Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
The night agent बघून संपवली.
The night agent बघून संपवली. शेवटी शेवटी फारच खेचली आहे. Maddie प्रकरणानंतर लवकर संपवायला हवी होती.
अ आणि अ आहे, पण बर्यापैकी engaging आहे.
Bridgerton चा prequel आलाय
Bridgerton चा prequel आलाय Queen Charlotte . इच्छुकांनी लाभ घ्यावा.
'जामतारा सबका नंबर आयेगा'
'जामतारा सबका नंबर आयेगा' पाहिला. काय मस्त सिरीज आहे. आवडली मला. हल्ली पिक्चरपेक्षा सिरीजमध्ये कथा, अभिनय सगळं असतो. कोणीही ओळखीचं नव्हतं, त्या पोलीसाला पाहिलंय कुठेतरी, पण सगळे नवीन होते माझ्यासाठी, पण सगळ्यांनी कामं छान केलीत.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
ऑलरेडी दोन सिझन आलेत !
ऑलरेडी दोन सिझन आलेत !
वर्किंग मॉम्स चा शेवटचा सीझन
वर्किंग मॉम्स चा शेवटचा सीझन आला आहे. मला ही सीरीज खूप आवडली ओवरऑल. मस्त कॅरेक्टर्स आहेत!
एचबीओ वर White House Plumbers
एचबीओ वर White House Plumbers नावाची वॉटरगेट स्कॅण्डलशी संबंधित नवीन सिरीज सुरू झाली आहे. सध्या फक्त पहिला भागच आहे. तो मस्त आहे. गॉट मधली सर्सी लॅनिस्टरही आहे यात. वूडी हॅरलसन आणि जस्टिन थेरो हे मेल लीड्स आहेत. जस्टिन थेरोला कोठेतरी पाहिला आहे असे सारखे वाटत होते - मॉस्किटो कोस्ट (अॅपल+) मधे जो मेल लीड आहे तो तोच.
ऑलरेडी दोन सिझन आलेत !>>
ऑलरेडी दोन सिझन आलेत !>> पहिले 2 ना, आता तिसर्या सीजनची वाट बघतेय.
maitreyee कोणता सीजन, मला नेफ्लि नवा सीजन म्हणुन दाखवत होता मागे म्हणुन पाहिलं तर 6 वा सीजन, पण माझा तो केव्हाच बघून झालाय. 7 वा आला का?
अजूनही 6 च सिजन्स आहेत, आमचं
अजूनही 6 च सिजन्स आहेत, आमचं नेटफ्लिक्स स्लो आहे काय?
इतक्यातच ( बहुधा गेल्या
इतक्यातच ( बहुधा गेल्या आठवड्यात) सातवा सीझन आलाय ना आता! हाच फायनल सीझन आहे.
जामताराचा दुसरा भाग आला ?
जामताराचा दुसरा भाग आला ? माहितीच नव्हतं.
सिटडेल ने चांगलंच उल्लू बनवलं. दोनच भाग टाकलेत.
कॅनेडियन सिरीज आणि कॅनडातच
कॅनेडियन सिरीज आणि कॅनडातच नवीन सीजन दिसत नाही अजुन.
Justin Theroux ne काही movies
Justin Theroux ne काही movies मस्त लिहिले आहेत. बेन stiller आणि त्याचा tropic thunder cult movie झाला आहे. Prime var असू शकतो. नसेल पाहिला तर जरूर बघा. Surprise एलिमेंट टॉम क्रुज!
हो त्यातही होता का तो? तो
हो त्यातही होता का तो? तो पाहिला आहे पण फारसा लक्षात नाही. तेव्हा फार भारी वाटला नव्हता इतके आठवते.
नाही त्यात तो navta as a
नाही त्यात तो navta as a character. तो लेखक आहे त्या चित्रपटाचा.
फ्लेमस बघायला सुरुवात केली,
फ्लेमस बघायला सुरुवात केली, दोन भाग बघितले, हिरो मस्त आहे. हिरॉईनची खळी आवडली, बाकी ओके. ती अनुशा आवडली जास्त. सरांनी फार सहज काम केलंय.
हो. अनुशा आणि पांडू बेस्ट
हो. अनुशा आणि पांडू बेस्ट आहेत सगळ्यात.
पांडू म्हणजे पांडेजी ना, हो
पांडू म्हणजे पांडेजी ना, हो त्यानेही मस्त केलंय, फेस एक्स्प्रेशन्स छान दाखवल्यात त्याने.
ही सजेस्ट केल्याबद्द्ल धन्यवाद अमितव. फ्रेश क्राऊड बघून छान वाटतं, कॉलेजमधे असताना दुरदर्शनवर कॉलेजमधल्या सिरीयल्स बघितल्यात त्याची आठवण झाली. अर्थात वेबसिरीजची भाषा जरा अजुनही पचनी पडत नाही म्हणा, थोडं दुर्लक्ष करता आलं इथे.
फेल्म्सचा एक भागअ र्धा
फ्लेम्सचा एक भाग अर्धा पाहिला. आवडत आहे. पांडुने मस्त काम केलंय. त्या मुलाचा चेहराच मजेशीर आहे. मला जरा भिती वाटत होती पहायला कारण काही महिन्यापुर्वी दिल्लीच्या कॉलेजमधे घडणारी एक मालिका नेटफ्लिक्सवर आली होती. त्यात पहिल्या अर्ध्या भागात मॉडर्नपणा (?) दाखवायचे सगळे चेकलिस्ट मार्क केले होते, म्हणजे गरीब पोट्टा, श्रीमंत पोट्टी, तिचा गुंड भाऊ, राजकारणातली फ्यामिली, त्यांच्या कारवाया, त्यामुळे पोट्टीचे द्रग व सिगरेट व बेदरकार वागणे, पोट्टा व पोट्टीची मैत्री, दुसर्या एका पोट्टापोट्टीचे कॉलेजमधल्या पार्किंगमधे गाडीतच चाळे, समलिंगी व्यक्तींचे अजुन एक जोडपे…. वगैरे वगैरे. चेकलिस्ट संपेचना त्यामुळे ती पहायची बंद केली. ही साधी गोड वाटते.
जामताराचा दुसरा भाग आला ?
जामताराचा दुसरा भाग आला ? माहितीच नव्हतं. >>> +१
फ्लेम्स पहीला सिझन बघितला.
फ्लेम्स पहीला सिझन बघितला. हलकीफुलकी आहे स्टोरी.
अजुन दोन सिझन्स आहेत. ते बघेन.
दहाड (अमेझॉन प्राईम) -
दहाड (अमेझॉन प्राईम) -
राजस्थान च्या एका छोट्या कसब्यात एका मागोमाग एक महिलांचे संशयास्पद मृत्यू होत असतात. तिथली पोलीस टीम खुन्यापर्यंत कशी पोचते याची स्टोरी आहे.
अर्थात ट्रेलर पासूनच खुनी कोण आहे हे लपवून ठेवलेलं नाहीये त्यामुळे सीरिज ला सस्पेन्स थ्रिलरपेक्षा सोशिओ पोलिटिकल इन्वेस्टीगेशन असंच म्हणावं लागेल.
सगळ्या सपोर्टींग कलाकारांची कामं चांगली आहेत. सोनाक्षी चा अभिनय बरा आहे पण तिचा स्मॉल टाऊन राजस्थानी अकॅसेन्ट मधून मधून सटकतो.
ओव्हरऑल चांगली वाटली. 3.5 / 5 गुण देईन.
दहाड (अमेझॉन प्राईम) -<< शेवट
दहाड (अमेझॉन प्राईम) -<< शेवट गुंडाळलाय,
सीरिज ला सस्पेन्स
सीरिज ला सस्पेन्स थ्रिलरपेक्षा सोशिओ पोलिटिकल इन्वेस्टीगेशन असंच म्हणावं लागेल. >>> पहिला भाग पाहिला आणि असेच वाटले. पण कामे चांगली आहेत. सिरीज एंगेजिंग वाटते.
पण कामे चांगली आहेत. सिरीज
पण कामे चांगली आहेत. सिरीज एंगेजिंग वाटते. >>
हो, आजवर तरी झोया अख्तर आणि रीमा कागती या जोडगोळीने कधीच सपशेल निराशा केली नाहीये.
डिप्लोमॅट एकेक करत संपवली.
डिप्लोमॅट एकेक करत संपवली. आवडली.
फॉरेन सेक्रेटरी आणि अँबॅसेडर यांचा लवसीन किमान किसिंग सीन येईल येईल करत राहिलाच की!
हो पण मला तेच आवडले. आता
हो
पण मला तेच आवडले. आता पुढच्या सीझन मधे काही बदलते का माहीत नाही पण काही सिरीज्/पिक्चर्स मधे अशा पेअर्स असतात की ज्यांच्यात रोमॅण्टिक इन्व्हॉल्वमेण्ट न झालेलीच चांगली वाटते. (उदा: फ्रेण्ड्स मधे रेचेल आणि चॅण्डलर. त्यांचे एकत्र सीन्स सुंदर आहेत. पण रोमॅण्टिक नाहीत).
बाय द वे, मी समजत होतो की भारतातल्याप्रमाणे इंग्लंडमधेही "सेक्रेटरी" ही नोकरशाही मधली पोस्ट असते. अमेरिकेसारखी मंत्र्याचे अधिकार असलेली नाही. आपली पार्लमेण्टरी सिस्टीम इंग्लंडच्या सिस्टीमसारखी असल्याने तसे वाटायचे. त्यामुळे तेथे फॉरेन "मिनिस्टर" असेल असे वाटले होते.
पण मला तेच आवडले. >> हो!
पण मला तेच आवडले. >>
हो! डेनिसनने मस्त काम केलंय. तिच्या बरोबर असताना तो टोटल फिदा मोड मध्ये असतो. ब्रिटिश वे मध्ये फ्लर्ट करत असतो. हिला काहीच झेपत नाही. 
गूगल करायचं राहिलं. करतो आता.
इंग्लंडमधेही "सेक्रेटरी" ही नोकरशाही मधली पोस्ट असते>> हो. मला ही तसंच वाटलेलं. आणि मग अमेरिकन ऑडियन्सला समजावं म्हणून वॉटरडाऊन केलं की काय असं वाटून हसून पण घेतलं.
मग अमेरिकन ऑडियन्सला समजावं
मग अमेरिकन ऑडियन्सला समजावं म्हणून वॉटरडाऊन केलं की काय असं वाटून हसून पण घेतलं. >>>
अरे टोटली माझाही तसाच समज झाला होता 
कुणी सिटडेल पाहतंय का? कशी
कुणी सिटडेल पाहतंय का? कशी आहे?
Hot star वर ' सास, बहु &
Hot star वर ' सास, बहु & फ्लेमिंगो ' नावाची वेब सिरीज पाहिली. लीड - डिंपल कपाडिया.
कथा आहे, डिंपल सासु, तिच्या दोन सुंदर बहु आणि underground कोकेन उगवुन त्यापासुन बनवलेल्या फ्लेमिंगो नावाच्या ड्रग एम्पायरची.
कोकेन वर विविध प्रयोग करून त्यापासुन variety ड्रगज बनवणारी डिंपलची मुलगी ही अजुन एक सुंदरी. आणि मग डिंपलची अनाथ/पिडित स्त्रियांची फौज. अशा भरपुर सुंद्र्या आणि उगीच diversity candidates अनिवार्य असल्यामुळे 5-6 पुरुष (त्यातील एक नसीरुद्दीन) दिसत रहातात. बाकी सेक्स, गे रिलेशनशिप, न्युडीटी, हिंसा, रक्त हा OTT mandate असल्यामुळें भरपुर आहे.
राजस्थानची पार्श्वभूमी आहे. जुनी हवेली, वाळवंट, ते कपडे, ज्वेलरी पहायला आवडलं. डिंपलच्या look ने तिच्याच ' लेकीन' ची आठवण करून दिली. आताही ती सुंदरच दिसली आहे. यातले तिचे आणि तिच्या दोन सुनांचे काही tatoo copy करायचा मोह होतो आहे.
Suspense निर्माण करून सिझन 1 संपला आहे. टिपीकल बॉलिवूड टाईप मारामाऱ्या आहेत. डोकं बाजुला ठेवून एकदा बघायला मला चालली.
Pages