वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय वर्मा चा तेलुगू मिडल क्लास अब्बाई सिनेमा पासून तो आवडायला लागला..डार्लिंग्स मधे पण आवडला..
दहाड बघायला हवी.

Vijay Verma- Gully boy मधल अफलातून कॅरॅक्टर... आणि दहाड तर मस्तच!!
Series बद्दल सगळ्या प्रतिसादांना सहमती.

City of dreams S3 फारच अ आणि अ.. काहीच पटत नाही. शेवट तर अस वाटत .. इतके धक्के आणि विचित्र प्रसंगातून जाऊन ही खंबीर राहिली आणि त्या माणसाने एक दंगलीच सत्य सांगितल्यावर एवढं... ?? असा वाटला.. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी आणि सगळ्यांचे च अभिनय जबरदस्त.. ती दिसते पण खूप छान. पण स्टोरी अगदीच बोर.. आणि स्लो झाली आहे.
New character रणविजय सिंह तर आधी कळतच नाही काय करतो आहे नक्की.. नंतर का एपिसोड मध्ये स्वतचं कायतरी explain करतो तेव्हा त्याच्या मागचा अर्थ कळतो..मला तरी असं च झालं...

दहाडचा एक शेवटचा एपिसोड बघायचा राहीलाय, मला वाटलं किमान या भागाच्या शेवटी तरी तो पकडला जाईल, नाहीच.

ते त्याचे बाबा किती मूर्ख, अनेक वर्षांपूर्वी बायकोचा खून केलाय, म्हातारे आहेत, स्वत:चे काय एवढं. तो भुयारात लपतो तेव्हाच कळवायचे होतं पोलिसात. त्याने वडलांचे सांगितलं तर सांगितलं, जायचं जेलमध्ये. तो पळाल्यावर कसले कळवतात. भाऊही स्वत: अडकला तरी भावाचे नाव घेईना. तो विकृत माणूस किती बिनधास्त, त्याचे उद्योग सुरू.

वंदनानेही चांगलं काम केलं.

Btw, त्या प्रेमपत्राच्या उपकथानकाचं प्रयोजन कळालं नाही.>> ती मुलगी उच्च वर्गीय आहे हाय कास्ट. ह्याचा टार्गेट सेगमेंट लो कास्ट गरीब समाजातील मुली ज्यांना कायमच उपेक्षेची सवय असते. सर्व घालून पाडून बोलतात. अशी मुलगी लो सेल्फ एस्टीम वाली असते व थोड्या श्या कौतुकाने भ्रु रळून जाते. अपर क्लास मुलगीचा खून पचवणे अवघड जाईल म्हणून तिला अर्धवट सोडले त्यातही दु श्ट पणे प्रेम पत्र एक्स्पोज केले म्हणजे तिची जीवन भर मानहानी होत राहील. अनाघ्रात मुलींचे भावविशव उद्ध्वस्त करायचे हीच ती विकृती.

सोनाक्षी येते तेव्हा ती आत यायच्या आधी SP केस नीट करतो , ती आल्यावर स्पेशल चहा मागवतो असे एकदम गोड गोड बोलतो, तिच्या सिनियर समोर देखील ती असताना चाय मंगता हू वै बोलतो त्या सिन मध्ये त्याचा इंटरेस्ट सूचित होतो>>आमच्या इथे पॉश ट्रेनिन्ग मध्ये एक फिल्म दाखवली होती त्यात असेच बिहेविअर दाखवले होते. वर्क्प्लेस वातावरणा त असे वागणे बरोबर नाही.

मला तर प्रत्येक मुलगी फसते तेव्हा अरे रे असे होत होते. व ती गोव्याची बायको पण मरेल का अशी भीती वाटत होती. सोनाक्षीला संवाद फेकीचे चांगले अंग आहे. वडिलांचा हात आहे डोक्यावर.

ती गोव्याची बायको पण मरेल का अशी भीती वाटत होती.>>> मला ही.
सोनाक्षीला संवाद फेकीचे चांगले अंग आहे. >> आता इतक्या वर्षांनंतर तेवढं पण येणार नाही तर काय उपयोग इतके चान्स मिळुन मग Happy पण समहाऊ मला संवाद फेकीतच जरा कमी वाटली. डोळे, देहबोली, चेहरा अभिनय करता येतोय आता.
अभिषेक ब. ला ही जमायला लागली होती अ‍ॅक्टींग नंतर नंतर.

अभिषेक ब. ला ही जमायला लागली होती अ‍ॅक्टींग नंतर नंतर.>>>> कुठं अजून? नाही जमत..त्याची रिसेंट वेबसीरीज पाहिली होती.. मल्टीपल पर्सनालिटी डिसॉर्डर असते त्याला....दगड अभिनय आहे त्याचा त्यात.

अमा,
मी वर कुठेतरी लिहिलंय तसं, गोव्याची बायको ही त्याची समाजात मिक्स होउन चारचौघासारखं आयुष्य जगून लो profile राहण्याची पद्धत आहे. त्याने बरीच इम्युनिटी मिळते त्याला.
Just like trinity किलर dexter मधील.
म्हणून तर राजस्थान मध्ये असताना त्याच्या बायकोचे अफेअर कळाल्यावर देखील तो तिला इजा पोहचवत नाही.
ती जेव्हा त्याला स्वतःहून सांगते तेव्हाही तो विषय कट करतो आणि सोडून जायचे नाही असेच म्हणतो.

पहील्या भागापेक्षा मला शेवटचा भाग अति स्लो वाटला. काय शेवटी पांच मिनिटांत पकडले. बरं त्या अंजली आणि सरांचे काही अफेअर नसतं, सरांना ती आवडत असते एवढंच तरी त्याची बायको आणि हा विकृत शेवटी असं का म्हणतो. नशीब या सीझनला पकडला गेला असं म्हणायला हवं, तरी मला ते त्रोटक वाटलं. अर्धा भाग झाल्यावर पकडायला हवं होतं आणि नंतर निदान अंजली, त्याच्या दोन बायका आणि रेणुका यांनी तुडवायला हवं होतं.

मला हा असा विकृत का झाला त्याचं कारण समजलं नाही. आईला वडलानी मारले तर उलट त्याचा असा बायकांचा छळ करणाऱ्या पुरुषांवर राग हवा, हैवान होऊन स्वत: खालच्या जातीच्या मुलींना का त्रास देतो.

मुळ स्टोरी वरवर समजली, त्या मोहन सायनाईडची फाशी बदलून जन्मठेप झाली असं वाचलं, अंधा कानून.

फार अस्वस्थता आली सिरिज बघून, नशीब दोघी आणि त्याची पहिली बायकोही वाचली.

बहुतेक आईचं अफेअर म्हणून बापाने खून केला असं असेल.म्हणून सर्व सो कॉल्ड 'इझी' बायकांना फसवून मारणे(अर्थात सोनं आणि शारीरिक सुख हे साईड फायदे आहेतच).
खरं तर बायकोला या इन्स्पेक्टर माणसाने प्रभावीपणे समजवायला हवं होतं की काही नाही.त्याने एकदा बोलून पुढे विषयच सोडून दिलाय.
आनंद मूळचा अतिशय धूर्त असल्याने सोनाक्षी ला निव्वळ अपसेट करायला बोललेला असू शकतो.किंवा काहीतरी लक्ष त्याच्यावरून हटवून/पोलिसांत भांडणं लावून स्वतः सुटायला.

बहुतेक आईचं अफेअर म्हणून बापाने खून केला असं असेल >>> हे मलाही वाटलं, पण मग बापाचा एवढा राग केला नसता असंही वाटलं.

अन्जू +१. त्याच्या अशा सायकीचं कारण धड समजतच नाही. शेवट फारच गुंडाळुन टाकल्यासारखा वाटला. रादर काय शेवट करावा हे न समजल्याने सरधोपट उरकुन टाकला असं झालं.
एकुण सिरिअल मात्र आवडली.

*** स्पॉइलर अलर्ट ***

सायकोपॅथ आहे तो. 'कारण' असं नाही लागत ना त्यांना - डिफेक्टिव वायरिंग!
राग आईचा आहे ना बापाचा - बापाकडे पैसा (आणि सायनाइड वगैरे) मिळतं म्हणून 'उपयुक्त' आहे तो फक्त. प्रत्येक नात्यात तो फक्त उपयुक्तताच पाहतो, रागलोभ नाही.
या शोमधली व्हिलनसकट बरीच पात्रं आपापल्या परिघात लग्नसंस्था क्वेशन करताना दिसतात मात्र.

सॉरी सॉरी, पण सस्पेन्स नाहीये यात - गुन्हा कोण आणि कसा करतो आहे हे दिसतं आपल्याला, त्याचा तपास आणि पाठलाग कसा होतो तेच इन्टरेस्टिंग आहे.

ज्यांना सिरिज बघायची आहे त्यांनी माझ्या पोस्टस वाचू नयेत म्हणून मी पहिल्याच पोस्टमध्ये लिहिते की माझ्या पोस्टसमध्ये स्पॉयलर्स असतील, त्याशिवाय मला चर्चाच करता येत नाही. मोघम नाही लिहिता येत.

सॉरी रघू आचार्य.

काही पोस्टमधे स्पॉयलर्स दिसले. त्यामुळे आता डोळे किलकिले करून दहाड संदर्भात काही दिसले कि स्किप करावे लागतेय. त्यामुळे स्पॉयलर अलर्ट दिसला नाही.

मालिका बघणे होत नाही तोपर्यंत इकडे न फिरकणे उत्तम!

मालिका बघणे होत नाही तोपर्यंत इकडे न फिरकणे उत्तम! >>>>> पण सस्पेन्स अजिबात नाही. आपल्याला 8 एपिसोड्सच्या सिरीज मधील एपि 1 मधेच खुनी कोण ते दाखवलं आहे. ही investigation story आहे.

नाराज होऊ नये.
रहस्य नाही हे मान्य आहे. पण तपास कसा होतो, उकल कशी होते हाच जीव आहे या मालिकेचा. ते उघड होऊ नये एव्हढीच माफक अपेक्षा आहे. त्या दृष्टीने काळजी घ्यावी इतकेच. स्पॉयलर असेल तर सुरूवातीस ठळक अक्षरात लिहावा.

वेगळा धागा असेल तर पळेल.

ओह खरंच.बरेच स्पॉयलर झाले.
या धाग्यावर असलेले प्रतिसाद नवा दहाड चा धागा काढून त्यात हलवता येतील का?

कोळ्यांनी मनावर घेतले तर नवा धागा घेऊन जाळे विणले जाऊ शकते. पण प्रतिसाद हटवण्यासाठी कोदंडपाणि दंडाधिकाऱ्यांनी मनावर घेतले पाहिजे.

झाली पाहून. आवडली.
शेवट गंडलाय असे वाटत नाही. क्लायमॅक्स काहीतरी ड्रामाटिक करून हास्यास्पद करण्यापेक्षा जमिनीवरचा घेतला हे बरं केलं. पुढ्चा सीजन येईल असे वाटले. सोनाक्षी सिन्हाने छान काम केलेय. ती कुठेच सोनाक्षी सिन्हा वाटली नाही. राजस्थानी लेहजा, शिवाय तिची पार्श्वभूमी हे सगळं उत्तम सांभाळलंय.

इंग्रजीत एक कादंबरी होती, ज्यात एका उमरावाच्या व्हिलामधे खून पडत असतात.. त्यात एक कृष्णवर्णिय अधिकारी मुख्य डिटेक्टीव्ह असतो. त्याच्यामुळे त्याला येणार्‍या अडचणी कथेला उठाव आणतात. तशी एखादी कथा भारतात होऊ शकते असे वाटले होते. या मालिकेत जात + महिला असे कॅरेक्टर घेतले आहे आणि ते कुठेच ठिगळ वाटत नाही. तसेच प्रचारकीही झालेले नाही. पोलीस तपासाच्या बाबतीत क्राईम पेट्रोल ही झालेली नाही मालिका आणि सीआयडी सारखी अ आणि अ सुद्धा नाही. खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. इतकं पुरेसं आहे.

शेवट त्रोटक वाटला मला, गंडलाय असं नाही वाटलं मला, गुंडाळला असं वाटलं.

वाह तुम्ही एका दिवसात बघितली, मस्तच.

फार काही नाही त्या मुलींच्या वतीने आणि तिला जातीवरून बोलला आणि अफेअरचे खोटे आरोप केले त्यावरूनही आणि पोलीस या नात्यानेही एक ठेऊन द्यायला हवीच होती.

खरं तर तुडवायला हवं होतं, पट्याने मारलं असतं तरी चाललं असतं पण किमान एक मुस्कटात तरी द्यायलाच हवी होती हे मात्र वाटलं.

हा धागा पाहिला नव्हता, म्हणून समजले नाही. दहाड पण पाहिली नाही. धागा चालण्यासारखा मसाला ( राजकारण / धार्मिक / जातवाद / सेन्सॉरेबल सीन्स इत्यादी ) आहे का ?
काढायला काही नाही, फेल जाऊ नये.

स्कुप (नेटफ्लिक्स) -

दिग्दर्शक हंसल मेहताने स्कॅम 1992 च्या यशा नंतर सत्य घटनांवर वर बेस अजून एक सिरीज काढली आहे.

सिरीज, पत्रकार ज्योतिर्मय डे मर्डर केस वर आधारित आहे, ज्यात अजून एक पत्रकार जिग्ना वोरा ला सस्पेक्त म्हणून नेम केलं होता.

आता पर्यंत आम्ही दोनच एपिसोड पहिले आहेत. सो फार सिरीज चांगली वाटतेय.

झिशान अयुब इज द स्टॅन्डआऊट ऍक्टर फ्रॉम द कास्ट. करिष्मा तन्ना ने हि मेन रोल मध्ये चांगलं काम केलंय.

हरमन बावेजा ला पोट सुटलेल्या मध्यमवयीन कॉप च्या भूमिकेत पहिली 5-10 मिनटे ओळखलेच नाही.

लिडिया पोएट ( नेफि) :
१८ व्या शतकातील ईटालयीन स्त्री वकील . समाजात स्त्री वकील आणि एकंदरीतच जास्त शिकलेल्या स्त्रियांना फारशी मान्यता नाही . तिचा भाउ एन्रिको ही वकील आहे . सुरुवातीला तिच्या कामाला विरोध करणारा भाउ नंतर तिला स्व:ताची असिस्टन्ट म्हणून परवानगी देतो . तिची हुशारी आणि कुवत कळल्यावर तिच्यावर घतलेल्या बंदीविरोधात अपिल करायला तिला मदत करतो. लिडिया च्या वहिनीचा भाउ पत्रकार आहे . " तू तू मै मै " करत तो तिला तिच्या कामात मदत करतो .
साध्या सोप्या केसेस आहेत , थोडासा फॅमिली ड्रामा आहे , खरतर लिडीया वकील न वाटता डिटेक्टीव जास्त वाटते.मूळ ईटालियन सिरिज , ईन्ग्लिश डब्ब्ड आहे साधीशी सीरिज आहे पण त्या वेळेचा समाज , लोकांच वागण , रूढी वगैरे बघायला आवडतेय . डोक्याला फार त्रास नको म्हनून सध्या बघतेय ही सिरिज .

Pages