वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण बोअर का वाटते>> ती बोअरच आहे व धाक टी जरा जासतच आगाउ आहे.

ब्लॅक मिरर नवा सीझन एक भाग बघितला. व समर स्ट्राइक एक के ड्रामा बघितला. काही भाग. हिरो हिरवीण साधी आहेत अगदी.

बघायला काही सापडत नव्हत म्हणून प्राईमवर Blue Bloods बघायला सुरुवात केलीय .
माझा आवडता genre . NYPD , LAPD , Police Detective वगैरे थीम्स मला पहायला आवडतात . Happy

सगळः रेगन कुटुम्ब पोलीसात आहे . आजोबा हेन्री एक्स पोलिस कमिशनर , बाबा फ्रॅन्क सध्याचे पोलिस कमिशनर , मोठा मुलगा डॅनी पोलिस डिटेक्टीव , मधला मुलगा ज्यो पण पोलिसात होता तो मारला गेलाय , धाकटा जेमी आताच अ‍ॅकॅडेमीमधून पास झालाय तो ऑफिसर आहे . मुलगी एरीन वकील आहे . त्याच्यासोबत मोठ्या मुलाची बायको लिन्डा , त्यांचे दोन लहान मुलगे , एरीनची टीनेजर मुलगी निकी , डॅनीची पार्टनर जॅकी , फ्रॅन्कची सेक्रेटरी बेकर , मेयर ई ई .साध्या सरळ गुन्हेगारीच्या कथा , कुटुंबियांचे आपापसातले संबंध , त्यांचे वैयक्तिक प्रोब्लेम्स .
टोटल १३-१४ सीझन्स दिसतायेत , तेवढे पेशन्स नाहियेत - जितके आवडतील तितके बघेन Happy

ती लिन्डा , सासर्याना आणि आजे सासर्यना - फ्रॅन्क आणि हेन्री म्हणून नावाने हाक मारते - माझ्यासाठी कल्चरल शॉक होता . Happy

सोनाली कुलकर्णी (मोठी) उत्तम अभिनेत्री असली तरी मलापण बोअर का वाटते ते मला अजुनही कळले नाहीये. अपवाद ‘गुलाबजाम’. आवडत नाही असं नाही पण कंटाळा येतो तिला पहाताना.
कदाचित गुलाबजाम सारखे चित्रपट करते व शिकवण द्यायची सवय असले रोल करते म्हणून बोअर वाटते. crackdown 2 मध्ये सोकूला रॉ चिफचा रोल आहे. तिच्या तोंडातून baxxxxrd शिवी पण ऐकयला विचित्र वाटते.

काल crackdown 2 बघून संपवली. शेवटचा ट्विस्ट बरा आहे.

एक कळत नाही की प्रत्येक अतिरेकी यांची काही तरी इमोशनल स्टोरी असतेच व दाखवावीच लागते का? उगाचच सिस्टीम किंवा राजकारणी लोकांमुळे अतिरेकी तयार होतात हे दाखवायचा प्रयत्न. पण ओव्हरऑल ही सिरीज आवडली. मुळ कारण म्हणजे वेग. कदाचित त्यामुळे काहींना शेवट गुंडाळल्यासारखा वाटू शकेल.

शिवी पणअ ऐकयला विचित्र वाटते.>> कारण ती खूप प्रिव्हिलेज्ड वातावरणातून आलेली आहे. कधी असे शब्द वापराय्ची वेळ आलेली नसेल.
ह्या नट्यांचे दिल के करीब मधील मुलाखती बघा. घेणा री पण लाडे लाडे, बोलणा रे पब्लिक त्याहू न लाडे लाडे. मी फक्त काय गिफ्ट देण्यात आलेल्या आहेत ते बघते व मग टर टर चालू ठेवते. आता ह्या बाईंनी एक वेगळे वळण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो स्तुत्य आहे.

सो कूच्या आळशी बायकां ट्वीट नंतर मी तिला सीरीअसली घेत नाही. दुसरी ज्युनीअर अजूनही अप्सरा मोड मधून बाहेर येत नाही. आता चेहरा तर लैच वयस्कर दिसतो वेडा वाकडा.

इरिटेटिंग/ कटकटी/ डोक्यात जाणारी कॅटेगरी करत असाला तर अमृता सुभाषला आधी टाका त्यात. ती दिसली की एकसुरी आणि कंटाळवाणेपणाची निश्चिंती होते.
मुलाखती तर तिने देणं बंदच करावं. कधी बरं काम घडलंच तर मुलाखत एक्सपोजरमुळे ते ही अप्रिशिएट करावं वाटत नाही.

हो हो, अमृता सुभाष फार लाउड वाटते मला - अ‍ॅक्टिंगही, आणि एरवी तर फारच! तसंच दोन्ही सोकुंबद्दल अमांना अनुमोदन.
पण कालच मी यूट्यूबवर 'लस्ट स्टोरीज२'च्या निमित्ताने घेतलेला एक इन्टरव्ह्यू पाहिला, कोंकणा सेन, अमृता सुभाष आणि तिलोत्तमा शोम तिघींचा, त्यात अ.सु. बरी बोलली.

अ. सु. यात अनॉयिंग नाही वाटली, पण असे वाटले की ती तिचेह म्हणणे एक्सप्रेस करायला शब्द शोधते आहे सतत. Happy

अमृता सुभाष फार लाउड वाटते मला >>> नेमकं काय आवडत नाही हे सांगता येत नाही, पण वळू सोडला तर ती इरीटेटींग वाटते. एका अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात आमीर खानला पाहून इतकी चेकाळली होती कि निवेदन कशाचं आहे हेच कळत नव्हतं.

सो कु ज्येष्ठ यांनी धारावी वरील सिरीज मध्ये मनसोक्त शिव्या दिल्या आहेत.. ग म भ न. (त्या सिरीज मध्ये सुनील शेट्टी डॉन आहे )

>>> पण असे वाटले की ती तिचेह म्हणणे एक्सप्रेस करायला शब्द शोधते आहे सतत
हो! तिला 'चारचौघी' म्हणजे काय तेही नीट सांगता आलं नाही! जौद्या झालं!

ह्या नट्यांचे दिल के करीब मधील मुलाखती बघा. घेणा री पण लाडे लाडे, बोलणा रे पब्लिक त्याहू न लाडे लाडे. >>> Happy मी एक दोन क्लिप्स पाहिल्या आहेत. आणि असेच वाटले होते. आपल्याकडे मुलाखत घेणारे महानम्र अवस्थेत असतात कायम. आणि मुलाखत देणारे एकदम ग्यान पेलत असतात. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलतात तसे बोलत असतात Happy

सोकु (सीनियर) एक अभिनेत्री म्हणून जबरदस्त आहे. पण तिच्या संवादफेकीत कायम काहीतरी खटकते (पुणे ५२ मधे तिचे संवाद ऐकताना हे वेगळे डबिंग सुरू आहे असे एकदा वाटले आणि मग पूर्ण पिक्चरभर ते डोक्यातून काढता आले नाही). ते शिवी ऑड वाटणे त्यामुळे असेल. आपल्याकडे प्रिविलेज्ड क्लास मधले लोक इंग्रजी शिव्या अगदी सराईतपणे देतात.

>>> सोकु (सीनियर) एक अभिनेत्री म्हणून जबरदस्त आहे.
मला नाही असं कधी काही एक्सेप्शनल वाटलेलं. एखादा सिनेमा सांग वानगीदाखल.

त्यात अ.सु. बरी बोलली. >>>> किती कृत्रिम इंग्लिश बोलली आहे. काहितरी विचित्र अ‍ॅक्सेंट. पुण्यात टिपीकल पेठी शाळांमधल्या मुली आपण किती "क्युल" आहोत असं दाखवायला अश्या पध्दतीचं इंग्लिश बोलत्य, त्याची आठवण झाली.

दिल के करीब फार बोर आहे. त्यापेक्षा रंगपंढरी खूप आवडायचं. त्यातले बरेच भाग बघितले आहेत.
दिल के करीब मधला निशिगंधा वाड चा भाग बघा. बाईंचा आवाका इतका मोठा आहे की बस!!

>>> किती कृत्रिम इंग्लिश बोलली आहे. काहितरी विचित्र अ‍ॅक्सेंट.
त्याला काय इलाज आहे? तो तर आपलाही आपल्याच मुलांनाही वाटतो. Proud
एरवीइतकी लाऊड नाही वाटली आणि नुसत्या आवाजीपेक्षा काहीतरी सब्स्टन्स होता -अशा अर्थी म्हणते आहे. Happy

>>> दिल के करीब मधला निशिगंधा वाड चा भाग बघा. बाईंचा आवाका
होमोफोबिक बोलली होती तोच भाग का? मला अजिबात नाही आवडला.

आपल्या कडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्री पुणे /मुंबई इथल्या सारख्याच ममव बॅकग्राऊंडच्या तितक्याच सपक, तेच ते रूईया/नाटकाची पार्श्वभूमी, आईवडीलांचा सपोर्ट, सारखंच प्रमाण मराठी , लहानपणापासून केंकरे/ पणशीकर टाईप यांच्या घरी चहाला येतात. पुस्तकंही पुलंचीच वाचतात. गप्पांतले संदर्भही पुण्यामुंबईचेच असतात. यांच्यासाठी बाहेरचं जग म्हणजे फार फार तर कोल्हापूर. एक मराठवाड्यात वाढलेली मुलगी म्हणून मला यांच्याशी रिलेटच करता येत नाही. प्लास्टिकच्या वाटतात. अगदी लोणच्याएवढा संघर्षही सांगतात, औपचारिकता हो !

अमृता सुभाष अतिशय लाऊड आहे. छोटी सोकु लक्षात रहात नाही. अमृता खानविलकर नाकातून बोलते. सुरेख दिसायचा आटापिटा करते. मोठी सोकु कायम पुणेरीच वाटते. निशिगंधा वाड प्रोफेसर वाटते. अश्विनी भावे कोण्या मोठ्या माणसाची बायको वाटते. अश्विनी भावेची मुलाखत बघितली दिल के करीब मधली. तिच्या आयुष्यात सगळं तिला वाटलं तेव्हा बरोबर झालं आहे. पररररररफेक्ट Wink तिने बोअर होतं म्हणून लावलेली गाजरंही किलोंनी आली. गार्डनिंग मधे सुद्धा पररररररफेक्ट.

तिने बोअर होतं म्हणून लावलेली गाजरंही किलोंनी आली. >>> Lol

आदित्य चोप्रा/करण जोहरच्या पिक्चर मधल्या हिरॉइन्स जशा एका साच्यातून काढल्यासारख्या वाटतात तसे अनेक मराठी हिरॉइन्सबद्दल वाटते हे खरे. त्याला कारण थोडे त्यांचे व्यक्तिमत्त्व व पिक्चर्सच्या कथाही तशा सपक असणे किंवा रोल्स ही पांढरपेशे असणे हे ही असू शकेल. म्हणजे मिस वर्ल्ड मधे आलेल्या मुलीला लीड रोल द्यायचा व भूमिका "फॅशन डीझायनर"ची, असा प्रकार.

यातल्या हौशी कवयित्री व त्यांच्या कविता हा ही एक मनोरंजक प्रकार आहे Happy

मुक्ता बर्वे (सुंबरान, जोगवा), वीणा जामकर, आश्विनी गिरी वगैरेंसारख्याही आहेत या साच्याबाहेरच्या. यातली मुक्ता बर्वे सोडली तर बहुतांश मेनस्ट्रीममधे कमी दिसतात.

होमोफोबिक बोलली होती तोच भाग का? मला अजिबात नाही आवडला. >>>> हो तोच तो.. मला आवडला म्हणून बघा असं म्हणत नाहीये. सर्कास्टीकली लिहिलय. प्रश्न काय उत्तर काय! कुठला विषय कुठे आणि शिवाय उगाच विषयाला सोडून होमोफोबिक कमेंट्स!

तो तर आपलाही आपल्याच मुलांनाही वाटतो. >>>> हो पण निदान (म्हणजे मी तरी) आहे त्या अ‍ॅक्सेंटमध्ये बोलतो. मला खात्री आहे अमृता सुभाष नेहमी ह्या अश्या अ‍ॅक्सेंटमध्ये बोलत नसणार. हा मुद्दाम काढलेला अ‍ॅक्सेंट वाटतो, त्याबद्दल बोलतो आहे मी.

>>> सर्कास्टीकली लिहिलय.
हाँ, मग ठीक आहे. Proud

>>> अमृता सुभाष नेहमी ह्या अश्या अ‍ॅक्सेंटमध्ये बोलत नसणार. त्याबद्दल बोलतो आहे
शक्य आहे, काही कल्पना नाही.

अस्मिता. Lol
(मुंबईची असून मला हसू आलं बघ! Proud )

बाई, मुंबईच्या असूनही 'राकट देशा कणखर देशात' तुमचं मनापासून स्वागत ! Wink Happy

फा, Happy पण या साच्याबाहेरचाही एक साचा लगेच तयार होतो. साच्यात सोकु साच्याबाहेरच्या साच्यात मुक्ता, बरेचदा बेगडी अवसान वाटतं. वीणा जामकर, विभावरी देशपांडे मात्र आवडतात.

अस्मिता Proud मला पण अमृता सुभाष अजिबात आवडत नाही , डोक्याला शॉट, तिची आईपण नाही. दफ्तरदार भगिनी छान काम करतात. आणि ते रुपारेल तर प्रत्येक मुलाखतीत हवेच हवे Proud

लंपन, मला ती नटरंग व हरिश्चंद्राची फॅक्टरी मधे आवडलेली. रूपारेल पण. मला पाठ व्हायला लागलेत हे इंटरव्ह्यू. दफ्तरदार भगिनी चांगले काम करतात, पण मला आता आठवल्याच नाही.

हो , दोन वर्षांपूर्वी अमृता सुभाष आणि तिची आई या दोघींना बोटीत बसवून लांब सोडून यायला हवं या अमांच्या(?) कमेंटला मी हातातलं काम सोडून तातडीने +१ दिलं होतं. जसं काही पिटिशनच आहे. Proud

वरच्या सगळ्याच पोस्टना +१.
दिल के करीब फारच मिट्टंगोड असतं +१. रंगपंढरी जेन्युईन वाटायची आणि आवडायची.
आपल्याकडले मुलाखतकार महानम्र आणि दुसरी बाजू ग्यान देणारी हे इथले रेडिओवरचे कार्यक्रम ऐकू लागल्यावर प्रकर्षाने जाणवू लागलं. ताठ मानेने प्रश्न आणि गोत्यात आणणारा प्रश्न असला तरी ताठ मानेने वातावरण खेळीमिळीचं ठेवत एकमेकांना बारिक चिमटे काढत घेतलेली मुलाखत किंवा मनापासून उत्सुक्ता असलेली टेलर्ड असली तरी तशी न वाटणारी मुलाखत किंवा साधी प्रश्नउत्तरे ही मजा आणतात. आपल्याकडे बरेचसे मखरात बसवुन घंटा वाजवतच मुलाखत घेतात.
रच्याकने: आपल्या देसी तात्यांना एक साधा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तयार करुन धोबीपछाड घालणं काय कठिण होतं का? तेवढं एक्सपेक्ट करुन जरा तयारी करायचा ही आळस. हजरहबाबी पणा तर नाहीच, सगळाच लेमळट कारभार. त्यापेक्षा रिअल-तात्या चक्रम बोलून लेटनाईटला तरी कंटेंट देतात. Wink

आपल्याकडे बरेचसे मखरात बसवुन घंटा वाजवतच मुलाखत घेतात. >>> Lol टोटली. इथे मस्त खुली चर्चा असते तुलनेत.

देसी तात्या - लोल

Pages