वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सिरीज, पत्रकार ज्योतिर्मय डे मर्डर केस वर आधारित आहे, ज्यात अजून एक पत्रकार जिग्ना वोरा ला सस्पेक्त म्हणून नेम केलं होता.<<
हा संदर्भ माहित नव्हता. हे फॅक्टबेस्ड असेल तर छोटा राजनचं केलेलं मॅनिप्युलेशन खरं असेल का?..

दहाड पण पाहिली नाही. धागा चालण्यासारखा मसाला ( राजकारण / धार्मिक / जातवाद / सेन्सॉरेबल सीन्स इत्यादी ) आहे का ? >>>> अगदी भरपुर मसाला आहे.
जातीयवाद, धार्मिक वाद, feminism, लग्न संस्था, pre marital sex असे सगळेच विषय म्हणजे तुमचा धागा शंभरी लगेच पार करेल.

(स्पॉयलर्स नाहीयेत)
असुर2 पूर्ण संपवला.एकंदर जबरदस्त वाटला.संवाद पॉवर पॅक आहेत.मध्ये मध्ये मेंटलिस्ट आणि रेड जॉन कल्पनेची आठवण आली.

सिटाडेल संपवली एकदाची. आधी काहीतरी कूल असेल असे वाटले पण नंतर बोअर झाली. कै च्या कै. एक तर सगळे प्लॉट ट्विस्ट्स प्रेडिक्टेबल. त्यात सतत १० वर्षे मागे नेब्रास्कात मग ५ वर्षे पुढे वॅलेन्सिया मग प्रेझेन्ट टाइम बर्लिन , पुन्हा २५ वर्षे मागे वॉशिंन्ग्टन अशा उड्या, ज्याने काहीच साध्य होत नाही. अ‍ॅब्सर्ड वाटायला लागतं सगळंच. प्रिचो त्यातल्या त्यात सेव्हिंग ग्रेस आहे. रिचर्ड मेडन उर्फ रॉब स्टार्क तद्दन दगड आहे . जबरदस्त ठोकळा! तो एकहाती पार रसातळाला नेतो सीरीज. बघू नका.

मी पण दोन भाग पाहिले आणि हे अ आणि अ च्या वरच्या श्रेणीतले आहे असे वाटल्याने नंतर पाहिलेच नाही. अर्थात त्या वेळी दोनच भाग उपलब्ध होते म्हणून वाचलो. Lol

रिचर्ड मेडन उर्फ रॉब स्टार्क तद्दन दगड आहे . जबरदस्त ठोकळा! >>> लोल आता मला रेड वेडिंग चे खरे रहस्य कळाले Happy

मै - सिरीज मधे वॉशिंग्टन वगैरे ठिकाण दाखवताना टाइपरायटरचा आवाज करून स्क्रीनवर अक्षरे उमटत होती का? तो एक क्लिशे बाकी आहे.

सिताडेल spoiler असू शकतात खालील पोस्ट मध्ये.

दगड ठोकळा ला अनुमोदन Lol
प्रिचो मात्र छानच.
दाविक/ डाविक एक character फारच हिरोईक stylish व्हिलन.
त्याला मारायची संधी असून सोडतात किती वेळा.
अरे काय 90 तला हिंदी चित्रपट सुरुय का? असे ओरडावे वाटतं.

Btw, इथेच वाचलेलं म्हणून सिनेमा मरते दम तक ही सेरीज पाहिली.
बी ग्रेड सी ग्रेड चित्रपट बनवणाऱ्या 4 दिग्दर्शक विषयी डॉक्युमेंटरी म्हणता येईल.
त्यात त्यांना आताच्या काळात प्रत्येकी एक चित्रपट बनवताना दाखवलं आहे. प्रत्येकाची style वेगळी, हिशोब वेगळे. 6 दिवसात चित्रपट छापायचे हे लोकं.
ह्या चित्रपटाच्या मागचं धंद्याच, नफा तोट्याच गणित, स्पर्धा , त्यातून सुरू झालेले बिट्स दाखवण्याची स्पर्धा, त्यात काम करणारे कलाकार बरंच काही स्पर्श करून जातो विषय. अर्थात फार खोलात जाउन चूक बरोबर खरं खोटं इथवर पोहचत नाही. पण बर्याच गोष्टीवर प्रकाश पडतो.
त्यात मी पहिल्यांदा कांती शाह ला पाहिला.
गुंडांचा जन्मदाता Lol
ह्या सगळ्या बी ग्रेड मध्ये तो एकदम दादा माणूस, मिथुन, धर्मेंद्र ह्यांनाही गळाला पकडलेला व्यक्ती.
सपना की कोण ह्या चित्रपटात हिरोईन असायची बर्याच वेळा ती कसली बिनधास्त आहे हे जाणवतं.

अशा कविता वाचणार्‍यांपासून सावध रहावे हा संदेश दहाडने दिला.
तसे तर प्रत्येक कवी पासून सावधच राहिले पाहिजे. कुठे कधी बेसावध गाठून....

Manifest: सिजन ४, पार्ट २ काल आला . आवडली मला , पूर्ण सिरीज कोडे सोडवा प्रकारात होती , काही काही कोड्यांचा संदर्भ अगदी बादरायण होता , शेवटच्या पार्ट मध्ये 'अरे हा तर गेला होता ना , कसा काय जिवंत झाला परत ?' असं १-२ जणांसाठी झालेलं , पण ओव्हरऑल आवडली .

ईथली चर्चा वाचून दहाड बघून संपवली . आवडली . बरेच लूपहोल्स वाटले , शेवट अगदीच आटोपल्यासारखा झालाय .
बर्याच गोष्टी आवडल्या , बर्याच गोष्टी बघून खिन्न व्हाय्ला झालं .

सोनाक्शी सिन्हाची अंजली भाटी आवडली . कुठलाही खोटा आव नाही वाटला , अगदी प्रामाणिक .
विजय वर्मा च काम मस्त आहे , नंतर नंतर त्याला पकडून आपटावसं वाटायला लागलं .
सगळ्यात आवडला गुलशन देवरैया चा देवी सिन्ह . एकदम सही कास्टीन्ग , सही कॅरॅक्टर . प्रत्येक फ्रेम मध्ये त्याचा वावर उल्लेखनीय आहे.

बरेच प्रसंग /संवाद चांगले घेतले आहेत. शिवबद्दलचा आनंदचा राग छोट्या छोट्या प्रसंगातून दाखवलाय .
देवी सिंह आणि अंजली मधले संवाद , त्यांचे एकत्र सीन्स छान आहेत .
दोघांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर , विश्वास , बराच काळ एकत्र काम केल्यामुळे नात्यात आलेला मोकळेपणा आणि त्याचवेळी वाढलेल्या जवळीकीमुळे आलेला थोडासा अवघडलेपणा , प्रसंगी होणारे वाद , मोकळ्या गप्पा - फारच छान घेतलयं .
"ये प्रोफाईल तो मुझपे भि फीट बैठता हे " " हां पर आपके पास टाईम कहां होता है "
"ऐसी सॉरीया तुम पेहलीभी बहोत बार केह चुकी हो" , "आगेसे ऐसे नही होगा सर "
"येभी तुम कई बार कह चूकी हो " " अगली बार कुछ और कहून्गी "
देवी सिन्ह आणि अंजली मधलं नागपूरच्या डीनर च्या वेळेच संभाषण .
तिला गोळीची आयडीया कशी सुचली त्यावेळी त्यांचे संवाद .

एकंदरीत , बघण्यासारखी वाटली. पहिल्या एपिसोड नंतर चांगली पकड घेते मालिका आणि शेवटाल ती पकड सैल होते .

इथे वाचून 'फ्लेम्स' बघायला सुरुवात केलीय.
टाइमपास आहे. कामं सगळ्यांची छान आहेत. वातावरणनिर्मितीही झकास.
मात्र सगळेच कलाकार त्या पात्रांच्या वयोगटापेक्षा मोठे वाटतात. त्यामुळे किंचित विरस झाला.

'ज्युबिली' वेबसिरीज पाहिल्यानंतर त्या काळातले काही जुने सिनेमे पुन्हा लागोपाठ पाहिले. मधुमती, नौ दो ग्यारह, आरपार, कागज के फूल. आणखी काही क्यूमध्ये आहेत.
प्रत्येकातली काही ना काही एलिमेन्ट्स ज्युबिलीमध्ये अगदी नकळत आणि बारकाईने विचार करून वापरली आहेत. ती शोधायला /ओळखायला फार मजा आली.

असुर 2 पाहिली.
असुर 1 जबरदस्त आवडलेली
ही त्या तुलनेत बरीच कमी आवडली.
खूप लूप होल्स आणि चुका जाणवतात बघताना.
पहिल्या सिजन इतका हा सिजन convincing वाटत नव्हता. कोणी पाहिला असेल तर लिहा इथे.

वेगळा धागा काढुयात का, म्हणजे चुकून स्पॉयलर आले तर इथे नकोत(हे दहाड च्या या धाग्यावर झालेल्या चर्चेवरून)
असुर2 आवडला.1 आणि 2 दोन्ही मध्ये काही कायच्या काय भाग आहेतच.

असुर 1 वुट वर होतं
2 जिओ सिनेमा वर आहे.परदेशात कसं बघायचं माहिती नाही.

ताज season १ आणि २ पाहिला.
Casting आणि भाषा खटकते..
नसीरुद्दीन ला अकबर आणि संध्या ल जोधा म्हणून का घेतलं असेल??? अजूनही खूप स्टारकास्ट आहे पण तरीही पहीला भाग काही विशेष वाटला नाही..
अनारकली ल तर फारसा वावच नाहीये.
सलीम आणि अनारकली च प्रेम आपल्या पर्यंत पोहोचत च नाही.. म्हणजे त्यांची प्रेम कथा ही जाणवतच नाही सीरिज मध्ये..
सलीम आणि नुर जहा चा अभिनय छानच!
छोटी अंजुमन क्यूट दिसते. कामही छान.

नेफिवर "Our Planet" चा दुसरा सीझन पाहतोय. कधी आला ते माहीत नाही. मी सध्या पाहतोय. मस्त आहे. ड्रोन कॅमेरे वगैरे वापरून फार सुंदर चित्रण आहे. अशा सिरीज मधे डेव्हिड अ‍ॅटनबरोचे नॅरेशन म्हणजे क्रिकेट मधे रिची बेनॉ.

बाय द वे, "सूट्स" आता नेफिवर आली आहे. लाभ घ्या. प्राइमवर आधीपासूनच आहे.

खरंय, या सगळ्या डॉक्युमेंट्री अप्रतिम असतात. पाहु तितके कमीच आहे.

ब्लॅक मिरर ६ वा सिजन १ पाहिला episode शेवट किंचीत जमला नाहीये. स.हा. ला समजते ते अ‍ॅ.म. ला का नाही समजत तो उलगडा नीट नाही पोचला.

क्रॅकडाऊन सिझन १ पाहिली असल्याने सिझन २ बघणे आले. सिझन २ हा सिझन १ पेक्षा चांगला वाटतो (अजून ४ एपिसोड बघायचे आहेत). मुळात चांगली गोष्ट म्हणजे कथा एकदम वेगात पुढे जात आहे. फक्त सोनाली कुलकर्णी (मोठी) सोडली तर काहीच बोअर होत नाही. जिओसिनेमावर ही सिरीज पहाता येईल

सोनाली कुलकर्णी (मोठी) उत्तम अभिनेत्री असली तरी मलापण बोअर का वाटते ते मला अजुनही कळले नाहीये. अपवाद ‘गुलाबजाम’. आवडत नाही असं नाही पण कंटाळा येतो तिला पहाताना.

Pages