चांगले आहेत. तो "मॅन इन द हाय कॅसल" मधे ओबरग्रुपेनफ्यूरर सारखी लांबलचक उपाधी असलेला (आणि नंतर ती आणखी लांब होते बहुधा) अॅक्टर यात आहे. केरी रसेलचे काम मस्त आहे. बाकी स्टाफची कामे केलेले लोकही मस्त काम करतात. यात अमेरिकन प्रेसिडेण्टचा रोल केलेला अॅक्टर "बेटर कॉल सॉल" नंतर लगेच पुन्हा चांगल्या रोल मधे दिसला. नाहीतर मला तो अनेक वर्षे फ्रेण्ड्स मधे मोनिकाला मॉक फूड विकायला नेमू पाहात असलेला म्हणूनच माहीत होता.
मला यातला स्क्रीनप्ले सर्वात आवड्ला. अनेक सीन्स मधे एकही संवाद न घालता केवळ लोकांच्या एक्सप्रेशन्सवर सीन पुढे नेला आहे.
या सिरीजची लेखिका आहे तिने द वेस्ट विंग चे काही भाग व द होमलॅण्डचे काही भाग - याची स्क्रिप्ट लिहीली होती.
डिप्लोमॅट +१. बघतोय आणि आवडते
डिप्लोमॅट +१. बघतोय आणि आवडते आहे.
सोनी लिव्ह वर "गर्मी" नावाची
सोनी लिव्ह वर "गर्मी" नावाची सिरीयल आहे. उत्तरेतील कॉलेज्/विदयापीठांत असलेली राजकीय धुळवड हा विषय दिसतोय. दोन भाग पाहिले. अजून खूप पकड घेत नाहीये पण बघतोय तुकड्यांतुकड्यांत.
डिप्लोमॅट , सुरु केलीये. काल
डिप्लोमॅट , सुरु केलीये. काल २(च) मिनीट पाहुन झाली. आता पुढे पाहीन.
Netflixwar maid वेबसीरीज
Netflixwar maid वेबसीरीज पाहिली .>>> हो मी ही पाहिलीये ही. खूप पॉझीटिव्ह वाटते राहते आणि सशक्त. तिची आई कॅरॅक्टर अगदी अशक्य वाटतं आधी मग अमेरीकन आई म्हणुन ती पण कुठे तरी पटायला लागते
ज्युबिली पूर्ण बघितली. खूप
ज्युबिली पूर्ण बघितली. खूप आवडली. बर्याच दिवसांनी इतकी छान हिंदी मालिका पाहिली.
सीझन-२ चं सूतोवाच केलेलं वाटलं. पण दुसरा सीझन आणू नये असं वाटलं मला. ज्या नोटवर संपवलीय ते छान आहे.
सिद्धांत गुप्ताची (जय खन्नाचं पात्र - हे राजकपूरवर बेतलेलं असावं असं वाटतं) फॅन झाले मी. आधी कुठेही त्याचं नाव ऐकलं नव्हतं. वमिका आवडती आहेच.
गरमी फारच अव्हरेज निघाली.
गरमी फारच अव्हरेज निघाली.
नाविन्य काही नाही.
सिद्धांत गुप्ताची (जय खन्नाचं
सिद्धांत गुप्ताची (जय खन्नाचं पात्र - हे राजकपूरवर बेतलेलं असावं असं वाटतं) फॅन झाले मी. आधी कुठेही त्याचं नाव ऐकलं नव्हतं. >>> +100 मी अगदी fan नाही झाले पण जाम आवडला .
त्या सुमित्रा सोबत च्या गाण्यात काय handsome दिसतो तो.
त्या ची आणि निलोफरची जोडी छान दिसते.
Netflixwar BEEF वेबसीरीज
Netflixwar BEEF वेबसीरीज पाहिली..वेग चांगला आहे
Netflix वर The Watcher पहायला
Netflix वर The Watcher पहायला सुरुवात केली आहे. Psychological thriller आहे. एका छानशा चौकोनी कुटुंबाने सबर्ब मधे घेतलेलं अति सुंदर घर आणि त्याच्याशी निगडित रहस्य.
सत्यकथा आहे कळल्यामुळे अजुन जास्त eerie वाटते आहे. Intresting आहे. एकदम शेवटचा सातवा भाग पाहून लवकरात लवकर रहस्य जाणुन घ्यायची उत्सुकता वाटते आहे.
वोचर चा शेवट कळला तर मलाही
वोचर चा शेवट कळला तर मलाही सांगा... मला नाही कळला...
नको पाहु मीरा, सगळी पहा.
नको पाहु मीरा, सगळी पहा.
च्रप्स, कळतो की शेवट, पुन्हा पहा शेवटचा भाग.
बीफ पण चांगली आहे.
सॉरी, माझी गडबड झालीये. मी
सॉरी, माझी गडबड झालीये. मी म्हणते ती वॉचर आहे की दुसरी ते शोधावे लागेल.
नेफिवर "रफ डायमंड" नांवाची
नेफिवर "रफ डायमंड" नांवाची वेबसिरीज आली आहे. विषय वेगळा आहे - बेल्जियम, डायमंड ट्रेड, ज्युज, फॅमिली वॅल्युज, क्रायसेस, गव्हर्नमेंट शोडाउन इ भोवती कथानक फिरते. बघा, आवडेल...
फ्लेम्स (प्राईम):
फ्लेम्स (प्राईम):
इनोसंट, साधीसुधी टीन्सची लव्हस्टोरी. बारावीच्या क्लास मध्ये फुलत जाणारी, अभ्यास - क्रश - प्रेम - इनसिक्युरिटी इ. जे होतं तेच इतकं मस्त दाखवलं आहे! कुठेही मेलोड्रमॅटिक नाही की फारफेच्ड नाही की स्टिरिओटाईप अडसर नाहीत. थोडंसं गुडीगुडी पण अगदी हवंहवंसं उबदार वातावरण तयार करणारी. मला फार आवडली. काय गोड दिसतात आणि वागतात पोरं! कामही मस्त केली आहेत.
त्यातुन दिसणारी दिल्ली ही नेहेमी दिसणार्या दिल्ली पेक्षा वेगळी आणि लव्हेबल. फार साईड स्टोरी न टाकल्याने अजिबात पसरट ही होत नाही.
पांडू आणि अनुशा तर फेवरेट! हायली रेको.
मला आवडतात असल्या सीरीज
मला आवडतात असल्या सीरीज बघायला. टाकते आता लिस्ट मधे.
ठीके पण टिपी बरा झाला.
नाइट एजन्ट संपवली - शेवटी शेवटी अ. आणि आ . आणि फारच प्रेडिक्टेबल होत गेली
वोचर चा शेवट कळला तर मलाही
वोचर चा शेवट कळला तर मलाही सांगा... >>>>> ही सत्यकथा आहे. त्या मुळ सत्यघटनेत जशी रहस्य उकल कधीच झाली नाही, तसाच शेवट वेबसिरिजचा केला आहे. प्रेक्षकांनी आपापल्या समजुती प्रमाणे नोरा, डीन, old preservation society, जॉन ग्राफ, मो यापैकी कोण watcher आहे ते ठरवायचं आहे.
त्या वॉचरमध्ये दाखवलेलं घर
त्या वॉचरमध्ये दाखवलेलं घर २०१९ मध्ये शेवटचं विकलं गेलं होतं.
फ्लेम्स (प्राईम):
फ्लेम्स (प्राईम):
इनोसंट, साधीसुधी टीन्सची लव्हस्टोरी.
>>> विशलिस्टला टाकली
फ्लेम्स रेको बद्दल धन्य वाद
फ्लेम्स रेको बद्दल धन्य वाद . लेकीला सांगते.
CITADEL चा पहिला भाग पाहिला.
CITADEL चा पहिला भाग पाहिला. पठाण , बॉण्ड पट, टायगर पटापेक्षा चांगली पण नावीन्य काहीच नसलेली.
तरीही उत्कंठावर्धक आहे. पुढे पकड घेईल असे वाटते.
अरे वा आली का!
अरे वा आली का!
हो. दोनच एपिसोडस आहेत पण.
हो. दोनच एपिसोडस आहेत पण.
सगळे एपिसोडस आल्यावर बघावी असे वाटतेय.
द वॉचर मस्त आहे. चार भाग
द वॉचर मस्त आहे. चार भाग बघितले.
Pages