वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणती नवी सिरीज आली म्हणून घाईघाईने वाचायला आले तर सर्वांचे सात्विक संताप गगनाला भिडलेत. Lol
सोनाली कु. चा आवाज पण बरोबर नाही. घशात काहीतरी अडकल्यासारखा वाटतो. मोकळा नाहीये हे ही एक कारण आहे.
निशिगंधा वाड तर फारच बोअर.
रंगपंढरी वालीचे हम्माहम्मा हुंकार ऐकवत नाहीत म्हणुन तिच्या मुलाखती पहाणं बंद केलं.
दिल के करीब मला अजुन तरी आवडते.
अमृता सुभाषला फार पाहिलं नाही.
अमृता खानविलकर... नक्को रे बाबा. तो कोणता सिनेमा आला तिचा हल्ली? कशीबशी सहन केली तिला कोठारे मुळे. गैरमधे पण संदीप कुलकर्णीमुळे सिनेमा तरला.
मुक्ता बर्वेबद्दल मी एकदम पार्शल आहे त्यामुळे तिने काही केलं तरी मला आवडतं. Happy (विद्या बालन सारखे)

आता धाग्याची लाज राखायला - 'ब्लॅक मिरर' सहावा सिझन भारी आहे. पहिले ५ नंतर पाहीन पण हा संपवायला घेतलाय.
(आणि तोंडी लावायला चटणी, लोणचं लागतं तसं 'मंक' चा एकतरी भाग मी रो ज पहाते. ५ व्यांदा सुरु केली आहे मालिका पुन्हा पहायला.)

विभावरी देशपांडे मात्र आवडतात. >> विलक्षण दुर्दैवी अभिनेत्री. प्रत्येक सिनेमात तिच्या वाट्याला प्रॉब्लेमॅटिक नवरा येतो.

काल नेटफ्लिक्स वरची स्कुप बघितली
मुबैतल्या प्रसिद्ध रिपोर्टर जिग्ना व्होरा हिच्यावर दुसर्‍या एका क्राइम रिपोर्टरच्या खुनाचा आरोप झाला होता ज्यात तिला आणी तिच्या परिवाराला खुपच हाल सोसावे लागले. कुठलाही गुन्हा केलेला नसताना तिची झालेली परवड,तिने सिस्टिमशी दिलेला लढा.काहि वर्शापुर्वी तिला पुराव्याअभावी केसमधुन मुक्त करण्यात आल त्यानतर तिने एक पुस्तक लिहल त्यावरच बेस्ड ही सिरिज आहे.
अडरवल्ड, पत्रकार याचे एकमेकाशी असलेला सबन्ध.त्यानी एकमेकावर केलेल्या कुरघोड्या, सनसनाटी फ्रन्ट पेजसाठी व्रुत्तवाहिन्याची स्पर्धा, इर्शा, छुपी दुश्मनी हे सगळ सगळ यात आलय.
सिरिज खुप रन्जक आहे, एकही मिनिट स्र्किनवरुन लक्ष दुसरिकडे जात नाही.सगळी कास्ट जबरदस्त आहे.मुख्य भुमिकेतल्या करिष्मा टन्नाचा हा बहुधा पहिलाच मध्यवर्ती रोल आहे.फार सुन्दर काम केलय तिने, तिच्याइतकच कुणाच काम मला आवडल असेल तर इमरानच्या भुमिकेतला मोहम्मद झिशान अयुब...तनु वेडस मनु-२ मधला अवलिया तेव्हा पण लक्षात राहिला होताच.
त्याच्या तोन्डी असलेला हा डायलॉग म्हणजे स्वतःला लोकशाहीच्या चौथा स्तभ म्हणवुन घेणार्‍या मिडियाला मारलेली सणसणित चपराक आहे
"When someone says it's raining and the other says it's dry, it's not our job to report both. Our job is to fuc*ing look outside the window and report what's right."

काय मी crackdown 2 सिरीज बघितली आणि सोकू व इतर मराठी अभिनेत्र्यांवर चर्चा झाली. पण प्रतिसाद वाचून मजा आली.

अस्मिता - तुमचा प्रतिसाद एकदम मस्त. पटेश.

का कोणास ठाऊक पण मला मुक्ता बर्वे पण याच कॅटेगिरीतली (सोकू, असु) वाटते. तिच्या अभिनयात जरा अतिशहाणपणा वाटतो. श्रेया बुगडे ह्या सर्वांची मस्त खेचते ते मात्र आवडते. एका चला हवाच्या एपिसोडमध्ये तिने मुक्ता बर्वे समोरच तिची नक्कल करताना अति perfection चा नमुना दाखवला होता. हसून हसून फुटलो होतो.

होमोफोबिक कमेंट गाजली तशी सोकुलची "आजकालच्या मुलींना सगळं आयतं हवं असतं," ही कमेंटही. अनेक पीडित पुरुषांना ती आपली तारणहार वाटली. तर वोक स्त्रियांना वा स्त्रीवाद्यांना ती अन्याय्य , विशिष्ट वर्गा पुरती मर्यादित वाटली. बोलताना तसं काही म्हटलं नव्हतं.

सोकुलचा आवाज विचित्र वाटतो. सत्यदेव दुबेंची आठवण सांगताना तिने आवाजाबद्दलच सांगितलं होतं. म्हणजे दुबेंना जे म्हणायचंय ते एकतर तिला कळलं नाही किंवा आपल्याला पटत नाही.

If someone says it's raining and another person says it's dry, it's not your job to quote them both," goes a quote often attributed to journalism professor Jonathan Foster. "Your job is to look out of the f—-ing window and find out which is true."

सोकु सिनियर मला अभिनयात आणि दिसायला कायम च आवडत आली आहे.. आवाजाचं म्हणाल तर त्यात काय? अभिनय, एक्सप्रेशन्स निदान मला सर्वात महत्वाचे वाटतात त्यामुळे माफ..
अमृता सुभाष मला बघताच दिडशहाणी आणि बोर वाटते. गंध मधे अ ति लाऊड अभिनय करून वात आणलाय.
पूजा सावंत आवडते मला..जिवंत वाटतो तिचा अभिनय. अधिर मन झाले मधे काय सुंदर हावभाव आणि अदा..
प्रिचो ची सावली वाटते Happy

ऑ आशु, गंध मधल्या अ सु च्या अभिनयाला अति लाऊड म्हणशील तर अय्या मधल्या राणी मुखर्जी च्या अभिनयाला द्यायला अजून वरची उपमा कुठे शोधणारेस Happy

ब्लडी डॅडी पाहिला.एकंदर शाहिद ला बघण्या साठी लोकांनी लॉजिक पासून कितीही फारकत घेतलेली सहन करावीच असा आग्रह आहे.

Modern Love च्या short stories आवडतात. modern love मुंबई आवडली होती, म्हणून modern love चेन्नई पाहिली, पण त्यापेक्षा हैद्राबाद जास्त आवडली.

Modern love याच नावाच्या न्यूयॉर्क टाइम्स मधील सदरावर आधारित कथा आहेत. याची न्युयॉर्क, टोकियो, Amsterdam, मुंबई अशी versions आहेत. काही कथा आवडल्या आणि काही पकाऊ होत्या.

अमृता खानविलकर. >>> ही आवडते मला. पुर्वी हिचं मराठी अगदीच ऐकायला त्रास व्हायचा, आता सुधारले आहे जरा. मी फार काही चित्रपट बघत नाही त्यामुळे एकंदरीत सगळ्यांचे काम कमीच बघितलं गेलंय.

दफ्तरदार भगिनी आवडतात.

कोणाच्या मुलाखती बघायचा एकंदरीत कंटाळा आहे. निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून आवडत नाही, तिच्या शिक्षणाबद्दल आदर आहे.

मी इतक्यात 'सिटी ऑफ ड्रीम्स' (पहिला सीझन) पाहिली. दोनेक वर्षं जुनी आहे असं कळलं, मला माहीत नव्हती.
मला सहसा नागेश कुकुनूरचं दिग्दर्शन आवडतं - या सिरीजनेदेखील शेवटपर्यंत इन्टरेस्ट टिकवून ठेवला.
मुंबईत घडणारा पोलिटिकल ड्रामा आहे, बरेच मराठी अ‍ॅक्टर्स आहेत, सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत.
तो 'पद्मावत'मधला देशनिकाला दिलेला अ‍ॅक्टर यात सापडला. Proud

सोकु दोन्हीही मला आवडत नाहीत, अम्रुता सुभाष इरिटेतिन्ग आहे पण गलि बॉय आणी देउळ मधे आवडली होती... काही काही भुमिका मधे सुट होते.
अम्रुता खानविलकरचा डान्स , फिटनेस, कॉन्फिडन्स आवडतो.चन्द्रमुखितही बर काम केलय तिने ( गावाकडचे अ‍ॅक्सेन्ट जमवलेत बर्‍यापैकी).
..तिच्याबद्दल उगाच एक सोफ्ट कॉर्नर आहे.
मुक्ता बर्वे बाबत सुनिधीशी सहमत...तिच्याबद्दल थोडा बायसच असल्याने तिची काम आवडतात.

मला ही आत्ताच समजले city of dreams baddal. Pan Priya बापट आहे हे वाचून भीती वाटतेय lol. ती वरच्या कॉमेंट्स मध्ये दिसली नाही Lol
बाकी वरील सार्‍या कॉमेंट्स ना अनुमोदन Happy (मी मुंबईची आहे lol ) सोनाली कुलकर्णी दिल चाहता है मध्ये पण पुणेरी दिसली. वरून लाऊड रंगीबेरंगी मेकअप आणि तिला अवघड करणारे कपडे.
बाकी नवीन अभिनेत्री मध्ये, Mithila palkar मला मुरंबा मध्ये आवडली. अमेय वाघ ही त्यात आवडलेला.

(नागेश kukunoor che चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो जायचा नेम होता एके काळी.)

>>>>>सोनाली कुलकर्णी दिल चाहता है मध्ये पण पुणेरी दिसली.
बरोबर. नॅह!! सैफपुढे अगदीच ही वाटली मला तरी. कदाचित डायरेक्टरने अधिक मेहनत करवुन, नीट काम करवुन घ्यायला हवे होते.

@अस्मिता ः पटलंच. पण अश्विनी भावेचा आवाका जास्त आहे या सगळ्यांपेक्षा. कळत नकळतमधल्या छोट्याश्या रोलमधली, वजिरमधली अश्विनी अजून लक्षात आहे. आणि त्याकाळी प्रमोशन फंडा जास्त नसल्याने ती ओव्हरएक्स्पोज नाही झाली.

@प्राजक्ता मोहम्मद झिशान अयुब चांगला ॲक्टर आहे. ‘रांझना’तला त्याचा अभिनय व डायलॉग डिलीव्हरी आवडली होती.

मनमोहन, रहमान आणि कुकुनूर म्हणजे आपले दोन गुण जमले Happy
'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये प्रिया बापटनेही चांगलं केलंय काम.

बाकी मला शिवराळ भाषेची अ‍ॅलर्जी नाही, पण या सिरीजमध्ये अतिरेक वाटला त्याचा.

अश्विनी भावेने 'कदाचित' नावाचा सिनेमा काढला होता, चांगला होता असं आठवतंय - अमरापूरकर होते त्यात.

ए हो मुलाखतींचा वेगळा धागा हवा. मलाही function at() { [native code] }इशय आवडतात मुलाखती. अगदी माझा कट्टा पासून रंगपढरी, दिल के करीब पासून बिअरबायसेप्सवाला रणवीर घेतो त्या मुलाखतीचे पॉडकास्ट्स इ. सर्वच आवडतात.

"When someone says it's raining and the other says it's dry, it's not our job to report both. Our job is to fuc*ing look outside the window and report what's right." >>> I would rather if these journalists just showed the rain and let the public decide !

सिटी ऑफ ड्रीम्सचे दोन सीझन्स पाहिलेत, दोन्ही आवडले. (तिसरा सीझनही नुकताच आलाय, पण अजून पाहिला नाही.)
प्रिया बापटने मस्त काम केलंय. तिला अशा गंभीर, टेन्स भूमिका शोभतात.
बबली, चिक रोल्समध्ये ती मला आवडत नाही.

मनमोहन, रहमान आणि कुकुनूर म्हणजे आपले दोन गुण जमले :

स्वाती ताई Happy मणीरत्नम आणि गुलजार अॅड करू शकतो Happy

सिटी ऑफ ड्रीमस ट्राय करते.

Pages