Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला अजून एक दहाड आवडलेली
चला अजून एक दहाड आवडलेली व्यक्ती आली.

पोलिस लोकांच्या साईड लाईन
पोलिस लोकांच्या साईड लाईन स्टोरीज ज्याची काही गरज नव्हती, सर्वच ठिकाणचे पुरूष (एस पी सकट) सोनाक्षीला पाहिल्यावर लाळ टपकायला लागतात, टपोरी मुले सोनाक्षीला पोलिसाच्या वेषात बघूनही तिला चिडवतात, छेडतात तरी ती शिव्या घलण्याव्यतिरीक्त काही करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत पण ओव्हरऑल सिरीज चांगली आहे. >>>> हे काय नवीन , हा हा हा हा हा .
सोनाक्षीला रस्त्यावरच्या
सोनाक्षीला रस्त्यावरच्या पोरांनी छेडायचे सीन्स आहेत एक दोन (जे अगदी पॉसिबल आहेत) पण एसपी ने तसे काही केलेले नाही लक्षात. साइड स्टोरीज बद्दल - मलाही तसे वाटले होते आधी, की याची काय गरज आहे. पण नंतर वाटले की पोलिस असले तरी ते रोबॉट नाहीत, माणसे आहेत ती, त्यांच्यावर अशा मोठ्या केस चा आणि व्हिक्टीम्स ना जवळून पाहिल्याचा दृष्य अदृष्य परिणाम होणारच. जसे सोनाक्षीच्या सिनियर ने मुलीला सक्षम बनवण्याचाविचार करणे, दुसर्या कलीग ने या अशा जगात मूल आणावे की नाही असा विचार करणे, सतत सोबत राहून नकळत सोनाक्षी आणि तिच्या सिनियर मधे एक अनसेड ( मानसिक) कंफर्ट/ जवळीक निर्माण होणे वगैरे त्यामुळे ही ह्यूमन बाजू दाकवली ती मला नंतर आवडली अॅक्च्युअली.
हो अगदी.
हो अगदी.
मला सर्वांची पात्रं रोचक वाटली.
तेरगी बद्दल आधी तो गे आहे असं वाटलं होतं, त्याची बाप बनण्याच्या बातमीवर प्रतिक्रिया बघून.
दहाड च्या कथेचा मूळ गाभा खूप सॅड आहे.आणि त्याचा अधून मधून सोनाक्षी वर परिणाम होताना दाखवलाय तेही ह्युमन वाटतं.
विजय वर्मा असे रोल जबरदस्त करतो.
सोनाक्षी येते तेव्हा ती आत
सोनाक्षी येते तेव्हा ती आत यायच्या आधी SP केस नीट करतो , ती आल्यावर स्पेशल चहा मागवतो असे एकदम गोड गोड बोलतो, तिच्या सिनियर समोर देखील ती असताना चाय मंगता हू वै बोलतो त्या सिन मध्ये त्याचा इंटरेस्ट सूचित होतो.
सोनाक्षी येते तेव्हा ती आत
सोनाक्षी येते तेव्हा ती आत यायच्या आधी SP केस नीट करतो , ती आल्यावर स्पेशल चहा मागवतो असे एकदम गोड गोड बोलतो, तिच्या सिनियर समोर देखील ती असताना चाय मंगता हू वै बोलतो त्या सिन मध्ये त्याचा इंटरेस्ट सूचित होतो.
दहाड पूर्ण केला.जबरदस्त आहे
दहाड पूर्ण केला.जबरदस्त आहे.नक्की बघावे असे.खूप वेगवेगळे मुद्दे कव्हर केले आहेत.सर्वांचा अभिनय आवडला.विजय वर्मा तर एकदम चेरी ऑन टॉप.
दहाड बघायला घेतली, दोन
दहाड बघायला घेतली, दोन एपिसोडस बघितले. मला पहीला स्लो वाटला नाही, इन जनरल स्टोरीचा अंदाज यायला तेवढा वेळ लागतोच. ते कॅरॅक्टर धन्य आहे, खोटेपणा करणाऱ्याला किती वेगवेगळ्या आघाड्या लक्षात ठेवाव्या लागतात, अनेक फेसेस ठेऊन वावरावे लागतं, कशी काय लीलया करू शकतात अशी लोकं. किती सहजतेने करतो तो हे सर्व. फार किळस येते त्याची.
विजय वर्मा, सोनाक्षी, तिचा बॉस ह्यांचा अभिनय जबरदस्त. तो गावचा यंग जमीनदार त्यानेही काम चांगलं केलं आहे.
स्पॉयलर असतील माझ्या लिखाणात.
ती ट्रेन येते तेव्हा सोनाक्षी तो पिवळा झेंडा दाखवून ट्रेन थांबवू शकत नाही का, ते सोपं होतं, भले रंग काही असो कोणीतरी थांबवतेय हे समजलं असतं ना. ती सोडवत बसते त्याला, अगदी काही सेकंदभराच्या फरकाने वाचवते, थरार असला तरी काय, टिपिकल फॉर्म्युला वाटला तो. जीव गोळाही झालेला.
टपोरी मुलं असं एरवी डेरींग करु शकले असते का जर ती त्या गावातलीच आणि खालच्या जातीतली नसती तर असा विचार आला मनात, तिने धरुन धोपटायला हवं होतं. थोडाफार तरी रिस्पेक्ट हवा ना.
विजय वर्मा कशात होता अजून, मला आठवत नाहीये त्याला कुठे बघितल्याचं. गुगलून बघते.
सिटी ऑफ ड्रीम्स ३ - ३ भाग
सिटी ऑफ ड्रीम्स ३ - ३ भाग पाहून झाले. फारच अ. आणि अ. वाटत आहे. बेसिक लॉजिक पण हरवले आहे. सीझन २ पण मला फारसा आवडला नव्हता. खूपच फ्लॉ होते. पहिला सीझन फक्त चांगला होता अशा निर्णयाप्रत आले आहे.
सिटी ऑफ ड्रीम्स ३ - ३ भाग
सिटी ऑफ ड्रीम्स-३ चे ३ भाग पाहून झाले. फारच अ. आणि अ. वाटत आहे. बेसिक लॉजिक पण हरवले आहे. सीझन २ पण मला फारसा आवडला नव्हता. खूपच फ्लॉ होते. पहिला सीझन फक्त चांगला होता अशा निर्णयाप्रत आले आहे.
टपोरी मुलं असं एरवी डेरींग
टपोरी मुलं असं एरवी डेरींग करु शकले असते का जर ती त्या गावातलीच आणि खालच्या जातीतली नसती तर असा विचार आला मनात, तिने धरुन धोपटायला हवं होतं. >>> मलाही असंच वाटलं ह्याबाबत पण! मुलगी कुठल्याही वेषात असो तिला हे झेलावंच लागतं ...
ह्या बाबतीत तिने गप्प बसायला
ह्या बाबतीत तिने गप्प बसायला नको होतं, वर्दी असताना असं करत असतील तर एरवी ही मुलं इतर कोणत्याही मुलींची छेड काढत असतीलच की (इथे खालची जात असं नाही, मुलगी म्हणायचं आहे), त्यामुळे याबाबतीत तिने पॉवरचा वापर करायला हरकत नव्हती. ते गुन्हाच करत होते ना.
विजय वर्मा गुगललयावर आता यु ट्यूब त्याचे इंटरव्युजही दाखवत आहे. एक सोनाक्षी बरोबर बघितला. तो मूळचा राजस्थानमधला पण हैद्राबाद मध्ये वाढलेला आहे असं त्याने सांगितलं, आई बहुतेक तेलुगू आहे आणि वडील राजस्थानचे.
दहाड सिरीज पाहिली.
दहाड सिरीज पाहिली.
कथा म्हणून भयंकर आहे. असं कसं काय कोणी करू शकतो इतके वर्षानुवर्ष... आणि कोणालाही कळत सुद्धा नाही...
बाकी सिरीज म्हणजे अतिशय सुंदर अभिनय, आणि एंगेजींग आहे.
शिव्या, घाणेरडी भाषा, सेक्स, violance याशिवाय चांगली सिरीज काढता येते याचा वस्तुपाठ. इथे तर प्रचंड scope होता सगळ्या गोष्टींना.
सोनाक्षी , विजय वर्मा आणि देवीलाल सगळ्यांची कामं एकदम टॉप.
जातीपतीमुळे किती काय काय सहन करावं लागतं ते प्रीचींग मोड n वापरता दाखवलं आहे.
सोनाक्षीला लहान मुलांनी चिडवणे, घराबाहेर ठेवणे , टोमणे मारणे हे खालच्या जातीची स्त्री म्हणून सहन करावं लागतं आणि तिचे सहकारी, हाताखालचे लोक हे असं होतंच असं मान्य करून असतात हे वाईट आहे. इनफॅक्ट सहकर्यापैकी बऱ्याच जणांना ती खालच्या जातीची स्त्री असून आवाज चढवून बोलते हे आवडत नाही. ती मुलांना काही करत नाही कारण किती फ्रंट वर तेच तेच करणार.
ती शेवटी चिडून आईला सांगते ते भारी आहे. प्रत्येक मुलीच्या घरी तिला जे ऐकू येतं ते हळूहळू डोक्यात साठत जातं आणि मग एकदम चिडून आईला बोलते.
विजय वर्मा darlings मध्ये पण होता. आणि तिथेही विकृत होता. आता त्याला दुसऱ्या ठिकाणी बघितलं की हेच आठवणार .. काम असं karatobki त्या charactor ची किळस येते.
Ott platform मुळे इतका चांगला कंटेंट आणि विषय येत आहेत आणि इतक्या चांगल्या actors ला स्कोप मिळत आहे हे छान आहे.
Spoiler
मुळात हे गुन्हे सुद्धा घडण्यामागे आणि पकडले न जाण्यामागे जाती व्यवस्था , हुंडा , आणि घरातून पळून गेल्यावर मुलींशी पूर्ण संबंध तोडून टाकणे हेच आहे.
सत्यघटना २००० सालाच्या आसपास घडली आहे पण अजूनही असं होतंच असेल.
अलीकडेच घडलेलं श्रद्धा प्रकरण ज्यात मुलगी मेली तरी सहा आठ महिने आईबापाला कळलंच नाही.
आतातरी लग्न झालं, पळून गेली म्हणजे मुलगी आम्हाला मेली असा विचार सोडावा लोकांनी.
Spoiler end.
(लेडी इंस्पे., गावातली भाषा आणि जातपात अँगल मुळे मध्येच एकदम कटहल आणि ही सिरीज यात कन्फ्युजन झाले )
विजय वर्मा अलिया भट बरोबर
विजय वर्मा अलिया भट बरोबर होता डार्लींग चित्रपटात.
दहाड खुप आवडली.
तिने धरुन धोपटायला हवं होतं. << हो ते तिच्या स्वभावाला सुट ही झालं असतं
मैत्रेयी +100
मैत्रेयी +100
नाही आवडली City of dreams . उगाच ताणली आहे..
विजय वर्मा गली बॉय मध्ये
विजय वर्मा गली बॉय मध्ये रणवीर चा लहान मुलांना ड्रग ट्रेड करायला लावणारा मित्र.डार्लिंगस मध्ये आलीया चा जुलमी नवरा.ftii मध्ये शिकलेला आहे.
SHE webseries मध्ये
SHE webseries मध्ये हायद्राबादी टोन खुप भारी बोलला आहे तो...
ओहह हा वर्मा असलेच निगेटीव्ह
ओहह हा वर्मा असलेच निगेटीव्ह रोल करतो का सगळीकडे.
एखादा पॉझिटीव्ह बघायला आवडेल, कविता शिकवताना सुरुवात आहे, तिथे किती मस्त दाखवला. नंतर कारमधून जाताना पहील्या मुलीला विचारतो तेव्हा मात्र विचित्र वाटलाच आणि नंतर विकृत. मग त्याचा सभ्य चेहेरा खटकत राहिला मात्र. रोल भारी केलाय यावर दुमत नाही.
चार एपिसोडस झाले बघून.
चार एपिसोडस झाले बघून.
तो आनंद त्या हॉटेलातून बाहेर पडतो, ते cctv त पकडलं जात नाही का, जय मरतो त्यावेळी.
ही सत्य घटना असेल तर इतकी वर्षे इतकं सुरू रहाते आणि इतक्या 27 किंवा त्यापेक्षा जास्त मुली गायब होतात एकाच राज्यातल्या तरी सगळे शांत, आश्चर्यकारक आहे हे.
City of Dreams.. ऊत्तम वेगवान
City of Dreams.. ऊत्तम वेगवान कथानक.. ज्या ट्विस्ट वर सिझन 2 संपवला तिथून पुढे सुरू होतेय. प्रिया बापट चा कमाल अभिनय आहे.. राजकारणाचे सुक्ष्म बारकावे चांगले टिपलेत
चुकून वेनसिरीजची पोस्ट
चुकून वेनसिरीजची पोस्ट चिकवावर टाकली होती. ईथे कॉपीपेस्ट करतो.
Crash landing on You - नेटफ्लिक्स बघत आहे.
स्टोरी टाईपायला कंटाळा म्हणून गूगाळून कॉपीपेस्ट करतो.
A paragliding mishap drops a South Korean heiress in North Korea - and into the life of an army officer, who decides he will help her hide
मस्त आहे. बॉलीवूड टच आहे. मजा येत आहे बघायला. रोमांटीक ॲंगल फार आवडला आहे. मूळ भाषा कोरीअन असल्याने बायकोने हिंदी डब वर्जन लावले आहे त्यामुळे मलाही झेपत आहे. दिड दिड तासाचे पिक्चरसारखे मोठमोठे एपिसोड सलग बघणे चालू आहे
मला दहाड मधे एक समजलं नाही की
मला दहाड मधे एक समजलं नाही की त्या स्टुडंटला हाच पहील्यांदा गुलाब आणि पत्र लिहीतो, मग ती रिस्पॉन्स देते तेव्हा हा सभ्यपणाचा आव आणून तिचं बिंग फोडतो, तेव्हा ती त्याने लिहीलेलं मूळ पत्र का नाही दाखवत का तो फक्त गुलाब देतो, ते फार समजलं नाही, ती त्याचं नाव घेत का नाही.
गुलाब देणं आधीचा बेत होता
गुलाब देणं आधीचा बेत होता.म्हणजे पुढचं सावज ही स्टुडंट होतं.पण त्याच्या आत अटक झाल्याने स्वतःची इमेज सुधारायला तिलाच अडकवलं.
फक्त गुलाब देतो
अंजु, तो फक्त गुलाब देतो.
अनु म्हणतात तेच बरोबर आहे पण ते एकदम abrupt आल्याने लक्षात येत नाही.
सिटाडेल सिजन 1 संपला.
एक ट्विस्ट आहे शेवटी.
सलग पाहिल्यावर फील येईल कदाचित.
प्रत्येक शुक्रवारी एक भाग येत होता मी तसे पाहिलेत.
पुढचा सिजन येईल लवकरच.
ठिकठाक सेरीज म्हणता येईल.
सेम पिंच झकास...
सेम पिंच झकास...
पण नेक्स्ट Citadel 2024 चे प्रोमो दाखवले शेवटी त्यात तर दुसरीच कुठली कथा वाटतेय...
विजय वर्मा कशात होता अजून,
विजय वर्मा कशात होता अजून, मला आठवत नाहीये त्याला कुठे बघितल्याचं. गुगलून बघते.
मिर्झापुर २ मध्येही होता हा. लिलीपुटचा मुलगा (डबल रोल). त्यातला एक (नक्की कोण ते सस्पेंस ठेऊन) मरतो शेवटी.
शिव्या, घाणेरडी भाषा, सेक्स, violance याशिवाय चांगली सिरीज काढता येते याचा वस्तुपाठ. इथे तर प्रचंड scope होता सगळ्या गोष्टींना.
दहाड मध्ये घाणेरडी भाषा नाही पण काही वेळेला शिव्या आहेत (ज्या हळू आवाजात दिल्या जातात). अगदी सोनाक्षीच्या तोंडात पण शिव्या आहेत. तसेच सेक्स सिन्सही आहेत.
तो आनंद त्या हॉटेलातून बाहेर पडतो, ते cctv त पकडलं जात नाही का, जय मरतो त्यावेळी.
अगदी हेच वाटले. त्या ५ स्टार हॉटेलात एकाची (म्हणजे जयची) हत्या होते आणि तरीही cctv फुटेज का पाहिले जात नाही?
City of Dreams चा तिसरा सीझन
City of Dreams चा तिसरा सीझन चालू केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण झालेले आहे त्याचं डॉक्युमेंटेशन असावं अशी मालिका आहे. पण एव्हढेही नाही कि रक्ताची नाती एकमेकांना जगातून संपवतील. कोणताही पक्ष झाकावा अशी स्थिती महाराष्ट्रात नाही. रमणिकभाईंसारखे गुज्जू पैसेवाले २००० पर्यंत पैसे पुरवत. त्यामुळे त्यांचा दबदबा असे. पण आता नेतेच एव्हढे पैसेवाले झालेत कि लिलावात सरकारी मालमत्ता विकत घेतात.
काळा पैसा पांढरा करण्याचे डिटेल्स ऐकून होतो. कलाकार ओळखीचे आहेत, अभिनय सफाईदार आहे आणि एंगेजिंग आहे म्हणून पाहून झाली. नाहीतर आता मनोरंजनाचा नॉशिया आल्यासारखे वाटते.
City of Dreams चा तिसरा सीझन
City of Dreams चा तिसरा सीझन पहिल्या दोघांपेक्षा आवडला . कमी रक्तपात , कमी शिव्या , कमी सेक्स सीन्स .
प्रिया बापट फारशी आवडत नाही , पण यात तिचा अभिनय चांगला आहे .
अकुलकर्णी , सचिन , वसिम खान , ओजस , डॅनी , अँजी अगदी तो कॅस आणि छोटी सुहाना पण सगळेच आवडले .
जगन अण्णाला मोजून २०-३० शब्द असतील .
त्या एका गेस्टला ईतके दिवस एका गोष्टी साठी लपवून ठेवलं हे जरा जास्तच होतं. ते रहस्य जरा फुसकंच निघालं
वसीम खान (एजाज खान) चे पात्र
वसीम खान (एजाज खान) चे पात्र ना शेंडा न बुडखा आहे तरी ते खूप फुटेज खातं. हे पात्र सुपरकॉप दाखवण्यामागे अधून मधून वेगवान घडामोडी दाखवता याव्यात हा हिशेब आहे. पण त्या नादात तो त्याचं परदेशी रिव्हॉल्व्हर घेऊन परदेशात कसा काय जातो याकडे दुर्लक्ष केले आहे. मुंबईतच सिक्युरिटी स्कॅन मधे बाहेर काढले असते. दुसऱ्या देशात प्रश्नच नाही. रॉ चे लोक सुद्धा गन घेऊन कुठेही घुसत नसतील.
विजय वर्मा कशात होता अजून,
विजय वर्मा कशात होता अजून, मला आठवत नाहीये त्याला कुठे बघितल्याचं. गुगलून बघते.
मिर्झापुर २ मध्येही होता हा. लिलीपुटचा मुलगा (डबल रोल). त्यातला एक (नक्की कोण ते सस्पेंस ठेऊन) मरतो शेवटी. >>> थॅंक यु. मी नाही बघितलं. मी गुगलले तर त्याने कोणत्या भुमिका केल्यात ते आलं. त्यातलं काहीच मी बघितलेलं नाहीये.
सिटी ऑफ ड्रीम्समधे ती माझ्या आवडत्या चांदेकरला मारते ना, प्रोमोत मागे बघितलेलं, म्हणून मी नाही बघत.
धन्यवाद अनु आणि झक्या, मी विचारलेली घटना उलगडून सांगितल्याबद्द्ल.
Pages